********************************************************
राजा : प्रधानजी... प्रधानजी...कुठे उलथले सकाळीच!
प्रधानजी : आलो आलो महाराज, द्या ट्टाळी!!
राजा : प्रधानजी, एकतर उशीरा आलात नि वर टाळ्या कसल्या मागताय!
प्रधानजी : महाराज, अहो काही वर्षांपूर्वी नव्याने वसलेल्या मायबोलीनगरीत आज फेरफटका मारायला गेलो होतो... तिथे यंदाच्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे म्हणून जरा खूष झालो!
राजा : असं होय! काही बोलू नका बुवा त्या नगरीबद्दल! आम्हाला समजल्या आहेत बातम्या! एकाचढी एक महापंडित रहातात म्हणे तिथे. राज्यात जरा कुठे खुट्टं वाजलं की लगेच हे त्यावर चर्चासत्रं काय घडवून आणतात... एकमेकांच्या नावाने आरोळ्या काय मारतात... छे छे!
प्रधानजी : महाराज, अहो त्या चर्चासत्राला कधी नीट शेवटचं वळण मिळालेलं ऐकलं आहात का पण?
राजा : नाही ऐकलंय प्रधानजी. म्हणूनच म्हटलं ना, रत्नं आहेत तिकडचे नगरवासी म्हणजे! प्रधानजी, एक काम कराच. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी आमचं आसन राखून ठेवाच तिथे! बघूया तरी, काय काय अजब नमुने आहेत ते!
********************************************************
टीप : कार्यक्रम आणि स्पर्धांचे विषय आणि नियम बघण्याकरता निळ्या शब्दांवर जाऊन टिचकी मारा.
********************************************************
विसरू नका!
स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, बाप्पाकरता तुम्ही स्वतः गायलेली गाणी, श्लोक, आरत्या, भजनं, रेकॉर्ड केलेल्या कॉलनीतल्या गणेशाच्या आरत्या.... आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.
सगळे तुमच्या घरातल्या बाप्पाच्या दर्शनाकरता आतूर आहेत. त्यामुळे घरच्या गणपतीचे फोटो, आरास, नैवेद्यांची प्रकाशचित्रे आणि कृती आम्हाला जरूर पाठवा. आपल्याला काही खास चित्रं पाठवायची असतील, सुलेखन करून पाठवायचे असेल, वेगवेगळ्या अपरिचित गणपतींची ओळख करून द्यायची असेल तर स्वागत आहे.
तुमच्या गावातील, शहरातील, परदेशातील या वर्षीच्या गणपतीबाप्पांचे फोटोही सगळ्यांना बघायला नक्कीच आवडतील.
हे सर्व आम्हाला sanyojak@maayboli.com वर पाठवा.
********************************************************
दवंडी १ : मायबोली गणेशोत्सव २०११
दवंडी २ : मायबोली गणेशोत्सव २०११
आगामी आकर्षण : गणपतीबाप्पांचे आगमन!
मंडळी, तिसरी दवंडी झाली आहे.
मंडळी, तिसरी दवंडी झाली आहे.
छान दवंडी
छान दवंडी
छान दंवडी आणी वरिइल ३ ही
छान दंवडी आणी वरिइल ३ ही स्पर्धेची उत्सुकता आहे.
दवंडी मस्तच दे ट्टाळी,
दवंडी मस्तच

दे ट्टाळी, आरोळ्या आणि शेवटचं वळण याची लईच उत्सुकता लागुन राहिलीय बघा
जबरी दवंडी... शेवटंच वळण काय
जबरी दवंडी... शेवटंच वळण काय असू शकेल त्याची थोडीशी कल्पना आलेली आहे..
दे ट्टाळी, आरोळ्या आणि शेवटचं
दे ट्टाळी, आरोळ्या आणि शेवटचं वळण याची लईच उत्सुकता लागुन राहिलीय बघा >>>>>अगदी अगदी
मस्त शक्कल लढवता आहात...
मस्त शक्कल लढवता आहात...

संयोजक जबरदस्त कल्पक आहेत
संयोजक जबरदस्त कल्पक आहेत ह्या वेळचे. खूप मस्त
मस्त आहे ही दवंडी सुद्धा.
मस्त आहे ही दवंडी सुद्धा. तिनही दवंड्यांमधली स्टेज आवडली
अरे, तिसरी घंटा झाली का? आता
अरे, तिसरी घंटा झाली का? आता पडदा कधी उघडणार? केव्हाचे चटया टाकून बसलोय......