प्रथम कविराज भुषणाचे एक काव्य...
जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी … ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि … ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि … ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि … ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि … ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि … ।
अर्थ -
हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.
(सौजन्य - ईनमिनतीन)
दुर्गांवरील देवतांमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणता येईल अशा तुळजाभवानीला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांनी नेपाळमधून गंडकी नदीजवळील शिळा मागवून त्यातून ही मूर्ती बनवून घेतल्याचा उल्लेख आहे. ज्या दिवशी तिची प्रतिष्ठापना झाली तेव्हा स्वत महाराज तिच्या पालखीचे भोई बनले आणि त्यांनी अत्यंत आदरभावाने ती प्रतापगडावर नेली. तिथे कवड्यांची माळ धारण केलेल्या महारांजानी यथासांग पूजा केली आणि आपल्या कार्याला आशिर्वाद राहू दे अशी प्रार्थना केली.
तसे पाहिले तर दुर्गांवरील देवतांमध्ये भवानीला मोठा मान. बहुतांश दुर्गांची नावे ही त्या त्या देवतांवरून ठेवलेली आढळतात..
जसे, शिवाई देवीवरून शिवनेरी, रांगणाईवरून रांगणा तसेच कर्णाई (कर्नाळा), केजंळाई (केंजळगड) आणि तुंगीदेवी (तुंग).
तर अशा या देवीच्या उत्सवात (नवरात्रात) दुर्गे दुर्घट भारी ही संकल्पना सादर करण्यात अतिशय समाधान मिळत आहे....(अर्थात, यात मोठा वाटा यो रॉक्सचा आहे...त्याने त्याच्याकडील प्रचि पाठवून या संकल्पनेला मोठा हातभार लावला...). दुर्ग गणेश या संकल्पनेला मायबोलीकरांच्या मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर यावेळीही भटके माबोकर विविध दुर्गांवर असलेल्या दुर्गामातांची प्रचि इथे टाकतीलच याची खात्री आहे.
बाकी सुरुवात, यो रॉक्सच्या प्रचिंपासून
अर्थात पहिला मान वणीच्या सप्तशृंगीचा...साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी
दुसरे महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थानी विराजमान असलेली कळसुबाई
आणि कळसुबाईचे मंदिर (प्रचि - आशुचँप)
स्वराज्याचे तोरण बांधताना राजांना आशिर्वाद देणारी तोरण्यावरील मेंगजाईमाता (प्रचि - यो रॉक्स)
राजगडच्या पद्मावती माचीवरील पद्मावतीमाता (प्रचि - यो रॉक्स)
भैरवगडावरील दैवत भैरोबाचे देऊळ...दाट जंगलात, मनुष्यवस्तीपासून दूर, जंगली श्वापदांच्या सानिध्यातले हे देऊळ अतिशय प्रशस्त आहे आणि किमान दहा-बारा जणांची मुक्कामाची सोय होऊ शकते. अनेकदा भाविक नवस फेडण्यासाठी इथे येतात...आम्ही गेलो होतो तेव्हा एका बाईच्या अंगात आले होते आणि ती घुमत होती...ते वातावरणच इतके अंगावर काटा आणणारे होते की सांगता सोय नाही.
त्या मंदिरातली ही वाघजाईदेवी...याच मंदिरात तुळादेवी आणि भैरोदेवीपण आहेत..पण देवीच्या पायाखाली असणारी आकृती वाघसदृश्य वाटल्याने हीच वाघजाई देवी असावे असे वाटते. (प्रचि - आशुचँप)
निबिड जंगलात वास्तव्य करणारी आणखी एक देवी रांगणाई..कोल्हापूरातील प्रसिद्ध रांगणा किल्ल्यावर या देवीचे देखणे मंदिर आहे....(प्रचि - आशुचँप)
मंदिर आणि त्यासमोरील दिपमाळ (प्रचि - आशुचँप)
कर्नाळा किल्ल्यावरील कर्णाईदेवी...(प्रचि - आशुचँप)
अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावरची ही पद्मावती देवी...या देवीचे मंदिर अतिशय पडक्या अवस्थेत आहे किंवा मग नव्याने बांधकाम करत असावेत. (प्रचि - आशुचँप)
त्याच किल्ल्यावर असलेल्या गणेश पंचायतनमध्ये मागच्या रांगेत एका देवीची मुर्ती दिसत आहे पण जास्त माहीती नाही...(प्रचि - आशुचँप)
कोराईगडावरील प्रसिद्ध कोराईमाता (प्रचि - जिप्सी)
तुंग किल्ल्यावरची तुंगीदेवी (प्रचि - यो रॉक्स)





धावेल ना भाऊ
धावेल ना भाऊ
मी थोडा उशीरच केला वर्गात
मी थोडा उशीरच केला वर्गात यायला...आशुगुर्जीं, मापी करा नि आमची ही ओंजळ समर्पित करा.
प्रचि १

अहिवंत दुर्गावर..
प्रचि २

सुधागडावरील दुर्गदेवता श्रीभोराईदेवी.
प्रचि ३

या दुर्गदेवता जरी नसल्या तरी भटक्या मंडळींच्या आवडत्या प्रचितगड- कुंडी या ट्रेकदरम्यान लागणार्या चांदेल या उठवलेल्या गांवातील या भग्नावस्थेतील देवता एकत्र करुन ठेवल्या आहेत.
प्रचि ४

घनगडाच्या पायथ्याची श्रीदेवी गारजाई.
प्रचि ५

रतनगडाजवळील प्रसिद्ध कात्राबाई खिंडीत वसलेली ही कात्राबाई.
प्रचि ६

ही प्रचितगडावरील दुर्गदेवता.
प्रचि ७

रतनगडावरील दुर्गदेवता श्रीरत्नादेवी/ रत्नुबाई.
प्रचि ८

सिन्नरजवळील डुबेरगडाच्या पायथ्याच्या गांवातील श्रीदेवी सटुआई.
प्रचि ९

तेलबैलाकडून सुधागडाकडे वाघजाई घाटाने उतरतांना सुरुवातीला वाघजाई देवीचे मंदीर आहे. त्या मंदीरातील या देवता.
प्रचि १०

कोरीगडावरील दुर्गदेवता श्रीकोराईदेवी.
हेम - देर आये पर एकदम दुरुस्त
हेम - देर आये पर एकदम दुरुस्त आये
ब्येष्ट....:)
अरे कोराईदेवीचा असा फोटो कसा काय मिळाला. त्यावेळी काय छप्पर नव्हते का काय...
व्वा.. इनमीनतीन.. सुंदर कविता
व्वा.. इनमीनतीन.. सुंदर कविता सुंदर फोटोज..
नि हेमांनु.. तुमची वाट बघीत होतो.. मस्तच संग्रह !! प्रचितगड, कात्राबाई खींड
व्वा ईनमिनतीन हेम मस्तच
व्वा ईनमिनतीन
हेम मस्तच ..
वाजंत्री घाटातुन भिमाशंकरला जाताना या देवीचे दर्शन घडते.
आशू, ..तेव्हा त्या छपराचं काम
आशू, ..तेव्हा त्या छपराचं काम सुरु होतं, तेव्हा असा छप्पर फाडके फोटो पुन्हा मिळणे नाही.
यो,.. माझी वाट कित्यां बघतंस?? तो मान दुसर्या कुनाचो तरी हां!
मस्त कल्पना. इथे फोटो
मस्त कल्पना. इथे फोटो दिलेल्या सर्वांनाच धन्यवाद
वा देवींचे छान दर्शन झाले.
वा देवींचे छान दर्शन झाले.
खुपच आवडले सगळे
खुपच आवडले सगळे फोटोज!!!
अप्रतिम!!
हेम, ईनमीन अप्रतीन प्रचि...
हेम, ईनमीन अप्रतीन प्रचि... मस्तच!
एवढ्या मोठ्या प्रमाणावर
एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या सुंदर प्रचि देणार्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
सर्वांचे मनापासून आभार......
मस्त! जिप्सी, गोरखगड व
मस्त!
जिप्सी, गोरखगड व कोथरगडच्या देव्यांची आयकनोग्राफी वेगळी वाटते आहे. त्यांची नावे कळु शकतील का?
जिप्सी, गोरखगड व कोथरगडच्या
जिप्सी, गोरखगड व कोथरगडच्या देव्यांची आयकनोग्राफी वेगळी वाटते आहे. त्यांची नावे कळु शकतील का?>>>>अगदी अगदी. नावं मलापण नाही माहिती. नेटवर सर्च सुरू आहेच.
ही गावं आहेत कुठे? आसपासचे
ही गावं आहेत कुठे? आसपासचे लोक सांगु शकतील की.
ही गावं आहेत कुठे? आसपासचे
ही गावं आहेत कुठे? आसपासचे लोक सांगु शकतील की.>>>>>गोरखगड "मुरबाड" तालुक्यात आणि कोथळीगड "कर्जत" तालुक्यात.
..
..
प्रतापगडाची तुळजाभवानीदेवी -
प्रतापगडाची तुळजाभवानीदेवी
- -
साल्हेरची रेणुकादेवी

हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा
हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा कालचा फोटो... ( ई-पुढारी वरुन घेतलाय.. )
यो भारी आलाय प्रचि
यो भारी आलाय प्रचि तुळजाभवानीचा
'आंग्लाई देवी' -
'आंग्लाई देवी' - सज्जनगड

'मंगळा देवी' - अजिंक्यतार

माहुलीच्या पायथ्याला असलेल्या शिवमंदिरातील दुर्गा माता

प्रतापगडाच्या पायथ्याकडील पार गावातील कुलस्वामीनी 'वरदायनी' आणि 'रामवरदायनी'

वा वा अगदी योग्य मुहुर्ताला
वा वा अगदी योग्य मुहुर्ताला धागा वर आलाय...
उदे गं अंबे उदे...
इंद्रा.. मस्तच रे...
इंद्रा.. मस्तच रे...
क्या बात है. खूप सुंदर आहेत
क्या बात है. खूप सुंदर आहेत प्रचि सगळी.
>>या देवींनी प्रत्यक्ष इतिहास घडताना पाहिला आहे.
>>हा विचारच किती रोमहर्षक आहे !
दिनेशदा +१००००
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
आंबाआगाऊझोटिंगइल्बिसादी
आंबाआगाऊझोटिंगइल्बिसादी प्रतिसादतत्पर धार्मिक मित्रांनो आपला अभिप्राय राहू दे, पण नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कमीतकमी नमस्कार तरी करून जावे अशी विनंती आहे!
वाह!!
वाह!!
शिवाई देवी , शिवनेरी किल्ले
शिवाई देवी , शिवनेरी

किल्ले रोहीडा , सगळ्यात उजवीकडील मूर्ती बहुतेक देवीची असावी
जय अंबे _/\_ भवानी माता -
जय अंबे _/\_
भवानी माता - टेरव, चिपळुण
रामवरदायनी - दादर, चिपळुण
भगवती देवी - धामापुर, मालवण
दुबेर गड - सिन्नर
रेणुका माता - साल्हेर गड, नाशिक
धोडाप किल्ला, नाशिक
खूप सुंदर संकल्पना.. अप्रतिम
खूप सुंदर संकल्पना..
अप्रतिम फोटोज..
__/\__
इंद्रा - झकास
इंद्रा - झकास रे.....
चिपळूणच्या देवीचा पहिला फोटो कसला तेजस्वी आहे....
जबरदस्त
Pages