'दुर्गे' दुर्घट भारी

Submitted by आशुचँप on 3 October, 2011 - 14:39

प्रथम कविराज भुषणाचे एक काव्य...

जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी … ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि … ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि … ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि … ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि … ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि … ।

अर्थ -
हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.
(सौजन्य - ईनमिनतीन)

दुर्गांवरील देवतांमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणता येईल अशा तुळजाभवानीला अनन्यसाधारण महत्व आहे. महाराजांनी नेपाळमधून गंडकी नदीजवळील शिळा मागवून त्यातून ही मूर्ती बनवून घेतल्याचा उल्लेख आहे. ज्या दिवशी तिची प्रतिष्ठापना झाली तेव्हा स्वत महाराज तिच्या पालखीचे भोई बनले आणि त्यांनी अत्यंत आदरभावाने ती प्रतापगडावर नेली. तिथे कवड्यांची माळ धारण केलेल्या महारांजानी यथासांग पूजा केली आणि आपल्या कार्याला आशिर्वाद राहू दे अशी प्रार्थना केली.

तसे पाहिले तर दुर्गांवरील देवतांमध्ये भवानीला मोठा मान. बहुतांश दुर्गांची नावे ही त्या त्या देवतांवरून ठेवलेली आढळतात..
जसे, शिवाई देवीवरून शिवनेरी, रांगणाईवरून रांगणा तसेच कर्णाई (कर्नाळा), केजंळाई (केंजळगड) आणि तुंगीदेवी (तुंग).

तर अशा या देवीच्या उत्सवात (नवरात्रात) दुर्गे दुर्घट भारी ही संकल्पना सादर करण्यात अतिशय समाधान मिळत आहे....(अर्थात, यात मोठा वाटा यो रॉक्सचा आहे...त्याने त्याच्याकडील प्रचि पाठवून या संकल्पनेला मोठा हातभार लावला...). दुर्ग गणेश या संकल्पनेला मायबोलीकरांच्या मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर यावेळीही भटके माबोकर विविध दुर्गांवर असलेल्या दुर्गामातांची प्रचि इथे टाकतीलच याची खात्री आहे.

बाकी सुरुवात, यो रॉक्सच्या प्रचिंपासून
अर्थात पहिला मान वणीच्या सप्तशृंगीचा...साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी

दुसरे महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थानी विराजमान असलेली कळसुबाई

आणि कळसुबाईचे मंदिर (प्रचि - आशुचँप)

स्वराज्याचे तोरण बांधताना राजांना आशिर्वाद देणारी तोरण्यावरील मेंगजाईमाता (प्रचि - यो रॉक्स)

राजगडच्या पद्मावती माचीवरील पद्मावतीमाता (प्रचि - यो रॉक्स)

भैरवगडावरील दैवत भैरोबाचे देऊळ...दाट जंगलात, मनुष्यवस्तीपासून दूर, जंगली श्वापदांच्या सानिध्यातले हे देऊळ अतिशय प्रशस्त आहे आणि किमान दहा-बारा जणांची मुक्कामाची सोय होऊ शकते. अनेकदा भाविक नवस फेडण्यासाठी इथे येतात...आम्ही गेलो होतो तेव्हा एका बाईच्या अंगात आले होते आणि ती घुमत होती...ते वातावरणच इतके अंगावर काटा आणणारे होते की सांगता सोय नाही.

त्या मंदिरातली ही वाघजाईदेवी...याच मंदिरात तुळादेवी आणि भैरोदेवीपण आहेत..पण देवीच्या पायाखाली असणारी आकृती वाघसदृश्य वाटल्याने हीच वाघजाई देवी असावे असे वाटते. (प्रचि - आशुचँप)

निबिड जंगलात वास्तव्य करणारी आणखी एक देवी रांगणाई..कोल्हापूरातील प्रसिद्ध रांगणा किल्ल्यावर या देवीचे देखणे मंदिर आहे....(प्रचि - आशुचँप)

मंदिर आणि त्यासमोरील दिपमाळ (प्रचि - आशुचँप)

कर्नाळा किल्ल्यावरील कर्णाईदेवी...(प्रचि - आशुचँप)

अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावरची ही पद्मावती देवी...या देवीचे मंदिर अतिशय पडक्या अवस्थेत आहे किंवा मग नव्याने बांधकाम करत असावेत. (प्रचि - आशुचँप)

त्याच किल्ल्यावर असलेल्या गणेश पंचायतनमध्ये मागच्या रांगेत एका देवीची मुर्ती दिसत आहे पण जास्त माहीती नाही...(प्रचि - आशुचँप)

कोराईगडावरील प्रसिद्ध कोराईमाता (प्रचि - जिप्सी)

तुंग किल्ल्यावरची तुंगीदेवी (प्रचि - यो रॉक्स)

गुलमोहर: 

होय आशु... कधी चिपळुणला गेलास तर टेरवला नक्की जा.

कुंभार्ली घाटा उतरुन चिपळुणला आलास की, बहादुर शेख नाक्याकडे न जाता कोकण रेल्वेच्या ब्रिजच्या आधी डाविकडे लगेच खेर्डी गावात वळायचे... हा रस्ता टेरव पर्यंत कोकण रेल्वेला समांतर जातो.. मंदिराचा परिसरही अतिशय शांत आणि निवांत आहे.

फारच सुंदर लेख. खूप आवडला.

कवी भूषण यांचे काव्य तर अप्रतिम आहे. इथे शेअर केल्याबदद्ल धन्यवाद.
ही कवी भूषण यांची वेगळी स्वतंत्र रचना आहे हे की त्यांच्या या
इंद्र जिमि जंभ पर,
बाढव सुअंभ पर,
रावन सदंभ पर,
रघुकुलराज है ! कवितेचाच हा भाग /एक्सटेन्षन आहे?

दाभोळची श्री चंडिका

चंडिकेच्या दर्शानासाठी गुहेत वाकून जावे लागते. आतील स्वयंभू मुर्तीचा फोटो काढण्यास मनाई आहे. वरिल फोटो गुहेच्या कमानीवरिल आहे.

चॅम्प, इंद्रा, यो रॉक्स, ईनमिनतीन, जिप्सी

जबरी फोटो आहेत

इंद्रा क्लोज अप अप्रतिम

धागा वर काढण्यात यावा म्हणून >> आज दिसला हा.

अजून कुणाकडे असतील तर त्यांनी कृपया टाका >> गड दुर्गा म्हणून "माझे दुर्गभ्रमण" अंतर्गत रोज एक गड दुर्गा बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतोय

Pages