नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24

nevaidya_0.jpg

गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्‍हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.

तुमच्या घरी यंदा कायकाय नैवेद्य बनवलात? बाप्पाकरता कोणता प्रसाद वाटला? आम्हालाही कळवा. तुमच्या पाककृती वाचून, त्यांची प्रकाशचित्रे पाहून बाप्पासारखेच आम्हीही तृप्त होऊ.

नैवेद्याच्या संकल्पाची सिद्धी !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, कुठल्याही नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवल्याखेरीज तो नैवेद्य पूर्ण होत नाही.

मी नैवेद्य पूर्ण वाढून घेतला, मग फोटो काढला. **मग लक्षात आलं की आपण पानामधे खीर आणि वाटीमधे कुर्मा भाजी वाढलीच नाहिये, ती वाढून घेतली **
आणि नंतर सतिशने तो नैवेद्य देवाला दाखवला. (तुळशीचे पान ठेवून, ताटाभोवती पाणी फिरवून, वगैरे म्हणत) मग त्या नैवेद्याच्या पानात मीठ वाढून घेतले. त्याअधी शेजार्‍याना आणि कामवालीला जेवण वाढून दिले आणि मग जेवायला बसलो. Happy

लिंबूभटजी अधिक माहिती देतील.

मी वाचलेल्या माहितीत गणपतीला तुळस निषिद्द आहे त्यामुळे तुळस न ठेवता दुर्वा ठेवुन नैवेद्य दाखवावा असे म्हटले आहे. चारचउघी च्या २ वर्षापुर्वीच्या अंकात संपुर्ण माहिती होती गणेश पुजन, नैवेद्य इ. बद्दल. त्यात लिहील्याप्रमाणे गणपतीच्या नैवेद्यात वांगी, दुधी व गाजर ह्या भाज्या निषिद्द आहेत.

भंडारा (भंडार) आमच्यात पण भरतात. पण बायकाही भरतात. हातात भंडारा घेउन भंडार भरती अस म्हणतात. आम्ही उकडिचे करतो पण आकार थोडा वेगळा असतो. मी जमलं तर फोटो टाकेन.

आभार श्रद्धा,
मला वाटतं गणेशाला वहायच्या पत्रीत पण तुळस नसते.

नंदीनी, खर्‍या अर्थाने नैवेद्य दाखवला म्हणायचा.

नले, खिरापत म्हणजे खवा, खडीसाखर, खोबरे, खारिक आणि खसखसच ना, सुंदर वळले आहेस.

मला वाटतं गणेशाला वहायच्या पत्रीत पण तुळस नसते.<<< दिनेशदा, मला एका गणपती बसवलेल्या आलेल्या गुरुजींनी सांगितल्याचे आठवते कि ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी फक्त तुळस चालते, बाकी दिवशी नाही.

देवा मला पुढच्या जन्मी बाप्पाच बनव डायरेक्ट>>>> Rofl

मला वाटतं गणेशाला वहायच्या पत्रीत पण तुळस नसते.>>

माझ्या घरी ह्यावर्षी तुळस रुजली आणि चांगली वाढली म्हणून मनापासून गणपतीला वाहिली. देवाचीच पत्री देवाला का चालत नसावी?

आर्च, तुळस म्हणजे श्रीविष्णुशी पुढच्या जन्मात विवाहाचा वर मागून घेतलेली सती वृंदा.
शिवाय तिने खात्री करुन घेण्यासाठी, इतक्या बायका असताना माझे स्थान काय,
असेही विचारले, तर तूझे स्थान मीठाचे असे श्रीविष्णूने सांगितले. म्हणून नैवेद्यात मीठ
न घालता, तुळशीचे पान ठेवतात. (मीठाला अगस्तीचा, तसेच खाल्ल्या मीठाला जागावे
लागू नये..असाही संदर्भ आहे.) अर्थात लिंबू योग्य ते संदर्भ देईलच.
पण मनोभावे वाहिलेली तुळस बाप्पाला नक्कीच आवडेल.

मला एक विचारायचे होते. रिमाचा नैवेद्य सोडला तर बाकी कुणाच्याच नैवेद्यावर तुळशीचे पान नाही. बाप्पाच्या नैवेद्यावर नसते ठेवायचे का ते ? का फक्त सत्यनारायणाच्याच नैवेद्यावर ठेवायचे असते.>>
दिनेशदा आमच्याकडे सावंतवडीला जे भटजी त्यांनी तस ठेवायला सांगितल.

दिनेशदा, संदर्भ छान दिला आहे तुळशीबाबतचा. मला ही माहिती नविनच. ह्याविषयी अजुन जाणुन घ्यायला आवडेल.

हो. गणपतीला फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळस वाहिलेली चालते. (वाहणे म्हणजे देवावरती फूल पत्री वगैरे ठेवतात त्या अर्थी)

एरव्ही कधीही कुठल्याही देवाचा नैवेद्य वाहताना पानामधे तुळस असणे मस्ट आहे. Happy तुळशीच्या पानाशिवाय पंचपक्वान्नाचा नैवेद्य देखील निरुपयोगी. यासंदर्भात आज्जीने सांगितलेली माहिती:

"श्रीमंताघरी पक्वान्नाचे जेवण आणि गरीबाघरचे साधे जेवण देवाला दोन्ही सारखे. शिवाय माणसाला "मी" एवढा स्वैपाक साक्षात देवाला जेवायला वाढले असा गर्व येऊ नये म्हणून पानामधे तुळस ठेवायची. देवासाठी ती तुळस (त्याच्याच सृष्टीमधली) महत्त्वाची. बाकीचे सर्व आपल्यासाठी.

माझ्या घरी ह्यावर्षी तुळस रुजली आणि चांगली वाढली म्हणून मनापासून गणपतीला वाहिली>> यातला मनापासून हे महत्त्वाचे. Happy देवाला निषिद्ध असे काही नाही.

अनंत चतुर्दशीला २१ पदार्थांच्या नैवेद्याचा संकल्प सोडू या का ? सगळ्यांच्या सहकार्याने सहज शक्य होईल. अनायासे रविवार आहे, वेळही मिळेल. बघा विचार करुन.

१) मोदक, २) साटोर्‍या, ३) खीर, ४) घारगे ५) श्रीखंड
५) वरणभात ६) खतखते ७) निवगर्‍या ८) भोपळा गवार भाजी
९) पडवळाची भजी १० ) मटाराची भाजी ११ ) कोशिंबीर
१२) पुरी १३) कढी १४ ) पातोळ्या १५ ) आंबाडीचे रायते
१६) टरबूज आणि पोह्याचे रसायन १७ ) पपनस
१८) केळे १९) कानवले २०) लाल माठाची किंवा अळूची भाजी
२१) वाटली डाळ

असा मला सूचलेला मेनू. (आमच्याकडे असा असतो) पण इथल्या सभासंदांना जे शक्य असेल ते.
सूचना अर्थातच हव्यात.

आपण संयोजकांकडे वेगळे फोटो पाठवू आणि २१ जमले कि ते एकत्र पोस्ट करतील.
बघा कल्पना कशी वाटतेय. आणि कुणाला काय करता येईल ते पण लिहा. काही पदार्थ अगदी सोपे आहेत, मुले पण भाग घेऊ शकतील.

खीर- वरणभात- पुरी कोशिंबीर-दहीपोहे-वाटली डाळ आणि केळे हे त्यातल्या त्यात सोप्पे. Proud

शेवयाची खीर चालेल का? वाटल्या डाळीसाठी मला इथे अजून कैरी मिळतेय. त्यामुळे मी करू शकेन.
पडवळाची भजी पण करेन मी. पातोळ्या अजून कुणी करणार नसेल तर मी करेन. आमच्या बिल्डिंग्मधे हळदीची पानेच पाने आहेत. आणि शेजारच्या आंटी अ प्र ति म पातोळ्या करतात. त्या आणि मी मिळून करू. Happy
रच्याकने, मी त्या दिवशी चित्रान्ना पण करणार आहे.

आयला म्हणजे दोन वेगळे प्रकार आहेत का? मला वाटलं की वाटल्या डाळीत पण कैरीच घालतात. मग वाटल्या डाळीत आंबटपणाला काय घालतात???

नंदिनी, हमखास हळदीची पाने मिळतील असे कुणी नसेल इथे.
त्यामूळे पातोळ्याची जबाबदारी घेतली तर छानच.

वाटल्या डाळीत >>
याची रेसेपी टाका ना कोणीतरी!
आमच्याकडे विसर्जनाच्या वेळी चवळीची नुसती मिरची वर परतलेली उसळ आणी लाह्यांच पंचखाद्य असत. हि उसळ नुसती खाल्ली जाते (म्हणजे पोह्यांसारखी)

हो. गणपतीला फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळस वाहिलेली चालते. (वाहणे म्हणजे देवावरती फूल पत्री वगैरे ठेवतात त्या अर्थी) >>
http://www.esakal.in/moraya/ganeshpatri_tulas.aspx
हे चेक करा. चांगली माहिती आहे.

Pages