सुश्राव्य संगीत - हे गजवदना - रैना

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:29


हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना

आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्‍यांची
श्री गणराया तुला वंदना

कवी: प्रसाद शिरगावकर
चाल: प्रमोद देव
गायिका: रैना
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेल चालीला मृदू आवाजात गायल्याने ऐकताना सुंदर वाटतेय गीत.
वाद्यांची साथ नसतानाही गीत सुमधूर वाटावे, हे अलौकिकच म्हणावे लागेल. Happy
गीताचे शब्दही साजेशेच आहेत.

व्व्वा सुंदर.... !!

खूप प्रसन्न वाटलं हे गाणं ऐकून... Happy

योग ह्यांच्याशी शब्दनशब्द सहमत !!

सुरेल चालीला मृदू आवाजात गायल्याने ऐकताना सुंदर वाटतेय गीत. >> + १
रैना, किती गोड आवाज आहे गं तुझा.

प्रसाद, खूप छान आहे गाणं. आणि प्रमोद यांनी सुरेख चाल दिली आहे.
रैना, सुंदर गायलं आहेस. आणि अगदी सहजतेनं. सुरुवातीची आलाप सुंदर आहे.

Pages