छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : "कहानी घर घर की"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:10

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियमः

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

************************************************************************

"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."

Ghar 2.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages