पहिल्यांदा बघितलं तेंव्हा मी हरखुन गेलो होतो. आपल्या कडे गुलमोहोर फुलल्या वर जसे संपुर्ण झाड
लाल लाल दिसते तसचं पण निळ्या/परपल रंगात.
या दिवसांत जोहनसबर्गच्या रस्त्यांवरुन फिरतांना निळ्या फुलांनी मोहरलेली जॅकरन्डा (Jacaranda) ची झाडे तुमचं लक्ष वेधुन घेतात.
जॅकरन्डा आणि माबोकरांची भेट घडवण्याचा मोह आवरला नाहि म्हणुन हा खटाटोप.
जॅकरन्डा बद्दल खालिल माहिती आंतरजाला वरुन साभार.
-----------------------------------------------
दक्षिण अमेरीकेचा ट्रोपिकल आणि सब ट्रोपिकल (मुख्यत्वे अर्जेंटिना, ब्राझिल, पेरु आणि उरुग्वे) हा भाग जॅकरन्डाचे उगमस्थान आहे. नंतर तो ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड, भारत, फिजी आणि अफ्रिकेच्या काहि भागात पसरला.
जगभरात मिळुन जॅकरन्डाच्या ४९ जाती आढळतात. लहान झुडुप ते मोठ्ठे झाड अशा विस्त्रुत प्रकारात. दक्षिण अफ्रिकेत ते दिसतात झाड रुपात. पाचं पाकळ्या मिळुन जॅकरन्डाचे एक फुल बनते. निळा हा मुख्य रंग असला तरी काहि जातित या पाकळ्या पांढर्या रंगाच्या पण असतात.
दक्षिण अफ्रिकेचि प्रशासकिय राजधानी प्रिटोरीया "सिटि ऑफ जॅकरन्डा" म्हणुन ओळखली जाते. संपुर्ण शहरात, रस्त्याच्या दुतर्फा आणि पार्क मधे जॅकरन्डाच्या झाडांची भरपुर लागवड केली आहे.
ओक्टोबर्/नोव्हेंबर च्या दरम्यान आजुबाजुच्या टेकड्यांवरुन जर तुम्हि प्रिटोरीया शहरावर नजर टाकलित तर संपुर्ण शहर निळी दुलई पांघरल्याचा भास होतो.
जॅकरन्डाचा मुख्य उपयोग शोभेचि झाडे म्हणुन जरी केला जात असला तरी त्याचे ईतरहि उपयोग आहेत. जसे ब्राझेलियन जॅकरन्डाच्या लाकडाचा उपयोग एकोस्टिक गीटार बनवण्या साठी करतात तर दक्षिण चिन मधे जॅकरन्डाच्या पानांचा उपयोग निळ्या रंगाचा डाय बनवण्या साठी करतात.
----------------------------------------------------------------------------
प्रकाशचित्रे:
जॅकरन्डा माझ्या नजरेतुन - रिपब्लिक रोड, जोहनसबर्ग
खालिल प्रकाशचित्र आंतरजाला वरुन साभार:
जॅकरन्डा - १२ मुख्य रस्ता, बेंगलुरु, भारत ()
खुप खुप खुप आवडले फोटो...
खुप खुप खुप आवडले फोटो...
सुं............द.............
सुं............द...................र! जांभळी जादूच!
२ रा, ६वा अप्रतिम. जांभळा
२ रा, ६वा अप्रतिम. जांभळा रस्ता मस्त दिसतोय अगदी.
अप्रतिम
अप्रतिम
आई ग्ग! खूपच सुंदर
आई ग्ग! खूपच सुंदर

खूप सुंदर आले आहेत फोटो
खूप सुंदर आले आहेत फोटो
मस्त, मस्त, मस्तच!!
मस्त, मस्त, मस्तच!!
फार फार आवडते झाड आहे हे
फार फार आवडते झाड आहे हे माझे...
गुलमोहोर, नीलमोहोर(जॅकरंडा) आणि बहावा यांची भरगच्च भरलेली झाडं पाहताना फार मस्त वाटते!!
सुरेख प्रचि !!
सुरेख प्रचि !!
निळाई बघून डोळे निवले! नाही
निळाई बघून डोळे निवले! नाही निळावले! अप्रतिम. शापित गंधर्व्..थँक्यू हो.
अहाहा... सुंदर.. चवथा तर
अहाहा... सुंदर.. चवथा तर अप्रतीम!!!
..
माझ्या दारात पण आहे ह्याचे मोठ्ठे झाड. बहरते पण छान मात्र आधीच्या मालकाने ते नेमके आम्ही व शेजारी अशा २ घरांच्या मधे लावले त्यामुळे नेहमी मला काटछाट करावी लागते कारण खुप पसरवता येत नाही त्याला.
अहाहा.. नीलमोहोर. निळी-जांभळी
अहाहा.. नीलमोहोर. निळी-जांभळी सावली काय अप्रतिम दिसते या जॅकरन्डाची. अमलताशचे, गुलमोहोराचे अव्हेन्यूज बघितले आहेत. जॅकरन्डाचे पहिल्यांदाच पाहीले.
नेहरु सेन्टरजवळही बरीच झाडे आहेत याची.
सुरेख फोटो.
गुलमोहोर, नीलमोहोर(जॅकरंडा)
गुलमोहोर, नीलमोहोर(जॅकरंडा) आणि बहावा यांची भरगच्च भरलेली झाडं पाहताना फार मस्त वाटते!!>>>>+१
सुंदरच.
सुंदरच.
अप्रतिम अशा रस्त्यांवरुन
अप्रतिम
अशा रस्त्यांवरुन चालताना काय मस्त अनुभव येत असेल. फारच सुंदर.
आईशप्पथ!
आईशप्पथ!:)
वा! नयनमनोहर पुष्पवृष्टीची
वा! नयनमनोहर पुष्पवृष्टीची प्रकाशचित्रे. छान. मुळात दृश्येही सुरेख आहेत, आणि सौंदर्यपूर्ण चौकटीत बद्ध करण्याचे कसबही सुरेख आहे. प्रकाशचित्रे आवडली, हे वेगळ्याने सांगायलाच नको.
आपल्याकडे पिवळ्या आणि तांबड्या गुलमोहोरांनी फुललेले रस्ते पाहण्यात आहेत. तसाच हा जांभळा आविष्कार देखणा आहे.
@बस्के - नीलमोहोर...सुंदर नाव
@बस्के - नीलमोहोर...सुंदर नाव दिलस.
केवळ अप्रतिम !!
केवळ अप्रतिम !!
@ - दक्षिणा, नीधप, रंगासेठ-
@ - दक्षिणा, नीधप, रंगासेठ- माझ ऑफिस रिपब्लिक रोड वर आहे. रोज अनुभवतो आहे मी हि निळाई पण खरंच सांगतो... अजुन मन भरल नाहि हो......
सुंदर च... अप्रतिम...
सुंदर च... अप्रतिम... अवर्णनीय... मस्त आलेत सगळे फोटो
पूर्वी माझ्या ऑफीसला जायच्या
पूर्वी माझ्या ऑफीसला जायच्या रस्त्यावर दोन झाडे होती अन खाली अक्षरशः सडा पडलेला असायचा या फुलांचा. पण सकाळच्या वेळी ऑफीसला जाणार्या लोकांची / शाळेची अशी वाहनांची इतकी गर्दी असायची की सगळी फुलं तुडवली जायची. :(. मला ते तुडवायला नको वाटायचे अगदी इतकी फ्रेश फुले, त्यामुळे मी गाडी बाजूने घ्यायचे पण तसे करताना एकदा समोरुन येणार्या गाडीची धडक बसून होत्याचे नव्हते होणार होते तेव्हा पासून फुलांवरुन गाडी न्यावी लागायची, रोज सॉरी म्हणायचे. कधीकधी गाडीवर फुले पडली तेवढ्यात तर दिवस आनंदात जायचा.
आणि हो, फोटो सुंदरच आलेत हे सांगायचे राहीलेच.
गुलमोहोर, नीलमोहोर(जॅकरंडा)
गुलमोहोर, नीलमोहोर(जॅकरंडा) आणि बहावा यांची भरगच्च भरलेली झाडं पाहताना फार मस्त वाटते!!>>>>+१
सुंदर
सुंदर
मी नाही हो इन्व्हेन्ट केले
मी नाही हो इन्व्हेन्ट केले नाव. आहेच ते नाव त्याला. जबरी समर्पक आहे ना आणि!
वॉव, स्वर्गच ! अप्रतिम फोटोज
वॉव, स्वर्गच ! अप्रतिम फोटोज आहेत. दुसरा फोटो तर केवळ सुंदर! आभाळ जमिनीवर उतरल्यासारखं वाटतंय.
वॉव मस्त.
वॉव मस्त.
अ..प्र..ति..म!!!!
अ..प्र..ति..म!!!!
खुप्प्प्प्प्प्च मस्तं आहेत हे
खुप्प्प्प्प्प्च मस्तं आहेत हे फोटोज.............
वाह खुप सुंदर! डोळे निवले.
वाह खुप सुंदर! डोळे निवले. रस्ते अगदि जांभळे होवुन गेलेत.
Pages