चॉकलेट-चिप कुकीज (फोटो सहित)

Submitted by लाजो on 30 June, 2011 - 08:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

११५ ग्रॅम सॉफ्ट बटर,
११५ ग्रॅम बारीक साखर,
१ अंड - हलकं फेटुन,
१७५ ग्रॅम मैदा,
१ कप चॉकलेट चिप्स,
१ टेबलस्पुन कोको (ऐच्छिक)
व्हॅनिला इसेन्स्/एक्स्ट्रॅक्ट (ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

१. ओव्हन १८० डिग्री तापमानाला प्रिहीट करुन घ्यावा;
२. बेकिंग ट्रे वर बटर्/ग्रिस प्रुफ पेपर लावुन तयार ठेवावेत;
३. एका बोल मधे सॉफ्ट बटर आणि साखर एकत्र फेटायला घ्यावे. चांगले हलके होईतो फेटावे;
४. यात हलकं फेट्लेल अंड आणि इसेन्स घालावा;
५. आता मैदा चाळुन घ्यावा व वरच्या मिश्रणात हळुहळु घालावा. कोको घालणार असाल तेर तो ही मैद्याबरोबरच चाळुन मिश्रणात घालावा;
६. चॉकलेट चिप्स घालुन हलकेच मिश्रण एकत्र करावे;
७. टेबल स्पुन किंवा आईस्क्रिम स्कुप ने मिश्रणाअचे गोळे तयार ट्रे वर अंतरा अंतराने ठेवावे;
८. स्पॅच्युला किंवा लाकडी चमच्याने किंवा काट्याने हे गोळे हलकेच दाबावेत;
९. कुकिज १०-१५ मिनीटे बेक कराव्यात.
१०. वायर रॅक वर थंड व्हायला काढुन ठेवाव्यात आणि थंड होता होताच एक एक करुन गट्टम कराव्यात.

IMG_0136.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल त्या प्रमाणे :)
अधिक टिपा: 

१. या कुकिज मधे डार्क्/मिल्क्/व्हाईट किंवा कॉम्बिनेशन चॉकलेट चिप्स वापरु शकता.
२. चिप्स मिश्रणात घालण्यापूर्वी साध्या मैद्यात थोड्या घोलवुन घ्याव्यात म्हणजे नीट मिक्स होतात.
३. या कुकिज फार कडक बेक करु नयेत.

माहितीचा स्रोत: 
बेकिंगचे पुस्तक - द अल्टिमेट कुकी बुक
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, फोटो एकदम मस्त Happy

या कुक्या अंड्याशिवाय करायच्या असतिल तर बाकी घटकांमधे काही बदल करावे लागतील का?

लाजो, आता खाताखाताच टायपतेय... ऐशु जाम खुष आहे या कुकीजवर. उद्या मेल्टिंग मोमेंट्स करुया असा ठराव पास केला आताच Happy

सगळ्याना धन्यवाद Happy

स्पेशल धन्स गं साधना Happy फोटो टाक की कुकीजचा.
आणि मेल्टिंग मोमेंट्स करशिल तेव्हा त्याचा पण टाक फोटु Happy

मंजुडी, माझ्याकडे अंड्याशिवाय चॉक्-चिप कुकिज ची एक रेसिपी आहे, पण मी त्यानुसार कधी कुकिज केल्या नाहियेत. करते आणि मग टाकते Happy

शुभे, मायक्रोव्हेव मधे कशा करायच्या मला खरच नाही माहित. मी बेकिंगसाठी मावे नाही वापरत.

शंका-
१) हलकं फेटलेलं अंडं म्हणजे कसं?
२) काल टीव्हीवर एक रेसिपी पाहिली, त्यात साधी साखर आणि ब्राऊन शुगर दोन्ही होत्या. ब्राऊन शुगर कशासाठी वापरतात- खमंग चवीसाठी, की अजून काही कारण?

@ पौर्णिमा,

अगं हलकं फेटलेलं म्हणजे जस्ट पिवळा बलक आणि पांढरा भाग नीट मिक्स केलेलं. ऑमलेट ला करतो तसं.

ब्राऊन शुगर (रॉ नव्हे) घालायची २ कारणं - पहिलं म्हणजे गुळचट चव येण्यासाठी आणि दुसरं म्हणजे थोड्या च्युई होण्यासाठी. काही कुकिज क्रिस्पी पेक्षा थोड्या च्युई चांगल्या लागतात पण मग त्या थोड्या थिक करायच्या.

या वरच्या रेसिपीत अर्धे अर्धे प्रमाण घेऊन ट्राय करु शकतेस.

मस्तच आम्ही चॉकोहोलिकच त्यामुळे नक्की करून बघेन. व्हॅनिला इसेन्स शक्यतो वापरावा त्यामुळे अंड्याची चव मास्क होते. व चॉकोलेट ला एक फाइन बेस मिळतो.

अगं सध्या फोटो अपलोड करायला इश्यु आहे कॉम्प वरुन म्हणुन टाकला नाही. एकदा इश्यु सॉल्व झाला की टाकते. फोटो काढुन ठेवलाय Happy