सध्या गाजत असलेला धार्मिक बाफ वरचा मराठी - इंग्रजी वादाने ह्या बाफचा जन्म झाला.
मला काही गोष्टी स्पष्ट नाहीत त्या करुन घेणे हा मुख्य उद्देश.
ह्या स्थळावर प्रत्येक बाफ, (बीबी) रंगीबेरंगी इइ आणि प्रत्येक पोस्ट मराठीतच असावी का कधीकधी इंग्रजी चालेल?
फक्त मराठीचा आग्रह असेल तर माझे काही प्रश्न आहेत. त्यावर काही उपाय करता येईल का?
सर्व मराठीत करायचे तर माझे युजर नेम kedarjoshi असे दिसत आहे, तर ते पण मराठीत करुन द्या, आणि ह्या बाजुला ज्या अॅडस दिसत आहेत त्या पण मराठीत कश्या येतील हे बघता का? मराठी साइट आहे तर सर्व गोष्टी संगतवार व्ह्यायला पाहिजेत.
धार्मिक ह्या ग्रुपचा मी सदस्य नाही तर तिथे invite friend असे काहीसे दिसत आहे. मग ते का?
लिहीताना इंग्रजी ची सोय का? ही पोस्ट लिहीताना मजकूराच्या खाली अनेक इंग्रजी वाक्ये दिसत आहेत ते का?
आधी लिहील्याप्रमाने अॅडमीनना प्रश्न विचारने हा हेतू नाही तर तिथली चर्चा अनेक बाफवर कधी कधी होत असते, तर त्याला योग्य वळन देणे हा आहे.
आणि लिहीतच आहे तर पुढे हे ही लिहीतो की बरेच सदस्य दुसर्या सदस्यांना, हे करु नका, ते करु नका?, हे असेच पाहिजे असे सांगत असतात, तर एखादी नियमावली पण द्या म्हणजे आमच्या सारख्यांना कोणी सांगीतले तर ते बरोबर (मायबोली साइटीच्या दृष्टीने) आहे की नाही हे पण कळेल. कधी कधी नविन गोष्टी वाचायला मिळतात म्हणून विचारले.
ह्यासर्व गोष्टींत तुमचे व इतरांचे मत जाणून घ्यायला आवेडल. चर्चा करुयात.
मला स्वतःला मराठीतच लिहीने आवडते, येते म्हणून मी ते पाळतोच. इतरांना सांगतोही पण दुराग्रही नाही.
ह्म्म...
ह्म्म... चांगले मुद्दे मांडलेस.
यातील काही गोष्टींची कारणे तांत्रिक असावीत. उदा. सदस्यनाम इंग्रजीत असणे, invite group सारख्या शब्दांचा वापर. जर तांत्रिक नसेल तर हे सर्व हळूहळू बदलण्याची प्रक्रिया सुरू असेल. याविषयी प्रशासनच जास्त व्यवस्थित सांगू शकेल.
इंग्रजी लिहिण्याचा पर्याय उपलब्ध आहे कारण समजा मला इंग्रजीतले काही उद्धृत करायचे असल्यास ते करता यावे. दुसरे म्हणजे कथा, ललित, मुलाखत इ. साहित्य लिहिताना इंग्रजी लिहिणे कधीकधी आवश्यक ठरते. कथा वगैरे साहित्यात एखादे पात्र इंग्रजीतून बोलते, मुलाखतीत मुलाखत देणारा इंग्रजीतून बोलला असेल तर प्रत्येक वेळी अनुवाद करणे उचित ठरत नाही अशी कारणे आहेत. मग तिथे देवनागरी का वापरायची नाही ? ज्याप्रमाणे मिंग्लिश वाचताना त्रास होतो, त्याप्रमाणे मोमन वाचायलाही त्रास होतो म्हणून लिपीबदल करत नाही.
नियमावली काय असावी यापेक्षाही ती मुळात असावी का हा मुद्दा आहे. मला वाटते की अशी कडक नियमावली नसावी, सदस्यांनीच मंथनातून ठरवावे. नियमांपेक्षाही मला 'संकेत असणे' जास्त उत्तम वाटते. मायबोलीसारख्या संकेतस्थळाने बहुतांशी स्वनियंत्रित (self-regulated) असणे मी व्यक्तिशः पसंत करेन.
***
Entropy : It isn't what it used to be.
तर एखादी
तर एखादी नियमावली पण द्या >>>>
अगदी बरोब्बर म्हणालात केदार... :)...(मी पण केदार जोशी.... ;))
उगिच आपण स्वतः दुसर्याना सल्ले देण्यापेक्षा, मायबोलिच्या अॅडमिन ने आता या मधे जातिने लक्ष घातले पाहिजे...पण ते पण मूग गिळून गप्प आहेत कारण वर उल्लेख केल्या प्रमाणे मायबोली मधेच खूप english चा वापर आहे (सदस्य नाव वैगेरे..)...ते उलटे त्यांच्यावरच शेकेल...
मला स्वतःला मराठीतच लिहीने आवडते, येते म्हणून मी ते पाळतोच>>> मी तर यापुढे जाउन म्हणेन की इकडे मराठी लिहायला-वाचायला येते म्हणुनच मी माबो वर येतो..
पण काही लोक जर लिहित नसतिल..तर आपण त्याना सध्या फक्त विनंती करु शकतो..सक्ती नाही.
बघू आता अॅडमिन लोक काय कृती करतात ते...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
सर्व
सर्व मराठीत करायचे तर माझे युजर नेम kedarjoshi असे दिसत आहे, तर ते पण मराठीत करुन द्या,
नक्कीच तसे करायचा आमचा विचार आहे. मायबोली सुरू झाली तेंव्हा उपलब्ध सॉफ्टवेअरमधे ही सुविधा नव्हती. आता आहे. (पण जुन्या मायबोलीवर नाही.) जुन्या विभागातले स्थलांतर अजून पूर्ण झाले नाही तोपर्यंत हे देता येत नाही. इतके जुने इतर कुठलेच मराठी संकेतस्थळ नसल्याने फक्त मायबोलीवरच येणार्या या अडचणी आहेत.
ह्या बाजुला ज्या अॅडस दिसत आहेत त्या पण मराठीत कश्या येतील हे बघता का?
मराठीत जाहिराती मिळाल्या तर आनंदाने दाखवू.
पण तुमचे
पण तुमचे मत काय? बाफवर मराठीच की दोन्ही चालेल. इतर प्रश्न फक्त विरोधाभास दाखविन्यासाठी आहेत.
मराठीत जाहिराती मिळाल्या तर आनंदाने दाखवू. >> म्हणजे सध्या इंग्रजी आहेत तर चालतील असा अर्थ घेतला तरी चालेल. राईट.
एक लक्षात घ्या की मला मराठीच चालते,आवडते, पण 'ती' चर्चा वाचून मुलभूत प्रश्न पडलेत.
स्लार्टी तु पोस्ट नंतर ऐडीट केलीस का? चालेल नंतर करुयात चर्चा.
अॅडमिन
अॅडमिन यानी स्पष्ट पणे काहिच सांगितले नाही...आपले मत जाणुन घ्यायचे आहे अॅडमिन म्हणजे बाकिच्या बाफ वर होणारी चर्चा थांबेल..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
मला वाटते
मला वाटते आपण मराठीतून लिहिण्याचा आग्रह करू शकतो, सक्ती नाही.
मायबोलीवर
मायबोलीवर देवनागरीत लिहिण्याचा आग्रह जरूर आहे पण सक्ति नाही.
फार पूर्वीपासून आपण हे धोरण स्वीकारले आहे. याबाबत सक्ती करण्याऐवजी वाचकांचा प्रतिसाद (प्रतिक्रिया या अर्थाने नाही) हा सगळ्यात चांगला उपाय ठरला आहे. देवनागरीत लिहिलेले उपलब्ध असताना (इतके की ते वाचायला वेळही मिळत नाही) आपोआपच वाचकांचा कल देवनागरीतले वाचण्याकडे वळतो आणि लेखकाना ते उमजून तेही देवनागरीत लिहितात हा अनुभव आहे. जिथे एकच लेखक आणि अनेक वाचक अशी स्थिती असेल तिथे त्या लेखकावर सक्ती करण्यापेक्षा इतरानी जर त्या विषयावर देवनागरीत लिहायला सुरुवात केली तर वाचकांना अजून एक पर्याय उपलब्ध होईल आणि कुठले वाचायचे कुठले नाही हे पण तेच ठरवतील.
सुरुवातीला ०% टक्के लेखक देवनागरीतून लिहीत. हळूहळू तांत्रिक सुविधांमुळे काही जण देवनागरीत लिहायला लागले. आज मायबोलीवरचे जवळजवळ ८०-९०% (कदाचित जास्त) लेखन देवनागरीतून होतं (कुठलीही सक्ती न करता) याचं माझ्या मते मुख्य कारण (इतरही कारणे आहेत) देवनागरीत लिहिलेलं जास्त वाचलं जातं हे लेखकाना दिसते आहे. पण जिथे इतर कुणि लिहीत नाही, तिथे वाचकाला इतर पर्याय उपलब्ध नाही तिथे देवनागरीत वाचायची मजा कळणार नाही.
ते उलटे
ते उलटे त्यांच्यावरच शेकेल... >> नाही हो केदार.
तसे नाही. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, ते अगदी विचारी व बॅलन्स्ड भूमीका घेतात. तिथे वाद चालु होता, त्याने काहीही निष्पन्न झाले नसते. कारण तो प्रश्न ह्या साइटच्या धोरणांचा होता. त्याचा निर्णय सभासद घेऊ शकत न्हवते. तर प्रशासनालाच पुढे यावे लागले असते.
(चर्चा, चालु धडामोडी असा प्रकार न्हवता, त्यामुळे मी पुढाकार घेऊन लिहीले इतकेच.)
ह्या बाफचे प्रयोजन कोणाकडेही बोट दाखवीने, इंग्रचीचाच प्रसार करणे नाही व न्हवता. पण दरवेळी ही धुळवड बघीतली म्हणून लिहीले. मी चुकीची बाजू घेतोय असे वाटत असले तर तसे नाही, मी काही गोष्टी स्पष्ट होतील ह्यासाठी हे लिहीले. दुसरा कुठलाही उद्देश नाही.
मी मराठीतच लिहील, आग्रही असेन, पण कुठे व किती? ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
अॅडमीन ने लिहील्या सारखे मी ही इग्रंजी उतारे असतील तर शक्यतो तो बाफ वाचत नाही वा स्किप करुन पुढे जातो. ' सक्ती' आहे का नाही हे विचारायचे होते.
तरीही एक सुचवावे वाटते, ते म्हणजे साहित्य केवळ मराठीतच असावे.
(हे स्पष्टीकरन आजकाल नेहमी द्यावे लागत आहे.
)
धन्यवाद!!
धन्यवाद!! हा बाफ सुरु करून तुम्ही उपकार केले आहेत!
थकलो येवध देवनागरी लिहून!
~मिलिन्द
अॅडमिन,
अॅडमिन, धन्यवाद. मी ज्योतिष बाफवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
अरे, त्याआधी 'ते साहित्य असावे' असे सुचवणे जास्त गरजेचे आहे 
>>> हे स्पष्टीकरन आजकाल नेहमी द्यावे लागत आहे
***
Entropy : It isn't what it used to be.
अरे,
अरे, त्याआधी 'ते साहित्य असावे' असे सुचवणे जास्त गरजेचे आहे >>
डिंग डिंग डिंग! बिंगो!! Amen !!
एमएनसी,
एमएनसी, थकलो येवध देवनागरी लिहून>> का हो? तुम्ही 5 वर्ष 12 आठवडे सदस्य आहात म्हणजे माबोवर नवे नक्कीच नाही! तरी थकलात? का?
स्ला. सदस्यांनीच मंथनातून ठरवावे>> होय हे खर आहे! पण सर्वांना कायम समान संधी मिळेल का? (ह्याआधी अस झालेल नाही अस नाही!)
कारण नुसते 'संकेत असणे' महत्वाचे नसून ते संकेत नीटपणे कुणीतरी वेळीच सांगणही मह्त्वाच नाही का?
*********************

All desirable things in life are either:
1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
मायबोली हि
मायबोली हि मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचे संकेतस्थळ आहे कि मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीमधे (पक्षी : देवनागरीमधे लिहिणे आले) बोलण्याचे संकेतस्थळ आहे ह्याचा खुलासा अॅडमिन नी केला तर हे वारंवार उद्भवणारे वाद थांबतील.
प्रत्येक वेळी हा वाद झाला की मूळ BB चा विषय नि मराठीचा आग्रह हे मुद्दे बाजूला राहुन वाद भलतीकडेच भरकटतो. (कारणे काहिहि असोत). तेंव्हा हा आग्रह धरणार्यांनी आपला आग्रह नमुद केला कि परत तेच वेगवेगळ्या शब्दांमधे सांगण्याऐवजी पुढे अॅडमिन कडे आपले म्हणणे मांडावे.
असामी,
असामी, अगदी ह्याच विचारातून मी हा बाफ प्रपंच मांडला.
ह्या चर्चेतून धोरणात्मक बदल सामोरे यावेत, वा धोरणाचा पुणर्विचार केला जावा इ इ.
जसे साहित्य हे फक्त आणि फक्त मराठीतच असावे. बाकी इतर गोष्टी, पण समहाऊ लोकांनी इथे काही लिहीलेच नाही.
केदार,
केदार, समहाऊ
मायबोली हि
मायबोली हि मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचे संकेतस्थळ आहे कि मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीमधे (पक्षी : देवनागरीमधे लिहिणे आले) बोलण्याचे संकेतस्थळ आहे ह्याचा खुलासा अॅडमिन नी केला तर हे वारंवार उद्भवणारे वाद थांबतील. >>
दोन्ही केसेस मध्ये मराठी लिहिणे हे क्रमप्राप्त आहे असे मला वाटते. मराठी लिहिले गेले नाही किंवा मराठीत चर्चा झाली नाही तर इथे येण्यासाठी मराठी भाषिक असण्याचीसुध्दा गरज नाही, आणि तसे असेल तर या संकेतस्थळावर येण्याचीच गरज नाही.
वर स्लार्टीने लिहिल्याप्रमाणे ज्या ठिकाणी इंग्रजीची गरज आहे तिथे त्याचा वापर करण्यास कोणाचीच हरकत नसावी. परंतु, वेळ नाही आणि आम्ही लोकांची मदत करत आहोत म्हणून आम्ही इंग्रजी लिहिणार ही कारणे मलाही पटली नाहीत.
चार टाळकी एकत्र आली की वाद हे होणारच. वर अॅड्मिन यांनीसुध्दा लिहिले आहे की सक्तीऐवजी वाचकांच्या प्रतिसादांचा जास्त प्रभाव पडलेला आहे. तेव्हा ही चर्चा वाचून एखाद्याला वाटले की त्याने मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न करावा, तर तो तसे करेल. नाही वाटले तर तो तसे नाही करणार. इथे कोणत्या प्रकारची सक्ती आहे असेही मला वाटत नाही. वास्तविक अॅड्मिन सोडून इतर कोणीही मायबोलीवर कोणालाही कशाचीही सक्ती करु शकत नाही. जो काही असेल तो आग्रहच असेल.
त. टी. माझ्या काही विधाने ज्योतिष बाफवरच्या चर्चेला अनुसरुन आहेत. त्याशिवाय इथे प्रतिक्रिया देण्याचे विशेष कारण उरत नाही.
एक मुद्दा
एक मुद्दा हा पण आहे की कितपत देवनागरीकरण केले जावे.. मागे चर्चा झाली तेव्हा साधारण एकमत झाले होते (असे आठवते) की माझे संभाषण समोरच्या व्यक्तीपर्यंत effectively पोचणे हे महत्वाचे, लिपी नंतर येते. मी स्वत: देवनागरीत लिहीतो शक्यतो, पण अतिरेक करणे मला आवडत नाही. मध्ये कोठेतरी 'तूनळी' या शब्द वाचला. एखाद्या विशेष नामाचे असे भाषांतर करावे का हा एक नवीनच मुद्दा होऊ शकतो. उद्या प्रवासासाठी कुमारी वातरेषा पकडली असे म्हणालो तर त्यावर हसण्यापेक्षा दुसरे काही करता येईल असे वाटत नाही.
तेव्हा, आपली लिखाणाची हौस भागवणे हा उद्देश सोडून इथे खूप काही नवीन भर घालता येईल असे वाटत नाही.
कुमारी
कुमारी वातरेषा >>
दोन्ही
दोन्ही केसेस मध्ये मराठी लिहिणे हे क्रमप्राप्त आहे असे मला वाटते. मराठी लिहिले गेले नाही किंवा मराठीत चर्चा झाली नाही तर इथे येण्यासाठी मराठी भाषिक असण्याचीसुध्दा गरज नाही,>> असेच काही नाहि रे. अशा काही गोष्टी आहेत ज्या चार मराठी टाळकी एकत्र येऊन बोलू करू शकतात त्यासाठी मराठीतच लिहिले पाहिजे असे जरुरी नाहि. असो माझ्या मते अॅडमिन नी खुलास केला तर बरेच प्रश्न आपोआप निकालात लागतील.
आधी तुम्ही
आधी तुम्ही सगळे अॅडमिनना "अॅडमिन" म्हणणे बंद करा
सिंडरेला,
सिंडरेला, (आता याला मराठीत काय बरे म्हणावे?) या बाफचा उगम मायबोलीवर देवनागरीत लिहिण्याच्या वादातून झाला आहे. मग ते इंग्रजी शब्द का असेनात देवनागरीत लिहिले म्हणजे झाले (असे वाटतेय! :p )
कॅन आय
कॅन आय राइट समथिंग लाइक धिस ? मला वाटते इथे वाद मिंग्रजी आणि इंग्रजी लिहावे की नाही असा आहे.
आधी तुम्ही
आधी तुम्ही सगळे अॅडमिनना "अॅडमिन" म्हणणे बंद करा
--- कारभारी अथवा व्यवस्थापक
सिंडरेला, (आता याला मराठीत काय बरे म्हणावे?)
--- नाव असल्याने तो शब्द जसाच्या तसा वापरावा. करणारे काचबुटधारी पण करतात.
मला वाटते मराठी मधेच लिहावे या बाबत सक्ती नसावी पण त्याच बरोबर एक माफक अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नसावी किंबहुना तोच जाहीर (अनेकांपैकी एक) उद्देश असावा. सर्वांनी (मराठी तसेच अमराठी लोकांनी) माबो वर यावे (शब्दांच्या पायघड्या) पण शक्य तोवर मराठी मधे लिहायचा प्रयत्न करावा असे वाटते. आता काही लोकांना अनेक वर्षानंतरही मराठी लिहायचा त्रास होतो तर काहींना मराठी लिहिण्याचे तंत्र पुर्ण अवगत असते, पण ते देवनागरीत लिहिण्याचा आळशी पणा करतात किंवा त्या बद्दलच्या त्यांच्या संवेदना बोथट असतात. पण हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. जमेची बाजु म्हणजे बहुतेकांनी येथे मराठी लिहिण्याचे तंत्र काही दिवसात/ आठवड्यात अत्मसात केले आहे.
मी माबो वर केवळ मराठी मधे लिहिलेलेच वाचतो, त्याच उद्देशाने येत असतो. वाक्येच्या वाक्ये इंग्रजी मधे असतील तर आपसुकच दुर्लक्ष होते.
मायबोलीवर
मायबोलीवर देवनागरीत लिहिण्याचा आग्रह जरूर आहे पण सक्ति नाही
----------------------------------------------------------
मला वाटते "प्रशासक"नी(कसा आहे शब्द?:) योग्य लिहिले आहे.
एक गोष्ट म्हणजे साधारणपणे लोकाना दुसर्या कोणी काही सांगितलेले आवडत नाही आणि सक्ती वगैरे केली तर मग काय विचारूच नका. आणि जे आग्रह धरतात त्यांचा आग्रहही काहीशा उद्धटपणाच्या सीमारेषेवरील भाषेत असतो मग अशा वेळी "अडलेय माझे खेटर" असे म्हणुन लिहिणारे सांगणारांच्या नाकावर टिच्चून इन्ग्रजीत लिहितात. त्यापेक्षा प्रशासक म्हणतात तसे आपण स्वतः जास्तीत जास्त मराठीत लिहिले की इतराना हळुहळु तसे वाटेल आणि ते पण आपोआप मराठीत लिहितील.
>>कुमारी
>>कुमारी वातरेषा
तूनळी
तूनळी किंवा वातरेषा हे खरोखरंच अतिरेकी शब्दशः भाषांतर झाले, याला देवनागरीकरण कसे म्हणणार?
देवनागरीचा जोरकस आग्रह धरण्यात मला गैर काहीच वाटंत नाही. साहित्य आणि चर्चेशी बांधलेले 'मराठी' संकेतस्थळ किंवा 'मायबोलीशी (मराठीशी) नातं सांगणार्या जगभरच्या पाऊलखुणा' अशी उद्याच्या मायबोलीची पक्की ओळख वाढवायची आणि जपायची असेल तर आज हा आग्रह धरणे रास्त आहे. पण या आग्रहाबरोबरच नवीन प्रश्नही जन्माला येणार हे नक्की.
१) आग्रह कुणी धरावा?
२) नियमावली असलीच तर निकष काय असावेत? म्हणजे देवनागरी, मिंग्रजी की पूर्ण इंग्रजीही चालेल?
३) अॅडमिननी नियमावली प्रसिद्ध करुनही तिची अंमलबजावणी होण्याची शक्यता किती?
४) नियम न पाळणार्या साहित्यावर उपाययोजना करणे अॅडमिनसाठी नवे काम होऊन बसेल का?
५) तांत्रिकदॄष्ट्या या नियमावलीसाठीच्या प्रणालीची सोय करणे कितपत शक्य असेल?
आज अशा लेखकांची संख्या मर्यादित असतांना नियमावली नसतांनाही केवळ आग्रहातून चालण्यासारखे आहे. पण उद्या मिंग्रजी लिहिणार्या सदस्यांची/लेखकांची संख्या वाढल्यास मिंग्रजीचा प्रश्न बिकट होईल का?
>>मायबोली
>>मायबोली हि मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचे संकेतस्थळ आहे कि मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीमधे (पक्षी : देवनागरीमधे लिहिणे आले) बोलण्याचे संकेतस्थळ आहे
) नाव 'मायबोली' आहे या संकेतातून इथल्या भाषिक व्यवहारानं 'मराठी' या सामायिक दुव्याशी बांधिलकी मानणं गृहित असणार. भाषिक बांधिलकी न बाळगता केवळ मराठी भाषिकांनी एकत्र येण्याकरता जर ही वेबसाइट ठेवायची असती तर हिचं नाव 'मायबोलीकर'/'आमची माती, आमची माणसं'छाप असतं. शिवाय मराठी भाषिकांनी एकत्र येऊन (कुठल्याही भाषेत) संवाद साधावा असा हेतू असता, तर एखादी व्यक्ती 'मराठी भाषिक' आहे किंवा नाही हे कसं ताडणार? महाराष्ट्राचा रहिवास दाखला/ कुठल्यातरी महाराष्ट्र मंडळाचा सभासद क्रमांक मागून तपासणार का? अर्थातच नाही! 'मराठी भाषिक' म्हणून तुला, मला ओळख देणारी मराठी भाषा हाच या (व अश्या इतर) वेबसायटींचा केंद्रबिंदू असणार. अर्थात 'असणार.. असणार' अशी वाक्यरचना योजत असलो, तरीही हे माझं मत. 
असाम्या, हे दोन प्रश्न पडायची गरज (माझ्या मते तरी) नाही. या वेबसायटीचे (मिलिंदा, परभाषांमधले उसने शब्दही मराठीत नियम लावून चालवता येतात; ओढून ताणून भाषांतर न करतादेखील
मिलिंदा, 'तूनळी' वगैरे गमतीशीर उदाहरणं देऊन चर्चा मिस्किल पातळीवर आणण्याबद्दल धन्यवाद.
पण देवनागरीकरणाचा मुद्दा मांडताना, हे विपर्यस्त भाषांतराचं उदाहरण गैरलागू आहे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
बाफ म्हणजे
बाफ म्हणजे काय?
कोणि सान्गेल का ?
बातमी
बातमी फलक....
बीबीच्या
बीबीच्या विषयाला धरून, पण केवळ विचारार्थ..........!
ही गोष्ट २००४ मधली आहे, अर्थात २० एप्रिल नन्तरची
(पब्लिक जाम खवळायच
)
तेव्हा सुलवातीचे पन्धला दिवस मी हे अस बोबल बोलत होतो
मग "शुद्ध बोलता येऊ लागल्यावर", नन्तर काही बीबीन्वर "ग्रामीण ढन्गाच्या" भाषेचा/बाजाचा प्रयोग करुन पहात होतो, बर्यापैकी जमत होते अस पूर्वीचे बीबी पहाता लक्षात येते



पण काय ना??? ही असली कस्लि मराठी? कोणत्या भागातली? कथा लिहिताना हीच का वापरता? ग्रामीण भाषेचे प्रयोग करायचे तर वेगळा बीबी का काढत नाही?? अॅडमिन, याला आवरा, मॉडरेटर, बघताय ना..........
इत्यादी इत्यादी असन्ख्य प्रतिक्रिया त्यावेळेस धुन्वाधार पावसासारख्या कोसळल्या!
मला प्रश्ण पडायचा, ग्रामीण जीवनातील विविधान्गान्चे प्रकटीकरण्/सादरीकरण करताना त्या त्या बोली वापरल्या नाहीत तर रन्ग कसा भरणार?
पण नाही, इतरजण जसे ज्या "शहरी" भाषेत लिहितात (मी मुद्दामहून पुणेरी हा शब्द टाळला आहे हे सूज्ञ वाचकान्च्या लक्षात आलेच असेल), तसेच मी देखिल लिहावे ही आग्रहाची सक्ती!
(मी जुमानली नाही तो भाग वेगळा)
काही मोजक्या आयड्यान्नी माझ्या त्या विषयानुरुप भाषेचे समर्थनही केले
कालौघात, ग्रामीण बाजात येथे काही लिहीणे हा अपवादात्मक किन्वा धक्कादायक प्रसन्ग ठरेनासा झाला!
मला प्र्श्ण येवढाच पडतो की एकीकडे शहरी भाषे व्यतिरिक्त अन्य कुठल्या बाजात पण मराठीतच लिहिले, तर त्यास झालेला/होऊ शकणारा विरोध एकीकडे व रोमन लिपीच्या वापरास असलेला विरोध दुसरीकडे! यात काय साम्य? काय विरोधाभास? की हे केवळ तत्कालीक भावनिक उद्रेक??
की त्यात्या बीबीच्या स्वतःस नावडत्या विषयास विरोध करण्यास लिपीचा विरोध हे आडमार्गी शस्त्र???
मी तर बोवा कन्फ्युज्ड! गोन्धळात पडलो आहे, माझा गोन्धळ उडाला आहे!
असो,
जाताजाता हे सान्गायला हरकत नसावी की फार फार पूर्वी येथे "मिन्ग्लिश" या प्रकारात बोलली जाणारि धेडगुजरी भाषा मोठ्या प्रमाणावर प्रचारात होती, ती लिहिली जायची रोमन लिपीत, व मराठी व इन्ग्रजी भाषेतील शब्द्/क्रियापदे/नाम्/सर्वनाम्/विशेषणे इत्यादी कसेही आलटून पालटून लिहून वापरली जायची! तर या भाषेस काही त्यावेळच्या मोजक्याच आयडीन्नी विरोध केला होता त्यात मी देखिल होतो!
विचार असा आला की नशीब, केदारला या "मिन्ग्लिशचे" प्रताप ठाऊक नसावेत!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
Pages