मायबोली गणेशोत्सव २०११ - निकाल आला!

Submitted by संयोजक on 12 September, 2011 - 11:27

Wig.JPG_.jpeg

होश्शियाऽऽऽर!!!!!

मायबोलीनगरीच्या आजच्या सभेचे कामकाज सुरू होत आहे होऽऽऽऽ

सभापती : चिटणीस, आजचा जाहीरनामा सर्वांसमोर मांडा.

चिटणीस : आजच्या जाहीरनाम्यानुसार, मायबोलीनगरीत ११ दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची सांगता आणि विविध स्पर्धांच्या निकालांची घोषणा यांचा सभेत प्रामुख्याने अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

सभापती : चिटणीस, स्पर्धांचे निकाल तयार आहेत काय?

चिटणीस : हो, निकाल तयार आहेत. आपली हरकत नसेल तर ते इथे जाहीर व्हावेत अशी मी विनंती करतो.

एक सभासद : चिटणीस यांच्या विनंतीला मी अनुमोदन देत आहे. धन्यवाद.

सभासद : सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून आता आपण निकाल जाहीर करूया. चिटणीस, कृपया निकाल जाहीर करा.

चिटणीस :
स्पर्धा क्रमांक १ : प्रवासवर्ण स्पर्धा, मतदानाने निकाल जाहीर होत आहेत.
विजेती प्रवेशिका : बागेश्री

स्पर्धा क्रमांक २ : आमंत्रण लेखन स्पर्धा, मतदानाने निकाल जाहीर होत आहेत.
विजेती प्रवेशिका : कविता नवरे

स्पर्धा क्रमांक ३ : मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकेची निवड केली आहे.
विजेती प्रवेशिका : Ulhas Bhide (उल्हास भिडे)

स्पर्धा क्रमांक ४ : प्रकाशचित्र स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकांची निवड केली आहे.
विषय - शब्दांवाचून कळले सारे....

विजेती प्रवेशिका : कांदापोहे (प्रवेशिका १३)
विषय आणि व्यक्त होणारी भावना आवडली. कंपोझिशन खूपच मध्यवर्ती झाले आहे. व्यक्तींच्या नजरेच्या दिशेने अधिक मोकळी जागा असती तर हा फोटो अधिक चांगला वाटला असता.

उपविजेती प्रवेशिका : प्रफुल्ल शिंपी (प्रवेशिका १२)
चेहर्‍यावरचे भाव खूप छान टिपले आहेत. कंपोझिशन, रंग आणि contrast अजून चांगले करता आले असते.

विजेत्या प्रवेशिका इथे बघा.

विषय - जादू तेरी नजर....

विजेती प्रवेशिका : रोहित ..एक मावळा (प्रवेशिका १४)
विषयाची अनुरूपता, फोटोसाठी असलेली नजर खूप आवडली. कंपोझिशनही छान झाले आहे.
खास वेगळेपणासाठी या फोटोला विशेष प्राधान्य मिळाले.

उपविजेती प्रवेशिका : पराग (प्रवेशिका ४)
रंग, फोकसिंग, एक्स्पोजर खूप आवडले. कंपोझिशनमध्ये अजून काही क्रिएटिव्हिटी शक्य झाली असती.

विजेत्या प्रवेशिका इथे बघा.

विषय - आकाश तू, आभास तू

विजेती प्रवेशिका : गिरीराज (प्रवेशिका २)
फ्रेमिंग आणि चित्रातला मूड आवडला. चित्र जरा जास्त contrasty झाले आहे. एक्स्पोजर अजून चांगले करता आले असते.

उपविजेती प्रवेशिका : आनंदयात्री (प्रवेशिका १३)
फ्रेमिंग, विषयाची अनुरूपता आवडली. ओव्हर एक्स्पोज झाले आहे. थोडा angle बदलून ते टाळता आले असते.

विजेत्या प्रवेशिका इथे बघा.

स्पर्धा क्रमांक ५, 'कायापालट' ही कलाकुसर स्पर्धा, प्रवेशिकेअभावी रद्द करण्यात आली आहे.

सभापती : एकूण उत्सवात लोकांचा उत्साही सहभाग आणि सहकार्य याबद्द्ल मायबोलीनगरी प्रशासनातर्फे मी सर्वांचे आभार मानीत आहे.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

चिटणीस : अजून एक महत्त्वाची घोषणा बाकी आहे! "शेवटचं वळण" या कार्यक्रमासाठी अपूर्ण कथा दिल्याबद्दल कथा १ च्या लेखिका नंदिनी, व कथा २ चे लेखक बेफ़िकीर यांचे आभार!

********************************************
तर मायबोलीनगरीच्या रहिवाश्यांनो, अशा प्रकारे यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात पार पडला आहे. स्पर्धांव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमातही तुम्ही सर्वांनी खूप चांगला सहभाग घेतल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ कांदापोहे,
संयोजक आता स्पर्धेत दिलेला फोटो वापरता येईल का? फेसबुक वगैरेवर लिंक दिली तर चालेल ना प्रवेशिकांची?
>>> हो देऊ शकता. त्यात मायबोली गणेशोत्सव २०११ स्पर्धेचा उल्लेखही करू शकता.

आपण खुप छान रितीने मेहेनत घेऊन हा पुर्ण गणेशोत्सव आणि स्पर्धा पार पाडल्या त्यावद्द्ल संयोजक मंडळ आणि परिक्षक मंडळाचेही मनःपुर्वक धन्यवाद

वावा!
इतक मतब्बर लोक असतांना आणि एकाहून एक सरस चित्रे असतांना आमच्यासारख्या नवख्याला विज्तेपद लाभले! Happy

विजेत्यांच्ये अभिनन्दन!

>>> हो देऊ शकता. त्यात मायबोली गणेशोत्सव २०११ स्पर्धेचा उल्लेखही करू शकता.
मी केला! Happy

संयोजकजी,
आभार! छान उपक्रम! आणि सहभाग घेऊन खरोखर मजा आली....
लहानपणी व़क्तृत्व स्पर्धा जिंकून आल्यावर जो निखळ आनंद मिळायचा तो आज परतून मिळाला Happy
ऑफिस, घर- संसार या सर्वांमधे स्पर्धा वगैरे फार दूर गेलेला प्रकार आहे, पण ह्या निमित्ताने आपल्यातलं "स्पोर्टिंग स्पिरीट" कुठेतरी शाबूत असल्याचं जाणवलं!! स्पर्धा, गम्मत, निकालाची वाट पाहणे वगैरे.. सर्वच धम्माल.. Happy

सर्व विजेत्यांचे आणि सहभागी मित्र-मैत्रिणींचे मनःपुर्वक अभिनंदन!!

आणि सशक्त पाठिंबा देउन "वोट्स" दिलेल्या सगळ्या-सगळयांचे आभार! Happy

संयोजक, भाग घेतलेले सर्वच जण्/णी, सगळ्या सगळ्यांचेच आभार आणि धन्यवाद Happy

विशेष आभारः यो रॉक्स (आमंत्रण स्पोर्टिंगली घेतल्या बद्दल) Happy (यो, येत्या रविवारी एका हॉलची पहाणी करायला जायचा विचार आहे. येणार आहेस का? Wink :P)

किचनवाल्या "त्या" मैत्रिणीचेही आभार न घडलेला प्रवास खेळकर पणे एन्जॉय केल्या बद्दल Happy

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन!
संयोजकांचे विशेष कौतुक! खुप छान झाला गणेशोत्सव. कार्यक्रमांची रेलचेल होती. बर्‍याच प्रवेशिका अजुन बघायच्या राहिल्या आहेत.

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन. संयोजक आणि परिक्षकांचे आभार !
परिक्षकांची नावे कुठल्या दुसर्‍या बाफ वर दिली आहेत का? की अजून जाहिर व्हायची आहेत?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

कांदापोहेचा फोटो पाहिल्याबरोबरच संभाव्य विजेता असल्याची जाणीव झाली होती...
चला परिक्षकांचे आणि आमचे एकतरी मत जुळले....:)

बाकी निकालांबाबत परिक्षकांच्या मताचा संपूर्ण आदर...
लगे रहो...

व्वा.. गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल मस्तच.. सर्व विजेत्यांचे मनपुर्वक अभिनंदन ! परिक्षकांनाही धन्यवाद Happy

कविता.. कुठल्या गडावर.. Wink

Pages