छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : "कहानी घर घर की"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:10

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियमः

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

************************************************************************

"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."

Ghar 2.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही एकदम जबरी आयड्या आहे झब्बूची. सगळ्यांचे फोटो आणि गाणी आवडली. मी आलेच शोधाशोध करुन Happy

माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते
संसार मांडते मी संसार मांडते

दारी घरी सुखाची रुपे उभी नटून
मी पाहते तयांना ही लोचने मिटून

जागू Biggrin

दारी घरी सुखाची रुपे उभी नटून >>>> हे सुखाची ऐवजी 'दुधाची' 'हाडांची' 'ब्रेडची' 'पोळीची' ह्यातलं काही एक चालेल Proud

स्वाती ताई, सिंडरेला अग ही चप्पले त्यांचे सुखच आहे. हे कुत्रे चप्पल पळवून चावुन खातात. म्हणून ते सुखच आहे त्यांच्यासाठी Lol

... यूं तो सारे सुख है बरसे
पर दूर तू है अपने घरसे
आ, लौट चल तू अब दिवाने
जहाँ कोई तो तुझे अपना माने
आवाज दे तुझे बुलाने वही देस...

ये जो देस है तेरा

Flamings-sd1.jpg

सगळ्यांच्याच एंट्र्या भारीयेत. लई भारी.

तू घरभर भिरभिरत असतेस; लहान-मोठ्या वस्तुंमध्ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात.. स्वागतासाठी 'सुहासिनी' असतेस;
वाढताना 'यक्षिणी ' असतेस; भरवताना 'पक्षिणी' असतेस
साठवताना 'संहिता' असतेस; भविष्याकरता स्वप्नसती असतेस
.. संसाराच्या दहाफुटी खोलींत दिवसाच्या चोविस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही

विंदा. धृपद. झपतालCommorants-sd1_0.jpg

राजास जी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या...!

(ही निळावंती आणि तिचा शंख त्या सरड्याचं घर आहे.)

ge-niLaavanti-kashaalaa.JPG

koSh.JPG

ये बाहेरी अंडे फोडुनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी..

घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी

(हे कोष आहेत, अंडी नव्हेत याची नम्र जाणीव आहे. Proud
पण बाकी चपखल आहे की नाही? Happy ).

ghar1.jpg

छोटासा घर है ये मगर
तुम इसको पसंद कर लो
दरवाजा बंद कर लो
मै हां कहू या ना कहू
तुम मुझको रजामंद कर लो
दरवाजा बंद कर लो

:p

इन भूलभूलैया गलियों मे अपना भी कोई घर होगा
अंबर से खुलेगी खिड्की और खिडकी से खुला अंबर होगा
अस्मानी रंग की आँखो मे बसने का बहना ढुंढता

आबोदाना... ढुंढते है इक आशियाना ढुंढते है
Godwit-sd1_0.jpg
खरे तर 'एक अकेला इस शहर में' ही चालेल. Happy

मृ/स्वाती Happy
वारूळ मस्तय जिप्सी.
सशल- कसलं गोड आहे ते..

छान फोटो आहेत एकएक.

मृ तुझी निळावंती दर गणेशोत्सवात असतेच Lol

दिनेशदा मनुष्यप्राण्याच्या घराचा फोटो टाकलायत का?

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्देची गौरव पूजा करु..
IMG_32591.jpg

सिंडी, सेमपिंच, माझ्या डोक्यात तेच गाणं होतं. ऑस्सम गाणय.. Happy
जिप्सी- आयड्या मस्तय. माशाचा फोटु यायलाच हवा होता.

मेरे घर आना... Proud

magari.jpg

मेरे घर का सीधासा इतना पता है
ये घर जो है चारों तरफ से खुला है
न दस्तक ज़रूरी न आवाज़ देना
मेरे घर का दरवाज़ा कोई नहीं हैं
है दीवारें गुम और छत भी नहीं है

मैं साँसों की रफ़्तार से जान लूंगी
हवाओं की खुशबू से पहचान लूंगी

फिर तुमको खा लूंगी Proud

Lol

Pages