मायबोली गणेशोत्सव २०११ - निकाल आला!

Submitted by संयोजक on 12 September, 2011 - 11:27

Wig.JPG_.jpeg

होश्शियाऽऽऽर!!!!!

मायबोलीनगरीच्या आजच्या सभेचे कामकाज सुरू होत आहे होऽऽऽऽ

सभापती : चिटणीस, आजचा जाहीरनामा सर्वांसमोर मांडा.

चिटणीस : आजच्या जाहीरनाम्यानुसार, मायबोलीनगरीत ११ दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता आणि विविध स्पर्धांच्या निकालांची घोषणा यांचा सभेत प्रामुख्याने अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

सभापती : चिटणीस, स्पर्धांचे निकाल तयार आहेत काय?

चिटणीस : हो, निकाल तयार आहेत. आपली हरकत नसेल तर ते इथे जाहीर व्हावेत अशी मी विनंती करतो.

एक सभासद : चिटणीस यांच्या विनंतीला मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद.

सभासद : सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून आता आपण निकाल जाहीर करूया. चिटणीस, कृपया निकाल जाहीर करा.

चिटणीस :
स्पर्धा क्रमांक १ : प्रवासवर्ण स्पर्धा, मतदानाने निकाल जाहीर होत आहेत.
विजेती प्रवेशिका : बागेश्री

स्पर्धा क्रमांक २ : आमंत्रण लेखन स्पर्धा, मतदानाने निकाल जाहीर होत आहेत.
विजेती प्रवेशिका : कविता नवरे

स्पर्धा क्रमांक ३ : मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकेची निवड केली आहे.
विजेती प्रवेशिका : Ulhas Bhide (उल्हास भिडे)

स्पर्धा क्रमांक ४ : प्रकाशचित्र स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकांची निवड केली आहे.
विषय - शब्दांवाचून कळले सारे....

विजेती प्रवेशिका : कांदापोहे (प्रवेशिका १३)
विषय आणि व्यक्त होणारी भावना आवडली. कंपोझिशन खूपच मध्यवर्ती झाले आहे. व्यक्तींच्या नजरेच्या दिशेने अधिक मोकळी जागा असती तर हा फोटो अधिक चांगला वाटला असता.

उपविजेती प्रवेशिका : प्रफुल्ल शिंपी (प्रवेशिका १२)
चेहर्‍यावरचे भाव खूप छान टिपले आहेत. कंपोझिशन, रंग आणि contrast अजून चांगले करता आले असते.

विजेत्या प्रवेशिका इथे बघा.

विषय - जादू तेरी नजर....

विजेती प्रवेशिका : रोहित ..एक मावळा (प्रवेशिका १४)
विषयाची अनुरूपता, फोटोसाठी असलेली नजर खूप आवडली. कंपोझिशनही छान झाले आहे.
खास वेगळेपणासाठी या फोटोला विशेष प्राधान्य मिळाले.

उपविजेती प्रवेशिका : पराग (प्रवेशिका ४)
रंग, फोकसिंग, एक्स्पोजर खूप आवडले. कंपोझिशनमध्ये अजून काही क्रिएटिव्हिटी शक्य झाली असती.

विजेत्या प्रवेशिका इथे बघा.

विषय - आकाश तू, आभास तू

विजेती प्रवेशिका : गिरीराज (प्रवेशिका २)
फ्रेमिंग आणि चित्रातला मूड आवडला. चित्र जरा जास्त contrasty झाले आहे. एक्स्पोजर अजून चांगले करता आले असते.

उपविजेती प्रवेशिका : आनंदयात्री (प्रवेशिका १३)
फ्रेमिंग, विषयाची अनुरूपता आवडली. ओव्हर एक्स्पोज झाले आहे. थोडा angle बदलून ते टाळता आले असते.

विजेत्या प्रवेशिका इथे बघा.

स्पर्धा क्रमांक ५, 'कायापालट' ही कलाकुसर स्पर्धा, प्रवेशिकेअभावी रद्द करण्यात आली आहे.

सभापती : एकूण उत्सवात लोकांचा उत्साही सहभाग आणि सहकार्य याबद्द्ल मायबोलीनगरी प्रशासनातर्फे मी सर्वांचे आभार मानीत आहे.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

चिटणीस : अजून एक महत्त्वाची घोषणा बाकी आहे! "शेवटचं वळण" या कार्यक्रमासाठी अपूर्ण कथा दिल्याबद्दल कथा १ च्या लेखिका नंदिनी, व कथा २ चे लेखक बेफ़िकीर यांचे आभार!

********************************************
तर मायबोलीनगरीच्या रहिवाश्यांनो, अशा प्रकारे यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात पार पडला आहे. स्पर्धांव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमातही तुम्ही सर्वांनी खूप चांगला सहभाग घेतल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
संयोजक समिती, सर्व स्पर्धक आणि परिक्षकांचे मनःपुर्वक आभार.

.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! नुसते निकाल जाहीर न करता काय आवडले काय सुधारणा करायला हवी ते दिल्याबद्दल परीक्षकांचे धन्यवाद.

बाकी सर्व पाठीराख्यांना धन्यवाद Happy

सर्व विजेत्यांचे सहर्ष अभिनंदन! परिक्षकांचे आभार.

(प्रत्येकाच्या प्रवेशिकेवरची परिक्षकांची टिपण्णी वाचायची खूप उत्सुकता लागली होती. पण असो..)

संयोजक आता स्पर्धेत दिलेला फोटो वापरता येईल का? फेसबुक वगैरेवर लिंक दिली तर चालेल ना प्रवेशिकांची?

सर्व सहभागी स्पर्धक्,विजेते,परीक्षक आणि मायबोलीचे हार्दिक अभिनंदन. Happy

@ अश्विनीमामी,

लहान मुलांच्या उपक्रमांत स्पर्धा न ठेवता केवळ विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

Pages