सुश्राव्य संगीत - हे गजवदना - रैना

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:29


हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना

तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना

मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना

आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्‍यांची
श्री गणराया तुला वंदना

कवी: प्रसाद शिरगावकर
चाल: प्रमोद देव
गायिका: रैना
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

अहा.........काय गोड आवाज गं रैना !!
देवकाका...... यावर्षीचा गणेशोत्सव तुम्ही गाजवताहात ........मस्त Happy

आहाहा..... असा सुरेल, मधुर आवाज फार फार काळाने ऐकला. (मागल्या वर्षी झलक ऐकली होती तेव्हा कल्पना आलीच होती! यावेळी मनावर घेतलेत हे फार झाले. आता मात्र यात खंड पडु देवू नये असे वाटते. )
प्रमोद जी,
या गीताच्या चालीचा आत्मा मुळातच श्रीमंत आहे हे विशेष नमूद करतो. रैना च्या आवाजाने त्याला एक सुकून दिला आहे, एक ठेहेराव दिला आहे. सकाळी एखादी मधाळ भूपाळी कानावर पडून हलकेच जाग यावी तसे काहिसे वाटले आणि मग संपूर्ण गीत ऐकल्यावर थेट देवघरात ऊभे असल्याचा अनुभव आला.
शब्द, गीत, संगीत, सूर, हे पूजेचे साहित्य घेवून गणपतीचा अभिषेक केल्यासारखा माहोल झाला आहे.
खेरीज तांत्रिक दृष्ट्या, निव्वळ तानपुर्‍याच्या साथीने प्रत्त्येक सूर हळू हळू संयमाने आळवणे हे सोपे काम नाही. गायकाच्या "बैठकीची" ती कसोटी आहे.
क्या बात है!
अभिनंदन!!!!
(रैना, आगामी प्रॉजेक्ट साठी, स्टूडियो रेकॉर्डींग साठी तारखा मिळतील काय? नाही म्हणू नकाच! गळा", "आवाज" ही ईश्वरी देणगी असते, ती साधना करून प्राप्त होत नाही. तुम्हाला ती देणगी मिळाली आहे त्याचा आनंद ईतरांनाही अधिक अधिक मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो.) Happy

रच्याकने: प्रमोद जी, या गीताचे ध्वनीमुद्रण अधिक सुंदर आहे.

व्वळ तानपुर्‍याच्या साथीने प्रत्त्येक सूर हळू हळू संयमाने आळवणे हे सोपे काम नाही. >>> अनुमोदन.

प्रसाद, रैना, देव काका वा मस्त!

Pages