चित्रकला- घर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मुलाच्या चित्रकलेत हळूहळू (मनात असेल तर) प्रगती होत आहे.
ह्या चित्रामध्ये उजवीकडचं चित्र प्रिन्टेड होतं, आणि मुलाने फक्त रंग भरले होते.
आता तेच चित्र त्याने संपूर्णपणे पहिल्यापासून काढून रंगवले आहे. ही प्रगती आहे असं वाटले, आणि ह्या आधीचीही चित्र इथे दिली असल्याने, हे चित्र इथे देत आहे. कसे वाटले हे सांगा, जाणकारांना काही प्रगती वाटत आहे का?

drawing-house2.JPG

हे जरा जवळूनः

drawing-house1.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

गजानन, उजवीकडच्या चित्रात (जे नुसतं रंगवलं आहे) त्यात प्लॅस्टिक फिनिशचे खडू होते, त्यामुळे त्याला एक चमक आली आहे.
त्याच्या चित्रासाठी साधे तेलकट खडू वापरलेत, त्यामुळे ते थोडे खडबडीत दिसत आहे.

अल्पना, खूप खूप आवडलं ना तुला? Wink

धन्यवाद रैना, केश्विनी Happy वयाबरोबर हळूहळू बदल होत आहे- हे निरिक्षण करायला मस्त वाटतं Happy

वाह. मी काय जाणकार वगैरे नाही. Proud पण प्रगती आहे हे मात्र निश्चित. (आता त्याला त्याचा माबो आयडी काढून दे, म्हणजे तोच त्याची चित्रे पोस्ट करेल.)

मस्तच नचिकेत. Happy अशीच छान छान चित्रं काढ आणि तुझ्या त्या "कार्टुन" वर केलेल्या कवितेसारख्या कविताही कर खुप खुप Happy

छान

छान.:)

छान, प्रगती निश्चितच आहे.
पण माझ्या मते सर्वात महत्वाचे असे की, चित्रासारखे चित्र काढताना देखिल, स्वतःचे कल्पनास्वातन्त्र्य कुठेही गमावू दिलेले नाही. आन्धळेपणाने कॉपीपेस्ट सारखे केले नाहीये हे महत्वाचे. घराच्या दरवाजापासून बाहेर येणारा रस्ता हे त्याचे उदाहरण आहे असे मला वाटते. मूळ चित्रात ती "पायवाट" कशातरी नागमोडी रेषान्नी दाखवली आहे, जणू काही पाणी वहात येतय वा एखादा ओहोळ दाखवलाय, पण स्वतःच्या चित्रात मात्र तोच रस्ता आखिव रेखिव दाखवला आहे. इतर एक दोन मुद्दे देखिल आहेत.

लिंबुला अनुमोद, रस्त्याच्या अलिकडे पलिकडे त्याने फुलसदृश गोल गुलाबीही काहीतरी काढलंय... ते पण छान दिसतंय. शिवाय मूळ चित्रातलं घर थोडं तिरकं वगैरे आहे, पण तुझ्या मुलाने चित्रात चौकोन आयत वगैरे बरोब्बर मापात काढलेत. Happy

छान Happy
प्रिंटेड आणि त्याने काढलेल्या चित्रांमध्ये रंग कुठेही बाहेर गेले नाहीयत, हात बसलाय व्यवस्थित!

मीही हेच लिहीणार होते की रंग फार छान भरतो तुझा मुलगा, अजिबात बाहेर रंग आलेला नाही, मागच्या चित्रांमध्ये सुध्दा नव्हता. Happy नीटनेटके आणि सुबक चित्र Happy शाबासकी त्याला. Happy

शाब्बास नचिकेत!! चित्र खूऽप सुंदर काढलं आणि रंगवलं आहेस!

कुंपणाच्या फळ्या काढताना मागच्या रांगेतल्या फळ्यांच्या रेघा, समोरच्या ओव्हरलॅपिंग फळ्यांमधे दिसू नयेत म्हणून कित्ती पेशन्स ठेवून काढावं लागतं! ते फार मस्त जमलंय. चित्रातले छान प्रसन्न रंग आणि तुझं अ‍ॅडिशन म्हणून मूळ चित्रापेक्षा वेगळी हिरवळीवरची फुलं आवडली.

म्रु +. प्रगती पेक्षाही त्याला आवडतेय म्हणून चित्र काढतोय हे अधिक मह्त्वाचे माझ्या मते.

शाब्बास नचिकेत! छान काढलं आहेस चित्र. रंगही सुरेख भरले आहेस. मन लावून चित्र रंगवल्याचं जाणवतंय. Happy

Pages