टि-शर्ट आणि कॅप (ववि २०११) !!!

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2011 - 04:17

कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.

ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.

आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०

(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)

धन्यवाद !

"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का Angry ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... Blush जा तिकडे..."
"हँ..... "

तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .

टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-

Green T copy.jpgMaayboli_Tshirt_2011.jpg

वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-

लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"

मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-

३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL

आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप

Maayboli_Cap_2011.jpg

क्याप ६० + २५** = ८५रु/-

** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.

यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.

टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००

ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.

ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?

१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-

चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.

अधिक माहीतीसाठी संपर्क :-

पुणे -

मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५

मुंबई -

आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९

* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.

@ आर्फी - संयोजक जो अकाउंट नंबर जाहीर करतील त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे ऑनलाईन.

दरवर्षी प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या एखाद्या संस्थेला देतो. यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.

adhik1.jpg

महाविद्यालयात शिकत असताना काश्मीरातली परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुण्यातल्या एका स्वयंसेवी संस्थेबरोबर अधिक कदम आणि भारती ममानी हे दोघं काश्मीरला गेले. ही २००० सालातली गोष्ट. दोघंही तेव्हा एकोणीस वर्षांचे होते. दहशतवादानं पूर्ण काश्मीरला विळख्यात घेतलं होतं. तिथली परिस्थिती भीषण होती. गोळीबार, बॊम्बहल्ले रोजचेच होते. या दहशतवादाची सर्वाधिक झळ पोहोचली ती काश्मीरातल्या लहान मुलांना. काहीही दोष नसताना अतिशय भयंकर असं बालपण या मुलांच्या नशिबी आलं. अधिक आणि भारती पहिल्यांदा काश्मीरात गेले, त्यावेळी एकट्या कुपवाडा जिल्ह्यात पंचवीस हजारांहूनही अधिक अनाथ मुलं होती. यांपैकी बहुसंख्य मुलांनी आपलं पूर्ण कुटुंब गमावलं होतं. काहींचा सांभाळ लांबचे नातेवाईक, स्थानिक रहिवाशी, धार्मिक संघटना करत होत्या, पण बहुसंख्य मुलं अक्षरश: रस्त्यावर आली होती. त्यातही मुलींचा प्रश्न बिकट होता. मुलग्यांचा सांभाळ करायला हळूहळू अनाथाश्रम सुरू होत होते, मशिदींमध्ये, मदरशांमध्ये त्यांना आश्रय मिळत होता. पण मुलींचं काय? त्यांना आसरा द्यायला कोणीच नव्हतं. उपासमार, लैंगिक शोषण यांमुळे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता.

ही भयंकर परिस्थिती बघून अधिक आणि भारती व्यथित झाले, पण नुसतं शांत बसण्यापेक्षा त्यांनी या मुलींसाठी काहीतरी करायचं ठरवलं. काश्मीरच्या त्या पहिल्या भेटीनंतर ही दोघं अनेकदा काश्मीरला गेली, तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला, आणि २००२ साली पुण्यात ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेचं कार्यक्षेत्र अर्थातच काश्मीर असणार होतं. कुपवाडा जिल्ह्यातल्या सुलकूट या गावी त्याच वर्षी अधिकनं पहिला अनाथाश्रम स्थापन केला, आणि त्याचा खडतर प्रवास सुरू झाला. काश्मीरात बाहेरच्या व्यक्तीला जमीन किंवा घर खरेदी करता येत नाही. त्यामुळे अनाथाश्रम सुरू झाला तो एका भाड्याच्या घरात. या घराला अधिकनं नाव दिलं - ’बसेरा - ए - तबस्सुम’. आनंदाचं घर. अधिक तेव्हा जेमतेम एकवीस वर्षांचा होता. दोन वर्षांच्या दोन लहान मुलींना पहिल्याच दिवशी कोणीतरी पायर्यांवर सोडून गेलं. अधिक आणि भारतीनं सहा महिने या दोन्ही मुलींचा सांभाळ केला. या मुलींची शी धुण्यापासून त्यांना जेवण भरवण्यापर्यंत, त्यांच्या डोक्यातल्या उवा काढण्यापर्यंत सगळं अधिकनं आणि भारतीनं केलं. या अनाथाश्रमात काम करायला एकही स्वयंपाकी किंवा आया मिळेना. कारण अधिक आणि भारती हिंदू होते. हिंदू व्यक्तीशी बोललं तरी जीव गमावण्याचा धोका होता. पण नंतर अधिकच्या माणुसकीनं स्थानिकांना जिंकून घेतलं. आज या अनाथाश्रमात बासष्ट मुली राहत आहेत.

पुढे २००६ साली बडगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांतही अधिकने अनाथाश्रम सुरू केले. स्थानिकांचा काही दिवस विरोध होताच. एक हिंदू व्यक्ती आपल्या गावात येते, मुलींचा सांभाळ करते, यामागे नक्की काही वाईट हेतू असेल, हा माणूस गुप्तहेर असू शकेल, अशा शंका लोकांच्या मनात होत्या. एका मुल्लानं त्याच्याविरुद्ध फतवा जारी केला. अधिक या सगळ्याला पुरून उरला. पण त्याच्या धैर्याची कसोटी लागली ती दहशतवाद्यांनी त्याचं अपहरण केलं तेव्हा. २००२ साली काश्मिरी दहशतवाद्यांनी अधिकचं अपहरण केलं. त्याच्यावर बंदूक रोखली. अधिकनं मात्र शांतपणे त्यांना आपल्या कामाची माहिती दिली. या कामाचं महत्त्व त्या दहशतवाद्यांनाही पटलं, आणि त्याची सुखरूप सुटका झाली. पण काश्मीरात कायमच नवीन दहशतवाद्यांची भरती होत असते. या नव्यानं दाखल झालेल्या अतिरेक्यांना अधिकचं अस्तित्व खटकतंच. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत तब्बल एकोणीस वेळा दहशतवाद्यांनी अधिकचं अपहरण केलं आहे. त्याला मारहाणही केली आहे. पण प्रत्येक वेळी त्याच्या कामाबद्दल ऐकल्यावर त्याची सुटकाही झाली आहे.

आज अधिकचं काम खूप वाढलं आहे. कुपवाडा, बडगाम आणि अनंतनाग इथल्या अनाथाश्रमांखेरीज अधिकनं जम्मू इथे अनाथाश्रम सुरू केला आहे. जम्मूतला हा अनाथाश्रम खास पंडीत मुलींसाठी आहे. या चारही अनाथाश्रमांत सध्या सात महिने ते सतरा वर्षं या वयोगटांतल्या अधिकनं दत्तक घेतलेल्या १३३ मुली राहत आहेत. पंधरावीस मुलंही आहेत. वीसबावीस वर्षांच्या पंचवीस निराधार तरुणी या सर्वांची काळजी घेण्यासाठी या आश्रमांत राहतात. वडिलांची, मोठ्या भावाची जागा भरून काढायला जेमतेम तिशीचा अधिक भैय्या असतोच.

अधिकनं दत्तक घेतलेल्या या मुलींच्या राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा संपूर्ण खर्च देणग्यांमार्फत केला जातो. सरकारकडून काहीही मदत मिळत नाही. या मुलींना एक सुरक्षित, आश्वस्त बालपण मिळावं, म्हणून अधिक धडपडत असतो. लहानपणापासून या मुलींनी प्रचंड हिंसाचार पाहिला आहे. या हिंसाचारात आपले आईवडील, आजीआजोबा त्यांनी गमावले आहेत. हे ओरखडे त्यांच्या मनावर कायम राहू नयेत, या जगात चांगली माणसंच अधिक आहेत, हे त्यांना कळावं म्हणून अधिक प्रयत्नशील असतो. मुलींना दरवर्षी तो सहलीसाठी महाराष्ट्रात घेऊन येतो. इथला समुद्र, कारखाने त्यांना दाखवतो. अधिकच्या मुलीही खूप समजूतदार आणि हुषार आहेत. शाळेच्या अभ्यासात कायम पुढे असतातच, पण खेळ, संगीत यांतही चमकतात. गेल्या वर्षी मुलींना आणि मुलांना पुण्यातल्या एका कार्यकर्त्यानं फोटोग्राफी शिकवली. कॅमेरा कसा हाताळायचा, फोटो कसे काढायचे, हे शिकवलं. त्यांच्या हाती कॅमेरा दिला. या मुलांनी काढलेल्या अप्रतिम फोटोंचं प्रदर्शन दिल्लीतल्या तीन मूर्ती भवनात भरवण्यात आलं होतं. एनसीईआरटीनं भरवलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत या मुलांनी बक्षिसं मिळवली.

bwf1.jpg

bwf2.jpg

bwf3.jpg

अधिकनं आणि त्याच्या सहकार्यांनी उभ्या केलेल्या या कामाचं मोल करता येणं अशक्य आहे. हिंसाचारानं बालपण उद्ध्वस्त झालेल्या अनेक लहान मुलांना अधिकनं त्यांचा निर्भयपणे जगण्याचा अधिकार परत मिळवून दिला आहे. त्यांना एका सुखकर, सुरक्षित आयुष्याचं स्वप्न दाखवलं आहे. तेही महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या, दहशतवादानं ग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये.

या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे. काश्मीरात अनाथ मुलांची संख्या लाखाहून अधिक आहे. जास्तीत जास्त मुलांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी अधिक आणि त्याचे सहकारी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यासाठी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे.

काश्मीरातल्या गावागावांमध्ये हिंडून अनाथ मुलींना हक्काचं घर मिळवून देणार्या अधिक व ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’च्या सर्व कार्यकर्त्यांना मायबोली.कॉमतर्फे मानाचा मुजरा.

bwf_homes.jpg

संयोजक एका चांगल्या संस्थेची माहिती मिळाली, धन्यवाद. देणगी देत असलेल्या संस्थेचे नाव आणि वेबसाईट वरच्या मजकुरात टाकाल का?

’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन'.... अतिशय उत्तम निवड. संयोजक मंडळाचे आभार Happy

’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन'.... अतिशय उत्तम निवड. संयोजक मंडळाचे आभार Happy

उद्या शि पा येथे पैसे जमा करणे नक्की आहे ना?
तुमच्या पोचपावती वाल्या मेलमधे ठिकाण वेळ कळवले जाईल असा उल्लेख आहे तर वरती उद्या जमायचं लिहिलंय.

Pages