सत्कर्म श्रध्दाश्रय

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

वनवासीना देती शिक्षण आणि आरोग्य सेवा
कित्येकांना मिळवून देती गोमातेचा मेवा......
देहरंग : पनवेल जवळ पण मुंबई पुणे रस्त्यापासून खूप दूर डोंगराळ भागात जिथे सरकारी सुधारणा अजून पोहोचल्या नाहीत तिथे "सत्कर्म श्रध्दाश्रय" नावाची एक संस्था तिथल्या लोकांना आरोग्य सेवा व मुलांना शिक्षण देण्याचे कार्य गेले २५ वर्ष करत आहे. त्यांचे हे कार्य सर्वस्वी देणग्या व लोकांच्या मदतीवर चालत असते. तिथे विद्यार्थ्यांची रहाण्याचीही सोय केलेली आहे. साधारण १४, १५ मुले आहेत. त्यासाठी काही कार्यकर्ते तिथेच रहातात. त्या मुलांचा अभ्यास जेवण व्यायाम श्लोक इ. गोष्टी ठरलेल्या वेळेवर केल्या जातात. त्याना जवळात जवळच्या म्हणजे ७, ८ कि.मी. पायी शाळेत प्रवेश घेतला आहे. ती शाळा ७वी पार्यंतच असल्यामुळे नंतर पनवेलच्या खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. त्यांची जायची यायची व्यवस्था करावी लागते.
मुलांना दूध मिळावे व देणग्यां शिवाय स्वतःचे उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी तिथे गाई पाळल्या. गोमुत्र अर्क, त्याच्याच गोळया, गाइच्या ताकाचे ताक्रारिष्ट, गाईचे तूप, ओवा अर्क अशी औषधे करण्यास सुरवात केली. ही बाजारातील प्रचलीत औषधांपेक्षा प्रभावी असल्याचे अनुभवास आले आहे. तसेच स्वस्तही आहेत. त्यामुळे मुलुंड पासून अम्बरनाथ पार्यंत बरेच वैद्य तीच वापारतात.
तेथील सुपीक जमिनीत इतर औषधी वनस्पती लागवडीचे प्रयत्न चालू आहेत. अर्थात यातून मिळणारा अर्थ पुरेसा नाही म्हणून देणग्यांच्या निरनिराळया योजना आहेत. त्यावर करात सुटही मिळते.
याशिवाय आरोग्य सेवेसाठी दर रविवारी मेडिकल कॅम्प असतो. तोव्हा आसपासच्या ८,१० पाडयांमधले आदिवासी येतात. साधारण १०० च्या आसपास रुग्ण असतात. त्यांचे केस पेपर्स मेन्टेन केले जातात. त्यामूळे फॉलो अपही रहातो. टी.बी. सारख्या रोगांवरही इलाज केला जातो. यासाठी औषधे विकत आणली जातात किंवा डॉक्टर्स कडे फिरून गोळा करतात.

या सगळया साठी पैसा मनुष्य बळही लागते. तिथे पाण्याचीही टंचाई आहे. सुरवातिला रस्ताही नव्हता. आशा अनेक अचणींवर मात करत वाटचाल चालू आहे.

डिसेंबरमधे वर्धापन दिन साजरा करतात. त्यावेळी हे पाहाण्याची इच्छा असणाऱ्या सर्वाना डोबिंवलीहून जायची यायची सोय असते. आधी नाव नोंदवावे लागते.

जवळच २ कि.मी. अंतारावर गाढेश्वर धरण आहे व गाढेश्वराचे देउळ आहे. पावसाळयात तर फारच छान देखावा असतो. ८, १० कि.मी. वर माथेरानचा डोंगर व त्यावरून जाणारी छोटी गाडीही दिसते.

त्यांचे कार्य बघून म्हणावेसे वाटले . . .

वनवासीना देती शिक्षण आणि आरोग्य सेवा
कित्येकांना मिळवून देती गोमातेचा मेवा

विद्यार्थ्यांची सोयही करती राहण्या खाण्याची
सुजाण बनविती त्याना देऊन जोड संस्कारांची

वसते जेथे श्रध्दा सदोदित सत्कर्मावरी
सत्कर्मास त्या यश देण्याची देवा कृपा करी

*-*-*-*-*-*-*-*-*-*
अधीक माहीती येथे आहे.
http://www.loksatta.com/daily/20081102/ravi09.htm
http://loksatta.com/daily/20090102/mv07.htm

सुधीर

प्रकार: 

फक्त डिसेंबर मधेच जाण्याची सोय होते की कधीही जाऊ शकतो. जरा सविस्तर माहीती मिळाली तर बर होईल. मी पण डोंबिवली मधेच रहाते

कविता
तिथे एरवी जायला आपलं वहान लागतं, किंवा पनवेल वरून दिवसात दोन तिन वेळा ST असते. पण त्याचे डिटेल्स मला माहीत नाहीत. वर दिलेल्या लोकसत्ताच्या लिंक मधे फोन नं. आहे त्यावर चौकशी करता येईल. हे अजून काही नंबर आहेत.

9833269667, २४४८५३१,
सुधीर