Submitted by एम्बी on 4 October, 2011 - 01:54
मूळ कवयित्री घुमा यांची माफी मागून
मूळ कलाकृती:
http://www.maayboli.com/node/29454
विडंबनः
आम्ही दोघ लोळत पडलो होतो गटारात,
डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन
ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.
जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते,
"जिन चांगलीच चढलेली दिसतेय तुला. चांगलीच तर्र झालीयेस!"
आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,
"मला तरी एक कारण आहे. तू का न पिता झिंगला आहेस?"
त्यानी ते खरेच ऐकले की काय? म्हणाला,
"बिल भरतो आहे तुझ्या दारवांचे."
किती गंमत ना?
मी पडले त्याने पाजलेली जिन पिऊन
आणि तो पडला माझे बिल पाहून.
मी आणि माझा झिंगलेला क्षण मग
नुसतच लोळत राहिलो मूकपणे गटाराकडे एक टक पहात....
गुलमोहर:
शेअर करा
टाकलीस का?
टाकलीस का?
लै भारी एम्बी
लै भारी एम्बी
आ़ज घाऊक विडंबनांचा दिवस
आ़ज घाऊक विडंबनांचा दिवस दिसतोय...
लै भारी
लै भारी
भारी
(No subject)
धन्यवाद!!
धन्यवाद!!
(No subject)
बापरे! देशी घेऊ की परदेशी.
बापरे! देशी घेऊ की परदेशी.
(No subject)
भारीच
भारीच
भारी हो
भारी हो
(No subject)
जीन पिल्यावर गटारात
जीन पिल्यावर गटारात पडण्याइतकी चढते ? नविनच समजते आहे ? जीन पिल्यावर सुध्दा कधी हा साक्षात्कार झाला नाही. असो पण जीन पेक्षा तुमच्या विडंबनाने नशा आली.