संधीस्वप्न

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

संधीस्वप्न
लमाल, ११ जुन २०११
विषय: स्वप्न
आिशष महाबळ

[अमरेंद्र संगणकाबरोबर चेस खेळतो आहे तर युवराज नुकताच आपल्या संगणकासमोर स्थानापन्न झाला आहे].
अमरेंद्र: 'युवराज, चेसच्या कोड्यासारखी एक केस आहे. White Elephant Detective Agency ने घ्यावी का हाती'?
युवराज: 'कोड्यासारखी म्हणजे? सगळीच तर सोडवेपर्यंत कोडी असतात'.
अमरेंद्र: 'एका अर्थी मृत. खरे लोक गुंतलेले नाहीत. किंवा आहेत, पण डाव आधीच होऊन गेलेला आहे'.
युवराज: 'कोड्यात बोलु नकोस. निट काय ते सांगशील जरा'? [जरा उतावीळपणे युवराजने विचारले]
अमरेंद्र: 'तेंव्हा जरी त्या लोकांना डेटा गोळा करायला वेळ लागला तरी आता संक्षीप्तपणे सांगणे शक्य आहे. ऐक. याची सुरुवात साधारण दोन वर्षांपुर्वी झाली. केप टाऊन मधील काही लोकांना अचानक खूप आनंदी वाटु लागले'.
युवराज: 'पुरुष आणि स्त्रिया दोन्ही? कोणते वयोगट?', सराईतपणे यूवराजने लगेच उलटतपासणी सुरु केली.
अमरेंद्र: 'मुख्यत: पुरुष आणि जवळजवळ सर्व साठीतील, आणि अनेक वेगवेगळ्या देशातील', [त्याच्या प्रश्नांचा होणारा फायदा माहीत असल्याने अमरेंद्राने लगेच उत्तर दिले. पुढचा अपेक्षीत असा प्रश्न लगोलग आलाच.]
युवराज: 'अजुन कोणत्या समानता होत्या'?
अमरेंद्र: 'त्यांचे व्यवसाय भिन्न असले तरी ते सर्व सकाळी एका नव्या रस्त्याने पुर्वेकडे एका पवनचक्कीच्या बाजुने जात. तेंव्हाच त्यांना आनंदाचा झटका येई'.
[लगेच पुढचा प्रश्न न आल्याने अमरेंद्र पुढे बोलला,]
अमरेंद्र: 'तो आनंद खूप वेळ टिकायचा मात्र नाही. दूसऱ्या दिवशी पुन्हा आनंदी वाटे. अनेकांनी आपापल्या परीने हे का होत असेल ते शोधायचा प्रयत्न केला, व त्यातले काही त्यांच्या मानसोपचारतज्ञांकडे पोचले'.
युवराज: 'म्हणजे ज्यांना खरी-खोटी उत्तरे मिळाली असतील ते पोचले नसणार व प्रभावीत लोकांचा आकडा मोठाही असु शकेल'.
अमरेंद्र: 'बरोब्बर'!
युवराज: 'पण मानसोपचार तज्ञांच्या अशिलांची नावे तर गोपनीय असतात'.
अमरेंद्र: 'कुणाचीही नावे जाहीर नाही झालेली व त्या मानसोपचार तज्ञांनी आपापल्या पेशंट्सना आनंदीही केले आहे. म्हणुन तर हे एका मृत कोड्याप्रमाणे आहे'.
युवराज: 'मी खरेच चक्रावलो आहे. ही केस तुझ्यापर्यंत पोचली तरी कशी'?
अमरेंद्र: 'चक्रावणारा तु एकटा नाहीस. एका वार्षीक गोष्ठीत एका मानसोपचार तज्ञाने अशा एका केस बद्दल सांगताच बरेच तज्ञ पुढे येऊन त्यांच्याकडे आलेल्या तशाच केसेस बद्दल बोलले. त्यांची त्यांच्या पेशंट्सशी तोपर्यंत जरी काही बांधीलकी राहिली नसली तरी त्यांचेच कुतुहल जागृत झाले. खरेतर झोप उडाली असेल, पण ते थोडेच असे म्हणणार. आपले डेटा संबंधीत 'we mine your' हे ब्रिद त्यांच्यापर्यंत पोचले असल्याने ते आपल्याला याचा पाठपुरावा करायला उद्युक्त करताहेत'.
युवराज: 'अच्छा, असे आहे तर - आपण एक-दोन नाही तर अनेक तज्ञांचा मानसोपचार करणार. मस्त. पण त्यांनी त्यांच्या पेशंट्सना कसे खुष केले'?
अमरेंद्र: 'सकाळी पुर्वेकडे पवनचक्कीच्या बाजुने जाणे हे सर्वांनीच हेरले व ते त्यांना बदलायला लावले. कोड्याचे उत्तर न देता कोडेच बदलले'.
युवराज: 'हम्म्, पवनचक्की, सकाळ, पुर्व, नवा रस्ता, आनंद. सगळाच आनंद आहे एकुण. सायकॉलॉजीस्ट्स आले म्हणजे बालपणाची व पुर्वाश्रमाची कसुन तपासणी आली. त्यात काही आढळतय'?
अमरेंद्र: 'कौटुंबीक परिस्थीती, किती टिव्ही पहायचे, आयुष्य कुठे घालवले, कोणते सिरीअल बघायचे आणि कोणते सिरीयल खायचे असे बरेच काही.'
युवराज: 'समान मुद्दे आहेत काही'?
अमरेंद्र: 'सॉकर, ड्रीममशीन, टेलेटबीज, डॉ स्युज, लेगो वगैरे बरेच काही. त्यांचा काळ हा स्पंजबॉब, अॅड्रुईनो व आय-डिव्हायसेस च्या आधीचा. या लोकांच्या अशा ईतिहासाबरोबरच या प्रकारे प्रभावीत न झालेल्या लोकांबद्दलही माहिती मिळवावी लागणार. त्याच रस्त्यानी जाणारे व न जाणारे. त्याचप्रमाणे इतरही प्रत्येक घटकाबद्दल. ती सर्व व्यवस्था त्यांच्या संघटनेने केली आहे. त्यांच्या संगणकांना आवश्यक असलेल्या परवानग्या तुझ्या संगणकाच्या अधीन केल्या आहेत'.
युवराज: 'ठीकाय लागतो मी या कोड्याच्या मागे.'
***********************
[बरेच डेटासेट्स जमवुन व त्यांची भरपुर उलटापालट करुन, सेमॅंटीकनेटशी जुळवाजुळव करुन]
युवराज: 'कंट्रोल सॅंपलमधील, म्हणजे प्रभावीत न झालेल्या लोकांच्या माहितीमध्येही, अनेक गोष्टी प्रभावीत झालेल्या लोकांप्रमाणे आहेत. मैदानी खेळांमधे फरक आहेत, पण त्यांचे डिस्ट्रीब्यश समान आहे. शिक्षण, टिव्ही पाहणे ई. बाबतही तेच'.
अमरेंद्र: 'एखादा तर दुवा असेल? समान किंवा असमान? दोन्ही तितकेच महत्वाचे'.
युवराज: 'एक असु शकेल, पण तसा अगदीच नगण्य आहे'.
अमरेंद्र: 'कितीही शुल्लक बाब असली तरी तीचा तपास व्हायलाच हवा. काय आहे ती'?
युवराज: 'प्रभावीत झालेले सर्व लोक टेलेटबीज नामक विसाव्या शताकाच्या शेवटी बनलेली टिव्ही सिरीज पहायचे तर प्रभावीत न झालेल्या बहुतांश लोकांच्या माहितीत तिचा उल्लेख नाही'.
अमरेंद्र: 'महत्वाचे असु शकेल. पाहतो मी. तु तुझा तपास चालु ठेव'.
***********************
[युवराजने जुळवाजुळव केलेली माहिती व महाजाल वापरुन]
अमरेंद्र: 'युरेका! सापडले!'
युवराज: 'काय झाले? सुटले कोडे'?
अमरेंद्र: 'टेलेटबीज, पवनचक्की, ... सगळे जुळुन येते आहे'.
युवराज: 'अरे, जरा विस्तार करुन सांगणार'?
अमरेंद्र: 'टेलेटबीज मध्ये मानवसदृश ४ रोबो असत. त्यांच्या पोटावरील स्क्रीन वर त्यांच्या डोक्यावरील अॅंटेनामार्फत त्यांना संदेश मिळत व त्याप्रमाणे ते वागत. प्रत्येक भाग हा सुर्योदयाला सुरु होई व सुर्यास्ताला संपे. ते चौघेही अतिशय आनंदी होते, व त्यांच्या अंगणातील पवनचक्की सतत दिसे. त्यातील एकाचा, टिंकी-विंकीचा, अॅंटेना त्रिकोनी होता व तो पर्ससारखे काही जवळ बाळगी. यावरुन वादळ पण उठले होते की मुलांना समलैंगीकतेकडे ते प्रवृत्त करु पाहताहेत म्हणुन. ते खरे असो वा नसो, पण त्या सिरीजमधे काहीतरी सबकॉंशस नक्की असणार कारण अनेक ठिकाणी कॉलेजकुमार/कुमारी देखील घोळक्याने ते भाग पहात. अनेक देशांमध्ये टेलेटबीज दाखवल्या जाई'.
युवराज: 'प्रभावीत झालेल्या लोकांनी जर ते लहानपणी पाहिले होते तर त्यांना का नाही आठवले हे सर्व'?
अमरेंद्र: 'सबकॉन्शस. आपण जेंव्हा स्वप्न पाहतो तेंव्हा मनातल्या काही गोष्टींभोवती ते असते. जाणवलेल्या गोष्टी स्मरणात गोठवणे, त्या जाणिवा निट गुंफणे यासारखे प्रकार होत असतात. स्वप्नात काही प्रश्न विचारल्या जातात व कोणते तरी एक उत्तर निवडल्या जाते. मग स्वप्न त्या दिशेनी सरकते व पुढचा प्रश्न समोर येतो. असे होतहोत एकएक उत्तर मिळते व एक सलग गोष्ट तयार होते. दूसऱ्या दिवशी आपण बहुतांश स्वप्ने विसरलो असतो'.
युवराज: 'पण ईथे स्वप्नांचा काय संबंध'?
अमरेंद्र: 'सबकॉन्शस अवस्था तशीच असते. तुला सांगायला नको की कित्येकदा गाडी चालवतांना आपल्याला आसपासच्या गोष्टींची सहेतुक जाणीव नसते. कितीतरी मिनिटे आपण विचारात गढुन गाडी चालवु शकतो. मेंदुचा एक भाग वेग, वळणे ईत्यादीची आकडेमोड सुरु ठेवतो. नंतर त्याबद्दल आपल्याला कोणी काही विचारले तर सांगता येत नाही. पण त्यादरम्यान मात्र थांबवुन विचारले तर सांगता येते'.
युवराज: 'पण त्यांच्या उलटतपाणीच्या वेळी तर टेलेटबीजचा उल्लेख नक्कीच झाला असणार ...'
अमरेंद्र: 'पण या दृष्टीने त्यांना विचारल्या गेले नसणार व त्या सूप्त आठवणी तशा मूर्त स्वरुपात वर येतीलच असे नाही. चल कळवुन टाक त्यांना याबद्दल'.
युवराज: 'कळवतो, पण चेक स्विकारण्या आधी मी त्यांना हेही सांगेन की त्यांनी आपले अनुमान तपासुन पहायला हवे. उदा. टेलेटबीज पाहिलेल्या पण त्या रस्त्यानी कधीच न गेलेल्या त्याच वयोगटातील लोकांपासुन त्यांना सुरुवात करता येईल. त्यांच्यावरही तसाच प्रभाव पडायला हवा'.
अमरेंद्र: 'अर्थातच. आणि असा प्रभाव मुळात पडतो तरी का व कसा हे अजुनच मोठे कोडे आहे. ते ही सुटेल कधीतरी'.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्यवाद aschig... नाही म्हणजे चुकुन दिसला तरी बघाय्ला नको म्हणुन विचारलं... तुम्ही तर लिंकच दिलीत... पण मी ती बघणार नाहिये Wink