तुझी खबर (तरही)

Submitted by आनंदयात्री on 12 July, 2011 - 00:31

"खोल खोल आतवर तुझी नजर" या तरहीसाठी माझा सहभाग -

खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर

आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)

आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?

चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर

तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)

व्वा.

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर.... चांगला शेर.

एकंदर सुरेख गझल. धन्यवाद नचिकेत.

नचिकेत,
मस्तच रचना...

<विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)>

खुप्पच भावला हा शेर तर...!
अभिनंदन! Happy

नचिकेत, गझल छान आहे.
>>तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर >> हा शेर खूप आवडला.. Happy

व्वा!! सगळे शेर आवडले...! Happy
> विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)

कातिल शेर!

> चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर

अशक्य सुंदर!!

आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!>> Happy

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)>> Happy मस्त...

चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर>> ग्रेट

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर>> हा भारीये...

व्वा.. क्या बात है.. एकापेक्षा एक.. Happy लई भारी.. जियो....

वेड! Happy

मस्त गझल नचिकेत

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर) >>> सुरेख

चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर >>> मस्तच

हे दोन खूप आवडले...

ह्यावेळचा तरही चा मिसरा मस्त आहे. मीही प्रयत्न करतोय लिहायचा

.

डॉक्टरकाका, बागेश्री, स्मितु, हबा, दक्षे, मुक्ता, लल्या, झाडा, गिरीशजी, प्राजु, बेफिकीर - धन्यवाद! Happy

मिल्या, धन्यवाद! लक्ष असू द्या.. Happy
ह्यावेळचा तरही चा मिसरा मस्त आहे. >> मिसरा मोहक आहे असं म्हणायचंय का तुला? Wink
असो.. तू गझल लिही, मग बोलू आपण.. Happy

क्रांतिताई, विदिपा, शामराव, हर्षल, - धन्यवाद! Happy

साती, तुमचा प्रतिसाद क्वचित असतो.. आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्द्ल thanks! Happy

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर

तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर

खूप आवडली संपुर्ण गझल सुंदर...

Pages