जॅकरन्डा

Submitted by शापित गंधर्व on 1 November, 2011 - 11:01

पहिल्यांदा बघितलं तेंव्हा मी हरखुन गेलो होतो. आपल्या कडे गुलमोहोर फुलल्या वर जसे संपुर्ण झाड
लाल लाल दिसते तसचं पण निळ्या/परपल रंगात.

या दिवसांत जोहनसबर्गच्या रस्त्यांवरुन फिरतांना निळ्या फुलांनी मोहरलेली जॅकरन्डा (Jacaranda) ची झाडे तुमचं लक्ष वेधुन घेतात.

जॅकरन्डा आणि माबोकरांची भेट घडवण्याचा मोह आवरला नाहि म्हणुन हा खटाटोप.

जॅकरन्डा बद्दल खालिल माहिती आंतरजाला वरुन साभार.
-----------------------------------------------
दक्षिण अमेरीकेचा ट्रोपिकल आणि सब ट्रोपिकल (मुख्यत्वे अर्जेंटिना, ब्राझिल, पेरु आणि उरुग्वे) हा भाग जॅकरन्डाचे उगमस्थान आहे. नंतर तो ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड, भारत, फिजी आणि अफ्रिकेच्या काहि भागात पसरला.
जगभरात मिळुन जॅकरन्डाच्या ४९ जाती आढळतात. लहान झुडुप ते मोठ्ठे झाड अशा विस्त्रुत प्रकारात. दक्षिण अफ्रिकेत ते दिसतात झाड रुपात. पाचं पाकळ्या मिळुन जॅकरन्डाचे एक फुल बनते. निळा हा मुख्य रंग असला तरी काहि जातित या पाकळ्या पांढर्या रंगाच्या पण असतात.

दक्षिण अफ्रिकेचि प्रशासकिय राजधानी प्रिटोरीया "सिटि ऑफ जॅकरन्डा" म्हणुन ओळखली जाते. संपुर्ण शहरात, रस्त्याच्या दुतर्फा आणि पार्क मधे जॅकरन्डाच्या झाडांची भरपुर लागवड केली आहे.
ओक्टोबर्/नोव्हेंबर च्या दरम्यान आजुबाजुच्या टेकड्यांवरुन जर तुम्हि प्रिटोरीया शहरावर नजर टाकलित तर संपुर्ण शहर निळी दुलई पांघरल्याचा भास होतो.

जॅकरन्डाचा मुख्य उपयोग शोभेचि झाडे म्हणुन जरी केला जात असला तरी त्याचे ईतरहि उपयोग आहेत. जसे ब्राझेलियन जॅकरन्डाच्या लाकडाचा उपयोग एकोस्टिक गीटार बनवण्या साठी करतात तर दक्षिण चिन मधे जॅकरन्डाच्या पानांचा उपयोग निळ्या रंगाचा डाय बनवण्या साठी करतात.
----------------------------------------------------------------------------
प्रकाशचित्रे:

जॅकरन्डा माझ्या नजरेतुन - रिपब्लिक रोड, जोहनसबर्ग

खालिल प्रकाशचित्र आंतरजाला वरुन साभार:

जॅकरन्डा - १२ मुख्य रस्ता, बेंगलुरु, भारत ()

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फोटोज भयानक आवडले.
लॅबर्नम नंतर हे माझे आवडते झाड'एय..
असाच उतल्यामातल्यासारखा बहर असावा तरच तो जॅकरांडा. खुडूक आलेला जॅकरांडा आपल्यालाच काय खुद्द जॅकरांडालाही नसेल आवडत.
२रा, ४था, ५वा आणि ६वा फोटो खूप सुंदर, डोळे निवले अगदी.

असाच उतल्यामातल्यासारखा बहर असावा तरच तो जॅकरांडा. खुडूक आलेला जॅकरांडा आपल्यालाच काय खुद्द जॅकरांडालाही नसेल आवडत.>>>>>>+१ Happy

शापितगंधर्व,
एकसे एक फोटो, डोळे थंडावले बघुन. ही असली चित्रं म्हणजे स्वप्ननगरीतलीच वाटतात. तुम्ही प्रत्यक्ष त्या नेत्रसुखद दृश्याचे साक्षिदार झालात... नशिबवान आहात. Happy

मस्त मस्त!!
हे प्रत्यक्ष बघणं कसलं खल्लास असेल.

१३-१४ वर्षापूर्वीपर्यंत तरी आपटे रोडला(आणि गल्ल्यांमधे) इतका ग्रेट नाही पण कल्पना यावी एवढा तरी जॅकेरन्डा फुलायचा. आता बहुतेक नाहीये.

मस्त!

झक्की, आमच्या कॅलीफोर्नीयातीलही जॅकॅरन्डा असेच फुलतात हो.
नीधप, आयुक्कात आहेत अनेक झाडे - मी तिथे असतांना बरीच लहान होती ती, आता जास्त बहरत असावीत.

तुफान मित्रा...
२ रा तर निव्वळ अफलातुन...
कौतुक करायला शब्द नाहित.
बंगलोर लाही जॅकरण्डा ची झाडे आहेत पण एवढी सुंदर उधळण नसते...
लगे रहो.

माय गॉड कांट बिलिव.... ह्या रस्त्यावरुन चालणारे लोक काय भाग्यवंत आहेत.... हेवा हेवा.. जळले मी .. Happy

धन्स मंडळी.....माझ्या पहिल्याच प्रयत्नाला भरभरुन प्रतिसाद दिलात्....भरुन पावलो.... ___/|\___

बंगलोर लाही जॅकरण्डा ची झाडे आहेत पण एवढी सुंदर उधळण नसते... >>> अनुमोदन.. आहेत झाडे पण अशी ओळीने नाहीत .. तरीही सुंदरच दिसतात.

Pages