निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी धन्स. कदंबाचा वास माहीत नाही पण फुल पाहूनच आला. सुबाभूळीचे फुल पण असेच पण पांढरे असते. त्यालाही एक प्रकारचा सुगंध असतो.

पार्ले कॉलेजमधे लायब्ररीच्या मागे ( की बायो लॅबच्या मागे ) कदंबाचा देखणा वृक्ष होता. जुहू बस डेपोच्या आवारात सुद्धा कदंबाची झाडं होती बरीच. मी पाहिल्याला वीस वर्षांच्यावर झाली आता त्यामुळे आहेतच असं सांगता येत नाही.

जिप्सी,
कधि गेला होतास?
मी आत्ताच जाउन करमळ पाहुन आले. काय अप्रतिम सुंदर आहे. :-). मला खुप वाटत होत की एक तोडावं. तिथे एक काका होते ते म्हणाले, बंगाली लोक ह्याची फळ भाजीत घालतात.

निकिता, फूल नाही तर फळे तोडायला काहीच हरकत नाही. त्याचे लोणचे चांगले होते.
हि १३०० वी पोस्ट.

आता एखाद्या छानश्या फोटोने, तिसरा धागा उघडा बघू.

मी कसलं ध्यान दिसत असेन त्या झाडाखाली. एका हातात लॅपटॉप, दुसर्‍या हातात पर्स आणि ड्ब्याची पिशवी आणि मान वर करुन वेड्यासारखी बघते आहे झाड. Happy

पण ती फुलं फारच सुंदर होती. भान हरपण्याइतकी. आणि प्रत्येक फुलात किमान दोन तरी मधमाशा होत्या Happy

दिनेश,
मायबोलीत प्रवेश देउन स्वागत केले त्याबद्दल मनापासून आनंद झाला.
झाडांबद्दल छान माहिती मिळेल. नेहमीच्या पाहण्यातल्या झाडांचे नावही माहित नसले कि चिड्चिड होते. तेही आता कमी होइल.
अशोक वॄक्षाबद्द्लची माहिती छान. मलापण ठाउक होती. गोव्यात माझ्या पाहण्यात आलेल्या अशोकाचे फोटो देत आहे
फोटो लोड होत नाही. काही कळत नाही.
.

माफ कर साधना . तुझे आभार मनायला हवेत कारण हे पेज तु सुरु केलयस असं आत्ता लक्षात आलय.पूर्वीचे सा-या गप्पा वाचताना दिवस्चे दिवस निघुन जाताएत. खुप मजा येतेय, खुप नवि माहितीसुध्दा.
मस्त श्रीमंत वाटतय. नवे शब्दही कळताहेत. जसं धन्स.खुप धन्स.

Pages