मायबोली - फक्त मराठीच की इंग्रजी पण कधीकधी चालेल.

Submitted by केदार on 12 March, 2009 - 00:07

सध्या गाजत असलेला धार्मिक बाफ वरचा मराठी - इंग्रजी वादाने ह्या बाफचा जन्म झाला. Happy

मला काही गोष्टी स्पष्ट नाहीत त्या करुन घेणे हा मुख्य उद्देश.

ह्या स्थळावर प्रत्येक बाफ, (बीबी) रंगीबेरंगी इइ आणि प्रत्येक पोस्ट मराठीतच असावी का कधीकधी इंग्रजी चालेल?

फक्त मराठीचा आग्रह असेल तर माझे काही प्रश्न आहेत. त्यावर काही उपाय करता येईल का?

सर्व मराठीत करायचे तर माझे युजर नेम kedarjoshi असे दिसत आहे, तर ते पण मराठीत करुन द्या, आणि ह्या बाजुला ज्या अ‍ॅडस दिसत आहेत त्या पण मराठीत कश्या येतील हे बघता का? मराठी साइट आहे तर सर्व गोष्टी संगतवार व्ह्यायला पाहिजेत.

धार्मिक ह्या ग्रुपचा मी सदस्य नाही तर तिथे invite friend असे काहीसे दिसत आहे. मग ते का?
लिहीताना इंग्रजी ची सोय का? ही पोस्ट लिहीताना मजकूराच्या खाली अनेक इंग्रजी वाक्ये दिसत आहेत ते का?

आधी लिहील्याप्रमाने अ‍ॅडमीनना प्रश्न विचारने हा हेतू नाही तर तिथली चर्चा अनेक बाफवर कधी कधी होत असते, तर त्याला योग्य वळन देणे हा आहे.

आणि लिहीतच आहे तर पुढे हे ही लिहीतो की बरेच सदस्य दुसर्‍या सदस्यांना, हे करु नका, ते करु नका?, हे असेच पाहिजे असे सांगत असतात, तर एखादी नियमावली पण द्या म्हणजे आमच्या सारख्यांना कोणी सांगीतले तर ते बरोबर (मायबोली साइटीच्या दृष्टीने) आहे की नाही हे पण कळेल. कधी कधी नविन गोष्टी वाचायला मिळतात म्हणून विचारले. Happy

ह्यासर्व गोष्टींत तुमचे व इतरांचे मत जाणून घ्यायला आवेडल. चर्चा करुयात. Happy

मला स्वतःला मराठीतच लिहीने आवडते, येते म्हणून मी ते पाळतोच. इतरांना सांगतोही पण दुराग्रही नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I saw a few comments here and hence wanted to respond:

1. First of all a big thanks to LimbuTimbu for articulating the comment which I think is the SINGLEMOST reason for my English postings on yotish (Speed of thoughts -- which is impossible for me to convert to Devnagari typing). I respond to 5 questions in say 25-30 minutes. Would take 1.5 hrs if I had to type it in Devnagari. The problem is that: There is ONLY 1 Reader for my 1 post UNLIKE on other boards: Who would have at least some 4-5 members reading the posts.
2. PHA:: GET ONE FACT VERY STRAIGHT::: I NEVER EVER responded or wrote to SLARTY or Chinoox or Sachin_B on my OWN. I ONLY RESPONDED to derogatory posts like pani bharane and ichhashakti and likes. SO your comment about MNC being MUJOR in responding to Slarty is a "Kalpana-wilaas". He was the one to write to me with mazhya ghari pani bharayala thewnar nahi karan tumhi palahya ghadyat bharal etc etc SO WHO WAS MUJOR in the 1st place??? (Palatha ghada was started by chinnoox I think.)
3. I didn't respond for some time but then did respond later in the night when I saw overall "khilli" approach by him and his friends on this board which we kept alive for past several years. My initial id was MilindC, forgot the password and also lost the email id on hotmail, hence created mnc id. I am here not from 2003/2004 BUT even before that.
4. I did respond to genuine posts for example from Bhagyashree(?) in a very decent and common sense manner. (Territory etc) but would not tolerate some discouteous talks some folks did with me. For most of them it was the 1st post from their side to me!!

AGAIN, THIS post is just because "Pha" has mentioned that MNC was MUJOR with Slarty and Slarty was very decent and logical when he posted that "hillarious" post about Palathya ghadyawer pani bharane, Swarthi-pana and what not.

BTW, Almost ALL the posts here by Pha, Slarty, Kedar and others have been quite logical & decent. Which makes me wonder why the posts on jyotish board were so nasty? What was the 'other' root-cause other than love for devnagari and Marathi?

LimbuTimbu: Tumachi latest Gaandhigiri jordar ahe! Might force me to change to Devnagari! Happy

The biggest problem with Jyotish boatd now a days is that: Nobody wants to discuss jyotish and related topics. It has become more like a consultancy!

आपापला परिपक्वपणा, उदारमतवाद सिद्ध करताहेत, तसाच तत्त्ववादीपणा ज्योतिष बाफावर इंग्लिशीतच लिहिण्याचे समर्थन करणार्‍या, स्लार्ट्याच्या मुद्द्यांना लॉजिकल प्रत्युत्तरे देण्याऐवजी त्याची मुजोर खिल्ली उडवणार्‍या एमेन्सी यांजसमोर का दाखवला नाही?! >>>

फ, मी उदार, परिपक्व, तत्ववादी वैगरे नाही. आणि मी तो सिद्धही करत नाही. 'जे आहे, ते असे आहे.'

मग तिथे का वाद घातला नाही? तर तिथे पाहिल्यावर मला हे कळले की हा प्रशासनाने सोडवायचा मुद्दा आहे. सदस्यानी भांडन करुन सोडवायचा नाही. मी माझ्या पोस्ट मध्ये ही तेच अधोरेखीत केले आहे. कदाचित तुझे दुर्लक्ष झाले असेल. ह्याला जर उदारमतवादीपणा तुला वाटत असेल तर मी काही करु शकनार नाही. कारण हा मुद्दाच मुळी प्रशासनाचा आहे. तुझा माझा नाही. आणि त्यामुळे, त्या वितंडवादाचे, चर्चेत रुपांतर होउन त्याला योग्य ते वळण लागावे, ह्या हेतूने मी हा बाफ काढला.

माझ्या इंट्रोडक्टरी लिहीन्यामुळे तर आधी मिच मराठी विरोधी वाटलो काहीजनांना. ( आता विचार करु जाता असे वाटते की तुलाही तसेच वाटले. Happy आणि कदाचित पहिलीच पोस्ट थोडी निट टाकली असती तर बर्‍याच जनांचे गैरसमज नाहीसे झाले असते.)

पूनमच्या विपूत मी लिहीले होते की ९८ टक्के लोकांकडे लक्ष देणार की उरलेल्या २ टक्क्यांसाठी वाद घालनार? नंतर अ‍ॅडमिननेही तेच मांडले आहे. माझ्यामते दॅट इज क्रक्स. (पण हे माझे मत आहे, जे चूकीचे असेल).

मुजोरी, उद्दामपणा किंवा आढ्यतखोरी करणार्यांसोबत एका लिमीटनंतर मी चर्चा/वाद घालने थांबवतो. मग ते कोणीही असले तरी, आणी मुद्दा कितीही महत्वाचा असला तरी Happy

(तू सर्वांना प्रश्न विचारलास, पण रोख मुख्यतः माझ्याकडे वाटला, म्हणून खटाटोप. )

स्लार्टी, इंग्रजी शब्दांना व्याकरणात आणले तर ते चालतील हे पटत नाहीये. दोन शब्द भाषेत येणे वेगळे आणि अर्धे इंग्लीश शब्द मराठीत, व्याकरणासहीत लिहीने वेगळे असे वाटते.

LimbuTimbu: Tumachi latest Gaandhigiri jordar ahe! Might force me to change to Devnagari!
---- mnc तुमची संपुर्ण पोस्ट एका दमात प्रथमच वाचली. एकवेळा देवनागरीची सवय झाल्यावर आज जेव्हढा वेळ लागतो आहे तेव्हढा नक्कीच नाही लागणार. तुम्ही प्रयत्न तर करा, तुमच्या प्रयत्नासाठी शुभेच्छा.

mnc >> एवढी मोठी चर्चा होऊनसुधा तुम्ही परत तुमचे विचार इंग्रजी आणि रोमन लिपी मधे लिहिलेत.. ज्योतिष बाफवर वेळेअभावी मराठी आणि देवनागरीत लिहिता येत नसेल हे मान्य पण या बाफवर तरी मराठीत विचार मांडायला पाहिजे होते.. तुम्ही एकदा मराठी आणि देवनागरी मधे लिहायचा प्रयत्न तरी करून बघा... तेवढे अवघड नाहिये... माझ्या मते जुन्या मायबोलीपेक्षा नवीन मायबोलीवर देवनागरीत लिहिणे खूप सोपे आहे... पण प्रयत्नच केला नाही तर कधीच नाही जमणार...
"अ‍ॅडमिन"च्या पोस्टप्रमाणे 98% मधे यायचे की 2% मधे हे तुम्हीच ठरवायचे आहे...

The problem is that: There is ONLY 1 Reader for my 1 post UNLIKE on other boards: Who would have at least some 4-5 members reading the posts.

कदाचित् मराठीत, देवनागरीत लिहायला लागलात तर जास्त वाचक मिळतील.

खरे तर तुम्ही इथे येऊन लिहिण्या ऐवजी इतर ठिकाणी जाऊन इंग्रजीतच लिहीलेत तर आणखी जास्त वाचक मिळतील. नि इथले लोकही, तुम्हाला मुजोर वगैरे म्हणणार नाहीत. जो (जी) कोण तुमचा/ची वाचक असेल ते तुम्हाला शोधायला इकडे तिकडे जातीलच.

मी माझ्या रंगीबेरंगी पानावर इंग्रजीतून मायबोलीवर लिहीण्याचा अट्टाहास करणार्‍या लोकांनी दिलेली कारणे नमूद केली आहेत. त्यात कीबोर्डावर मराठी नसते, किंवा माझा एकच वाचक आहे, ही कारणे आता द्यावी लागतील.

<<मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीमधे (पक्षी : देवनागरीमधे लिहिणे आले) बोलण्याचे संकेतस्थळ आहे ह्याचा खुलासा अ‍ॅडमिन नी केला >>

माझ्या मते, लोकांनी हे आपणहून ठरवलेच आहे. फार मोठ्या प्रमाणात लोक मराठीत लिहीतात. इंग्रजीतून जे काही लिहीले असते ते मी तरी दुर्लक्षितो. कारण इंग्रजीतले अनेक चांगले चांगले लेखक मी वाचले आहेत नि वाचतो. इथे मायबोलीवर इंग्रजीतून वाचण्याजोगे मला गेल्या आठ हून अधिक वर्षात काहीहि सापडलेले नाही. मुख्यतः अमेरिकेतले बरेच लोक जास्तीत जास्त प्रमाणात मराठीत लिहीतात नि भारतातले मात्र त्यांच्या अत्यंत भयाSण अश्या इंग्रजीतून लिहीतात. त्यात व्याकरणाचा खून, स्पेलिंगचा खून, यामुळे काही समजतच नाही.

असो. मी या कारणासाठी मायबोलीवर येतो, नि लोकांना मराठी लिहीण्याचा आग्रह करतो (सक्ति नाही) कारण एव्हढी सुंदर, भाषा, ज्यात अलंकार, शब्दरचना इतक्या प्रगल्भ आहेत, तर त्याचा आनंद घ्यावा. असे असताना आजकाल लोक उगीचच इंग्रजी किंवा इतर भाषांतील शब्द घुसडवतात, ते मला अजिबात आवडत नाही. आता काही इंग्रजी शब्दांना यथोचित मराठी शब्द नसतील, टेबलला मेज म्हंटले तर ते वापरात नसल्याने काही लोकांना कळणार नाही, अश्या वेळी इंग्रजी खपवून घ्यावे लागते.

पण इंग्रजांना धड बोलता येत नाही म्हणून त्यांनी मुंबईचे बाँबे केले तर आपण का तसे करावे? आम्ही तर आमच्या न्यू जर्सीला मायबोलीवर बाग राज्य असेच म्हणतो. मराठी कार्यक्रमात ती बाई "डिसिजन करणे डिफिकल्ट आहे" असे म्हणते! काSय हे! अहो, निर्णय घेणे कठीण आहे असे नाही का म्हणता येत?

मराठी भाषा चांगली आहे, आपली मायबोली आहे, तिचा उत्कर्ष करायचा की जिथे जिथे जमेल तिथे तिथे तिच्यावर वार करायचे?

मायबोलीवर लोकांनी मराठी भाषा जपावी, वाढवावी अशी अपेक्षा आहे.

खुद्द मराठी साहित्य संमेलनात तरी तसे कोण करतात का? इंग्रजी शब्दांना योग्य असे मराठी शब्द शोधून काढून, ते साहित्यातून सर्व लोकांना माहित होतील, वापरात येतील, ही कामे करायला नकोत का? आम्ही मराठीत बी ए. वगरे केले नाही. ज्यांनी केले त्यांना हे शक्य आहे ना? ते करत नाहीत तर निदान जे मायबोलीकर करताहेत, त्यांच्याशी नुसते भांडता काय? वाद कसला घालता? सगळे मराठीतून लिहू लागले तर हा प्रश्नच इथे उद्भवणार नाही.

आहो मी खूप वेळा प्रयत्न केला आहे हो पुर्वी !! ऊलट आनदच झाला होता पहिल्यान्दा इथे मराथिची सोय बघुन.

वरील वाक्य मला लिहायला ३ minutes लागले! आहो एवधा वेळ खरच नसतो हो !! त्या म्रराठी चा ठ जमायला बराच वेळ लागला! Happy

LimbuTimbu/kedar/Zakki ani barech members "टपाटप" Devnaagari posts lihitat tar mala sudhha jamayala harakat naahi.

मला चान्गले आठ्वते आहे कि मी आणि माझा मित्र योगेश बन्ग Zakki आणि इतरान्च्या भाशाप्रभुत्वावर बरेच बोलायचो. (Sometime in 2004/2005).

1. Also, I tend to think about devnagari more and less of the topic in hand when I type in Devnagari.

2. I think I will need to practice over the weekend in order to get efficient. Ithale MOTHE MOTHE Devnagari posts wachun mala barach "हूरुप" ala ahe.

धन्यवाद!
मिलिन्द

एकन्दरीतच व्यक्तिगत चिखलफेक टाळळी तर बरेचसे त्रास आणि वेळही वाचतो. Happy

झक्कि:

वाचक जास्त मिळायचा प्रश्नच नाहिये. ऊत्तर एकाच माणसासाठी असते सगळ्यान्-साठी नाही, त्यामुले ते दुसर्या-कोणी वचायची शक्यता फारच क्शिण आहे! Happy

One more confesion: After 10th Haven't written in Devnagari much. Have (almost) forgotten ह्रस्व आणि दीर्घ! Happy

हुशश......

~मिलिन्द

मिलिंद, र्‍हस्व दीर्घ नंतर बघता येईल, आधी देवनागरीचा सराव करा, ते जास्त महत्वाचे आहे.
तुम्ही बघितलं आहे की नाही ते माहिती नाही, पण देवनागरी लिहिणे हे रोमन लिहिण्यापेक्षा खूप वेगळे नाहीये, कारण तीच रोमन अक्षरे तशीच्या तशी भाषांतरीत केलेली आहेत, सोपे पडावे म्हणून...
ऑल द बेस्ट !

९८ % वरुन सरळ ९९.९९ %, अभिनंदन mnc.

वरील वाक्य मला लिहायला ३ minutes लागले! आहो एवधा वेळ खरच नसतो हो !! >>> अहो नि दान हे झ्क्कींच्यासमोर म्हणू नका! त्यांच्या रंगेबिरंगीवरूनच तर मी शुद्ध मराठी (सुबक) टाईपायला शिकलोय! Happy

इथ पाहा: http://www.maayboli.com/node/1114

आणि हा माझा त्या काळचा (पहिला) प्रतिसाद!>>
kuldeep1312 | 31 जानेवारी, 2008 - 17:29
वोव... क्आय पान प्रतीसाद आहे... मान्ले तुमस्नि!! वेल आतआ सम्ज्ले असेल च मरआती लिहिने किति कथीन आहे!!!!<<<

[इथं कुणालाहे दुखवायच नाही आहे! दुखलच तर डॉककडे जा! Happy ]

थोडस विषयांतर:
झक्की (आजपासून मी तुम्हाला आजोबा म्हणणार त्यादिवशी खूप बोलायच होत पण जनता खूप अन् तुम्हाला वेळ कमी असल्यान जमले नाही असो!) त्रिवार धन्यवाद!!! Happy

*********************
कंपून कंपूत सार्‍या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
Wink Biggrin

कुलदीप, तो प्रतिसाद माझ्या 'पोस्टा'वर होता का? आत्ता वाचल्यावर कळलं! Happy

>>वरील वाक्य मला लिहायला ३ minutes लागले! <<

आपण वेळात वेळ काढून आपले मत आम्हाला कळवले या बद्दल धन्यवाद. एव्हढा त्रास होत असेल, तर आपले मत आम्हाला नाही सांगितले तरी चालेल. आम्ही असेच अज्ञानात राहू. तसेहि या बाबतीत इतके लिहून झाले आहे की नवीन असे काहीच नाही.

काय झक्की, पुण्यातला उन्हाळा फारच त्रास देतोय वाटतं ? Happy

नाही! झक्कींना आता मुंबईची हवा मानवलेली दिसत नाहीये Wink

*********************
कंपून कंपूत सार्‍या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
Wink Biggrin

सो, फायनली हा बीबी एमएनसी यांना मराठी रायटींग करायला उद्युक्त करण्यासाठी होता/आहे तर ? Wink

अहो पण मराठीत लिहायला वेळ नाही ना त्यांना. जाउ द्या. लिहू द्या. त्यांच्या मते त्यांचा एकच वाचक असतो. तर तो वाचक नि ते बघून घेतील, आपण कशाला मधे पडा.

Pages