लहान मुलांसाठी कार्यक्रम (नियम) - "आनंदमेळा" : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:13

aanadamelaa-finalcopy.jpgसांस्कृतिक कार्यक्रम १ : किलबिल

पद्य ध्वनिमुद्रण- आरती/ स्तोत्र/ श्लोक/ गणपतीचं कोणतंही गाणं, किंवा इतर कोणतंही आवडीचं स्तोत्र.

नियम :

१) प्रत्येक मुलासाठी/ मुलीसाठी एकच प्रवेशिका असावी.
२) ध्वनिमुद्रण किमान १ ते कमाल ३ मिनिटांचे असावे.
३) हा कार्यक्रम फक्त मायबोली सभासदांच्या पाल्यांसाठी आहे.

प्रवेशिका कशा पाठवाल?
"किलबिल" आणि "छोटे कलाकार" या दोन्हीसाठी प्रवेशिका पाठवण्याची पद्धत वेगळी आहे.

१. प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. इ-मेल पाठवताना, किलबिल कार्यक्रमासाठी kilbil असा विषय लिहावा. (एक नम्र विनंती : स्पेलिंगमधल्या चुका टाळण्यासाठी इथूनच कॉपी-पेस्ट करावे.) तसेच इमेलमधे स्वतःचा मायबोली आयडी आणि पाल्याचे नाव, वय यांचा उल्लेख असावा.
३. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.

*****************************************************

सांस्कृतिक कार्यक्रम २ : छोटे कलाकार

दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/ रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्‍या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.

विषय :
१. माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा (ऐतिहासिक/ सामाजिक इ. व्यक्तिरेखा किंवा घरातील/ कुटुंबातील/ शाळेतील व्यक्ती.)
२. माझे आवडते घर (यात स्वतःच्या आवडीच्या घराची कलाकृती अपेक्षित आहे. उदा. स्वतःचे घर/ इग्लू/ स्ट्रॉपासून केलेली घराची कलाकृती/ इमारत/ झोपडी इत्यादी, माध्यम आपल्या आवडीचे.)

नियम :

१) कलाकृती मुलांनीच केलेली असावी. पालक मदत करू शकतात. (काय मदत केली याचा उल्लेख असावा)
२) कलाकृती करण्यासाठी काय घटक वस्तू वापरल्या याचे एक, प्रत्यक्ष काम करतानाचे एक आणि अंतिम कलाकृतीचे एक अशी किमान ३ प्रकाशचित्रे पाठवावीत. याहून अधिक प्रकाशचित्रे द्यायची असल्यास सोबत लिंक द्यावी. प्रवेशिकेमधे तीनच प्रकाशचित्रे असावीत.
३) मुलांनी केलेल्या कलाकृतींच्या प्रकाशचित्रांवर मायबोली गणेशोत्सव २०११ असा वॉटरमार्क ठेवावा.
४) प्रत्येक मुलाकडून/ मुलीकडून दोन्ही विषयांवर प्रत्येकी एकच प्रवेशिका स्विकारली जाईल.
५) हा कार्यक्रम फक्त मायबोली सभासदांच्या पाल्यांसाठीच आहे.

प्रवेशिका पाठवण्याची पद्धत सोपी करण्याच्या उद्देशाने, प्रवेशिका पाठवण्याबद्दलचे नियम बदलण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी. "किलबिल" आणि "छोटे कलाकार" या दोन्हीसाठी प्रवेशिका पाठवण्याची पद्धत वेगळी आहे.

प्रवेशिका कशा पाठवाल?

१. 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०११' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सभासद झाला आहात.

२. याच गृपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०११ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे योग्य तो विषय लिहावा :
छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा ((यापैकी कोणताही एकच विषय) - कलाकाराचे नाव
छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - कलाकाराचे नाव

४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्युमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

५. शब्दखुणा या बॉक्समध्ये उपविषय, स्पर्धेचे नाव आणि स्पर्धेचा प्रकार (जे शीर्षकात लिहिले आहेत तेच) मध्ये स्वल्पविराम देऊन लिहावे.
उदा. छोटे कलाकार, आनंदमेळा, आवडते कार्टून कॅरॅक्टर, आवडती व्यक्तिरेखा.

६. मजकूरात प्रचि टाकताना मजकूराच्या बॉक्सखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नविन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी upload हा ऑप्शन निवडा. मग 'browse' हा पर्याय क्लिक करून तुमच्या कॉप्युटरवरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की कालच्या करड्या बॉक्स मध्ये तसा मेसेज दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी 'Send to textarea' हा ऑप्शन वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
कलाकृतीमध्ये विषय कशा प्रकारे मांडला आहे हे २-३ ओळीत स्पष्ट करा. प्रवेशिकेच्या मजकुरात पाल्याचे नाव, वय यांचा उल्लेख करा.
प्रचि टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.

७. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लिक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

८. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.

९. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/ बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा ऑप्शन वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

टीप :

१. दोन्ही कार्यक्रमांत सहभाग घेण्यासाठी वयोमर्यादा १६ वर्षे.
२. एका मुलाला/ मुलीला "किलबिल" मधे प्रत्येकी एक आणि "छोटे कलाकार" मधल्या दोन्ही विषयावर प्रत्येकी एक अशी प्रवेशिका पाठवता येईल. (छोटे कलाकार मधील पहिल्या विषयात माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर किंवा माझी आवडती व्यक्तिरेखा यांपैकी एकाच विषयावर प्रवेशिका पाठवावी.)

प्रवेशिका स्विकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्विकारल्या जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी,
सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल काही शंका, प्रश्न असल्यास संयोजकांना या पानावर विचारा. आपल्या प्रश्नांचे शक्य तितक्या लवकर उत्तर द्यायचा संयोजक प्रयत्न करतील.

किलबिल मध्ये स्त्रोत्र, श्लोक, गणपतीचं गाणं हे २ वर्षांवरील मुले पण म्हणू शकतील ना ? वयोगट ३ वर्षे पासून सुरु आहे.

नियमात बदलः

खास लोकाग्रहास्तव वयाची किमान मर्यादा काढून टाकली आहे. मायबोली सभासदांच्या १६ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलामुलींकरता हे कार्यक्रम आता खुले आहेत.

संयोजक,

इथले पोस्टर बदलल्याबद्दल धन्यवाद.
मात्र तुमच्याकडुन माझ्या इमेलला उत्तर किंवा इथे काही स्पष्टीकरण येईल अशी अपेक्षा होती. ( मी पहिले इमेल दोन दिवसांपुर्वी केले होते आणि काल दुपार पर्यंत उत्तर नसल्याने रिमाईंडर टाकले तेव्हा, अजुन विचारणा चालु आहे असे तुमचे उत्तर आले. त्यानंतर काही आलेले नाही.)
इथले पोस्टर बदललेत म्हणजे लोकांना आवडलेले जुने पोस्टर मुळ चित्रकर्त्याच्या परवानगी शिवाय वापरले गेले होते का?

धन्यवाद.

संयोजक,

आता वापरलेले गणपतीचे चित्र कुणि काढले आहे?
हे चित्र फेसबुक वर इथे उपलब्ध आहे.
http://www.facebook.com/surfexcelindia#!/media/set/?set=a.21017429571015...

हे फेसबुक अकाउंट इथल्या पोस्टर कर्त्याचे आहे किंवा नाही हे मला माहित नाही. तसे असल्यास किंवा पोस्टर वापरण्यास लेखी परवानगी असल्यास छानच आहे. पण तसे नसल्यास पुन्हा एकदा परवानगी शिवाय इंटरनेट वरच्या इमेजेस वापरल्या आहेत जे योग्य नाही.

धन्यवाद.

सावली,

अजून आर्टीस्टकडून उत्तर न आल्याने तुम्हाला कळवायला विलंब झाला. तुम्ही ते लक्षात आणून दिल्याने आधीचे चित्र बदलले. प्रताधिकाराची नेहेमीच काळजी घेण्यत येते. एखाद्या वेळी त्यात चूक आढळली तर कोणी लक्षात आणून दिले तर आम्ही ते बदलायचा प्रयत्न करतो.

आपण आम्हाला कॉपीराईट नसलेली बालगणेशाची इमेज उपलब्ध करून द्यावी ही विनंती. ती पोस्टर वर टाकण्यात येईल. नाहीतर, तुम्हाला जर शक्य असेल तर नवीन चित्र काढून द्याल का?

धन्यवाद.

उत्तराबद्दल धन्यवाद संयोजक.
खरतर तुमच्या कडुन आधीच हे इमेल आले असते तर मलाही इथे काही लिहावे लागले नसते. मला इतक्या छान कार्यक्रमांमधे खरच मोडता आणायचा नव्हता.

आत्तातरी माझ्याकडे इथे टाकता येईल असे साजेसे बाळगणपतीचे चित्र नाही. पण मायबोलीवर अनेक कलाकार मंडळी आहेत. त्यांच्याकडुन एखादे सुंदर चित्र तुम्हाला सहज मिळेल. तुर्तास आता वापरलेल्या चित्राच्या प्रताधिकाराविषयीही माहिती नसल्यास नुसताच रंगित बॅग्राउंड वर ठेवलेला मेसेज ठेवता येईल.

धन्यवाद.

नमस्कार,

हे नवे पोस्टर आपले मायबोलीकर बित्तुबंगा यांनी बनवुन पाठवले आहे. यावर असलेले श्रीगणेशाचे प्रकाशचित्र हे त्यांनी स्वतः काढलेले आहे. धन्यवाद बित्तुबंगा Happy

धन्यवाद

वा! फारच मस्त फोटो आहे गणेशाचा. इतक्या सुंदर बालगणेशाच दर्शन घडवल्याबद्दल बित्तुबंगा यांचे आभार. Happy

स्मिताके, 'आवडते घर' करता वेगळा धागा आपल्याच उघडायला हवा. अधिक माहितीसाठी कृपया वर दिलेले नियम वाचा.

हं. मी काहीतरी गोंधळ केला आहे तर Sad सॉरी. पण आता ती प्रवेशिका योग्य जागी हलवता येईल का? की ती परत अपलोड करावी लागेल?

Pages