आनंदमेळा- छोटे कलाकार- माझे आवडते घर- नचिकेत

Submitted by पूनम on 2 September, 2011 - 04:44

'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अ‍ॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.

पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.

पूर्वतयारी-

sahitya.jpg

कामात असताना-

tayari.jpgtayari1.jpg

झालं घर करून-

चॉकलेटच्या डोंगराला, 'पर्क'ची नदी, डोंगराच्या पोटात चक्क मनुका आणि बेदाणे, 'पोलो'चा सूर्य आणि 'मार्बल्स'ची झाडं, बिस्किटांचे घर, 'जेम्स'ने भरलेला घराचा माळा, पक्षी आणि फुलंही 'जेम्स'ची, कारंज्यातही बेदाणे, तर पाणी श्रीखंडाच्या गोळ्यांचं आणि तुषार बडीशेपेच्या गोळ्यांचे! दारात उभा असलेला 'तो' आनंदात असेल नाहीतर काय! Happy

final.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावेळी कटाक्षाने काहीही सूचना करायच्या नाहीत असं ठरवलं होतं, त्यामुळे कष्टाने माझं तोंड बंद ठेवलं>>>>
याबद्दल आईलाही शाब्बासकी. Happy

किती सुंदर.. !!!!
नचिकेत,
फारच आवडलं हे घर.. अगदी लहानपणी स्वप्नात यायचं तसय :).

घर चॉकलेटचं असलं तरी नचिकेताने मात्र काळजावर दगड ठेवून केलंय. Proud आणि सूचनांचा मोह आईने आवरलाय तेही जिकीरीचंच काम! त्यामुळे दोघांनाही शाबासकी. जेम्सचे पक्षी आणि बडीशेपचे तुषार क्यूटच.

पौर्णिमा,

या धाग्याच्या शीर्षकात नचिकेतचे नाव घाला प्लीज. म्हणजे शीर्षक असे दिसेल :

आनंदमेळा- छोटे कलाकार- माझे आवडते घर - नचिकेत

मस्त आहे बंगला Happy अन तो दोन्ही हात वर करून दारात उभा मुलगा विशेष आवडला. Happy डाव्या बाजुची छोटी रोपं आहेत का कुंडीत?

Pages