मी आहे!!

Submitted by मंदार-जोशी on 31 August, 2011 - 04:22

तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो
हळूच माझ्या मागे येऊन
खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस...
"मी आहे!"

पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली
तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली
जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज
पुन्हा कधी ऐकायला मिळेल
असं वाटू लागलं, तेव्हा
फोन आलाच तुझा, म्हणालीस...
"मी आहे!"

घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत
गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत

श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर
धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..."

वाटलं कळवावं का तुला,
गर्दीत आहे, सार्‍यात आहे... पण एकटाच मी!

आणि नकळत, माझ्याच आतून आला गं आवाज....

आश्वासक...

"मी आहे रे, मी आहे!!"

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

वॉव!

मला ज ब र द स्त आवडली Happy

"तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो...">> हे पण भावलं!

रोजच्या वापरातले साधे शब्द!! जियो! Happy

मंदार, जबरी रे. किती गोड.

माझ्याच आतून आला गं आवाज....

आश्वासक...

"मी आहे रे, मी आहे!!" >>> असा आवाज येतो मग कसं हुश्श होतं ते तुला नाही कळणार (कदाचित). खुप अपिल झाली मला. मस्त मस्त !

>>"मी आहे रे, मी आहे!!" >>> असा आवाज येतो मग कसं हुश्श होतं ते तुला नाही कळणार (कदाचित).

मनिमाऊ, 'कदाचित' म्हणालीस ते बरं केलंस. कळतंय मला, रोज कळतंय. Happy

आशु, देवकाकांचंही हेच मत आहे. पण तो शब्द मी काही विशिष्ठ कारणासाठी वापरला - किंबहुना मुद्दामून नाहीच. तो अगदी सहज उतरला कवितेत. 'जगाची तसवीर' म्हटल्यावर जे व्यक्त होतं त्यासाठी इतर कुठलाही शब्द माझ्या दृष्टीने तरी फिट बसला नसता.

Happy !!!

व्वा सह्ही

तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो
हळूच माझ्या मागे येऊन
खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस...
"मी आहे!" Happy

Pages