सुश्राव्य संगीत - हे गजवदना - रैना

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:29


हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना

आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्‍यांची
श्री गणराया तुला वंदना

कवी: प्रसाद शिरगावकर
चाल: प्रमोद देव
गायिका: रैना
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द, चाल सुंदरच. रैना, तुझा आवाज खरच खूप गोड आहे. मस्त गायलं आहेस तू. अगदी शांत-शांत वाटलं गाण ऐकून.

देव साहेब, छान उपक्रम राबवत आहात.
शब्द, चाल आणि आवाज. एकदम भारी.
प्रसन्न वाटलं.

और भी आने दो.....!

-दिलीप बिरुटे

भारं-भार वाद्यांच्या कोलाहला पासून 'वाचलेली' एक सुन्दर रचना ऐकायला मिळाली...

देवकाका...
फक्त 'तानपुर्‍या'चा प्रयोग आवडला... फक्त एक शंका विचारतोय- ईथे वाजणारं रेकॉर्डींग 'रफ-रेकॉर्डींग (Dry Track)' आहे का?...

रैने, खूप सुंदर लागलाय आवाज... योग म्हणतोय तसा.... ठहराव मिळालाय.
चाल सुरेख आहेच.
प्रसाद, मायबोलीला आनंदाचं गाव म्हणतोयस ना... ह्यापरतं दुसरं समर्पक असं नाही... सगळ्या गावकर्‍यांकडून तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन...

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!
सर्दी-खोकल्याने त्रस्त असतांनाही गाणं मनासारखं जमेपर्यंत पुनःपुन्हा गाण्याचे कष्ट घेण्याचे चीज म्हणजेच हे आपण ऐकत असलेले हे सुंदर गाणे! रैनाच्या जिद्दीचे आणि एखाद्या गोष्टीसाठी झोकून देण्याच्या वृत्तीबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
प्रसाद शिरगांवकर ह्यांच्या ह्या सुंदर काव्यरचनेला लावलेली ही माझी सगळ्यात पहिली ध्वनीमुद्रित चाल आहे...सुमारे दोन वर्षांपूर्वीच मी ही चाल रचलेली आहे...आज रैनाच्या आवाजात ऐकतांना ती खूपच जास्त सुंदर वाटतेय. ह्या चालीनेच माझी संगीतातली जालीय कारकीर्द सुरु झाली...उत्सुक लोक त्याबद्दल इथे वाचू शकतात.

मायबोलीने संधी दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचेही मनःपूर्वक आभार!

देवकाका,
आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल अतिशय आभारी आहे. Happy

शिरगावकरांनीही आपले अपत्य अजिबात कांकुं न करता (काही काळासाठी) सुपुर्द केले त्याबद्दल त्यांचेही आभार. Wink

लोकहो,
मनःपूर्वक आभार. इतक्या प्रतिक्रिया आणि दाद पाहुन भरुन आले. जवाबदारीची एक मोठी जाणीव झाली पुन्हा एकदा. आशिर्वाद असू द्या.

ज्यांना ज्यांना गाणं शिकायची मनीषा आहे, खूप वर्षांपूर्वी सुटलय, पुन्हा सुरु करायचं आहे त्यांनी त्वरीत सुरु करा. It is never too late. ते तुमचं साप्ताहिक ध्यान ( weekly meditation) असणार आहे. त्याचं पुढे काय होईल, जमेल की नाही, वेळ नाही, हे तर झालंच, त्याही पलिकडे आपला सूर आपण शोधायचा तो प्रवास फार सुंदर आहे. कुठे गायला गायचंय ? स्वतःसाठी गा, ऐका, वाजवा, मुलांना शिकवा. तो एक वर्णनातीत आनंदाचा ठेवा आहे.

संयोजकमंडळ आणि प्रशासनाचेही आभार.

सुपर्ब !
रैना, सुंदर लिहितेस हे माहीत होतं, पण इतकं सुंदर गातेस हे आत्ताच कळलं. Happy लगे रहो !
सर्व टीमचं अभिनंदन.

रैने ,अगदी समजून गायली आहेस,आवाज तर अती मधूर .शब्द ,संगीतही खूप छान.तुम्हा तिघांच अभिनंदन.

@प्रमोद काका @रैना, गाणं फारच छान झालं आहे!

गाण्याच्या शब्दांना दाद देणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

@प्रमोद काका, MP3 file माझ्या संग्रहासाठी मेल करू शकाल का?

देवकाका, या गाण्याची लिंक नव्हती दिलीत मला. :रुसलेली माऊ: मी मिस केलं असतं इतकं गोड गाणं. फारच सुंदर चाल. गीत आणि गायकी पण खुप सुंदर. रैनाच्या आजारपणाबद्द्ल वाचुन परत गाणं ऐकल्यावर तर अजुनच भारावुन गेले मी. काय आर्जवी, गोड गळा आहे रैनाचा. सुरेख !

Pages