नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24

nevaidya_0.jpg

गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्‍हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.

तुमच्या घरी यंदा कायकाय नैवेद्य बनवलात? बाप्पाकरता कोणता प्रसाद वाटला? आम्हालाही कळवा. तुमच्या पाककृती वाचून, त्यांची प्रकाशचित्रे पाहून बाप्पासारखेच आम्हीही तृप्त होऊ.

नैवेद्याच्या संकल्पाची सिद्धी !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मला एक बेसिक शंका आहे. रविवारी हे पदार्थ करून आपण विविध देशांतून फोटो पाठवणार, तर मग ते सोमवारी किंवा मंगळवारी प्रकाशित करता येतील ना? रविवार जाईल मग...

वोक्के, हम पातोळ्या (इकडल्या भाषेत पत्रोळ्या) करेन. Happy

मंजू, ठिक आहे ना? संयोजक वेळेची डेडलाईन देऊ देत त्यानुसार आपण फोटो पाठवू.

संयोजक ऐकतायत ना ही सर्व चर्चा?

संयोजक गप्प का ? का ? का ? का ?

ऑस्ट्रेलिया ते अमेरिका --- असा दिर्घ प्रवास होणार चतुर्दशीचा !
त्यामूळे पहिले २१ जमले कि प्रकाशित करावेत संयोजकानी.
जास्त जमले तरी बाप्पा लंबोदर आहेच की !

त्यामूळे पहिले २१ जमले कि प्रकाशित करावेत संयोजकानी.>>>> अमेरीकेवर अन्याय होईल.

संयोजक वेळेची डेडलाईन देऊ देत त्यानुसार आपण फोटो पाठवू. >>> हे ठीक राहील.

भरत, बुंदीचा लाडू हा खर्‍या अर्थाने त्यांच्या भोग किंवा पकवान मधे बसतो. त्यांना नैवेद्य करताना पाणी वापरलेले चालत नाही. (बुंदीचे बेसन ते दूधात भिजवतात.) आपले उकडीचे मोदक त्या व्याखेत बसत नाहीत.
आपला सत्यनारायणाचा प्रसाद तसा शिजवलेला असतो.

हे गणेशा,
गेली अकरा वर्षे आम्ही मायबोलीवर गणेशोत्सव साजरा करत आहोत.
यावर्षीदेखील तेवढ्याच उत्साहाने आम्ही तो साजरा केला.
माझ्या अनेक बालसवंगड्यांनी आपल्या चिमुकल्या हाताने तवचरणी आपली कला
सादर केली. तूझे स्तवन केले. त्याच नव्हे तर मायबोली परिवारातील सर्व बालकांना
उत्तम बुद्धी दे, त्या सर्वांना कलानिपुण कर.
मायबोली परिवारातील सर्व सदस्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य, धनसंपदा, यश
व किर्ती लाभू दे.
आम्हा सर्व सदस्यातील मैत्र व स्नेह असाच दृढ राहो.
यावर्षी ज्या तूझ्याचरणी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी आपल्या कला सादर केल्या,
त्या कलांमधे त्या सर्वांना नैपुण्य लाभो.

हे मागणे केवळ निमित्तमात्र. आम्हा सर्वांसाठी काय योग्य आहे, हे तर तू जाणतोसच.
आजवर जे दिलेस त्याबद्दल आम्ही तूझे अखंड ऋणी राहू. आमच्याजवळ असलेल्या
अल्पज्ञानाचा, साधनांचा लाभ गरजूना मिळो असा योग जुळवून आण.

असा लाभ देण्यासाठी योग्य ती व्यक्ती पारखण्याची कुवत, हातचे राखून न ठेवता देण्याची
दानत आणि दिल्याचा गर्व होऊ न देण्याचा विवेक आम्हा सर्वांना लाभो.

आजचा निरोप हा केवळ तूझ्या मूर्त रुपाला. आमच्या मनातील विवेकाच्या रुपात तू आमच्यातच
वास करून असतोस, हे आम्ही जाणतो.

तरीही या मंगलमूर्तीच्या दर्शनाची ओढ आम्हा सर्वांना असतेच. तेव्हा पुढच्या वर्षी लवकर या.

१) श्रीखंड

२) भोपळ्याचे भरीत

३) मटारची उसळ

४) खतखते

५) काकडीची कोशिंबीर

६) वरणभात

७) केळी

दिनेशदा आणि इतर भक्त, छान उपक्रम.

भारतीय वेळेनुसार आज रात्री १२ पर्यंत फोटो पाठवा.
सर्वांचे फोटो एकत्र करून हेडर मध्ये घातले जातील.

९. मोदक

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया |
संकटरक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया..

modak11.jpg

पुढच्या वर्षी लवकर या..

दिनेश, तुमची प्रार्थना मनापासून आवड्ली.

लालू, ९/११ ला अमेरिकन फ्लॅग लावायची कल्पना छान आणि स्तुत्य वाटली.

सर्वांचे नैवेद्य खासच.

बाकीचे नैवेद्य इथे कधीपर्यंत प्रकाशित होतील? लवकरात लवकर हेडरमधे घालता यावेत यासाठी लोकहो, लवकर लवकर नैवेद्य इथे प्रकाशित करा.

संयोजक, माफ करा काल काही अप्रिहार्य कारणास्तव मी इथे फोटो देऊ शकले नाही. (नवर्‍याने कार्ड रीडर ऑफिसातच विसरणे असे ते कारण आहे :फिदी:)

१. पातोळ्या-कणकेच मोदक आणि उकडीचे मोदक

From Drop Box

२. चित्रान्ना

From Drop Box

३. पडवळाची भजी

From Drop Box

४. कैरीची डाळ.

From Drop Box

५. उंदिरमामाचे पापड

From Drop Box

काल आमच्या बाप्पांसाठी सौ.ने केलेले डबलडेकर मोदक..

आधीच जास्त पीठ घेऊन मोदक वळल्यावर वरचे टोक काढून न टाकता सलग दुसरा मोदक वळायला घ्यायचा..

दिनेशदा आणि इतर, कृपया, तुमच्या संकल्पांच्या नैवेद्याला योग्य क्रमाने नंबर द्या. मध्येच इतरही प्रचि येऊ शकतात. २१ झाले की हेडरमध्ये घालण्यात येतील.

मस्तच!!!

२१ पदार्थांच्या नैवेद्याची आयडिया खासचं. सगळ्यांचेच पदार्थ मस्त दिसतायत Happy बाप्पाची मज्जा आहे Happy

हेम, ते डबल डेकर मोदक भारी आहेत.

Pages