मायबोली गणेशोत्सव २०११ - सांगता आणि कानोसा

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 08:21

नमस्कार मंडळी,

यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांना निरोप देऊन आता पुढल्या वर्षीपर्यंत वाट बघायची.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण सर्वांनी समरसून भाग घेतलात याबद्दल आपले सर्वांचे आभार. स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर करू. त्याकरता पुन्हा एकदा आपल्याकडून भरभरून मतदानाची अपेक्षा आहे.

यंदा, काही उपक्रमांत खूप भरघोस प्रतिसाद मिळाला तर काहींना अपेक्षेपेक्षा फारच कमी (मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, आमंत्रण लेखन स्पर्धा). कलाकुसरीसारख्या विषयाकरता तर एकही प्रवेशिका आली नाही.

यंदाच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया, सुचना, निरीक्षणे आम्हाला ऐकायला आवडतील. कमी प्रतिसाद अथवा एकही प्रतिसाद न मिळणे याचीही कारणे जाणून घ्यायला आवडेल. शेवटी हा आपल्या सगळ्यांचाच उत्सव आहे त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याकरता आपले अभिप्राय आमच्या उपयोगी पडतील.

१. प्रवासवर्णन विषय वगळता लेखनस्पर्धेसाठी जास्त प्रवेशिका न येण्याचे कारण काय असेल?
२. कायापालट स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका न येण्याचे कारण हे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ नसणे, स्पर्धा असल्यामुळे सहभाग नसणे इत्यादी असू शकेल असे आपणांस वाटते काय? अन्य कोणती कारणे असू शकतात?
३. प्रकाशचित्र, झब्बूला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यामधील नाविन्य, विषयातली विविधता / व्यापकता याबद्दल आपलं मत.
४. करमणुकीचे खेळ, जसे 'तुझ्या गळा माझ्या गळा', 'चारोळ्यांच्या आरोळ्या', 'शेवटचं वळण' इत्यादीबद्दल आपले मत. यात अजून काय नवीन भर घालता येईल यासंबंधी आपल्या सूचना.
५. सुप्रसिद्ध / अप्रसिद्ध मंदिरे, सार्वजनिक गणपती या उपक्रमांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात अजून सहभाग वाढला असता असे आपणांस वाटते काय?

या किंवा इतर कोणत्याही मुद्द्यांवर आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरवर्षीप्रमाणे मजा आली! Happy

संयोजक टीम , खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन!

एक खटकलेली गोष्ट नमूद करावीशी वाटतेय,
स्पर्धांमध्ये, प्रवेशिका कोणाची आहे, हे आधीच फोडायला नको होतं!(IMO)

गणेशोत्सव छान झाला. नाविन्यपूर्ण आणि शिस्तीने सर्व कार्यभाग केल्याने संयोजकांचे अभिनंदन. सर्वच स्पर्धा, विभाग, बाफ यांवर डोकवायला झाले नाही पण काही ठिकाणच्या दवंड्या प्रवेशिकांपेक्षा अधिक आवडल्या Happy

मला रैना सारखच वाटतय. जरा जास्त भरगच्च कार्यक्रम झाला. नेट वापर, वेळ, ऊपलब्ध साहित्य, ई. सर्व बंधने लक्षात घेवून मोजकेच कार्यक्रम, स्पर्धा, पण अधिक अधिक सहभाग यावर जोर द्यायला हवा. खेरीज मा.बो. वर ईतके प्रचंड मटेरीयल आधीच ऊपलब्ध आहे की निव्वळ संकलातूनही अर्धा गणेशोत्सव साजरा होवू शकतो- यावर विचार व्हायला हवा कारण यात सर्वांचीच शक्ती, वेळ, सर्वच वाचेल. थोडक्यात मोजकेच आवडीचे पदार्थ पानात असतील तर आग्रह करायला व पचायला सोपे जाते Happy

कुणावरही टीका न करता निव्वळ वैयक्तीक मत म्हणून एव्हडेच नोंदवू ईच्छीतो:
१. झब्बू, STY, प्रवास वर्णने, वगैरे तेच तेच जुनेच आहे... त्यात गंमत असली तरी दर वेळी त्यातून सकस कंटेंट तेही गणेशोत्सवाला अनुसरून असतोच असे नाही. बरेच वेळा या गोष्टी निव्वळ मनोरंजन, वेळखाऊ पणा ठरतात.. यामूळे बरेचदा ईतर विभागांकडे दुर्लक्ष होते. या ऊलट मखर्/आरास स्पर्धा, गणेश स्तोत्रे, आरत्या, गीते, विविध शहरांतील गणपती, घरचे गणपती, गणपतीच्या कथा (शब्द वा श्रवणीय), हे असे कार्यक्रम गणेशोत्सवाच्या अनुशंगाने अधिक योग्य वाटतात. यातून मनोरंजनाबरोबरच उद्बोधन देखिल होते. अनेक विधायक विषय निवडता येतील, जसे: सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा केला जावा यावर मुद्दे-मतदान, गणेश मूर्ती कशा बनवतात यावर एखाद्या मूर्तीकाराची मुलाखत, गणेश पूजनाची ओळख, आजच्या काळात याचे सांस्कृतीक व समाजिक स्थान वगैरे वगैरे..
२. गणेशोत्सवात "ईतर" कुठलेही "असंबंधीत" साहित्य नसावे. ते मायबोलीवर वर्षभर येतच असते! गणेशोत्सवाची जागा/विभाग, त्यामागे संयोजक मंडळाचे श्रम, आणि वाचकांचा वेळ हे सर्व लक्षात घेता असे साहित्य मग ते कितीही का प्रदर्शनीय असेना, गणेशोत्सवात त्याचा अंतर्भाव मला खटकतो.
३. सर्वच स्पर्धा प्रवेशिकांना एकतर मतदान किंवा परिक्षक पैकी एकच कसोटी ठेवावी. मायबोलीवर वर्षभर प्रतिक्रीयांच्या स्वरूपात मतदान होतच असते.. मग किमान गणेशोत्सव, दिवाळी अंक ई. साठी "परिक्षक" नेमून निकाल दिले जावेत.
४. या धाग्यावर किंवा एखादा विशेष धागा ऊघडून त्यावर संयोजकांचे अनुभव, या निमीत्ताने त्यांना काय शिकायला मिळाले, पुढील ऊत्सवांसाठी काय बाबी ध्यानात ठेवाव्यात याचेही संक्षिप्त विश्लेषण दिले जावे. मला वाटते असा एक धागा ऊपलब्ध आहेच- त्यात दर वर्षी भर घातली जावी.

आगामी मायबोली दिवाळी अंकासाठी या बाफ वरील सर्वांच्या सूचना संपादक मंडळाच्या ऊपयोगी पडतील असे वाटते.

<<<<बाकी गेल्या वर्षी 'मी स्पर्धेत भाग घेत नाही, मला त्याबद्दल सांगू नका' असं म्हणणार्‍या बेफिकीर यांना यावर्षी स्पर्धेत भाग घेण्यास उद्युक्त केल्याबद्दल आयोजकांचे खास अभिनंदन.>>>>

तसे नाही हो? मला सहकार्य विचारण्यात आल्यानंतर 'तेवढेच करून बाजूला होणे' हे स्वार्थीपणाचे दिसले असते म्हणून मीही सहभागी झालो. माझा 'इश्टॅन्ड' अजूनही तोच आहे. बाकी, माझा उल्लेख टाळणे कदाचित आपल्याला जमलेही असते असेही एकदा वाटून गेलेच.

संयोजक समीतीचे मनःपुर्वक अभिनंदन!

-'बेफिकीर'!

संयोजक मंडळाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत इतक्या छान समन्वयाने हा उपक्रम राबविल्याबद्दल!
<<<जर कमी प्रतिसाद मिळाले असतील तर एखाद्या साहित्यकृतीला तर त्याबद्दल वाईट मुळीच वाटून घेऊ नका. इथे कुणीच पुर्ण वेळ देऊ शकत नाही मायबोलिला त्यामुळे इच्छा असूनही वाचायचे आणि तसेचं खूप काही लिहायचेही राहून जाते.>>>>.बींच्या पोस्ट्ला पूर्ण अनुमोदन.
तसेच<<<दूसरे म्हणजे स्पर्धेंच्या बीबी वर प्रतिक्रियांची सोय नको होती. प्रतिक्रिया मतदानातूनच दिसायला हव्या होत्या>>>दिनेशदांच्या पोस्ट्ला देखिल पूर्ण अनुमोदन.
मला वेळेअभावी एकदोन स्पर्धा सोडल्यास कशातच भाग घ्यायला जमले नाही,अजून बरेचसे वाचून देखिल व्हायचे आहे.
पण सर्व स्पर्धा , त्यामागच्या कल्पना फार आवडल्या.
संयोजकांना धन्यवाद . Happy Happy Happy

संयोजकांचे मनापासून शुभेच्छा.. ! तुमची कामगिरी कौतुकास्पदच आहे.. नि हा धागा उघडून मत जाणून घेण्याची पद्धत पण मस्तच.. !!

झब्बू मस्त होते, चारोळ्या छान झाल्या, गाणी सुरेख होती आणि लेखनस्पर्धाही काही अगदीच वाईट नाही झाल्या. इतपतच रिस्पॉन्स येणार Happy आमच्या घरचा गणपती आणि नैवेद्य तर अप्रतिम! हे दोन धागे दरवर्षी हिट होणारच. तेच लहान मुलांच्या प्रदर्शनाबाबतही.

शेवट सुचवा- नंदिनीला अनुमोदन. त्याच धाग्यावर लिहायला सांगितले असते, तर वाचता वाचता पटापट शेवट लिहून टाकले असते कदाचित. शिवाय ती आख्खी गोष्ट परत पेस्ट करण्यात काहीच पॉईन्ट नव्हता. एकाच विषयाचे खूप धागे यायला लागले की त्यांची संख्या बघूनच दबायला होऊ शकते. (आता तरी ते कोणी लिहिले होते ह्याचा गौप्यस्फोट करा की!)

पण एकूणात सर्व विषय/ स्पर्धा हे आधीच्याच काही स्पर्धांचे थोडेबहुत नवे व्हर्जन होते. एकदम नावीन्यपूर्ण असे काहीतरी असायला हवे होते. तुमच्या जाहिराती फारच कल्पक होत्या, त्यामानाने खेळ तेच ते निघाले Happy Light 1 गणेशोत्सव हा मुख्यत्वे लोकजागृतीचा उत्सव. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच त्यात काही वैचारिक लेखन, चर्चा, स्पर्धा असे काही असते तर चालले असते. वैचारिक म्हणजे 'जड' असे नव्हे Happy

तरी, एकूणात मजा आली. मायबोलीवर एकदम गणपतीमय वातावरण होते.
पुढच्या वर्षी लवकर या! Happy

गणेशोत्सव दणक्यात झाला ! त्याबद्दल मंडळाचे अभिनंदन.
जाहिराती, दवंड्या ह्यांमध्ये खूपच क्रियेटीव्हीटी होती. कोणत्याही जाहिराती, रिक्षा ह्या "बीनतात्पर्याच्या" नव्हत्या तसेच त्यांचे टायमिंग आणि फ्रिक्वेन्सी एकदम योग्य होती. मूर्ती सजावट खूपच सुंदर आणि भव्य होती. नंतरची फ्लॅशची आरास पण छान होती. पुढच्या वर्षी पासून लायटींगचा गणपती दिसणार नक्की. Happy स्पर्धांच्या बाफांवरची पोस्टर्स सही होती. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मेहेनत घेतल्याचं जाणवत होतं. पोस्टर्स / जाहिराती ह्यांचे दालन काढा नक्की.
माझ्यामते तरी लेखनाच्या स्पर्धांना साधारण इतकाच प्रतिसाद येतो. कारण घरच्या आणि दारच्या गणपतींमधून सगळ्यांना विचार करुन लिहायला वेळ मिळत नाही. चारोळ्या, झब्बू आवडले. झब्बूच्या फॉर्माटमध्ये बदल केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन आणि आभार ! विषय अजून टू द पॉईंट दिले असते तर जास्त मजा आली असती. प्रकाशचित्र स्पर्धांचे विषय मस्तच होते ! जादू तेरी नजरमध्ये सगळ्यांनी कॅमेरा सेटींग दिले असल्याने प्रयोग करून पहाता येतील.
लिखित सांस्कृतीक कार्यक्रम ठिक-ठिक वाटले. ऑडियो सगळे आवडले. बर्‍याचदा ऐकले.
मतदान करायच्या आधी सगळ्या प्रवेशिका वाचून होतील.
छान उत्सव आयोजित केल्याबद्दल मंडळाचे आभार !

संयोजक, अभिनंदन! फार छान पेललात गणेशोत्सव. जाहिरातींच्या पोस्टरांचे त्यातल्या रंगसंगतींचे खास कौतुक.

थोडे जास्त वाटले कार्यक्रम, पण चांगला झाला गणेशोत्सव.

झब्बू, चारोळ्या वगैरे कार्यक्रमांमध्ये संयोजकांचा पहारा जरा कमी पडला, असे मला वाटले. Proud

प्रकाशचित्रांच्या स्पर्धांमध्ये प्रत्येक प्रवेशिकेतल्या कमी-अधिक गुणांवर परिक्षक टिप्पणी करणार आहेत ही गोष्ट खूप चांगली आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला धडपड्याला खूपच फायदा होईल.

पाटील/सावली/सॅम हे तिघेही एवढे उत्तम छायाचित्रकार असूनही त्यांची एकही प्रवेशिका आली नाही. Sad की ते परिक्षक आहेत? माझा मुद्दा इतकाच की त्या त्या क्षेत्रातील पटाईत मायबोलीकर माहीत असतील तर संयोजकांनी त्यांना वैयक्तिक संपर्क करून संबंधित कार्यक्रमांची माहिती द्यावी. (हे संयोजकांनी आधीच केले नसेल तर.)

हो कविता सगळ्याच कल्पना अफाट होत्या. खरच संयोजकांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे. मलाही वेळच पुरला नाही. ५ दिवसांच्या गणपतीत इकडे तिकडे जाणे होते. त्यानंतर ५ दिवसांत ऑफिस, घर चा वेळ सांभाळून रात्री ह्या कामावर बसायला लागायच. पुढच्यावेळी गणेशोत्सव २१ दिवसांचा ठेवा. Lol

ह्या धाग्यासाठी भरभरून कौतुक आणि उपक्रमांबद्दल मनापासून अभिनंदन! Happy

काही उपक्रमांना साथ तर काहींना नाही, ह्याची कारणमीमांसा मला तरी अशी काहीशी वाटते!
संयोजकजी,
चुभूद्याघ्या हे आधीच म्हणते! कारण एवढे प्रचंड काम करायचे आणि 'आवश्यक बदल' विचारयचे, हे तुम्हीच करू जाणे!

१) उपक्रमांची रुपरेषा जरा आधीपासून माहिती असली (गणपती स्थापनेच्या आधीपासून), की कदाचित लोकांना तयारी करता आली असती
"वेळ" हा फारच महत्त्वाचा फॅक्टर होता, एकच धागा काढून "उपक्रमांची थोडक्यात रुपरेषा" सांगून कदाचित फायदा झाला असता

२) 'रात्र थोडी' असे काहीसे सुध्धा झाले, पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं की कुठुन सुरुवात करावी, आणि "पुरणाच्या पोळी" सोबतीने काय चाखावे असे काहीसे झाले. उपक्रमांची संख्या फार वाटली
इथे पण "वेळ" आडवा आला आहे, उपक्रम भर्घोस पण पुरेसा वेळच नाही!! शिवाय ऑफिसमधून लॉग इन झाल्यावर 'पहिल्या पानावर" जे दिसेल त्या कडेच लक्ष वेधून तेवढेच पाहण्यात येते

पहिल्या पानावर एक काँस्टंट "मायबोली- उपक्रम आणि नियम" डिस्प्ले होत राहिले अस्ते तर कदाचित सहभाग वाढला असता

मी स्वत: फक्त प्रवासवर्णन लिहू शकले आणि तेही नियम मला शोधावे लागले (शाम ने गगोवर नियमांची लिंक दिल्यामुळे जमले)

मा. संयोजक, वरील पोस्टीत मांडलेल्या काही मुद्द्यांचा गांभीर्याने विचार व्हावा.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संयोजकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल माझ्याकडूनही हार्दिक अभिनंदन.

बागेश्री
मायबोलीच्या मुख्य पानावर तसेच प्रत्येक पानाच्या उजवीकडे गणपतीच्या आराशीचे चित्र असलेले गणेशोत्सवाचे लँडींग पेज सतत दिसत होते (अजूनही दिसते आहे हे पहा http://www.maayboli.com/ganeshotsav/2011) ते आपण टीचकी मारून बघीतले होते का? त्यावर सगळे कार्यक्रम एकत्र बघता येत होते.

रूनी हो, आणि माझ्या अनुभवानुसार यावर्षी पहिले काही दिवस तरी मायबोलीचे मुखपृष्ठ उघडल्यावर सरळ वर रूनीने दिलेले पानच उघडत होते.

बहुसंख्य लोक(माझ्यासहित) समोर असणारेच धागे पाहात असतात...त्यातही स्वत:संबंधीच्या धाग्यांकडे जरा जास्तच लक्ष असतं. Wink त्यामुळे कैक इतर गोष्टीकडे आपोआप दूर्लक्ष होत असतं...आणि अजून बरंच काही...पण जाहीरपणे लिहिण्यासारखं नाही. Proud

हम्म रुनी, का ते माहित नाही, पण लक्ष नाही गेलं एकदाही त्याकडे!
कृपया गैरसमज नसावा, दिलेल्या मतांवर...
लोभ असावा Happy

संयोजक मंडळी , अभीनंदन.
धन्यवाद आणी आभार, उपक्रम फार चांगला होता.
हि फीडबॅक आयडिया पण स्तुत्यच.
फोटो अपलोड ची माहीती नसणे व असे इतर कारणांमुळे पण परिणाम होत असावा,
हा माझाच अनुभव. ह्या वेळी बर्‍याच ट्रायल / एरर करित फोटो अपलोड करता आले.
आपण काढलेले चित्र इंटरनेट वर दिसतंय ह्याचा चिरंजिवांना मिळालेला आनंद कसा वर्णु ?
Thanks a lot.

सर्व संयोजकाचे हार्दिक अभिनंदन! यंदा केवळ मधुनच मंडपात चक्कर मारणे याखेरिज कूठलाही सहभाग घेता आला नाही. मुलिला चित्रकलेची खुप आवड असुन सगळ जमवता आल नाही याची खंत वाटली.

सर्वप्रथम गणेशोत्सव दणक्यात पार पाडल्याबद्दल संयोजक टिमचे मनापासुन आभार आणि अभिनंदन Happy

जाहिरात, आरास, विविध स्पर्धा सगळ्याच आवडल्या. झब्बूचे विषय आणि वेगळेपण भन्नाट आवडले. Happy

पाटील/सावली/सॅम हे तिघेही एवढे उत्तम छायाचित्रकार असूनही त्यांची एकही प्रवेशिका आली नाही. की ते परिक्षक आहेत?>>>>>जीडीला अनुमोदन.
मलाही दिग्गज माबो छायाचित्रकार यांच्याकडुन प्रवेशिका अपेक्षित होत्या, खासकरून "जादू तेरी नजर" या जरा हटके विषयाकरीता. काहितरी नविन बघायला मिळेल अशी जरा जास्तच अपेक्षा होत्या या विभागाकडुन (हेमावैम) Wink

मस्तं झाला या वेळचा उत्सव, अभिनंदन संयोजकंचं , सर्व स्पर्धकांचं !
वर कोणीतरी दिलय तेच सजेशन, ज्या स्पर्धांना तयारी लागते ते थोडे आधी डिक्लेअर केले तर प्रवेशिका जास्तं येतील.
कथेचा शेवट करा मधे अजुन ४-५ कथा दिल्या असत्या तरी चाललं असतं कारण कथेचा निकाल लावणं सोप्पं होतं एस टी वाय पेक्षा Proud

मायबोलीच्या मुख्य पानावर तसेच प्रत्येक पानाच्या उजवीकडे गणपतीच्या आराशीचे चित्र असलेले गणेशोत्सवाचे लँडींग पेज सतत दिसत होते

हो तेही दिसत होते शिवाय नविनलेखन उघडल्यावरही गणेशोत्सवांच्या प्रवेशिकांच्या बाजुलाही संयोजक, गणेशोत्सव २०११ असे येत होते.

सर्वप्रथम गणेशोत्सवाचा हा अख्खा कार्यक्रम आखणे आणि राबवणे ह्यासाठी संयोजक मंडळाचे खूप आभार, अभिनंदन. सोप्पं नाहीये हे काम.
शिवाय आणखी त्यावर ह्या लेखात प्रतिक्रिया मागवून अजून काय करता येईल ह्याच्या दिशेनं तयारी करतायत....
जगात पाच टक्के जरी संयोजनं ह्या विचारांनी झाली ना... तर कुठच्याकुठे जाईल.. अख्खंच्याअख्खंजगच्याजग.
माझीच गोष्टं घ्या... ऑफिसातून वेळ होत नाही, किंवा कधी कधी नेट नाही.. असल्या चाळण्यांमधून ह्या वर्षी एकाही उपक्रमांना साधा प्रतिसादही देता आला नाही.... माझ्यासारखीच बर्‍याच जणांची अवस्था असेल नाही?..
पुन्हा एकदा त्रिवार मुजरा... ह्या गणांना... ह्यांच्याविना गण-ईशाच्या उत्सवाचं काही खरं नाही हेच खरं.

संयोजक मंडळाचं मनापासून अभिनंदन! दणक्यात झाला अगदी गणेशोत्सव. काही कल्पना अगदी नावीन्यपूर्ण होत्या आणि एकदम यशस्वीही झालेल्या दिसल्या. रैनाच्या पोस्टीलाही माझं अनुमोदन आहे.
इतकं काही पहायला/ वाचायला/ ऐकायला होतं आणि आहे की वेळ कमी पडत आहे अजूनही.

तुम्हां मंडळातील सर्व सदस्यांचं मात्र अफाट कौतुक आहे! एकदम गाजवलात गणेशोत्सव Happy धन्यवाद.

गणेशोत्सव जोरदार झाला. सुरेख आयोजन केलंत. तुमचे कार्यक्रमही छान होते. एकुणातच गणेशोत्सवात मायबोलीकरांनी धमाल केली. घरच्या गणपतीनंतर ऑफीसच्या कामात गुंतल्यामुळे स्पर्धांमधून मला भाग घेता आला नाही, पण जाहिराती, मजकूर, स्पर्धा आवडल्या. गणेशोत्सव संयोजनात काम केलं असल्यानं ज्यांच्यासाठी हे आयोजन करतो त्या मायबोलीकरांकडून झालेलं कौतुक किती महत्वाचं आहे हे मला माहित आहे. तर माझीही तुमच्या पाठीवर जोरदार शबासकीची थाप :). Good Job!

Pages