रानी माझ्या मळ्यामंदी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 September, 2011 - 10:50

माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या.

१) दुधी भोपळा

२)

३)

४) कारल्याचे फुल

५) कारल

६) भेंड्याची कळी

७) बाळ भेंडे

८) भेंडा

९) काकडीचे फुल (काकड्या तेंव्हा आल्या नव्हत्या)

१०) ही माझ्याकडची घेवड्याची शेंग

११) माझ्याकडच शिराळ

११) माहेरची लिली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त ग जागु..मी एकदम जे Wink

आमच्या सोसायटित पुर्वी सिमेंट नव्हतं घातल तेव्हा माझे बाबा भेंडि, कारली लावयचे, भोपळे पण त्याची आठवण झाली. तेव्हा नव्हते मी इतकी फुला पानात रमणारी. म्हणजे आवडायच तेव्हाही पण वेळ नाही द्यायचे, आता जागच नाही. बाबांनी तेव्हा लावलेले माड आता ५० नारळ देतात. आणि माझे बाबा छान खुश होतात. Happy

वॉव.. Happy
घरच्या भेंड्याची चव काही वेगळिच लागते नाही.. Happy
माझ्या सासर्यांनि पण मळा केला होता मध्यंतरी वाडीत..

जागू,फोटो मस्तच. ताज्या ताज्या भाज्या डोळ्यांना सुखाऊन गेल्या.खरच जागू ,साधना ,मानुषी,दिनेशदा
ह्यांच्या मुळे मायबोलीचा मळा अगदी बहरला आहे.काही नावे सुटली असतील तर चु.भु.दे.घे.

जागुतै मस्तच आहे तुमचा मळा Happy
विचार करतोय... लवकर रिटायर होउन उरणलाच जाउन रहातो (आमच्या जागुतै कडे) Happy

भारीये! Happy

<<एकदा हाताला माती लागली कि ती ओढच लागते. जागूकडची, नलिनीकडची बाग
बघितलीय ना. भाजी मिळो वा न मिळो, एका रोपट्याची डोळ्यादेखत होणारी
वाढ बघणे, हेच फार सुखदायी असते.<<

दिनेशदांना अनुमोदन!! आपण लावलेल्या रोपट्याची वाढ बघणे समाधान देते. त्याला आलेली पहिलं पान, कळी, फळ बघणे तर आनंदाचा ठेवाच असतो. Happy
मस्ताय जागु...तुझा मळा!

वा....

Pages