रानी माझ्या मळ्यामंदी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 September, 2011 - 10:50

माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या.

१) दुधी भोपळा

२)

३)

४) कारल्याचे फुल

५) कारल

६) भेंड्याची कळी

७) बाळ भेंडे

८) भेंडा

९) काकडीचे फुल (काकड्या तेंव्हा आल्या नव्हत्या)

१०) ही माझ्याकडची घेवड्याची शेंग

११) माझ्याकडच शिराळ

११) माहेरची लिली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी पैली मी पैली!
जागू मस्तच फोटो आहेत गं! तुम्ही भाज्या विकत आणतच नसाल ना?
मी खूप आनंदाने भाजी बाजारात जाते. आणि स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन असल्याने बाजारातल्या सगळ्या भाज्या घेऊन येते.

हो आणि सांगायचं म्हणजे माझ्याही आईकडे पूर्वी खूप म्हणजे जवळजवळ सगळ्या भाज्या आम्ही करायचो. म्हणजे वडील आणि गडी. पण अगदी कॉफी सुद्धा लावली होती त्यांनी. ते स्वता: बीया काढून गॅसवर कढईत भाजून घरीच मिक्सरवर बीया दळून कॉफी बनवायचे. खूप आहेत गं आठवणी!

भारी Happy

मी आजच बागेतलं एकुलतं एक दोडकं तोडुन घरात आणलय. चार लागली होती, तीन वाळुन गेली Sad संध्याकाळी भाजी करणार Happy

मानुषी अग माझ्या माहेरीपण आधी मोठी शेती व्हायचे. भाज्या काढायला मी पण जायचे. खुप सुखद दिवस होते ते माळव्यातले. प्रत्येक भाजीच एक शेत असायच. वांग्याच शेत, टोमॅटोची २-३ शेतं, मिरचीच शेत, मुळ्याच शेत, अलकोल, कोबी, फ्लॉवरच एक शेत, गवारीच शेत त्यात मध्ये मेथी, माठ पेरलेली असायची, कोथिंबिरिच शेत. पावसात पुर्ण शेती असायची. आता हिस्से झाले, शेती परवडत नाही. त्यामुळे सगळे ठप्प. माझे वडील आता ७५ वर्षांचे आहेत तरी आवड म्हणून त्यांनी ही स्वतः भाजी लावली आहे. त्याची देखभाल पण तेच करतात.

सिंडरेला झब्बु टाक ना.

मज्जा आली....मस्त वाटलं एकदम Happy

अशा आवारात मी तासंतास रमुन जातो.....फुलापानांचं निरीक्षण करत...
दुधी व्यवस्थीत तरारली आहे...

chatak hiravya bhajyana hirava bahula pahije.

जागू फारच छान गं! मला माझ्या लहानपणात नेलंस. माझे वडिल सुद्धा खूप भाज्या लावायचे. आणि त्यांची खूप काळजी पण घ्यायचे.
चातक, वा वा !

कोवळे कोवळे भोपळे पाहून तर मला लगेच तोडून खीर करावीशी वाटतेय.
काकडीला अजून काकड्या लागच्यात तर?
आई,बाबा किती जपतायेत झाडांना ते पण कळतय. Happy
मी माझ्या गावचा बाजार मिसतेय. शेजारच्याच खेड्यात २ तासाचा बाजार भरू लागला होता. त्यात फक्त शेतकरी. सकाळी तोडलेला ताजा ताजा भाजीपाला. शिवाय ओळखी झाल्याने माझ्यासाठी, लेकासाठी म्हणून पपई, काकडी, वांगी, गवारीच्या शेंगा असं ते लोक येतानीच बाजूला आणत.
मी ईकडे आल्याचे माहित नव्हते तर एक मावशी मी बाजारला का येत नाही ते पहायला चक्क घरी येवून गेल्या. येतानी लेकासाठी पपया आणल्या होत्या म्हणे.
शेतातल्या भाजीची हौस आता कुंडीतल्या भाज्यांवर भागवतेय.

जागू,
कित्ती छान! पूर्वीचे दिवस आठवून मज्जा येते नै! तुझे वडील अजून मळ्यात काम करतात म्हणून त्यांची तब्येत चांगली आहे. सगळे फोटो मस्त.

लई भारी.... मोजक्याच २-३ भाज्यांवर गुजराण करणार्‍या आमच्यासारख्यांसाठी तर अगदीच तोंपासु फोटो.:)

एकदा हाताला माती लागली कि ती ओढच लागते. जागूकडची, नलिनीकडची बाग
बघितलीय ना. भाजी मिळो वा न मिळो, एका रोपट्याची डोळ्यादेखत होणारी
वाढ बघणे, हेच फार सुखदायी असते.

चातक ये हुई ना बात. धन्स.

नलिनी मस्तच.

मनिमाऊ, प्रज्ञा, जिप्सी, रुणुझुणू, स्वाती, प्रिती, स्वातीताई धन्स.

शान्कली हो ग खरच आहे ते.

विप्रा तसा मळाही मी एकदा टाकला होता. उरण-अलिबाग असा धागा होता.

अगदी खर दिनेशदा. पाउस गेला की तुम्ही दिलेल्या बिया लावायच्या आहेत. वडीलान्कडे पण देणार आहे अर्ध्या. ते माझ्यापेक्शा जास्त चा.न्गली काळजी घेतील.

मस्त गं जागु Happy

यम्दाच्या स्प्रिंग मधे थोड्या भाज्या लावायचा विचार आहे. आता हे फोटो बघुन नक्कीच लावणार Happy

आहाहा!!!! डोळे निवले.. मीही ,बहिणीच्या तिने स्वतः लावलेल्या, जोपासलेल्या किचन बागेत जाऊन आंबे,अननस,आवळे,भेंडी,लहान मोठी वांगी ,काकड्या,भोपळा,दुधी,भुईमुगाच्या शेंगा खुडण्याचं सुख अनुभवलंय... जागू मस्त मस्त वाटलं..

जागू, कसले मस्त आहे. Happy
कधीतरी एक मोठ्ठं अंगण असलेलं तरी घर घ्यावं किमान वापरायला मिळावं असं स्वप्न आहे. श्या.

मस्तच भाज्या ग जागू. Happy झाडाला लागलेली भेंडी मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितली तुझ्या फोटोत. दुधी तर दृष्ट लागण्यासारखे आहेत.

मस्तय Happy

Pages