कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११)
टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) !!! - मुदत वाढ !!!>>>>>>>>>>>>>> आता हे काढा .... !!! - मुदत वाढ !!!
पुण्यनगरीतील संयोजकांच्या
पुण्यनगरीतील संयोजकांच्या कार्यबाहुल्यामुळे आणि मुंबईस्थीत कार्याध्यक्षांच्या आदेशानुसार, तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याने, चहा-सदर्यांचे बोचके ताब्यात घेतले आहे. तरी ते संबंधीतांनी योग्य वेळेत ओळख पटवुन घेउन जाणेचे(तरी) करावे.
संबंधीतांकडे टोप्याही
संबंधीतांकडे टोप्याही पोहचल्या आहेत. :p
संबंधीतांकडे टोप्याही
संबंधीतांकडे टोप्याही पोहचल्या आहेत.>>>>>>>>>>>> मग करा सुरुवात टोप्या लावायला
लिमये, तुम्ही टीशर्टांचं वाटप
लिमये, तुम्ही टीशर्टांचं वाटप बघणारात का पुण्याचं? एका माबो सदस्याच्या टीशर्टासंबंधात समितीशी संपर्क साधला होता. आशा आहे, त्यांनी तुमच्यापर्यंत तो पोचवला असेल. राम (ववि संयोजक) आहे ना उद्या? त्याला माहित आहे, नक्की काय आहे ते, म्हणून विचारत आहे.
छत्रे, मी फक्त पार्सल
छत्रे, मी फक्त पार्सल संयोजकांच्या सोयीसाठी ताब्यात घेतलं आहे. मी संयोजन समितीत नाही. वाटपाचे काम कोण करणार आहे ते मला माहीत नाही. माझ्या माहितीप्रमाणे राम आणि मल्लीनाथ (ह्या दोघांचेही भ्रमणध्वनी वर दिले आहेत) हे दोघेजण वाटपाचे काम पाहणार आहेत.
हां मग ठीक आहे. धन्यवाद.
हां मग ठीक आहे. धन्यवाद.
वैभ्या सार्वत्रिक टोप्या
वैभ्या सार्वत्रिक टोप्या घालायला २४ तारखेला सां समीती वेळ देणार आहे
मित्रहो.... आजचा आपला टी-शर्ट
मित्रहो.... आजचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.. नविन ठिकाण आणी वेळ आम्ही उद्या सर्वाना कळवत आहे.. माझ्याकडे ज्यांचे भ्रमणध्वनी होते त्या सर्वाना मी समस किंवा कॉल केलेले आहेतच .. उद्या दुपारी सुद्धा समस/कॉल करण्यात येईल.... तुमच्या उत्साहाची आम्हाला कल्पना आहे पण सध्या बालगंधर्वला खुपच गैरसोय झाल्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.. आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
वेळेत इथं माहिती दिल्या
वेळेत इथं माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
मी काल (१७ जुलै) शिवाजी पार्क
मी काल (१७ जुलै) शिवाजी पार्क येथे पोहोचु शकलो नाही.. आता मला कॅप व टि-शर्ट मिळवीण्यासाठी काय करावे लागेल..?
आता वविच्या दिवशीच गाडीत
आता वविच्या दिवशीच गाडीत चहासदर्याचे वाटप करा आणि सर्वांना टोप्या घाला..
काल एकगठ्ठा बर्याच थोर्थोर
काल एकगठ्ठा बर्याच थोर्थोर माबोकरांना भेटले. पहिल्यांदाच. ते टी-शर्ट वाटत होते, मला मजा वाटली.
मी काल (१७ जुलै) शिवाजी पार्क
मी काल (१७ जुलै) शिवाजी पार्क येथे पोहोचु शकलो नाही.. आता मला कॅप व टि-शर्ट मिळवीण्यासाठी काय करावे लागेल? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> सतिश वर अधिक माहीतीसाठी संपर्क :- मधे आनंद चव्हाण यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
मी काल (१७ जुलै) शिवाजी पार्क
मी काल (१७ जुलै) शिवाजी पार्क येथे पोहोचु शकलो नाही.. आता मला कॅप व टि-शर्ट मिळवीण्यासाठी काय करावे लागेल? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> सतिश वर अधिक माहीतीसाठी संपर्क :- मधे आनंद चव्हाण यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
थोर्थोर माबोकरांना भेटले>>>
थोर्थोर माबोकरांना भेटले>>> मामी मी पुण्यात होतो काल..
दक्षीणा.. तुझा भ्रमणध्वनी न्हवता माझ्याकडे त्यामुळे काल संपर्क करु शकलो नाही.. ववी च्या आधी शर्ट आणी टोप्या नक्की मिळणार..
धन्यवाद..vaibhavayare12345
धन्यवाद..vaibhavayare12345
राम, टोपी आधी काय नी नंतर काय
राम, टोपी आधी काय नी नंतर काय घालायला की फरक पेंदा वे??
शुभांगी...
शुभांगी...
राम.. तूझा फोन येत होता
राम.. तूझा फोन येत होता त्याआधीच मी निघालो होतो तिकडे यायला..
सव्वा सहा ला कॉल चूकलेला.
राम आपण बोललो काल. मी येऊन
राम
आपण बोललो काल. मी येऊन गेले तिथे असं सांगितलं तुम्हाला. बघा आठवतंय का ते.
कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा
कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
धन्यवाद, २३ ला भेटूयात. (
धन्यवाद, २३ ला भेटूयात. ( नक्की ना? )
अरे २४ जुलैला ववि आहे ना???
अरे २४ जुलैला ववि आहे ना??? मग कसे भेटणार आपण?? की गाडीतच वाटणार आहात?
पावसाळा आहे.. पाऊस असेलच.. अस
पावसाळा आहे.. पाऊस असेलच.. अस गृहित धरावं.
ओ संयोजक... वविच्या दिवशीच
ओ संयोजक... वविच्या दिवशीच टोप्या घालणार आहात का... आणि वविला जे येतील त्यांनी काय कर्जतहून धावत पळत बालगंधर्वच्या खिडकी पाशी यायचं का??
हिम्या
हिम्या
काय पण टायमिंग आहे... दोन
काय पण टायमिंग आहे... दोन पोस्टी एकाच वेळेस..
२३ तारखेला म्हणजे वविच्या आदल्या दिवशी टी-शर्ट मिळणार म्हणजे वविला मिरवता येणार....
छ्या! एकवचनी रामाचा काळ
छ्या! एकवचनी रामाचा काळ राहिला नाही हेच खरे.
खंडेराव
खंडेराव
Pages