मायबोली गणेशोत्सव २०११ - सांगता आणि कानोसा

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 08:21

नमस्कार मंडळी,

यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांना निरोप देऊन आता पुढल्या वर्षीपर्यंत वाट बघायची.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण सर्वांनी समरसून भाग घेतलात याबद्दल आपले सर्वांचे आभार. स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर करू. त्याकरता पुन्हा एकदा आपल्याकडून भरभरून मतदानाची अपेक्षा आहे.

यंदा, काही उपक्रमांत खूप भरघोस प्रतिसाद मिळाला तर काहींना अपेक्षेपेक्षा फारच कमी (मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, आमंत्रण लेखन स्पर्धा). कलाकुसरीसारख्या विषयाकरता तर एकही प्रवेशिका आली नाही.

यंदाच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया, सुचना, निरीक्षणे आम्हाला ऐकायला आवडतील. कमी प्रतिसाद अथवा एकही प्रतिसाद न मिळणे याचीही कारणे जाणून घ्यायला आवडेल. शेवटी हा आपल्या सगळ्यांचाच उत्सव आहे त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याकरता आपले अभिप्राय आमच्या उपयोगी पडतील.

१. प्रवासवर्णन विषय वगळता लेखनस्पर्धेसाठी जास्त प्रवेशिका न येण्याचे कारण काय असेल?
२. कायापालट स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका न येण्याचे कारण हे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ नसणे, स्पर्धा असल्यामुळे सहभाग नसणे इत्यादी असू शकेल असे आपणांस वाटते काय? अन्य कोणती कारणे असू शकतात?
३. प्रकाशचित्र, झब्बूला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यामधील नाविन्य, विषयातली विविधता / व्यापकता याबद्दल आपलं मत.
४. करमणुकीचे खेळ, जसे 'तुझ्या गळा माझ्या गळा', 'चारोळ्यांच्या आरोळ्या', 'शेवटचं वळण' इत्यादीबद्दल आपले मत. यात अजून काय नवीन भर घालता येईल यासंबंधी आपल्या सूचना.
५. सुप्रसिद्ध / अप्रसिद्ध मंदिरे, सार्वजनिक गणपती या उपक्रमांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात अजून सहभाग वाढला असता असे आपणांस वाटते काय?

या किंवा इतर कोणत्याही मुद्द्यांवर आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणेशोत्सव छान झाला! संयोजकांचे आभार आणि शुभेच्छा!

छायागीत खुप आवडलं .. Happy

उत्सव छानच झाला. जाहीराती, दवंड्या झक्कास होत्या..
आता काही कार्यक्रमाला प्रतिसाद कमी का मिळाला ह्याची माझ्यामते २ कारणे,
१. वेळ
२. विषय कितीही छान असला तरी तेवढी कल्पकता आमच्याकडे नसेल :).

पण सर्व विषय, स्पर्धा, उपक्रम छान होते. 'हा कार्यक्रम का आहे ह्या उत्सवात?' असे काही वाटले नाही.

मस्त काम केलेत संयोजकहो.

मला वेळ भरपूर होता, पण कश्शातले म्हणून काSSही कळत नाही! शिवाय माझे नाव 'कानफाट्या', मग चांगल्या कामात कशाला लुडबूड करा, म्हणून अज्जिबात काही वाचले नाही!!

दिवाळी अंकाचेहि माझ्याबाबतीत तेच होणार बहुतेक!!
सर्वांना अनेक शुभेच्छा.

गणेशोत्सव मस्तच झाला.
संयोजनाबद्दल संयोजकांचे आभार तसेच उत्सवात सहभागी होणार्‍या सर्वांचे पण.

Pages