नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24

nevaidya_0.jpg

गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्‍हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.

तुमच्या घरी यंदा कायकाय नैवेद्य बनवलात? बाप्पाकरता कोणता प्रसाद वाटला? आम्हालाही कळवा. तुमच्या पाककृती वाचून, त्यांची प्रकाशचित्रे पाहून बाप्पासारखेच आम्हीही तृप्त होऊ.

नैवेद्याच्या संकल्पाची सिद्धी !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू, तुमचे नैवेद्याचे ताट अप्रतिम दिसते आहे. मायबोलीचे दृश्यरूपच जणु. एक सोलकढी व एक ताक आहे का वाटीत?

बस्कु बै तुमच्या फटूला चेपु. वर लैक केले Happy

भरत,
त्या काजू मोदकांची पाककृती टाका ना प्लीज. सुंदर दिसतायेत.

सगळ्यांचीच ताटं छान. बस्के- नीलला सांभाळून केलेस एवढे. तुझे विशेष कौतुक.

लालू,अप्रतिम दिसतंय नैवेद्याचं ताट!!
आर्चचे मोदकही सुरेख आहेत.
प्रज्ञा९,छान झाले आहेत मोदक!! पहिल्यांदाच केलेस का? तसे वाटत नाही Happy
मयेकर,काजू मोदकांची रेसिपी टाका ना....

अहाहा, देखणे नैवेद्य आहेत.

लालू, दर वर्षीप्रमाणे यंदाचं ताट देखिल सुंदर सजलंय.

जनतेनं काय अफाट मस्त मोदक केले आहेत!

लालू सुंदर दिसतयं नैवेद्द्याचं ताट. सगळ्यांचे मोदक, नैवेद्य छान दिसतायेत.

सर्व मुरलेल्या आणि नवोदितांचे नैवेद्य, मोदक मस्त आहेत! हेम, मनापासून केलेले सगळे बाप्पाला आवडते. Happy

वाटीत काकडी कोशिंबीर, मठ्ठा, मोदक आणि आंबट-वरण/आमटी आहे.

सगळेच नैवेद्य मस्त आहेत! Happy

पूर्वा, म्हटले तर पहिले, नाहीतर दुसरे. गेल्या वर्षी बरीच उकड वाया घालवून वगैरे... जाऊदे! अंमळ दु:खदच आठवण होती ती. Proud

मोठ्या अपेक्षा ठेऊन दु:खी होण्यापेक्षा माझे आपले साच्यातलेच बरे Proud
ज्यांनी ज्यांनी छान कळ्या पाडल्या त्यांच्याकडे क्लास लावावा म्हणते मी Happy

DSC03515.JPG

मोदक भारी झालेत सगळ्यांचे.
नवप्रज्ञा, तु दुसर्‍यांदा केलेत असं वाटत नाहि इतके सुबक झालेत. Happy
हे आमच्याकडचे तळलेले मोदक.

मिनी, मला तळलेले सुद्धा आवडतात, पाठव.

पूर्वा, ताट सुंदर आहे!
मोदक पण मस्त जमलेत, एकसारखे. Wink

पूर्वा ताट काय सुंदर आहे!! फार आवडले.. साच्यातले मोदक मला याच कारणासाठी आवडतात, एकसारखे मस्त दिसतात!!

लालू आर्च बाय डीफॉल्ट गणेशोत्सव-नैवेद्य-क्विन्स आहेत.. दरवर्षी वाट पाहते मी ... Happy
बाकीचेही मस्तच नैवेद्य!

Pages