आम्ही दोघं लोळत पडलो होतो.....(नव्याने)

Submitted by एम्बी on 4 October, 2011 - 01:54

मूळ कवयित्री घुमा यांची माफी मागून

मूळ कलाकृती:
http://www.maayboli.com/node/29454

विडंबनः

आम्ही दोघ लोळत पडलो होतो गटारात,
डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन
ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.
जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते,
"जिन चांगलीच चढलेली दिसतेय तुला. चांगलीच तर्र झालीयेस!"
आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,
"मला तरी एक कारण आहे. तू का न पिता झिंगला आहेस?"
त्यानी ते खरेच ऐकले की काय? म्हणाला,
"बिल भरतो आहे तुझ्या दारवांचे."
किती गंमत ना?
मी पडले त्याने पाजलेली जिन पिऊन
आणि तो पडला माझे बिल पाहून.
मी आणि माझा झिंगलेला क्षण मग
नुसतच लोळत राहिलो मूकपणे गटाराकडे एक टक पहात....

गुलमोहर: 

जीन पिल्यावर गटारात पडण्याइतकी चढते ? नविनच समजते आहे ? जीन पिल्यावर सुध्दा कधी हा साक्षात्कार झाला नाही. असो पण जीन पेक्षा तुमच्या विडंबनाने नशा आली.