दृष्ट कशी काढावी?

Submitted by जागोमोहनप्यारे on 23 September, 2011 - 05:54

दृष्ट कशी काढावी?

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? )

संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी Happy ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते.

दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते.

दृष्ट नेमकी कशी काढावी? कोणत्या वस्तू वापरतात? दृष्ट कोणत्याही तिथीला काढता येते का? कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? Proud माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांची दृष्ट काढता येते का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा, बरोबर!
बाबु, अरे कस्च काय, ब्याटिन्ग कस्ली कर्तोय? सध्या मन्गळ माझ्या वाचास्थानातुन भ्रमण कर्तोय, मुळचा पण तिथेच आहे! जन्मजात फटकळपणा आवरुन धरायला मला प्रत्येक अक्षर न अक्षर खूप संयमाने विचारपूर्वक थाम्बत थाम्बत लिहाव लागतय, न जाणो फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची!

>>>
हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय?
>>>
या बद्दल माझ्या समाजवादी मित्रास विचारले असता त्याने चप्पल काढली. दृष्ट लागावी असा माझा चेहेरा नसल्याने खेटराने पूजा बांधली जाण्या आत तिथून 'i made black' (मी काळे केले)

आमच्या एकत्र कुटुंबात सारखी कुणाला न कुणाला दृष्ट व्हायचीच. विशेषतः पुरषांना! दृष्ट होणे म्हणजे काय तर कपाळभरुन डोकं दुखणे, किंवा अंग गरम होणे. मग सा.बाई लगेच त्यांच्या मुलांना," अगं बाई, दृष्ट झाली वाटतं...थांब तुझी सायसंध्याकाळी नजर काढु! असं म्हणुन एक काळ्या कपड्याची वाती दुपारपासुन तेलात भिजवायच्या. दिवेलागणीला ती वात मातीच्या पणतीत घालुन पेटवायची. तिच्याने २-४ वेळेस ओवाळुन "इडा पिडा टळो..." असे काहीतरी पुटपुटायच्या. मग कानावर कडाकडा बोटे मोडायच्या. नंतर ती पेटती वात सांडशीत उभी धरुन एक चामड्याचा बुट उलटा करुन त्यावर धरायच्या. अर्थातच ती दुपारपासुन चांगली तेलात भिजलेली असल्याने तेलाचा जळता थेंब बुटावर पडतांना 'चुर्र ..चुर्र' असा आवाज यायचा. मग म्हणायच्या," बघ बघ कशी बोलते आता" !! खरं खोटं काय माहीत .. पण ज्याला दृष्ट झाली तो ही खुश व्हायचा.
विशेष म्हणजे ही दृष्ट त्यांच्या सगळ्या मुलांनाच व्हायची,....सुनांना नाही. कधी कधी तर सा.बुवांना पण व्हायची. Uhoh

>>>> पण ज्याला दृष्ट झाली तो ही खुश व्हायचा.
अग पण डोके दुखायचे थाम्बायचे की नाही ते नाही का नोन्दवुन ठेवलेस? Proud बघ, आता यामुळे हे बुप्रा हातात कोलित मिळाल्याप्रमाणे म्हणत सुटणार की दाखवा आकडेवारी! Wink
अन आकडेवारी दाखवली तरि त्याला "अधिकृत" स्वरुप नाही म्हणून मानणार नाहीत.

छान

मी मात्र इथे सद्वर्तनाबाबत हिन्दू धर्मात सान्गितलेले नियम्/रुढी/परम्परान्चा विचार करतोय,
नियम, रूढी, परंपरा साद्वार्तानात येत नाहीत. कारण ह्या नियम रूढी बनवणार्यांनी स्वताचा, स्वताच्या जमातीच्या फायद्याचा विचार करून ह्या बनवलेल्या असतात. त्यात इतरांचा नुकसानही असू शकत. त्यापेक्षा दया , करुणा असणं, मदत करण्याची वृत्ती (लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता ) , निर्व्यसनी असणं सद्वार्तनात मोडू शकतं.

स्वतःभोवती एक संरक्षणकवच आपणच तयार केले पाहिजे जे सदा सर्वकाळ काम करेल.>> असे काही होत नाही रे. आता अझरुद्दीन चा मुलगा अन पुतण्या काय पापकर्मी होते का. लहान वयात गेले. त्यांना नाही ते काही सुरक्षा कवच? भुकंपात अन इतर वेळी मुले बाळे निष्पाप लोक मरतात आपण आपले भाबडे पणे असे काहीतरी विचार करतो
लहान वयात कोणी गेला म्हणून तो जीव पापी नवता असं थोडीच असतं ? अकाल मृत्यू पापी लोकांनाच तर येत असतो न . लहान वयात गेलेली माणसं उलट जास्त पापी असतात . आणि भोळी बाबडी लोक म्हणजे काय ? कोण भोळ बाबड असत ? आपण दिवसातून इतकी पापं करत असतो कि त्याचा हिशोब आपण विसरून जातो पण आपल्या संचितात त्याची नोंद होताच असते

दृष्ट काढण्यावर माझा अजिबात विश्वास नाही. ती दृष्ट लावणारी भुतं काय मीठ , मोहर्या , मिरच्यांना घाबरतात कि काय ? Happy त्यापेक्षा आपल्या आवडत्या देवतेच्या कवचाचा पाठ, ईश्वर स्मरण, नाम स्मरण, चांगली कर्म ह्यामुळे आपल्याभोवती संरक्षणकवच निर्माण होते जे भेदून जायला दुष्ट शक्तींना त्रास होतो. हि गोष्ट एकदम खरी आहे. प्रयोग करून पाहू शकता

माझी बहिण म्हण्जे एक्दम जेनेलिया दिसुजा...
तिल फर्स्ट ईअर ल द्रुश्ट लागली.. फार आजारी पडायची..

तिच्या वाढदिवसाला तिच्या मैत्रीणिंनी तिला लिंबु मिरची चे दागिने केले होते.. गंमत म्हणुन Happy Happy
ते आठवलं हे वाचुन सगळं!!

मोहिनी 333 ह्यांनी अगदी अचूक मुद्दा मांडलाय. बेसिकली दृष्ट लागते ते सूक्ष्म पातळीवर म्हणजे मनावर (म्हणूनच दृष्ट लागणे हां सिद्धांत शास्त्रीय दृष्टया प्रूव्ह होत नाही पण खरा आहे) आणि रिझल्ट्स दिसतात ते स्थूल पातळीवर म्हणजे शरीरावर (ज्याला डॉक्टरची बाह्य उपचाराची औषधे लागू नाही पड़त असे अनेकवेळा अनुभव येतात)

मन सुदृढ़ करणे म्हणजेच ईष्ट दैवताचे / सदगुरूंचे नामस्मरण करून आपला ऑरा अधिक बळकट करणे. जेवढे हे प्रभामण्डल कमकुवत तेवढे आपण ह्या नजर लागणे वगैरे त्रासांना सहज बळी पड़त असतो. रामरक्षा आणि हनुमंताची स्तोत्रे नक्कीच फायद्याची ठरतात पण जिकडे श्रद्धा नसेल तेथे काय ?

तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे Happy

आमच्या घरात सुद्धा द्रुष्ट काढण्याचा प्रकार आम्ही लहान होतो तेव्हापासून पहात होतो. एका मोठ्या परातीमध्ये पाणी भरुन आई घेत असे. तांब्याची घागर अगर लहान तोंड असलेली कळशी घेऊन , त्यात जळके कागद कोंबावयाचे, आणि ती घागर अगर कळशी , परातीमधल्या पाण्यावर उपडी टाकावयाची.परातीमधील पाणी शोषले गेले तर , नजर लागली होती आणि आता नजर उतरवली गेली, असे समजायचे. त्यावेळी पाणी शोषण्याचे कारण कळत नसे, पण जळक्या कागदांमुळे घागरीच्या आतमधील हवेचा दाब कमी होतो, आणि परातीमधील पाण्यावर , तुलनेने हवेचा जास्त दाब असल्याने, पाणी आतमध्ये शोषले जात असे.
कां कोणास ठाऊक, पण मनात असा विचार येतो, ज्यांची नजर इतरांना लागते अशी माणसे , जर ओळखता आली , तर अशा सर्वांना भारताच्या चीन, पाकिस्तान सीमेवर उभे करुन , पाकिस्तान व चीन सैन्याला " नजर " लावण्यास सांगावे, म्हणजे सैन्यावरचा बराच खर्च कमी होवु शकतो.

चाणक्य ह्यांच्यावरील पुस्तकात शत्रु पक्षासाठी अगदी चिचुंदरी सारख्या प्रण्यांचा वापर वगैरे पण उल्लेख लहानपणी वाचलेले आता आठवले
त्यात म्हणे शत्रु पक्षाच्या सैनिकांची मूत्रनलिका ब्लॉक होते Lol आणि लघवी तुंबुन ते त्रस्त होतात Proud

>>>कोणी फार सुरेख वगैरे दिसत असल्यास डाव्या पायाची चप्पल त्या मानसाच्या तोंडा भोवती फिरवून थू थू थू म्हणायचे. --
हहपुवा.

>> 16 व्या शतकात पोर्तुगीजांनि मिरची भारतात आणलीत्याच्या आधी काय करत होते ?

त्या आधी आल्याचा वापर करत

बंगालमध्ये फार काळी जादू म्हणून राई वरच्या क्रमांकावर.
-----
लिंबू, नारळ,कोहळा ही फळेही यादव त आहेत.

लिंबू तर अगदी स्पेशल आहे. नवी नवरी प्रथमच सासरच्या
घरात येण्यासाठी दरवाज्यापाशी उभी असते तेव्हा तिची दृष्ट लिंबू आणि मीठ म्हणजे लिंबलोणाने काढतात.

लिंबू तर अगदी स्पेशल आहे. नवी नवरी प्रथमच सासरच्या
घरात येण्यासाठी दरवाज्यापाशी उभी असते तेव्हा तिची दृष्ट लिंबू आणि मीठ म्हणजे लिंबलोणाने काढतात.

अच्छा! लोण म्हणजे मीठ होय!! मला वाटायचं की लोणचं.

आत्ता लक्षात येतंय, लवण वरून लोण आलं असावं.

Pages