आईस्क्रीम केक विथ फ्लेवर्ड सॉस

Submitted by श्रद्धादिनेश on 12 October, 2011 - 05:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य साहित्यः
२-४ प्रकारची क्रिम बिस्किटे (बरबॉन, ऑरिओ, जिम-जॅम किंवा तत्सम, नारळाची बिस्किटे, आवडत असतिल तर डायजेस्टीव बिस्किटे): प्रत्येकी १ पाकिट

३ आवडत्या प्रकारातील आणि स्वादाचे आईस्क्रीम्स, शक्यतो एक व्हॅनिला असावा: मुख्य फ्लेवर १/२ किलो, बाकी १/४

आवडीप्रमाणे स्लाईस केक (हवा असल्यास, नसला तरी चालेल)

चॉकलेट बार (पर्क किंवा फ्रुट-नट असल्यास उत्तम): पर्क असेल तर ४-५ बार

सजावटीसाठी:
चेरीज, स्ट्रॉबेरीज किंवा काहिही आवडीचे साहित्य

सॉस साठी:
आवडीचा जॅम: साधारण २०० ग्रॅम
आवडता फळांचा रस: १ कप

क्रमवार पाककृती: 

प्राथमिक तयारी:
१) सर्वप्रथम ज्यात केक करायचा आहे असे काचेचे भांडे थोडावेळ फ्रिझर मधे ठेऊन द्यावे. केकचे भांडे वापरणार असल्यास त्याला आतून क्लिंग फिल्म लावून घ्यावी. हे भांडे फ्रिझर मधे ठेवण्याची आवश्यकता नाही.

२) बरबॉन बिस्कीटांचा मिक्सरमधून बारिक चुरा करुन घ्यावा.

३) ईतर बिस्किटेही चुरा करुन वेगवेगळ्या वाट्यांमधे ठेवावीत.

४) चॉकलेट बार जाडसर क्रश करुन घ्यावा.

५) वापरायची आईस्क्रीम्स थोडावेळ फ्रिझर मधून बाहेर काढून ठेवावीत.

मुख्य कृती:
१) फ्रिझर मधले भांडे काढून त्याच्या तळाला बरबॉन बिस्कीटांचा चुरा सर्वत्र दाबून बसवावा. छान सेट होतो हा. हा आधीच सेट करुन भांडे फ्रिझर मधे ठेवले तर उत्तम.

२) केक वापरणार असल्यास तिरामिस्सु प्रमाणे कॉफिमधे भिजवून त्याचा थर द्यावा. हि पायरी गाळली तरी चालेल.

३) तयार बेस वर व्हॅनिला आईस्क्रीम चा थर पसरवून घ्यावा. ह्या कृतीसाठी आईस्क्रीम थोडे पातळ झालेले असेल तर सोप्पे पडते.

४) त्यावर दुसर्या प्रकारच्या बिस्कीटांच्या चुर्याचा थर द्यावा. हे बिस्कीटांचे थर पातळच असावेत.

५) त्यावर पुन्हा वेगळ्या चवीचे आईस्क्रीम पसरावे. अश्याप्रकारे ६-७ थर लावून घ्यावेत.

६) सर्वात वर क्रश्ड चॉकलेट पसरावे. वरुन चेरी, स्ट्रॉबेरीज ने सजावट करुन साधारण तासभर किंवा सेट होई पर्यंत फ्रिझर मधे ठेवावे.

७) चॉकलेट किंवा आवडीचा सॉस घालून सर्व करावे.

सॉससाठी:
१) प्रथम जॅम एका पॅन मधे काढून चमच्याने थोडा मऊ करुन घ्यावा.

२) मावे मधे किंवा गॅसवर ठेऊन थोडा पातळ करुन घ्यावा.

३) साधारण ५ मि ठेऊन त्यात आवडत्या फळाचा रस टाकून १० मि शिजू द्यावा.

४) हा सॉस गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व करु शकता.

वाढणी/प्रमाण: 
खरं सांगायचं तर खाणार्यांवर आहे :) पण अंदाजे ह्या प्रमाणात १० जण तर आरामात
अधिक टिपा: 

ह्याची खासियत हि की साहित्य आणि प्रमाण प्रत्येक जण आवडीप्रमाणे ठरवू शकतो. ह्यात मधे मधे फळांचे थर द्यावे. तेही छान लागतात. सुका मेवाही. मधाचाही वापर करता येईल.
बिस्कीटांचे जाड्सर तुकडे करुन ते आईस्क्रिम मिसळून थर देता येतात.
थर देताना आपल्या साहित्याच्या अंदाजापेक्षा थोडे मोठेच भांडे घ्यावे. बर्याचदा थर लावताना आईस्क्रिम वितळू लागल्याने भांड्याबाहेर ऊतू जाण्याची शक्यता असते. ह्यात थर लावणे हाच कुशलतेचा भाग आहे अन्यथा करायला एकदम सोप्पा प्रकार आहे.
पार्टीसाठी हमखास यशस्वी ठरणारा प्रकार आहे हा. सध्याच्या ऑक्टोबर हीट मधे तर अहाहा...

माहितीचा स्रोत: 
नायजेला आणि संजिव कपूर ह्या दोन्ही माझ्या फुड गुरूंच्या पाककृती एकत्र करुन व थोडेफार स्वताचे बदल करुन
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy
दिनेशदा, पहिलाच प्रतिसाद तुमचा बघून छानच वाटलं.

अनघा_मीरा...वर्णन सहीच्..पण खरच कातिल पक्क्या आईस्क्रिम खादाडांसाठी Happy

मंजूडी,
इथे लिहिण्याचा आधी प्लॅन नसल्याने विशेष फोटो नहि काढले गेले..एक देते सधारण नमुन्यासाठी

18072011715.jpg