गणपती गडद

Submitted by कविन on 9 October, 2011 - 05:16

२५ सप्टेंबरला गणपती गडद ला जायचं नक्की झालं आणि गुगलदेवाकीजय म्हणत माहिती मिळवायला गुगलला साकडं घातलं. पण एका ब्लॉगरच्या ब्लॉग वरचे फोटो आणि थोडी माहिती ह्या एका लिंक व्यतिरिक्त अजुन कोणतीच लिंक मिळाली नाही.

यो रॉक्स्याला विचारलं पण अशा ट्रेक कम नी ट्रिप जास्त असलेल्या कच्च्या लिंबू ट्रेकची त्याला काहीच माहिती नसल्याचं कळलं. वयाची ५० शी आली की तो अशाच ठिकाणी जाणार असल्याच त्यानं कळवलं, मग म्हंटलं चला जरा समाजसेवा करुयात. आपणच जाऊयात तिथे आणि देऊयात ही माहिती दगडुशेठना. त्याच्या ५० व्या वर्षी तेव्हढीच त्याला कमी धडपड करावी लागेल Proud

तर अशा रितीने आम्ही २५ ला सक्काल सक्काल ६.४५ ला कल्याणला भेटायचं ठरवलं, माबोचा आनंदयात्री हो नाही करता करता येतोय असं म्हणून कन्फर्म झाला आणि इन्द्र देवाने नेहमी प्रमाणे टांग दिली.

कल्याणला नेहमीच्या ठिकाणी ३ जीप मागवलेल्या होत्या. (येस्स आमचा ट्रेक आताशा म्हणजे माझ्यासारखे ट्रेकर्स त्यांना सामिल झाल्या पासून फायस्टार झालाय. जीप काय, नाष्ट्याला ठेपले सॉस पार्सल काय :P) तर त्या जीपमधून मुरबाड मार्गे पुढे जाऊन सोनावळे ह्या बेसच्या गावी पोहोचलो.

sonavane gaon (Medium).JPGvat (Medium).JPG ह्या वाटेने पुढे जात.. हिरवाई नजरेत साठवत, रानफुलांचा नजारा टिपत आमचा ट्रेक सुरु झाला आणि ह्या अनोख्या वसाहतीने जागीच खिळवून ठेवलं
IMG_8825 (Medium).JPGIMG_8823 (Medium).JPG

त्यांचे यथेच्छ फोटो काढून घेतले (दुर्बिण का विसरलो म्हणुन स्वतःलाच बोल लावले) आणि पुढे निघालो.

IMG_8962 (Small)_0_0.JPG हे आमचे गाईड

गाईड घेतले कारण सगळे पहिल्यांदाच त्या वाटेला निघालो होतो. तसाही बर्‍याच कमी जणांचे पाय लागलेला ट्रेक आहे हा म्हणूनच नेटवरही कमी माहिती उपलब्ध असलेला.

IMG_8878 (Medium).JPG आम्हाला इथे पोहोचायचं होतं.

dav (Medium).JPG (पानी पानी रे, पीने का पानी रे. चवदार पानी रे)

sanu (Small).JPG

बरेच रमत गमत चालत होतो तरिही सव्वा तासात गुहेपाशी पोहोचलो सुद्धा.

guhe javal pohochale.JPG

गुहेत गणपतीच्या बर्‍याचश्या मुर्ती होत्या,गुहा तशी प्रशस्त होती. वरुन पडणार्‍या पाण्याने समोरच जणू पाण्याचा पडदा घातला होता.

guha (Medium).JPGvarun disnara najara.JPG (वरुन दिसणारा नजारा)

केव्हजच्या जवळ पाकोळ्यांचं घरटं होतं त्यामुळे आमच्या आजुबाजुने उडत त्यांचाही संचार चाललेला होता.

ट्रेकमधे थ्रिल अनुभवायला कॅप्टन आणि यात्र्या (नचिकेत) केव्हजच्या पुढे निघाले धबधब्यापर्यंतचा मार्ग शोधत. तोपर्यंत आम्ही मात्र केव्हज निरिक्षण करायचं ठरवलं Proud

जवळचे डबे संपवून थोडा वेळ तो नजारा डोळ्यात साठवून उतरायला सुरुवात केली. तिथे जाण्यापुर्वी आमच्या प्रत्येकाच्या मनाची बॅटरी डाऊनचं इंडीकेशन देत होती ती परत येताना "फुल्ली चार्ज्ड" असा संदेश देत होती. विकांत सत्कारणी लागला होता आणि पुढच्या दिवसांत पुन्हा त्या मोनोटोनस रुटीन मधे मनाचा उत्साह टिकवून ठेवणारा ऑक्सिजन भरभरुन घेऊन आम्ही कल्याण दिशेकडे पळत होतो.

(टिपः हा छोटा ट्रेक असला तरी पावसाळ्यात तेही धो धो पावसात जर हा ट्रेक केला तर ज्यांना थ्रिलच अनुभवायचय त्यांना पुरेसं थ्रिल अनुभवता येईल. :P)

---------------
अजून काही प्रचि टाकत आहे

dev.jpg (मुर्ती - गुहेमधे ठेवलेल्या - गावकर्‍यांनी ठेवल्या आहेत)

dhuka.jpg असं धुकं होतं सकाळी

panyacha padada (clear view).jpg (हाच तो पाण्याचा पडदा)

varul.jpg रमत गमत चढत होतो तेव्हा दिसलेलं वारुळ

view of last leni from first leni.jpg पहिल्या लेण्यांमधून शेवटच्या लेण्याचा काढलेला प्रचि

sonaki.JPG सोनकी ची फुलं

vadani kaval gheta.JPG पेटपुजा केव्हज मधली

caves kade janarya payrya.JPGrelaxing in caves.JPG

---------------------
रुट संबंधी अधिक माहिती (शैलेंद्र सोनटक्के ह्या आमच्या ट्रेक्सच्या कॅप्टन करुन साभार)

कल्याण ते मुरबाड (२७ किमी) कल्याण एसटी स्थानकातून मुरबाडला जाणार्‍या बर्‍याच गाड्या मिळतात (माळशेज मार्गे जाणार्‍या गाड्या मुरबाड स्थानकावर थांबतात) त्याच एसटीला पुढे सरळगाव/उमरोली/धसई थांबा असेल तर रुट नंबर १ (खाली दिलेला) ने जायचं असल्यास तिथपर्यंत जावं

मार्ग १: माळशेज रुट

माळशेज रुटवर मुरबाड पासून सरळगावच्या पुढे उमरोली गाव लागतं (मुरबाड - उमरोली अंतर १५ किमी आहे) तिथपर्यंत गेल्यावर राईट टर्न वर धसई नावाचं गाव लागतं.

धसई हे बाजाराचं गाव असल्याने कोणाला ट्रेकसाठी काही खरेदी करायची असल्यास इथे करता येऊ शकेल. तिथून जवळच सोनावळे गावं आहे. हेच पायथ्याचं गाव आहे.

(उमरोली - सोनावळे अंतर अंदाजे ६ किमी)

हा रस्ता सुस्थितीतील असून ह्या मार्गावर चहा टपर्‍या, छोटी हॉटेल्स असल्याने पोटपुजेची सोय इथुन गेल्यास करता येऊ शकेल.

मार्ग २: मुरबाड पासून उजव्या वळणावर म्हसा जंक्शन पर्यंत जाऊन म्हसा पासून डावीकडे वळल्यास धसई गाव लागतं (मुरबाड-म्हसा अंतर १२ किमी; म्हसा जंक्शन - धसई अंतर १८ किमी)

ह्या मार्गावर टपर्‍या, होटेल्स तुरळक (न के बराबर) आहेत.

ह्या रुटवरुन जाताना बाकीच्या काही गडांची पायथ्याची गावं लागतात (ज्यांना एका वर एक फ़्री गिफ़्ट ऑफर सारखे ट्रेक करायचेत त्यांना ह्या माहितीचा उपयोग होऊ शकेल)

खालील गड आणि पायथ्याची गावं ह्या रुट वरुन जाताना लागतात

गोरख मच्छींद्र चा पायथा - देहरी गाव
सिद्धगडचा पायथा उचले गाव
अहुपे घाटाचा पायथा खोपिवली

-------------
गणपती गडद विषयी थोडी माहिती

उंची अंदाजे ३०० मीटर
ढाकोबा दुर्ग ह्या किल्ल्यांमधला हा डोंगर आहे.

लेणी प्रशस्त असली तरिही पाण्याची टाकं अर्ध्याच्या वर सुकलेलीच आढळली त्यामुळे पाण्याची सोय पुरेशी नसल्याने वस्तीसाठी थोडा अडचणीचा आहे. गुटखाप्रेमी मंडळींचे इथे लक्ष न गेल्याने जागा स्वच्छ आहे.

सोमवारची ऑफिसची डेडलाईन गाठायची असेल आणि त्याकरिता रविवारी एक दिवसाचा ट्रेक करुन वेळेत घरी परतायचं असेल तर हा ट्रेक बेस्ट आहे.

ज्यांना ह्याच्या जोडीने इतर ट्रेक करायचेत ते वर दिलेल्या मार्गाचा विचार करुन आखणी करु शकतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! मस्त!! मस्त!!! गेल्या २ पावसाळ्यांत मुंबईच्या मित्रांकडून या ट्रेकचं आवतण येत होतं पण जमलं नाय!!! ती रामदेवळीची लेणी म्हणतात ती हीच कां? खरं तर आम्ही ज्यावेळी दुर्ग ढाकोबा केला तेव्हा पुढील ट्रेक असा ठरवला होता.... दुर्गच्या पायथ्याच्या देवी मंदीरातून खुट्टा दाराने खाली उतरून ही लेणी करुन डोणे दाराने वर चढायचे आणि पुढे मोठी तंगडतोड करीत अहुपे घाटातून खाली उतरायचे. ३ ते ४ दिवसांची ३ घाटांची यात्रा आहे. सगळ्यांचे एकत्र येणे फक्त बाकी आहे. केव्हाही स्वारी केली जाईल.
सुगरणींच्या थव्याचे नि खोप्यांचे प्रचि तर मस्तच. आणि आमच्या स्वारीच्या वेळी या संदर्भ घेतला जाईलच. खूप धन्स!!

मुर्तीचे फोटो घेतलेत पण काही मुर्ती गावकर्‍यांनी आणुन ठेवल्या असाव्यात त्यांच्या घरच्या कारण त्या मुर्तींचे काही पार्ट निखळले होते (म्हणून इथे टाकले नाहीत ते फोटो)

कविता,
त्या प्रचिमध्ये "पानावर कोळ्याचं जाळ आणि त्या जाळ्यावर दवाचं जाळं" नाहीये!!
पाणी पिण्यासाठी केलेला द्रोण आहे तो... मी आणि सानु त्यातून पाणी प्यायलो.. Happy

कविता.. मस्तय एकदम !! ते पक्ष्यांचे फोटो छानच.. गुहेतील अजुन फोटो असतील तर टाक ना.. बाकी या गुहेचा इतिहास कदाचित मनोज यांना माहित असेल.. कळेलच बघ..

ओह! यात्र्या असं आहे होय? पण मग त्या दव वाल्या पानांचे कोणीच फोटो काढले नाहीत तर Sad मस्त होती ती पानं. माझा कॅमेरा बिघडल्याचं अशावेळी फार फार वाईट वाटतं.

कॅप्टन काही सांगत होते माहिती पण आम्ही आमच्या बॅटर्‍या रिचार्ज करण्यात गुंतलो होतो त्यामुळे पाकोळ्यांबरोबर माहिती पण उडून गेली. आता नीट विचारुन घेते त्यांनाच. तुमच्या पैकी कोणाला माहिती असेल तर टाका प्लीज Happy

गुहेचे आहेत अजून काही फोटो जमेल तसे अपलोड करते, नेट सारखं गंड्तय्/लाईट जातायत. हे पण चार वेळा सेव्हायच्या आधीच उडलेलं. कसंबसं सेव्ह झालय.

मस्तच जायला पाहीजे केव्हातरी.. Happy

दगडुशेठ Biggrin यो तुझ काय खर नाय तु हा ट्रेक १०० री लाच कर.

कविताजी मस्तच ट्रेक आणी फोटो पण..
आमच्या ४ वर्षांपुर्वीच्या ट्रेकचि आठवण ताजी झाली.... Happy

मला माहीत नाही की ह्या लेण्यांचे नाव गणपती गडद कसे पडले पण नि:संशय ह्या ब्राम्हणी लेण्या आहेत आणी साधारणतः सातव्या शतकात खोदल्या गेल्या असाव्यात... लेण्यांमध्ये काही विशेष शिल्पकारीता नसली तरी एका लेण्यातील (जे एकमेव दुमजली लेणे आहे) महीषासुरमर्दिनीच्या मूर्तीशिवाय इतर कुठल्याही विशेष मूर्ती नाहीत. माझ्या माहीतीनुसार ईथे अजुन कालभैरव, गजलक्ष्मी मातृका यांच्या पण मूर्ती होत्या. ह्या एकूण ११ लेण्या आहेत आणी पायथ्याला सोनावळे गावातून कनकवीरा नदी वाहते. अत्यंत प्राचीन आणी पुर्वापार वाहत्या असलेल्या नाणेघाट, दार्‍या (आंबोली घाट), अहूपे घाट ह्या व्यापारी मार्गांशी भौगोलीक जवळीक बघता पुर्वी ह्या लेण्यांचे बरेच महत्व असू शकते..

आमच्या ट्रेकच्या वेळेला काढलेले काही प्रचि झब्बू म्हणून...

दुमजली लेण्यातील महीषासुरमर्दिनी (हाच फोटो मी आशुचँम्पच्या दुर्ग्-दुर्गेश्वरीच्या लेखमालीकेत दिला होता.)

सोनावळे गावातून बाहेर पडल्यावर दिसणारे लेण्यांचे प्रथम दर्शन

दुमजली लेण्यातील दुसरा मजला

लेण्यातून दिसणारे सोनावळे गाव

शेवटच्या लेण्यातून दिसणार्‍या लेण्या

सुकलेले पाण्याचे टाके

आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्या जवळ ह्याची जायचे कसे याची कुठलीही माहीती नव्हती आणी आम्ही प्रथम पळू गावात गेलो होतो आणी तिथून सोनावळे गावात गेलो होतो..
जंगलातून वाट काढत जाताना अचानक एका बेकायदा कोसळा बनवण्याच्या भट्टीवर जाऊन थडकलो आणी तिथे कोळसा बनवत असलेल्या लोकांची तारांबळ ऊडाली होती (तसेही नंतर आम्हाला जाणवले की ती सर्व माणसे शस्त्रसज्ज होती आणी तारांबळ ऊडायचीच तर आमचीच ऊडाली असती..... ):)

कविता, या ठिकाणी कसं जायचं वगैरे लिही नां. तुम्ही जीपने गेलात पण कल्याणहून कोणती एस.टी. पकडायची वगैरे ते सविस्तर टाक नां लेखात.

स्वच्छंदी धन्स माहिती करिता.

आडो टाकते माहिती आजच्या दिवसात. अजुन काही फोटोही आहेत ते ही जमल्यास टाकते.

धन्स लोक्स Happy

गुहेचे अजून काही फोटो -

प्रचि१

प्रचि२

प्रचि३

प्रचि४

प्रचि५

प्रचि६

प्रचि७ - गुहेच्या वरचा कडा

मस्त फोटो आणि वर्णन Happy सुगरणींचे खोपे मस्तच. ते दुसरं झाड म्हणजे पानापानावर पक्षी उगवल्यासारखं वाटतंय.

सुंदर फोटो, सुंदर वर्णन -
फायस्टार तर फायस्टार पण <<तिथे जाण्यापुर्वी आमच्या प्रत्येकाच्या मनाची बॅटरी डाऊनचं इंडीकेशन देत होती ती परत येताना "फुल्ली चार्ज्ड" असा संदेश देत होती. विकांत सत्कारणी लागला होता आणि पुढच्या दिवसांत पुन्हा त्या मोनोटोनस रुटीन मधे मनाचा उत्साह टिकवून ठेवणारा ऑक्सिजन भरभरुन घेऊन आम्ही कल्याण दिशेकडे पळत होतो.>> हे खूप महत्वाचे वाटले.
"दगडूशेठ" - "मानाचा" आहे खरा..........
स्वच्छंदी -
<<मला माहीत नाही की ह्या लेण्यांचे नाव गणपती गडद कसे पडले पण नि:संशय ह्या ब्राम्हणी लेण्या आहेत >> हे लई भारी स्टेटम्येंट हां.........

मस्त!!

कविता, मलाही विचारत जा गं आता.. मी ८०% वेळा नाही म्हणेन, उरलेल्या २०% होकारापैकी ९५% वेळा माझं येणं रद्द होईल, पण त्या उरलेल्या ५%ची उभारी मला कायमच राहील. Happy

अजून एक -
मी, कॅप्टन आणि बाबू, शेवटच्या गुहेपासून पुढे झाडोर्‍यातून वाट तयार करत गेलो होतो. त्या गुहेपासून अगद जवळ निवांत जागी एक धबधबा लागला... शांत जागा आहे... दुसर्‍या बाजूने खाली उतरण्यासाठी वाट मिळते का ते शोधत त्यावरून तसंच पुढे शोधत गेलो, पण वाटच नव्हती/पावसामुळे बंद झाली होती आणि जी तयार होत होती ती वरच्या अंगाला जात होती. त्यामुळे ती शोधमोहिम थांबवून चुपचाप परत फिरलो.

या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य असणार. त्यामुळेच प्रशस्त गुहा असूनही माणसांचा वावर कमी आहे. सोनवळे गावापासून थेट गुहेपर्यंत वाटेत कुठेही पाणी नाही. गुहेजवळही पाण्याचे टाके नाही.

Pages