पुणं तिथं सगळंच उणं!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 08:49

मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात. एकतर पहिल्यांदा मीटरप्रमाणे जायला कोणी तयार नसतं. डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात. मीटरप्रमाणे (अगदी भाडेवाढ गृहीत धरली तरी) ३६ रूपयाच्या वर भाडं होत नाही. मग एखादा मीटरप्रमाणे जायला तयार झालाच तर माझ्या बरोबर अश्वमित्रला (गोर्‍या फॉरीनरला) बघुन आम्ही रीक्षात बसतानाच मीटरचा कान चार-पाच वेळा पिळून मीटर फास्ट करून ठेवतात. मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये. मी तर सरळ एकदा रीक्षावाल्यांना म्हणाले की आहो तुमचा मीटर फास्ट आहे. रीक्षाच्या भाड्यांमध्ये जरी वाध होत असली तरी आमच्या घरापासूनचं स्टेशनचं अंतर गेली अनेक वर्षे बदलेलं नाहीये. त्यामुळे मीटर मध्ये येणारे किलोमीटर रीडींग तर सारखंच असायला हवं. तरी त्या रीक्षावाल्याने मान्य केलं नाही. मग एकदा मी एका रीक्षावाल्याला पोलीस चौकी जवळ आल्यावर म्हंटलं, "चला आपण रीक्षा पोलीस चौकीत नेऊयात. तुमच्या रीक्षाचा मीटर फास्ट आहे." झालं रीक्षावाला एकदम नरमाईत, "कशाला ताई? तुमच्या हिशोबाने किती होतात ते सांगा. मग माझ्या मीटरप्रमाणे कीती होतात ते बघु आणि मग ठरवू किती पैसे घ्यायचे ते." आता इतरांना प्रश्न पडला असेल की जर रीक्षाच्या अशा भानगडी आहेत हे माहीती आहे तर रीक्षाने जायचं कशाला? पण पुण्यात पीएमपीच्या बसेसची सेवा भयंकर या कॅटेगरीत मोडणारी आहे. बस अतिशय जुन्या, अस्वच्छ, प्रवाशांना बसायलाच जेमतेम जागा तर त्यात परगावहून आलेल्या लोकांना सामान ठेवायला स्वतंत्र अशी जागेची सोय नाही, बसची असलेली कमी संख्या, कमी वारंवारीता त्यामुळे प्रत्येक रूटवर प्रचंड गर्दी. यासगळ्यातच लांबचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना कधी एकदा पटकन घरी पोहोचतोय असं होतं म्हणून सद्य स्थितीत बस घेणं शक्यच नाहीये.

पुण्यात एकूणच शासनकर्ते, पीएमपीएम वाले आणि रीक्षावाले यांची इतकी छान भट्टी जमली आहे. शासनाने दर पंधरा दिवसांनी पेट्रोल दरात आडीच ते तीन रूपयांनी वाढ करायची. त्यामुळे सगळेच भाव गगनाला भिडतात. कारण पेट्रोल-डिझेल शिवाय साधा भाजीपाला सुद्धा वाहून आणला जात नाही. मग याच महागाईच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ झाली की पुण्यातील रीक्षावाले बेसीक फेअर वाढवण्याची मागणी करतात. बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो. भाडेवाढ करतानाच इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे पण इलेक्ट्रॉनीक मीटर या लोकांना बसवायचा नसतो. पुणे स्टेशनला एशीयाड बस स्टॅंड्च्या बाहेर प्रीपेड रीक्षाचा एकच काऊंटर आहे आणि बहुतांशवेळा तो बंदच असतो. ९०% रीक्षावाले भाडे दर्शवणारं कार्ड दाखवत नाहीत. मनाला येईल ती रक्कम झालेलं भाडं म्हणून सांगतात. मग आपण कार्ड बघायला मागीतलं की ४-५ रूपयाचा फरक दिसतोच. एकदा तर पुण्यात रीक्षाचं बेसीक भाडं वाढून पुन्हा कमी झालं होतं. तर हे रीक्षावाले स्वत:च्या सोयीप्रमाणे आधीचं भाडेवाढ असलेलं कार्ड दाखवून पैसे घ्यायचे. नेहमी पुण्यात रीक्षाने प्रवास करणार्‍याला हा फरक समजू शकतो पण दर काही महिन्यांनी येणार्‍याला हा फरक समजत नाही. पुण्यातील ९०% रीक्षाचालक प्रचंड उद्धट आहेत. खरंतर रीक्षा चालवण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर आणलीत की कितीही अंतरा पर्यंतचं भाडं असू देत (जवळ किंवा लांब) रीक्षावाल्यांनी प्रवाशाला नाही म्हणायचं नाही असा कायदाच आहे. पुण्यातील रीक्षावाले हमखास हा नियम धाब्यावर बसवतात. संपूर्ण देशात पुण्यातील पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त आहेत.

पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असण्यालागचं कारणही हेच आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे अशांना प्रत्येक ठीकाणी चारचाकी घेऊन जाणं शक्य नसतं. पुण्यातील रस्ते हे पादचार्‍यांना आजीबात अनुकुल नाहीत. पदपथांवर एकतर पथारी पसरून विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं असतं नाहीतर दुचाकीस्वार दुचाकी चालवताना आढळतात. पुण्यात म्हणे दोन वर्षांपूर्वी कुठलेतरी गेम्स झाले त्यावेळी प्रचंड खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. बीआरटी प्रकरण तर औरच आहे. बीआरटी असलेल्या कोणत्याही रस्त्यावर आपण गेलो तर प्रचंड विनोदी चित्र पहायला मिळतं. सायकल ट्रॅक मध्ये चारचाकी गाड्यांनी पार्कींग केलेलं असतं. सायकल्स्वार स्वत:ची सायकल आणि जीव दोन्ही सांभाळत दुचाकी आणि चारचाकी यांच्या ताफ्यातून वाट काढत असतात. दुचाकीस्वार पदपथांवरून दुचाकी चालवत असतात. बीआरटी मार्गावरून केवळ पीएमपी आणि बीआरटीच्याच बस न धावता इतर वाहने सुद्धा धावत असतात. यासगळ्या वाहत्या रस्त्यांवर रस्ता क्रॉसकरणे म्हणजे एक मोठं दिव्यच आहे.

म्हणजे एकूणच पुण्याच्या सर्व पायाभूत सुविधांचा शक्यतेवढा बट्याबोळ करून ठेवून "पुणं तिथं काय उणं" च्या ऐवजी "पुणं तिथं सगळंच उणं" अशी उक्ती प्रचलीत करण्याचा प्रघात चालू झाला आहे.

पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत. अयोग्य याअर्थी की ते पुण्याच्या विकासाचा, पुण्यातील नागरीकांचा विचार करत नाहीत आणि कमकुवत याअर्थी की भ्रष्ट राजकारण्यांना खाली खेचण्याची ताकद अस्लेल्या नेतृत्त्वाचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभाव. पुण्यात कॉंग्रेस सोडलं तर इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वाचा अभाव आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांत तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांत भविष्यवेध आणि नियोजन याचा प्रचंड अभाव आहे. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्‍याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही.

पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक त्यांना मतदान करतील. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पुर्वीच्या पिढीत माकडं वैचारिक लेख वाचायचे, आता बघा हे माकड, जाहिरातीतली मिनी स्कर्टवाली मॉडेल बघण्यात गुंतलय... Proud कसं होणार आता या पिढीचं??? Uhoh

>>> काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!

अहो, सकाळच्या वाचकांच्या पत्रातल्या सूचना वाचूनच अमेरिकेची इतकी प्रगती झालेली आहे. अमेरिका-रशियातले शीतयुध्द, इराक्-इराण युध्द इ. लढाया सकाळमधल्या वाचकांच्या पत्रात दिलेल्या सल्ल्यामुळेच थांबल्या.

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!
>>>>>>>>>>>>>>:हहगलो:

"सगळंच" शब्दामुळे गोंधळ झालाय, नाहीतर रिक्षावाल्यांवरचा भाग योग्य आहे. पुन्हा बाकी भ्रष्ट लोकप्रतिनिधी निवडून देणे वगैरे सगळीकडेच आहे की. तो भाग पुणे-स्पेसिफिक नाही.

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!>>>
हे बरोबरच आहे. गणितच करा. म्हणजे पुण्यात आधी असे लोक आहेतच. त्यात इतर गावा/शहरातून वरच्या गुणांनी युक्त असलेले (बरेच) लोकही पुण्यात आले, त्यामुळे साहजिकच संख्या जास्त झाली की Proud

सर्व शहरे सारखीच असतात, फक्त कोणाला तेथील जनतेचे अनुभव चांगले येतात कोणाला वाईट यावरुन गावच वाईट आहे किंवा चांगले आहे हे सांगणे कठीण आहे.

पण पुणे रिक्षावाल्याचा, सिटी बस कंडक्टरचा माझा अनुभव वाईट आहे.

रिक्षावाले:

मुंबई - सरळ सोट रस्ते अधिक असल्याने फसवण्याचा हेतू असूनही फसवणे अवघड! तरीही प्रामाणिक म्हंटलेच पाहिजेत. मात्र रिक्षाचे भाडे खूपच अधिक

कोल्हापूर - अत्यंत सभ्य आणि एक पैसाही जादा न आकारणारे

चेन्नई - येथील रिक्षावाल्यांना सक्तमजूरीची कैद ठोठावली पाहिजे

हैदराबाद - दहा रुपये जास्त द्या असे सरळ सांगतात व ते आपल्याला पटतेही

बॅन्गलोर - इथे काही प्रश्नच येत नाही. तो नेईल तेथे जायचे आणि मागेल ते द्यायचे

कोचीन - फसवणुकीचा प्रयत्न करू पाहतात पण घाबरट असतात

रांची - दहशत! एकदाच घासाघिसीचा प्रयत्न केला, पुन्हा धीर होणार नाही

दिल्ली - हे शहर फक्त लुटण्यासाठी आहे हे सर्वांना मान्य आहेच

धनबाद - टंपूसे क्यों नही जाते हा प्रश्न रिक्षावालाच विचारतो. आपण शेअर रिक्षातून जात नाही यात त्याला आपण घातक माणूस असल्याचा संशय येतो

कलकत्ता - पत्ता नीट सांगीतला नाही तर कुठेही नेतात

राऊरकेला - फसवण्याइतके मोठे गांवच नसल्यामुळे बाळबोध असतात

बिलासपूर व रायपूर - सेम अ‍ॅज राऊरकेला

भिलाई व दुर्ग - रिक्षा नसतातच, शेअर डुक्कर असते

चंदीगढ - फसवू शकणार नाहीत असेच पत्ते असतात या शहरात

रामागुंडम व कोथागुडम - सेम अ‍ॅज राऊरकेला

देवास , इंदौर - फसवत नाहीत

गुजरात - फसवत नाहीत

जयपूर - आपण फसलो हे समजत नाही

हुबळी व विजयवाडा - मुद्दाम पत्याचा घोळ घालून फिरवतात

पुणे - चेन्नईच्या रिक्षेवाल्यांना जर सक्तमजूरीचा कायदा लागू केलाच तर यांच्यासाठी एक स्वतंत्र तुरुंग उभारावा लागेल.

Lol अजून अनेक शहरे राहिली. ज्ञान पाझळण्याची प्रचंड संधी दिल्याबद्दल आभारी आहे.

-'बेफिकीर'!

बेफिकीरपंत,

जबरी माहिती. तुम्हाला "भारतातल्या वेगवेगळ्या शहरातले रिक्शावाले आणि ठरलेल्या भाड्याच्या तुलनेत त्यांनी उकळलेले पैसे व त्यांच्या पैसे उकळण्याच्या पध्दती यांचा तदनुषंगिक अभ्यास" या विषयावर "विद्यावाचस्पती" ही पदवी मिळायला हरकत नाही. Rofl

(हलकेच घ्या हं. गंमत करतोय.)

मला पुण्यातल्या रिक्षेवाल्याच्या प्रामाणिकपणाचा आलेला अनुभव मी मागे इथे लिहीला होता. पण मी खरे लिहितो की उपहासाने हे कुणाला कळत नाही, त्यामुळे लोकान्नी ते मनावर घेतले नाही, उलट मलाच म्हणाले, तुम्हालाच त्याने बनवले असेल.
तसेच लक्ष्मी रोडवरच्या एका फेरीवाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दलहि मी लिहीले होते, तिथेहि तसेच!

असे कसे लोक? आधीच जगात प्रामाणिकपणा फार थोडा. कधी दिसला तर सिनिकल होऊन त्याची शन्का घेणे बरोबर नाही. जसे वाईट दिसले की ओरडा करता, तसे चान्गले दिसले की आवर्जून सान्गावे.

जगात फक्त वाईटपणाच नाही, चान्गुलपणा पण आहे. सतत भडक टाळक्याने, जो दिसेल त्याच्याशी भान्डायला उठायचे, नावे ठेवायची, अशाने वाईटच अनुभव येतील. पण प्रयत्न करत राहिल्यास, चान्गले अनुभव पण येतील. त्यान्ची सुखद स्मृती बरेच दिवस मनाला आनन्द देईल.

जगातले सगळे लोक नेहेमी तुम्हाला हवे तसे कसे वागतील? त्यान्ना त्या क्षणी जसे बरोबर वाटेल तसे ते वागतील. वाटल्यास तात्पुरते रागवावे, पण वाईट अनुभव विसरून जावे.

पण मी खरे लिहितो की उपहासाने हे कुणाला कळत नाही
>>

झक्की, आताशा तुम्हाला स्वतःला पण कळत नसेल, तुम्ही खर लिहिताय की उपहासाने. Wink Proud

झक्की, आताशा तुम्हाला स्वतःला पण कळत नसेल, तुम्ही खर लिहिताय की उपहासाने.

माझे मला नक्की माहित असते मी कधी, काय, कोणत्या अर्थाने लिहितो. लोक कमळे बघतात की चिखल हे त्यान्चे त्यान्ना माहित.

सारखे लोकान्च्या भीतीने हे लिहू का ते असा विचार केला तर मग कठीण होईल.

अहो सगळे जण माझ्याबद्दल काय बोलता? पुण्यातले रिक्षावाले हा विषय आहे!
इतरहि पुष्कळ जणान्नी इथे लिहीले आहे की!
डोक्याला ताण येत नाही
येत नाही? ताण म्हणजे काय पाऊस आहे, यायचे तेन्व्हा येतो, आपले काही चालत नाही. आपण नाही घ्यायचा ताण म्हण्टले की नाही येत! पाउस आला तर आपण पावसातून बाजूला होऊन आडोशाला जातो, छत्री घेतो. तसेच ताण येतो वाटले तर दुसरा विचार मनात आणावा!

तर, बोला पुण्यातले रिक्षावाले!

अहो सगळे जण माझ्याबद्दल काय बोलता? पुण्यातले रिक्षावाले हा विषय आहे!>>> तुम्हा दोघांचे तादात्मीकरण झालेय बहुतेक!!!! Proud Lol Light 1

अहो सगळे जण माझ्याबद्दल काय बोलता? पुण्यातले रिक्षावाले हा विषय आहे!
इतरहि पुष्कळ जणान्नी इथे लिहीले आहे की!<< आपकी बात ही ऐसी है झक्की जी! तुमचा प्रतिसाद (की प्रतिक्रिया)
एकदा का इथे कुणी पाहिला की मूळ विषय बाजूलच राहतो हो ..रच्याकने झक्कापक्की वरुन झक्की हे नाव आलं की झक्की वरून झक्कापक्की हे कळेनासं झालंय आता ...

मुद्दा सोडून भलतेसलते लिहीले की तशीच वेळ आपल्यावरही येते.

असो, पुण्यातले रिक्षेवाले आणि त्यामुळे फक्त पुण्यात सगळेच उणे असणे याचा सुतराम संबंध लावून दाखवला तर मी पुढचे तीन दिवस व दोन रात्री काहीही भंकस कथा, कादंबरी, कविता, गझल, सुखनवर, परिचय असे लिहिणार नाही.

Lol

>>> लोक कमळे बघतात की चिखल हे त्यान्चे त्यान्ना माहित.

अहो झक्की, एकवेळ चिखल बघा पण कमळ कधीही बघू नका. सर्वधर्मसमभावी उगाच तुम्हाला भाजपवाले (म्हणजेच संघवाले किंवा जातीयवादी) समजायचे.

ताण म्हणजे काय पाऊस आहे, यायचे तेव्हा येतो, आपले काही चालत नाही. >>>
अहो तो कंटाळा 'येतो' ना, तसा हा ताण 'येत' असेल. आता नाही का, तुम्ही कुठेतरी काहीतरी खरडलंत की अर्ध्या मायबोलीला ताण आणि उरलेल्या अर्ध्या मायबोलीला कंटाळा 'येत' असेल. आता कंटाळा असो, की ताण; तो अंगावर चाल करून येतो, तर कसा काय बुवा ठरवायचं की ताण किंवा कंटाळा 'घ्यायचा' नाही? मुळात तुम्हीच स्वतः म्हणता, की मी (म्हणजे तुम्ही) उथळ पांचट लिहितो. वरून हेही म्हणता, की मला (म्हणजे तुम्हाला) कशातलेच काहीच कळत नाही. समजतच नाही- मी (म्हणजे तुम्ही) काय नि कुठे लिहितो ते, त्यामुळे त्याकडे लक्षच देऊ नका. माझ्या (म्हणजे तुमच्या) पोस्ट्स डिलीट करा, म्हणजे मायबोली अडचणीत येणार नाही. सदस्यत्व रद्द करा. आता म्हणताय की मी (म्हणजे तुम्ही) खरे लिहितो की उपहासाने- ते लोकांनाच कळत नाही. (आता हा पुण्याबद्दलचा बाफ आहे. त्यामुळे पुण्याबद्दल सोडून इतर सारे इथे बोलायला हवे मायबोलीच्या नियमाप्रमाणे. पण नियम मोडून सांगूनच टाकतो, की आयुष्यात जेवढी अक्कल मिळाली, ती फक्त पुण्यातच- असंही तुम्ही म्हणला होतात.)

आता तुमचा लांडगा येणार येणार म्हणताना तो हजारो वर्षे 'येतच' नाही. पण लांडगा येत नाही म्हणून काय झालं? ताण तर 'येतोच' ना?

मि पुन्यात राहतो. विस्रान्तवाडि यिथे. यिथे सग्ले मिलते. उने काहिच नाहि.

Pages