प्रथम कविराज भुषणाचे एक काव्य...
जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी … ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि … ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि … ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि … ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि … ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि … ।
अर्थ -
हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.
(सौजन्य - ईनमिनतीन)
दुर्गांवरील देवतांमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणता येईल अशा तुळजाभवानीला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांनी नेपाळमधून गंडकी नदीजवळील शिळा मागवून त्यातून ही मूर्ती बनवून घेतल्याचा उल्लेख आहे. ज्या दिवशी तिची प्रतिष्ठापना झाली तेव्हा स्वत महाराज तिच्या पालखीचे भोई बनले आणि त्यांनी अत्यंत आदरभावाने ती प्रतापगडावर नेली. तिथे कवड्यांची माळ धारण केलेल्या महारांजानी यथासांग पूजा केली आणि आपल्या कार्याला आशिर्वाद राहू दे अशी प्रार्थना केली.
तसे पाहिले तर दुर्गांवरील देवतांमध्ये भवानीला मोठा मान. बहुतांश दुर्गांची नावे ही त्या त्या देवतांवरून ठेवलेली आढळतात..
जसे, शिवाई देवीवरून शिवनेरी, रांगणाईवरून रांगणा तसेच कर्णाई (कर्नाळा), केजंळाई (केंजळगड) आणि तुंगीदेवी (तुंग).
तर अशा या देवीच्या उत्सवात (नवरात्रात) दुर्गे दुर्घट भारी ही संकल्पना सादर करण्यात अतिशय समाधान मिळत आहे....(अर्थात, यात मोठा वाटा यो रॉक्सचा आहे...त्याने त्याच्याकडील प्रचि पाठवून या संकल्पनेला मोठा हातभार लावला...). दुर्ग गणेश या संकल्पनेला मायबोलीकरांच्या मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर यावेळीही भटके माबोकर विविध दुर्गांवर असलेल्या दुर्गामातांची प्रचि इथे टाकतीलच याची खात्री आहे.
बाकी सुरुवात, यो रॉक्सच्या प्रचिंपासून
अर्थात पहिला मान वणीच्या सप्तशृंगीचा...साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी
दुसरे महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थानी विराजमान असलेली कळसुबाई
आणि कळसुबाईचे मंदिर (प्रचि - आशुचँप)
स्वराज्याचे तोरण बांधताना राजांना आशिर्वाद देणारी तोरण्यावरील मेंगजाईमाता (प्रचि - यो रॉक्स)
राजगडच्या पद्मावती माचीवरील पद्मावतीमाता (प्रचि - यो रॉक्स)
भैरवगडावरील दैवत भैरोबाचे देऊळ...दाट जंगलात, मनुष्यवस्तीपासून दूर, जंगली श्वापदांच्या सानिध्यातले हे देऊळ अतिशय प्रशस्त आहे आणि किमान दहा-बारा जणांची मुक्कामाची सोय होऊ शकते. अनेकदा भाविक नवस फेडण्यासाठी इथे येतात...आम्ही गेलो होतो तेव्हा एका बाईच्या अंगात आले होते आणि ती घुमत होती...ते वातावरणच इतके अंगावर काटा आणणारे होते की सांगता सोय नाही.
त्या मंदिरातली ही वाघजाईदेवी...याच मंदिरात तुळादेवी आणि भैरोदेवीपण आहेत..पण देवीच्या पायाखाली असणारी आकृती वाघसदृश्य वाटल्याने हीच वाघजाई देवी असावे असे वाटते. (प्रचि - आशुचँप)
निबिड जंगलात वास्तव्य करणारी आणखी एक देवी रांगणाई..कोल्हापूरातील प्रसिद्ध रांगणा किल्ल्यावर या देवीचे देखणे मंदिर आहे....(प्रचि - आशुचँप)
मंदिर आणि त्यासमोरील दिपमाळ (प्रचि - आशुचँप)
कर्नाळा किल्ल्यावरील कर्णाईदेवी...(प्रचि - आशुचँप)
अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावरची ही पद्मावती देवी...या देवीचे मंदिर अतिशय पडक्या अवस्थेत आहे किंवा मग नव्याने बांधकाम करत असावेत. (प्रचि - आशुचँप)
त्याच किल्ल्यावर असलेल्या गणेश पंचायतनमध्ये मागच्या रांगेत एका देवीची मुर्ती दिसत आहे पण जास्त माहीती नाही...(प्रचि - आशुचँप)
कोराईगडावरील प्रसिद्ध कोराईमाता (प्रचि - जिप्सी)
तुंग किल्ल्यावरची तुंगीदेवी (प्रचि - यो रॉक्स)
जय अंबे!! छान कल्पना
जय अंबे!!
छान कल्पना
मस्तच
मस्तच
गडदैवतांना........./\........
गडदैवतांना........./\...........
मस्तच...चँप.
अजुन काही
अजुन काही "दुर्गदुर्गेश्वरी"
शिर्काई देवी (रायगड)
शिर्काई देवी मंदिर (रायगड)
मंगळादेवी (अजिंक्यतारा - सातारा)
श्री देवी भगवती (रत्नदूर्ग किल्ला - रत्नागिरी)
आडिवरे महाकाली पंचायतन (राजापूर)
या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात.
गोरखगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरातील देवी
पेठ (कोथळीगड) गडावरील दुर्गभवानी
पद्मावती देवी (राजगड)
(पद्मावती देवी प्रची मित्राच्या कॅमेर्यातुन)
_/\_ नतमस्तक...!!!
_/\_
नतमस्तक...!!!
मस्त
मस्त
व्वा रे मित्रा... भन्नाट
व्वा रे मित्रा... भन्नाट थिम... सुंदर प्रचि...
बेस्ट बेस्ट!! अजून येऊ दे!!
बेस्ट बेस्ट!!
अजून येऊ दे!!
जय अंबे ... मस्तच
जय अंबे ...
मस्तच
उदे गं अंबे
उदे गं अंबे उदे................
होउ दे सर्वदिशी मंगळ.... चढवतो रात्रंदिन संबळ...............
फुलवितो दिवटी दीपकळी......... आम्ही अंबेचे गोंधळी.......
कळसुबाई
कळसुबाई
माझ्या कडून एक अजुन भोराई
माझ्या कडून एक अजुन
भोराई देवी - सुधा गड
title="https://picasaweb.google.com/112592352501089731456/Sudhagad?authkey=Gv1s...५३८१९३७४३८०९४५९०५९४">https://picasaweb.google.com/112592352501089731456/Sudhagad?authkey=Gv1s...५३८१९३७४३८०९४५९०५९४
माला प्रची येथे कसे लावायचे ते माहीत नाही
आशू, लई आवडले..
आशू, लई आवडले..
मस्तच..
मस्तच..
सुंदरच. आशू, यो, जिप्सी,
सुंदरच.
आशू, यो, जिप्सी, धन्यवाद.
आशु.. परत एकदा मस्त
आशु.. परत एकदा मस्त कल्पना..
माझ्या कडून हे काही प्रचि..
१. कल्याणच्या दुर्गाडी किल्यावरील दुर्गाडी देवी
२. पळू - सोनावळे लेण्यातील मुख्य लेण्यातील खांबावरील महीषासूर मर्दिनी
३. त्रिंगलवाडी किल्ल्याला जाताना वाटेत लागणारे देवीच्या मंदिरातील वणीच्या देवीचे प्रतीरूप
४. चौलच्या लेण्यात स्थापीत हिंगुळजा देवी
५. चावंडच्या किल्ल्यावरील चावंडाई देवी
अजूनही काही आहेत, शोधतो आणी ईथे पोस्ट करतो...
गितुजी, प्रचि टाकण्यासाठी मदत http://www.maayboli.com/node/1556 ईथे आहे...
सगळ्या देवींना _/\_
सगळ्या देवींना _/\_
सगळ्या देवींना आणि इथे
सगळ्या देवींना आणि इथे डेटाबेस बिल्ड करणार्या उत्साही लोकांना _/\_
खूप खूप धन्यवाद.
आशु, छान संकल्पना आहे, शेवटून
आशु,
छान संकल्पना आहे, शेवटून तिसरा फोटो प्रचंड आवडला..
छान
छान
या देवींनी प्रत्यक्ष इतिहास
या देवींनी प्रत्यक्ष इतिहास घडताना पाहिला आहे.
हा विचारच किती रोमहर्षक आहे !
अप्रतिम कल्पना आहे आणि तितकेच
अप्रतिम कल्पना आहे आणि तितकेच सुंदर फोटुज पण आहेत.
हे एक महत्वाचे संकलन आहे.
___^___!!!
___^___!!!
वा नवरात्रीत देवीच्या सर्व
वा नवरात्रीत देवीच्या सर्व रुपानच घर बसल्या दर्शन घदवलत. धन्यवाद
आशुचँप छान आहे कल्पना! सर्व
आशुचँप छान आहे कल्पना! सर्व फोटो आवडले.
धन्यवाद सर्वांना.... अतिशय
धन्यवाद सर्वांना....
अतिशय सुरेख झब्बूंसाठी जिप्सी, स्वच्छंदी आणि इंद्रा यांना आभार...
कुणाकडेच तुळजाभवानीचा फोटो नाहीये का प्रतापगडावरचा ???
आशु- अॅडमिनना विचारून
आशु- अॅडमिनना विचारून लेखमालिका प्रकारात समाविष्ट करशील का प्लीज?
दुर्गगणेश आणि हेही- दोन्ही. अतिशय सुरेख दस्ताऐवज आहे. सहज सापडायला मदत होईल.
प्रथम कविराज भुषणाचे एक
प्रथम कविराज भुषणाचे एक काव्य...
जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी … ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि … ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि … ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि … ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि … ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि … ।
अर्थ -
हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.
प्रतापगड - माता तुळजाभवानी
प्रतापगड तुळजाभवानी मंदिर.
प्रतापगड पार्वती माता ( शिव मंदिर)
मानगड विंजाई माता
रोहा- ( माणगाव-जिते )कुर्डुगडाच्या पायथ्याचे जीर्ण मंदिर
कुर्डुगडाच्या पायथ्याच्या जीर्ण मंदिरातली ही जगज्जननी माता
कर्जत येथील प्राचीन लेण्यातील दुर्गामाता
From October 5, 2011
या देवींनी प्रत्यक्ष इतिहास घडताना पाहिला आहे. >>> अगदी..
तुळजाभवानीमातेकी जय.......
मस्त ईनमिनतीन
मस्त ईनमिनतीन
इनमिनतीनचे कौतुक करावे तेवढे
इनमिनतीनचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...
अप्रतिम फोटो आणि कवीराज भूषण यांचे काव्य तर फारच खास....
मी ते मूळ लेखाच्या सुरुवातीला टाकतोय चालेल ना...
Pages