काय सांगू सासवांना हासण्याची कारणे (तरीही)

Submitted by मंदार-जोशी on 29 July, 2011 - 10:41

गझल विभागात एक तरही वाचली आणि सहज गंमत म्हणून हे सुचलेलं टाकतोय........
संबंधितांनी कृपया हलके घेणे.
याला काहीच्या काहीच्या काहीच्या काही कविता म्हणण्यासही आक्षेप नाही.

------------------------------------------------------------------------------------

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
जाणार गावी आनंदून मग बांधेन मी तोरणे

जीन्स घालता सुनेने बोलती कुजके जरी
मुलीने करता फ्याशन तिला मॉडर्न संबोधणे

देखणे ते नाक मुलीचे अन् सुनेचे ते वाकडे
मुलगी आणि सुनेला का वेगवेगळे जोखणे?

सून करता विचारपूस यांना वाटते "फॉर्म्यालिटी"
मुलीचे टोमणेही भासती मायाळू ते बोलणे

दिवसा ढास खोकल्याची अन् घोरणे रात्री तरी
मधुमेही देहाने उघडूनि फ्रीज गुलाबजाम चोरणे

पावसात ते बहु फिरणे सोसेना सर्दी जरी
ओलेत्या देहानेच मग वातानुकूलित विहरणे

सर्दीने हैराण पण तोंडात केळे कोंबती
ढोल्या देहाला त्या किती ते कुपोसणे )

सोडवा देवा असा थकले करुन धावा बघा
गावी जाती आता जेव्हा मेले हजार मी मरणे

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
टळणार ब्याद एकदाची मग बांधेन मी तोरणे

------------------------------------------------------------------------------------
कुपोसणे = कुपोषण या शब्दाचा अपभ्रंश - पोएटिक लायसन्स का काय म्हणतात ते.
------------------------------------------------------------------------------------

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

फक्त दुसर्‍यांच्या सासवा नजरेसमोर ठेवून लिहीलय की स्वतःची सुद्धा? गंमत म्हणून थोडे फार टोमणे, ताशेरे चालले असते पण मधुमेही देह, ढोला देह वगैरे म्हणजे खुपच पातळी घसरवलीत.

Happy

पण:
थोड्याफार ठिकाणी बरोबर नाही वाटली.
उदा. < मधुमेही देहाने उघडूनि फ्रीज गुलाबजाम चोरणे >
वैद्यबुवांना अनुमोदन.

कन्सेप्ट आणि पॉईंट मात्र भारी! Proud

छान

ही कविता तुमच्या सासूवर केलीय की तुमच्या पत्नींच्या सासूवर? Uhoh मलाही बुवा/ऋयामप्रमाणेच काही भाग आक्षेपार्ह वाटला.

वादविवादा चे प्रचण्ड पोटेन्शियल असलेली कविता!! Lol नेहमी च्या सासवासुनांच्या सुपरफास्ट ट्रॅक वर जायची फक्त देर आहे Lol

>>फक्त दुसर्‍यांच्या सासवा नजरेसमोर ठेवून लिहीलय की स्वतःची सुद्धा?

वैद्यबुवा, हे जरा वैयत्तिक होतंय असं नाही का वाटत? Happy
हे कुणालाही उद्देशून नाही लिहीलेलं. एका सुनेच्या दृष्टिकोनातून लिहीलेलं जनरलच आहे.
तेव्हा काहीच्या काही ह्याच स्पिरिटमधे घेणे.

आपल्या संस्कृतीत यापेक्षा जहाल शब्द असलेली काव्ये आहेत. भारुड का काय म्हणतात ते...................

उदाहरणार्थः

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
सासू माझी जाच करिते
लौकर निर्दाळी तिला

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
जाउ माझी फडफड बोलति
बोडकी कर गं तिला

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
नणंदेच पोर किर्किर करिते
खरूज होऊ दे त्याला

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
दादला मारून आहुति देईन
मोकळी कर गं मला

सत्वर पाव गे मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकलीच राहू दे मला

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
तेव्हा ह्या का.का.क. मधले शब्द फारच सौम्य म्हणायला हवेत Happy

मंदार उदा. जरा जास्तीच ठासून दिल्यासारखं वाटतंय. असो..
ही कविता एक का.का.क आहे त्यामुळे हलकेच घ्यायला हरकत नाही.

Pages