दृष्ट कशी काढावी?

Submitted by जागोमोहनप्यारे on 23 September, 2011 - 05:54

दृष्ट कशी काढावी?

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? )

संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी Happy ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते.

दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते.

दृष्ट नेमकी कशी काढावी? कोणत्या वस्तू वापरतात? दृष्ट कोणत्याही तिथीला काढता येते का? कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? Proud माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांची दृष्ट काढता येते का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? <<< जागो, माफ करा पण हा प्रश्न कधी डोक्यातच आला नव्हता त्यामुळे खूप हसलो. Lol

लहान बाळांची रोजच तर मुल जास्त किरकिर करु लागली, आजारी पडली की दृष्ट काढतात आमच्या एरियामध्ये. दृष्टीसाठी मिठाचे खडे, मोहरी, केसांची गुंत, मिरचीचा तुकडा असे सामान वापरतात. आमच्याइथली एक कामवाली पाच दगड घेउनपण दृष्ट काढायची.
एक प्रकार आहे भाताने दृष्ट काढण्याचा. हा मोठी माणसे आजारी असल्यावरपण काढतात. काही जण दही भातही काढतात.
एक प्रकार आहे निखारे तांब्यात घ्यायचे. परातीत पाणी घ्यायचे. मग तो तांब्या दृष्ट लागणार्‍यावर ओवाळून परातीतील पाण्यात उपडा करायचा. जर पाणी तांब्यात शोषले तर दृष्ट लागली होती असे काहीतरी आहे. मला निट कल्पना नाही.

माझ्या सा.बा. लहान मुले घरात येताना उंबरठ्यावर पाण्यात चिंच आणि तांदळाचे दाणे टाकुन ते पाणी येणार्‍या दिशेकडे फेकतात.

ह्या सगळ्याने नक्की काय होत हे माहीत नाही. हे सगळे मी पाहीलेले प्रकार आहेत. ह्याच्यावर माझा विश्वास आहे असे नाही.
पण माझी मुलगी लहान होती तेंव्हा मात्र ती आजारी वगैरे पडली की मी तिची दृष्ट काढायचे. त्याने माझ्या मनाचे समाधान व्हायचे.

शनीवारी मुलांना नजर लागू शकते. मीठ खडे/ मोहरी हातात घेओन खालील म्हणायचे.
इडा पिडा ट्ळो, घरची दारची शेजार्‍याची कोणाची ( स्पेसिफिक व्यक्तीची) असे आपल्याला रेलेवंट काय असेल ते. त्याची दृष्ट लागली असल्यास उतरून जावो. हे बोलताना त्या माणसावरून ते ओवाळायची. मीठ पाण्यात टाकून ते पाणी त्या माणसाच्या डोळ्याला लावायचे. मोहरी असेल तर
गॅस वर जाळायची. मग वास सुटतोच. मग म्हणायचे बघ किती कडक नजर लागली होती ते.
संध्याकाळी शक्यतो काढावी.
कोणी फार सुरेख वगैरे दिसत असल्यास डाव्या पायाची चप्पल त्या मानसाच्या तोंडा भोवती फिरवून थू थू थू म्हणायचे. प्रेमाच्या माणसाने दृष्ट काढावी.
गोबरी गोजिरी मुले, फार सुरेख व हँड्सम दिसणारी मुले किंवा प्रेमी जन यांना नजर लागेल असे वाटणे
हा खरेतर मानसिक कमकुवत पणाचा भाग आहे. त्यात शास्त्रीय तथ्य काय आहे माहीत नाही. पण कोनीतरी काळजीने नजर उतरवली की बरे वाट्ते. असे भारतीय पद्धतीचे प्रेम करून घ्यायला मजा येते.
आईने मुलाची, बायकोने अहोंची नजर उतरवलेली पाहिली आहे. श्रद्धेचा भाग आहे.

घरी, दुकानात नजर लागू नये म्हणून नजर सुरक्षा कवच मिळते ते लावावे. मी विकायची एजन्सी घेऊ काय ? बराच खप आहे.

दृष्ट मीठ व मोहरी ने सुधा काढतात. मीठ व मोहरी दोन्ही हातांच्या मुठीमधे थोड्या थोड्या घेतात. ज्याची काढायची आहे त्याच्यावरुन ओवाळ्तात. ओवाळ्ताना काही तरी म्हणायचे पण असते. काय ते आठवत नाही. हवेच असेल तर आईला विचारुन सांगेन. पण शक्यतो स्वत: ची स्वतः काढलेली कधी ऐकलेले नाही. नंतर ते मीठ मोहरी पाण्यात सोडतात.

चर्मकार कडुन पण बांगड्या बनवुन घेतात आणि लहान मुलांच्या हातात घालतात.

घरी, दुकानात नजर लागू नये म्हणून नजर सुरक्षा कवच मिळते ते लावावे. मी विकायची एजन्सी घेऊ काय ? बराच खप आहे.<<< अश्वीनीमामी, हे लई भारी, पहिला त्यांना ढिल देउन पटवायचे कि तुम्ही किती महत्वाचे आहात ते, आणि मग नंतर घाबरवायचे, अहो दृष्ट लागेल ना तुम्हाला, घ्या आमचा माल. Proud

लिंबू-मिरच्या-बिब्बा, उलटी काळी बाहुली असं बांधलेलं पाहिलं आहे दुकानात, गाडीला..ते दृष्ट लागू नये म्हणूनच असतं बहुतेक.

>>>> बायकोने अहोंची नजर उतरवलेली पाहिली आहे >>>>>
मामे अग पण हे आमच्या लिम्बीला नै ना पटत!
म्हणजे दृष्ट काढण्यावर तिचा विश्वास आहे, पण माझी काढावी अशी तिला गरज भासत नाही Sad
इत्का का मी वाईट्ट दिस्तो? कुणाची दृष्टही न लागण्याइतका? Proud

महेश, धार्ष्ट्याचा नाही, चान्गला प्रश्न आहे.
होय, त्यान्ना पण लागू शकते, फक्त ती साध्या माणसान्चि नाही तर तितक्याच तीव्र (वाईट) इच्छाशक्ती असलेल्या माणसान्ची लागते. एखाद्याची दृष्ट लागायला त्या व्यक्तिच्या इछाशक्तिबरोबरच, कुन्डलीतील ग्रहयोगही कारणीभूत असतात. ग्रहयोगात, व्यक्तिचा हेतू असेल वा नसेल, पण वाईट नजरेचे वाईट परिणाम आढळतात. सूप्त पण आत्यन्तिक तीव्र हेवा/मत्सर यास जसे कारणीभूत होतात त्याचबरोबर जन्मतःच जळखाऊ/दुसर्‍याचे वाईट चिन्तणारी वृत्ती हे कारणही असू शकते.
दृष्ट लागणे फार नन्तरची गोष्ट, आम्हाला, कुणाही "परक्याच्या" नजरेसमोर खायला बन्दी असायची लहानपणी. रस्त्यावर उभारुन खाणे हे अलिकडील फ्याड, तेव्हा लहानपणी उम्बरठ्याबाहेर नुस्ते शेन्गदाणे खात गेल तरी चालायच नाही (अन तेच बरोबर होत). कुणालाही दाखवित दाखवित वा दिसेल अशा पद्धतीने खायला बन्दीच असायची. पदरच खाव पण नजरच खावु नये ही म्हण ऐकवली जायचीच, पण त्यामागिल पदरच्या खर्चाचा व्यावहारिक दृष्टीकोन वगळताही, "दृष्टीचे" खाऊ नये हा गर्भितार्थ असायचाच.
दृष्ट कुणाची लागते याबरोबरच, कुणाला लागु शकते याबाबतही ग्रहयोगाप्रमाणे व्यक्तिगत निकष अस्तात. काही व्यक्ति दृष्ट लागण्याबाबतही "फारच हळव्या' अस्तात असे अनुभवास आहे.
दृष्ट लागण्यापासुन होणारा त्रास कळत/जाणवत असल्याने त्याचा गम्भिरपणे विचार करणारे करतात. पण याच्याच नेमके उलटे, ते म्हणजे आशिर्वचनावेळची सदिच्छा जर तीव्र असेल, अशिर्वचन उच्चारणारा सत्यवचनी असेल तर आशिर्वचनाप्रमाणे घडण्यास सहाय्य होते. मात्र हल्ली आशिर्वचने तितक्या गम्भिरपणे अधिकारात देणारेच उरले नाहीत, येवढेच नव्हे तर मागे कुठेतरी म्हणल्याप्रमाणे "आशिर्वाद काय द्यावा/का द्यावा/त्याने काही होते का" वगैरे अनेक शन्काकुशन्कान्नी भरलेली मनेच आढळतात, त्यान्चे कडून काय प्राप्त व्हावे अशी अपेक्षाच नको!
आशिर्वचना व्यतिरिक्त, आपल्यात अजुनही म्हणतात की "कुणाचा तळतळाट" घेऊ नये, तर तो तळतळून जीव कळवळून तत्कालिक तीव्र इच्छाशक्तिने उच्चारलेला (बहुधा शापप्रद) शब्द सहसा खरा ठरतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र दृष्ट व तळतळाट यातिल मुलभूत फरक म्हणजे, दृष्ट लागण्याकरता व्यक्तिने स्वतः काहीच केलेले नसते/ती अपराधी नसते, तर तळतळाट हा मात्र व्यक्तिच्या वाईट कृतीवरील प्रतिक्रियात्मक आन्तरिक शाब्दिक जळफळाट असतो. शाप असतो.

दृष्ट लागण्याकरता व्यक्तिने स्वतः काहीच केलेले नसते/ती अपराधी नसते, तर तळतळाट हा मात्र व्यक्तिच्या वाईट कृतीवरील प्रतिक्रियात्मक आन्तरिक शाब्दिक जळफळाट असतो. शाप असतो.

एकदम बरोबर.. अगदी योग्य माहिती दिलीत. धागा काढण्याचं सार्थक झालं.. Happy पण यावर उपाय काय आहेत? दुष्ट व्यक्तींचा संपर्क टाळल्यास फरक पडतो का? नाहीतर वर दिलेत तसे आणखी काही उपाय आहेत का?

मोराचे पिस सुद्धा दृष्ट काढण्यासाठी म्हणून वापरतात असे ऐकले आहे.

म्हणजे दृष्ट काढण्यावर तिचा विश्वास आहे, पण माझी काढावी अशी तिला गरज भासत नाही
इत्का का मी वाईट्ट दिस्तो? कुणाची दृष्टही न लागण्याइतका? >>> लिंबुभाऊ, Rofl

>>>> पण यावर उपाय काय आहेत? <<<
नित्य/सदासर्वकाळ "सद्वर्तनाने" आन्तरीक शक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय.
[आता सद्वर्तन कशास म्हणावे, कशाच्या सापेक्ष याच्या वादात बराच धुरळा उडवणारे भेटतील, पण या बीबीच्या अखत्यारित तो विषय नाही, मी मात्र इथे सद्वर्तनाबाबत हिन्दू धर्मात सान्गितलेले नियम्/रुढी/परम्परान्चा विचार करतोय, बाकी कुणाला अन्य धर्म/भौगोलिक ठिकाणे इत्यादिन्चा विचार करुन ठरवायचे असेल तर ते मोकळे आहेत, हो ना, उद्या एखाद्या गुन्हेगाराला जमिनित खान्द्यापर्यन्त पुरुन त्यावर दगडान्चा वर्षाव करुन ठार मारणे हे कुणा वावदुकपटूला सद्वर्तन वाटल्यास त्यास कोण आडकाठी करु शकेल? नै का? Proud ]

नित्य/सदासर्वकाळ "सद्वर्तनाने" आन्तरीक शक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय.

अगदी माझ्या मनातलं बोल्लात ! मीदेखील यावर हाच विचार करत होतो.. स्वतःभोवती एक संरक्षणकवच आपणच तयार केले पाहिजे जे सदा सर्वकाळ काम करेल. Happy .. पण कसे? हाच प्रश्न आहे

स्वतःभोवती एक संरक्षणकवच आपणच तयार केले पाहिजे जे सदा सर्वकाळ काम करेल.>> असे काही होत नाही रे. आता अझरुद्दीन चा मुलगा अन पुतण्या काय पापकर्मी होते का. लहान वयात गेले. त्यांना नाही ते काही सुरक्षा कवच? भुकंपात अन इतर वेळी मुले बाळे निष्पाप लोक मरतात आपण आपले भाबडे पणे असे काहीतरी विचार करतो. पण सांगू का हॅरी पॉटरच्या आईने कसे त्याच्या भोवती प्रेमाचे सुरक्षा कवच उभारते तसे काहीतरी आपल्या भोवती असावे असे नक्की वाट्ते. पट्त नाही पण वाट्ते.

लिंबू तू स्वतःच लिंबू मग तुझी दृष्ट कशी काढायाची भाऊ?

लिंबूदा, सत्यवचन श्रीमान !
तुम्ही जे लिहिलेत ते सारे माहिती होते आधीपासुनच, पण तुमच्यासारखे एवढे छान समजावता आले नसते.
कवच उभारणे फार अवघड नाही, आपण सतत चांगले वागत राहिले तरी खुप फरक पडू शकतो.

आता अझरुद्दीन चा मुलगा अन पुतण्या काय पापकर्मी होते का.

हे अचानक येणार्‍या संकटाचे उदाहरण वातते, नजर लागल्याचे नव्हे... नजर लागते तेंव्हा दीर्घका:ळ आणि अनेक छोटीमोठी दु:खे येतात...

आपले मन खंबीर असेल तर नजर लागेल की नका?

उदा. मी खंबीर आहे.. कुणी नजर लावून दाखवू शकतो का? म्हणजे पुरावा मिळेल की नजर खरच लागते.. तसेच नजर उतरल्याचा काही शास्त्रोक्त पुरावा आहे का? की आपले सगळे ऐकिव माहिती वर विश्वास ठेवून हे सगळे चाललेले अस्ते? खुलासा करेल का कुणी?

खुलासा करेल का कुणी?

त्यासाठीच हा धागा आहे..

द्रुष्ट लागू नये म्हणुन हे उपाय करुन पहा:

घरा व दुकानावर 'बुरी नजर वाले तेरा मुह काला', 'जलो मगर दिये की तरहा' या सारख्या पाट्या, 'तू १३ देख' या पाटी सोबत लावाव्या :))

एखाद्या व्यक्तीला नजर लागयची भिती वाटत असेल तर भिती जाईस्तोवर सेकण्ड हॅण्ड दिसाणारे किंव्वा खरच सेकण्ड हॅण्ड असलेले कपडे घालुन कायम सुतक असल्यासारखा चेहरा घेउनच घरातुन बाहेर पडावे Lol

आमच्या इथे एका देवळात कारपूजा म्हणून एक प्र॑कार असतो. बहुदा दाक्षिणात्य भारतीय तिथे असतात.

आम्ही फार पूर्वी नवीन कार घेतल्यावर घरीच नारळ फोडून त्याचे पाणी शिंपडत असू. दोन तीन वेळा केल्यावर त्याचे कौतुक संपले. दोन तीन वर्षांपूर्वी आमच्या दोन्ही गाड्यांना अपघात झाले. म्हणून मी विचारले की आमच्या गाडीची कारपूजा कराल का? ते म्हणाले फक्त नव्या गाडीची करतात. मी म्हंटले अहो, इतकी दुरुस्ती केली की आता नव्यासारखीच झाली आहे गाडी, तरी ते नाही म्हणाले. म्हणजे आता डोळे उघडे ठेवून नि रस्त्यावर लक्ष ठेवून गाडी चालवायला लागते!

सध्या मात्र आम्हा दोघांना जबरदस्त दृष्ट लागली आहे. घराभोवती सुंदर बाग फुलली होती, बर्‍याच जणांनी कौतुक केले. आणि ऑगस्ट महिन्यातच सगळी झाडे मरू लागली. आम्हा दोघांचीहि तब्येत उत्तम असे. त्याबद्दलहि काही जण म्हणाले वा, वा. नि नंतर कानाचे इन्फेक्शन होऊन सौ. ला दहा दिवस रजा घ्यावी लागली, इतके वाईट इन्फेक्शन. मला सुद्धा पोटात व्हायरस होऊन जबरदस्त त्रास झाला, एक दिवस हॉस्पीटलमधे!
बहुधा मला साडेसाती चालू झाली असावी, परत एकदा, आठवणीत चौथ्यांदा!!

दारू पिणे सोडले, मांसाहार सोडला. व्यायाम करणे, वेळच्या वेळी खाणे, जरुरीपेक्षा जास्त न खाणे, तळकट, तूपकट न खाणे, कमी फॅट, कमी कोलेस्टेरॉल, बिनसाखरेचे पदार्थ खायची सवय केली.

या गोष्टी करायला लागल्यापासून सर्व काही सुरळीत आहे. आता दृष्ट लावू नका! सौ. चा विश्वास नाही दृष्ट वगैरेवर!

जामोप्या मुद्दलात दृष्टच लागू नये म्हणून एक मोठ्ठा काळा तिट लावून फिरलात तर दृष्ट लागत नाही. किंवा दुसरा उपाय म्हणजे लिंबं आणी मिरच्या घेऊन आणि शरीरावर त्या इतरांना दिसतील अश्या रितिने लटकवायच्या म्हणजे इडा पिडा टळेल.

झक्की आमच्या इथे एका सिद्धीविनायक देवळात वाहनपूजा करून मिळते.
गाडींच्या चाकांप्रमाणे रेट वाढत जातात. ऑफिशियल दरपत्रक आहे देवळात लावलेले. उदा, स्कूटर ५०,रिक्षा १००, कार २००, ट्रक ५०० इ.

इथे एका प्रसिद्ध गुरुद्वार्यात ट्रकवाले आपल्या ट्रकची नंबरप्लेट ड्युप्लिकेट करून एका झाडावर लटकवून किंवा ठोकून ठेवतात.

>>>> बहुधा मला साडेसाती चालू झाली असावी, परत एकदा, आठवणीत चौथ्यांदा!! <<<
झक्की, तुम्ही नव्वदी पार केलीत का? Proud हिशेब जुळत नैये माझा!
की जन्मतः पहिली, तिशीच्या आसपास दुसरी अन साठीला तिसरी साडेसाती, व्यतिरिक्त, तुमच्यामुळे "इतरान्ना" (खर तर मला म्हणायच होत सौ.झक्कीन्ना Proud पण मी आहे लहान, अस कस म्हणू?) कायमची लागलेली चौथी अशी काही गणना तुमच्या आठवणीत नाहीये ना? Wink

केदार | 24 September, 2011 - 01:45 नवीन
अनुमोदन
मागे त्या दृष्ट लागू नये म्हणून काय टांगावे बाफ वरून ही लिंबू मिर्ची वाली आयडिया आली का?

Pages