गणपती गडद

Submitted by कविन on 9 October, 2011 - 05:16

२५ सप्टेंबरला गणपती गडद ला जायचं नक्की झालं आणि गुगलदेवाकीजय म्हणत माहिती मिळवायला गुगलला साकडं घातलं. पण एका ब्लॉगरच्या ब्लॉग वरचे फोटो आणि थोडी माहिती ह्या एका लिंक व्यतिरिक्त अजुन कोणतीच लिंक मिळाली नाही.

यो रॉक्स्याला विचारलं पण अशा ट्रेक कम नी ट्रिप जास्त असलेल्या कच्च्या लिंबू ट्रेकची त्याला काहीच माहिती नसल्याचं कळलं. वयाची ५० शी आली की तो अशाच ठिकाणी जाणार असल्याच त्यानं कळवलं, मग म्हंटलं चला जरा समाजसेवा करुयात. आपणच जाऊयात तिथे आणि देऊयात ही माहिती दगडुशेठना. त्याच्या ५० व्या वर्षी तेव्हढीच त्याला कमी धडपड करावी लागेल Proud

तर अशा रितीने आम्ही २५ ला सक्काल सक्काल ६.४५ ला कल्याणला भेटायचं ठरवलं, माबोचा आनंदयात्री हो नाही करता करता येतोय असं म्हणून कन्फर्म झाला आणि इन्द्र देवाने नेहमी प्रमाणे टांग दिली.

कल्याणला नेहमीच्या ठिकाणी ३ जीप मागवलेल्या होत्या. (येस्स आमचा ट्रेक आताशा म्हणजे माझ्यासारखे ट्रेकर्स त्यांना सामिल झाल्या पासून फायस्टार झालाय. जीप काय, नाष्ट्याला ठेपले सॉस पार्सल काय :P) तर त्या जीपमधून मुरबाड मार्गे पुढे जाऊन सोनावळे ह्या बेसच्या गावी पोहोचलो.

sonavane gaon (Medium).JPGvat (Medium).JPG ह्या वाटेने पुढे जात.. हिरवाई नजरेत साठवत, रानफुलांचा नजारा टिपत आमचा ट्रेक सुरु झाला आणि ह्या अनोख्या वसाहतीने जागीच खिळवून ठेवलं
IMG_8825 (Medium).JPGIMG_8823 (Medium).JPG

त्यांचे यथेच्छ फोटो काढून घेतले (दुर्बिण का विसरलो म्हणुन स्वतःलाच बोल लावले) आणि पुढे निघालो.

IMG_8962 (Small)_0_0.JPG हे आमचे गाईड

गाईड घेतले कारण सगळे पहिल्यांदाच त्या वाटेला निघालो होतो. तसाही बर्‍याच कमी जणांचे पाय लागलेला ट्रेक आहे हा म्हणूनच नेटवरही कमी माहिती उपलब्ध असलेला.

IMG_8878 (Medium).JPG आम्हाला इथे पोहोचायचं होतं.

dav (Medium).JPG (पानी पानी रे, पीने का पानी रे. चवदार पानी रे)

sanu (Small).JPG

बरेच रमत गमत चालत होतो तरिही सव्वा तासात गुहेपाशी पोहोचलो सुद्धा.

guhe javal pohochale.JPG

गुहेत गणपतीच्या बर्‍याचश्या मुर्ती होत्या,गुहा तशी प्रशस्त होती. वरुन पडणार्‍या पाण्याने समोरच जणू पाण्याचा पडदा घातला होता.

guha (Medium).JPGvarun disnara najara.JPG (वरुन दिसणारा नजारा)

केव्हजच्या जवळ पाकोळ्यांचं घरटं होतं त्यामुळे आमच्या आजुबाजुने उडत त्यांचाही संचार चाललेला होता.

ट्रेकमधे थ्रिल अनुभवायला कॅप्टन आणि यात्र्या (नचिकेत) केव्हजच्या पुढे निघाले धबधब्यापर्यंतचा मार्ग शोधत. तोपर्यंत आम्ही मात्र केव्हज निरिक्षण करायचं ठरवलं Proud

जवळचे डबे संपवून थोडा वेळ तो नजारा डोळ्यात साठवून उतरायला सुरुवात केली. तिथे जाण्यापुर्वी आमच्या प्रत्येकाच्या मनाची बॅटरी डाऊनचं इंडीकेशन देत होती ती परत येताना "फुल्ली चार्ज्ड" असा संदेश देत होती. विकांत सत्कारणी लागला होता आणि पुढच्या दिवसांत पुन्हा त्या मोनोटोनस रुटीन मधे मनाचा उत्साह टिकवून ठेवणारा ऑक्सिजन भरभरुन घेऊन आम्ही कल्याण दिशेकडे पळत होतो.

(टिपः हा छोटा ट्रेक असला तरी पावसाळ्यात तेही धो धो पावसात जर हा ट्रेक केला तर ज्यांना थ्रिलच अनुभवायचय त्यांना पुरेसं थ्रिल अनुभवता येईल. :P)

---------------
अजून काही प्रचि टाकत आहे

dev.jpg (मुर्ती - गुहेमधे ठेवलेल्या - गावकर्‍यांनी ठेवल्या आहेत)

dhuka.jpg असं धुकं होतं सकाळी

panyacha padada (clear view).jpg (हाच तो पाण्याचा पडदा)

varul.jpg रमत गमत चढत होतो तेव्हा दिसलेलं वारुळ

view of last leni from first leni.jpg पहिल्या लेण्यांमधून शेवटच्या लेण्याचा काढलेला प्रचि

sonaki.JPG सोनकी ची फुलं

vadani kaval gheta.JPG पेटपुजा केव्हज मधली

caves kade janarya payrya.JPGrelaxing in caves.JPG

---------------------
रुट संबंधी अधिक माहिती (शैलेंद्र सोनटक्के ह्या आमच्या ट्रेक्सच्या कॅप्टन करुन साभार)

कल्याण ते मुरबाड (२७ किमी) कल्याण एसटी स्थानकातून मुरबाडला जाणार्‍या बर्‍याच गाड्या मिळतात (माळशेज मार्गे जाणार्‍या गाड्या मुरबाड स्थानकावर थांबतात) त्याच एसटीला पुढे सरळगाव/उमरोली/धसई थांबा असेल तर रुट नंबर १ (खाली दिलेला) ने जायचं असल्यास तिथपर्यंत जावं

मार्ग १: माळशेज रुट

माळशेज रुटवर मुरबाड पासून सरळगावच्या पुढे उमरोली गाव लागतं (मुरबाड - उमरोली अंतर १५ किमी आहे) तिथपर्यंत गेल्यावर राईट टर्न वर धसई नावाचं गाव लागतं.

धसई हे बाजाराचं गाव असल्याने कोणाला ट्रेकसाठी काही खरेदी करायची असल्यास इथे करता येऊ शकेल. तिथून जवळच सोनावळे गावं आहे. हेच पायथ्याचं गाव आहे.

(उमरोली - सोनावळे अंतर अंदाजे ६ किमी)

हा रस्ता सुस्थितीतील असून ह्या मार्गावर चहा टपर्‍या, छोटी हॉटेल्स असल्याने पोटपुजेची सोय इथुन गेल्यास करता येऊ शकेल.

मार्ग २: मुरबाड पासून उजव्या वळणावर म्हसा जंक्शन पर्यंत जाऊन म्हसा पासून डावीकडे वळल्यास धसई गाव लागतं (मुरबाड-म्हसा अंतर १२ किमी; म्हसा जंक्शन - धसई अंतर १८ किमी)

ह्या मार्गावर टपर्‍या, होटेल्स तुरळक (न के बराबर) आहेत.

ह्या रुटवरुन जाताना बाकीच्या काही गडांची पायथ्याची गावं लागतात (ज्यांना एका वर एक फ़्री गिफ़्ट ऑफर सारखे ट्रेक करायचेत त्यांना ह्या माहितीचा उपयोग होऊ शकेल)

खालील गड आणि पायथ्याची गावं ह्या रुट वरुन जाताना लागतात

गोरख मच्छींद्र चा पायथा - देहरी गाव
सिद्धगडचा पायथा उचले गाव
अहुपे घाटाचा पायथा खोपिवली

-------------
गणपती गडद विषयी थोडी माहिती

उंची अंदाजे ३०० मीटर
ढाकोबा दुर्ग ह्या किल्ल्यांमधला हा डोंगर आहे.

लेणी प्रशस्त असली तरिही पाण्याची टाकं अर्ध्याच्या वर सुकलेलीच आढळली त्यामुळे पाण्याची सोय पुरेशी नसल्याने वस्तीसाठी थोडा अडचणीचा आहे. गुटखाप्रेमी मंडळींचे इथे लक्ष न गेल्याने जागा स्वच्छ आहे.

सोमवारची ऑफिसची डेडलाईन गाठायची असेल आणि त्याकरिता रविवारी एक दिवसाचा ट्रेक करुन वेळेत घरी परतायचं असेल तर हा ट्रेक बेस्ट आहे.

ज्यांना ह्याच्या जोडीने इतर ट्रेक करायचेत ते वर दिलेल्या मार्गाचा विचार करुन आखणी करु शकतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो आणि वर्णन पण.
कविता, मलापण आवडेल असं एक-दोन दिवसाच्या ट्रेकला यायला. पुढच्या वेळेस विचारशील का मलाही?

ज्यांना ह्याच्या जोडीने इतर ट्रेक करायचेत ते >> जल्ला ते जोडीने ट्रेक अस वाचलं आणि :d

btw डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही मोठ मोठे ट्रेक करणार आहोत दगडाच्या नाक्कावर टिच्चून.

वर्णन, फोटू, झब्बू सगळेच छान आहे ... जर हा फाईव्हस्टार ट्रेक म्हणायचा तर मग माझ्यासाठी बहुतेक मला इलेव्हन स्टार ट्रेक शोधावा लागणार! Proud

मस्त! मस्त!! मस्त!फोटो पण आणि ट्रेक पण,असाच ट्रेकपालीगणपती जवलठणाळे लेणी चा करु सकता या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. प्रशस्त गुहा असूनही माणसांचा वावर कमी आहे. गावापासून थेट गुहेपर्यंत वाटेत कुठेही पाणी नाही. गुहेजवळही पाण्याचे टाके नाही.भरपुर जगल आहे.१ दीवसाचा ट्रेक आहे .

Pages