मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात. एकतर पहिल्यांदा मीटरप्रमाणे जायला कोणी तयार नसतं. डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात. मीटरप्रमाणे (अगदी भाडेवाढ गृहीत धरली तरी) ३६ रूपयाच्या वर भाडं होत नाही. मग एखादा मीटरप्रमाणे जायला तयार झालाच तर माझ्या बरोबर अश्वमित्रला (गोर्या फॉरीनरला) बघुन आम्ही रीक्षात बसतानाच मीटरचा कान चार-पाच वेळा पिळून मीटर फास्ट करून ठेवतात. मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये. मी तर सरळ एकदा रीक्षावाल्यांना म्हणाले की आहो तुमचा मीटर फास्ट आहे. रीक्षाच्या भाड्यांमध्ये जरी वाध होत असली तरी आमच्या घरापासूनचं स्टेशनचं अंतर गेली अनेक वर्षे बदलेलं नाहीये. त्यामुळे मीटर मध्ये येणारे किलोमीटर रीडींग तर सारखंच असायला हवं. तरी त्या रीक्षावाल्याने मान्य केलं नाही. मग एकदा मी एका रीक्षावाल्याला पोलीस चौकी जवळ आल्यावर म्हंटलं, "चला आपण रीक्षा पोलीस चौकीत नेऊयात. तुमच्या रीक्षाचा मीटर फास्ट आहे." झालं रीक्षावाला एकदम नरमाईत, "कशाला ताई? तुमच्या हिशोबाने किती होतात ते सांगा. मग माझ्या मीटरप्रमाणे कीती होतात ते बघु आणि मग ठरवू किती पैसे घ्यायचे ते." आता इतरांना प्रश्न पडला असेल की जर रीक्षाच्या अशा भानगडी आहेत हे माहीती आहे तर रीक्षाने जायचं कशाला? पण पुण्यात पीएमपीच्या बसेसची सेवा भयंकर या कॅटेगरीत मोडणारी आहे. बस अतिशय जुन्या, अस्वच्छ, प्रवाशांना बसायलाच जेमतेम जागा तर त्यात परगावहून आलेल्या लोकांना सामान ठेवायला स्वतंत्र अशी जागेची सोय नाही, बसची असलेली कमी संख्या, कमी वारंवारीता त्यामुळे प्रत्येक रूटवर प्रचंड गर्दी. यासगळ्यातच लांबचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना कधी एकदा पटकन घरी पोहोचतोय असं होतं म्हणून सद्य स्थितीत बस घेणं शक्यच नाहीये.
पुण्यात एकूणच शासनकर्ते, पीएमपीएम वाले आणि रीक्षावाले यांची इतकी छान भट्टी जमली आहे. शासनाने दर पंधरा दिवसांनी पेट्रोल दरात आडीच ते तीन रूपयांनी वाढ करायची. त्यामुळे सगळेच भाव गगनाला भिडतात. कारण पेट्रोल-डिझेल शिवाय साधा भाजीपाला सुद्धा वाहून आणला जात नाही. मग याच महागाईच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ झाली की पुण्यातील रीक्षावाले बेसीक फेअर वाढवण्याची मागणी करतात. बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो. भाडेवाढ करतानाच इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे पण इलेक्ट्रॉनीक मीटर या लोकांना बसवायचा नसतो. पुणे स्टेशनला एशीयाड बस स्टॅंड्च्या बाहेर प्रीपेड रीक्षाचा एकच काऊंटर आहे आणि बहुतांशवेळा तो बंदच असतो. ९०% रीक्षावाले भाडे दर्शवणारं कार्ड दाखवत नाहीत. मनाला येईल ती रक्कम झालेलं भाडं म्हणून सांगतात. मग आपण कार्ड बघायला मागीतलं की ४-५ रूपयाचा फरक दिसतोच. एकदा तर पुण्यात रीक्षाचं बेसीक भाडं वाढून पुन्हा कमी झालं होतं. तर हे रीक्षावाले स्वत:च्या सोयीप्रमाणे आधीचं भाडेवाढ असलेलं कार्ड दाखवून पैसे घ्यायचे. नेहमी पुण्यात रीक्षाने प्रवास करणार्याला हा फरक समजू शकतो पण दर काही महिन्यांनी येणार्याला हा फरक समजत नाही. पुण्यातील ९०% रीक्षाचालक प्रचंड उद्धट आहेत. खरंतर रीक्षा चालवण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर आणलीत की कितीही अंतरा पर्यंतचं भाडं असू देत (जवळ किंवा लांब) रीक्षावाल्यांनी प्रवाशाला नाही म्हणायचं नाही असा कायदाच आहे. पुण्यातील रीक्षावाले हमखास हा नियम धाब्यावर बसवतात. संपूर्ण देशात पुण्यातील पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त आहेत.
पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असण्यालागचं कारणही हेच आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे अशांना प्रत्येक ठीकाणी चारचाकी घेऊन जाणं शक्य नसतं. पुण्यातील रस्ते हे पादचार्यांना आजीबात अनुकुल नाहीत. पदपथांवर एकतर पथारी पसरून विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं असतं नाहीतर दुचाकीस्वार दुचाकी चालवताना आढळतात. पुण्यात म्हणे दोन वर्षांपूर्वी कुठलेतरी गेम्स झाले त्यावेळी प्रचंड खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. बीआरटी प्रकरण तर औरच आहे. बीआरटी असलेल्या कोणत्याही रस्त्यावर आपण गेलो तर प्रचंड विनोदी चित्र पहायला मिळतं. सायकल ट्रॅक मध्ये चारचाकी गाड्यांनी पार्कींग केलेलं असतं. सायकल्स्वार स्वत:ची सायकल आणि जीव दोन्ही सांभाळत दुचाकी आणि चारचाकी यांच्या ताफ्यातून वाट काढत असतात. दुचाकीस्वार पदपथांवरून दुचाकी चालवत असतात. बीआरटी मार्गावरून केवळ पीएमपी आणि बीआरटीच्याच बस न धावता इतर वाहने सुद्धा धावत असतात. यासगळ्या वाहत्या रस्त्यांवर रस्ता क्रॉसकरणे म्हणजे एक मोठं दिव्यच आहे.
म्हणजे एकूणच पुण्याच्या सर्व पायाभूत सुविधांचा शक्यतेवढा बट्याबोळ करून ठेवून "पुणं तिथं काय उणं" च्या ऐवजी "पुणं तिथं सगळंच उणं" अशी उक्ती प्रचलीत करण्याचा प्रघात चालू झाला आहे.
पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत. अयोग्य याअर्थी की ते पुण्याच्या विकासाचा, पुण्यातील नागरीकांचा विचार करत नाहीत आणि कमकुवत याअर्थी की भ्रष्ट राजकारण्यांना खाली खेचण्याची ताकद अस्लेल्या नेतृत्त्वाचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभाव. पुण्यात कॉंग्रेस सोडलं तर इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वाचा अभाव आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांत तसेच प्रशासकीय अधिकार्यांत भविष्यवेध आणि नियोजन याचा प्रचंड अभाव आहे. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही.
पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक त्यांना मतदान करतील. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?
आयला शोधून शोधून दमलो पण त्या
आयला शोधून शोधून दमलो पण त्या गणूची पोष्ट काही सापडली नाही. सावंतबाई राँगनंबर लागला वाटतं तुमचा. >>> नवीन दिसताय माबोवर.
सावंतबाई ? अहो त्यांचा असा अपमान करु नका.
ह हा हा हा हा चंद्रगुप्ताचा
ह हा हा हा हा चंद्रगुप्ताचा चाणक्य झाल्यावर कसे कळणार????

अपमाण ? कोणाचा ?
कसा ?
अवांतर :
(तसेही ह्या पोष्ट जास्त वेळ रहाणार नाहीत इथे. अॅडमीनकडे कागाळ्या केल्या कि पोष्ट रफ्फूचक्कर किंवा आयडी गायब.)
येवढी घनघोर चर्चा होईल असं
येवढी घनघोर चर्चा होईल असं वाटलं नव्हतं. मी पुण्यातच फक्त रिक्षा वापरते, तसेच पुण्यातच बीआरटी बघीतली आहे. म्हणून पुण्यातील अनुभव लिहीलेत. पुणं हा इतका जिव्हाळ्याचा विषय असेल असं वाटलं नव्हतं. एकदम मान्य की मी उपस्थित केलेले प्रश्न किंवा सांगीतलेले अनुभव संपूर्ण भारतात सगळ्यांना येतात. मला पुण्यात आलेत म्हणून लिहीलेत. पुणं शैक्षणिक क्षेत्रात पुढे होतं......झाला की भूतकाळ. आता पुणे विद्यापीठाचा संपूर्ण बोर्या वाजलाय. तसा हळूहळू एकूणच भारतातील चांगल्या शिक्षण संस्थांचा बोर्याच वाजतोय.
आपल्या शहरात आधी जर काही गोष्टी चांगल्या असतील आणि गेल्या काही वर्षात सर्वच परिस्थीती कशी झपाट्याने बदलली आहे आणि सगळंच शहर कचर्यात जातंय हे पाहून त्रास होतो. तसा त्रास आपल्या भारताच्या बाबतीत सुद्धा गेल्या काही महिन्यात व्हायला सुरूवात झाली आहे. संपूर्ण भात शिजलाय की नाही हे आपण चार दोन शीतं पारखून करतो. तसंच पुण्याची ही अवस्था तर सर्व देशाची सुद्धा अवस्था काही वेगळी नसेल. असा आशय या लेखातून घेतला तरी चालेल (ज्यांना मी लिहीलेलं फक्त पुण्याशीच नाही तर सर्व भारताशी संबंधीत आहे असं वाटत असेल त्यांनी). टीआरपी वगैरे वाढवण्याची मला गरज वाटत नाही. लोक उगाचच चर्चेची दिशा भरकटवत असतात आणि मुख्य म्हणजे आधीपासून आपली प्रतिक्रीया देणार्यांबद्धलची जी काही आधीच्या चर्चांमधील मतं असतील तीच घेऊन चर्चा करतात त्यामुळे उगाचच अशा छोट्या लेखाला इतक्या प्रतिक्रीयांचा पाऊस पडतो. यात लेखकाचा (लेखिकेचा) काही दोष आहे असं मला वाटत नाही.
हाहाहा मेलो खपलो. शांतीसुधा
हाहाहा मेलो खपलो.
शांतीसुधा कि अशांतीयुध्दा..............??????????????
जादा charge ? अहो पुण्यात १
जादा charge ? अहो पुण्यात १ किमी ला फक्त २५ सेंट घेतात. अमेरीकेत १ किमीला २५ डौलर घेतात. मग कशाला जादा चार्ज करतील>>>>>अमेरिकेत किमी नाही, मैल आहे. max $ 3 dollar aahet.
गंमतच आहे, लोक अमेरिकेत
गंमतच आहे, लोक अमेरिकेत राहतात म्हणून भारतातील शहरांविषयी काहीच लिहायचं नाही? प्रत्येकवेळी भारतातील किंमतींची अमेरिकेतील डॉलरशी तुलना करून यांना काय दाखवुन द्यायचं असतं समजत नाही. काही प्रतिक्रीया इतक्या भरकटलेल्या आणि मूळ लेखाशी काहीही संबंध नसलेल्या असतात. आता तुम्हाला जसा पुण्यात १ किमीला किती रूपये पडतात याने फरक पडत नाही तसा आम्हाला अमेरिकेत १ किमी ला किती डॉलर पडतात याच्याशी काहीही देणंघेणं नाही. मूळ लेख काय आणि प्रतिक्रीया काय? गंमतच आहे.
हे युद्ध ज्यांना वादाची खुमखुमी आहे त्यांनी चालू केलं लेखिकेने नाही. याची कृपया प्रतिक्रीया देताना नोंद घ्यावी.
>>> मला अजुनही हे मीटरचा कान
>>> मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये.
मेकॅनिकल मीटरला किल्लीच्या घड्याळाप्रमाणे ठराविक वेळाने किल्ली द्यावी लागते. मीटर फास्ट करण्याचा आणि किल्ली देण्याचा काहिही संबंध नाही. मीटरच्या आतल्या चकत्या फिरवून मीटर फास्ट केलेला असतो.
>>> बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो.
पुणे सोडून इतर कोणत्या शहरांमध्ये तुम्हाला प्रामाणिक रिक्षावाले आढळले ते सांगा. पुण्यातले रिक्षावाले जितके अप्रामाणिक आहेत, तितकेच, किंबहुना जास्तच अप्रामाणिक रिक्षावाले इतर शहरांमध्ये आहेत.
>>> पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत.
भारतातल्या कोणत्या शहरात योग्य आणि प्रबळ राजकीय प्रतिनिधी आहेत?
>>> कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत.
कलमाडीला म्हणजेच कॉन्ग्रेसला एकगठ्ठा मतदान झोपडपट्टीतून होते. भारतातल्या सर्व शहरात हीच परिस्थिती आहे.
>>> शेपूची भाजी बरं का..>>>
>>> शेपूची भाजी बरं का..>>> नक्की ना? शापू, शेपो, असे वेगवेगळे सांगतात सगळे.
शापू, फुलवर, कोथमिर, कोबू या भाज्यांची मूळ नावे सांगा.
>>> टांगेवाल्यांबदल पु लंनी
>>> टांगेवाल्यांबदल पु लंनी लिहीलेलच आहे बहुतेक, आठवत नाही.
टांगेवाल्यांवर आचार्य अत्र्यांनी एक मोठा लेख लिहिलेला आहे.
>>> अमेरिकेत काय कराल>> Taxi असते की. कधीही जादा charge करत नाहीत. कायद्याचा बडगाच तसा आहे.
अहो पण अमेरिकेतले कॅबवाले टिच्चून टीप घेतल्याशिवाय सोडत नाहीत. पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी टीप मागितली तर लोक जोड्याने मारतील.
पुणं तिथं सगळंच
पुणं तिथं सगळंच उणं!!>>
नावावरून असं दिसतय की लेखिकेला पुण्यात काहीच चांगलं दिसलं नाही का? माणसाची एवढी निगेटिव्ह अॅटिट्यूड का असावी?
वाचलेलं एक quote देते आहे.
Judith M. Knowlton
I discovered I always have choices and sometimes it's only a choice of attitude.
काही झाले तरी स्वत:ला हुषार,
काही झाले तरी स्वत:ला हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी समजणारे असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!
अहो म्हणजे काय? ते तसे आहेत, नि त्यांना ते कळतं म्हणून ते तसे समजतात!
बाकीच्या लोकांना ते समजण्याची कुवत आहे का? म्हणून मग सांगावे लागते! शिवाय तो 'जाज्ज्वल अभिमान' आहे. बाकीच्यांना कसा माहित असावा?

पुणं शैक्षणिक क्षेत्रात पुढे
पुणं शैक्षणिक क्षेत्रात पुढे होतं......झाला की भूतकाळ. आता पुणे विद्यापीठाचा संपूर्ण बोर्या वाजलाय. तसा हळूहळू एकूणच भारतातील चांगल्या शिक्षण संस्थांचा बोर्याच वाजतोय.
अरारा! नका हो असे बोलू! एव्हढे काही वाईट नाहीये. तिथे शिकून इथे आलेले लोक बघितले आहेत, हुषार असतात. आता इथल्यासारखे वेळेवर येणे, पटापटा काम करणे जमत नाही सुरुवातीला, पण तेहि शिकतात!
(काय, अस्सल पुणेकरांसारखी स्तुति केली की नाही?)
बाकी मी भारतात गेलो असताना मला काही भारतीयांनी ऐकवले की तुमच्या सारख्या अमेरिकेतून येणार्या लोकांनी आमच्या रिक्षेवाल्यांना बिघडवले आहे! हा मुद्दा अजून कसा कुणाला सुचला नाही?
पार्ल्याला आमच्या घरून स्टेशनवरच्या दुकानात जायला रिक्षा केली की आठ रुपये पडत, दहाची नोट दिली की बिचार्या रिक्षेवाल्याकडे चिल्लर नसे (च्यायला, मला काय मामा समजतो का?) पण आता भारतात इतका कमी वेळ नि कामे फार. मग २रु. चे डॉ (खरे तर सेंट करायचे) नि त्याला म्हणायचे असू देत! की माझ्या बरोबरचा माझा भाचा चिडायचा! बारीक सारीक गोष्टी दहा रु., १५ रु. काय म्हणतील तो भाव देऊन पुढे जायचे! की लोक म्हणायचे असे नाही, इथे घासाघीस करावी लागते!!
थोडक्यात हा सगळा अमेरिकेतून आलेल्या भारतीयांचा दोष आहे. भारतात लोक वाईट कसे असतील??
>>माझी सगळी अक्कल मला
>>माझी सगळी अक्कल मला पुण्यातच मिळाली हो! लोकांना वैषम्य वाटू नये म्हणून मी ती दिसू देत नाही इथे.<<
झक्की
पिंपरी चिंचवडला येऊन बघा हो.
पिंपरी चिंचवडला येऊन बघा हो. २ किमी ला ३० रुपये जो मिटरप्रमाणे २१- २२ रुपये होते. शिवाय शेअर रिक्षात बसलात तेर इतक्याच अंतराला ७ रुपये घेतात पण मागच्या सीटवर चार माणसे आणि पुढे दोन एकुण ४२ रुपये कमवतात. यासाठी रिक्षावाले अर्धा- एक तास रांगेत उभे रहातात. आठ तासाच्या शिफ्ट मध्ये पेट्रोलचा खर्च सोडुन जेमतेम १०० -१५० रुपये मिळवणार्या या रिक्षावाल्यांना हे का कळत नाही की त्यांनी पी.एम्.पी.एम्.एल इतकेच भाडे घेतले किंवा कमी घेतले तर पी.एम्.पी.एम्.एल ची वाट पहाणारे ग्राहक तुम्हाला मिळतील.
एकदा एका खट आर्.टी.ओ. अॅफिसर ने मीटर टाकत नाही म्हणुन खटले भरले. पुढे महिनाभर सगले रिक्षावाले मीटर चालवत तर होते पण पैसे मात्र त्यांचा मनाप्रमाणे घेत होते.
शापू, फुलवर, कोथमिर, कोबू या
शापू, फुलवर, कोथमिर, कोबू या भाज्यांची मूळ नावे सांगा.
>>>> यादीत ते तेवढे टंबाटू अॅड करा.
ह.बा. | 1 July, 2011 - 17:35
ह.बा. | 1 July, 2011 - 17:35 नवीन
आम्ही म्हणजे परफेक्शनिस्ट असा फुकाचा आव इतर गावातले नागरिक आणत नाहीत.... >>> असं काही नाही. प्रत्येकाचा मुद्दा वेगळा आहे. कोल्हापुरात सगळेच पैलवान! सातार्यात सगळेच विचारवंत! कोकणात सगळेच शहाळे! इ. इ. इ.
सातार्यात सगळेच विचारवंत! >>> विशेष धन्यवाद हबा
काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!
>>>>>>>>>>>>>>
कैच्याकै
हे वाक्य ज्या पुणेकराने लिहिलेय तो महा विनोदी आहे हे मी मोकळ्यामनाने मान्य करतो 
>>> बरं या रीक्षावाल्यांमध्ये
>>> बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो.
पुणे सोडून इतर कोणत्या शहरांमध्ये तुम्हाला प्रामाणिक रिक्षावाले आढळले ते सांगा. पुण्यातले रिक्षावाले जितके अप्रामाणिक आहेत, तितकेच, किंबहुना जास्तच अप्रामाणिक रिक्षावाले इतर शहरांमध्ये आहेत.<< नाही हो बडोद्यात खरंच अजूनही लहान लेकराला घेऊन कुणी माऊली दिसली की रिक्षावाले आडवत नाहीत की जास्त पैसे मागत नाहीत. सुट्ट्या पैशाम्साठी भांडत नाहीत दुकाने दु. १२ ते सम्ध्या. ४ बंद ठेवत नाहीत आणि विशेष म्हणजे सगळे हसत मुखाने करतात इथले(पुण्यातले) मारवाडी सुद्धा कुत्र अंगावर आल्यासारखे ओरडून बोलतात ते वेगळेच. बाकी रिक्षावाल्यांच्या बाबतीत पुण्याचा आणि सोलापूरचा (मी सोलापूरीच आहे) कुणीच हात धरू शकणार नाही.
पुण्यात रिक्षा विरंगुळा म्हणून चालवतात हे पक्क लक्षात ठेवलं की सगळ्या अपेक्षा बाजूला ठेऊन आपण आपलं आयुष्य मस्त एंजॉय करायला शिकतो ही शिकवण पुण्यानेच दिली बरंका.
रिक्षाच कशाला आमच्या एरियात (औंध) डॉ ची अपॉईंटमेंटही फोनवर घेतली जात नाही..काय काय आणि किती लिहिणार अश्या गोष्टींबद्दल? म्हणून वाद घालण्या पेक्षा चांगल्या गोष्टींचा, तसेच उणीवांचा ही स्वीकार करावा आणि पुढे चालावं हा.का ना.का?
अमेरिकेत किमी नाही, मैल आहे.
अमेरिकेत किमी नाही, मैल आहे. >>>>
आता अमेरिकेत (जगाच्या उलट) अंतर मैलात मोजतात म्हणुन किमी नाहित असे कसे होइल ? किमी आहेतच पण मोजतात मैलात असे म्हणा.
max $ 3 dollar aahet. >>>>
म्हणजे १५० रुपये. तेच अंतर पुण्यात रिक्षावाले १० रुपयात नेतात. म्हणजे पंधरा पट कमी
) २०० रुपये ( ३.५ डौलर बरका त्रुप्तीबाइ) म्हणजे लिटरला ५० रुपये. म्हणजे पेट्रोलही स्वस्त. मग कशाला जादा चार्ज करतील ?
बरे पुण्यात ६५ रुपयांना एक लिटर. तिथे ४ लिटरना ( १ गैलन बरका त्रुप्तीबाइ - नाहितर रागवाल परत
करमणुकीच्या धाग्याबद्दल परत
करमणुकीच्या धाग्याबद्दल परत एकदा धन्यवाद !!
दर महिन्याला( का अठवड्याला ) पुण्यासंबंधी एक तरी चर्चा वाचावयास मिळेल अशी आशा व्यक्त करतो.
( काही न चर्चीले गेलेले मुद्दे इच्छुकांसाठी - पुण्यातील मुठा नदी (?) कालवा, गडाच्या पायथ्याशी होणार्या रेव्ह पार्ट्या, स्वारगेट बसस्थानक, पुण्यातील वाहतूक शिस्त (?) )
अमोल केळकर
अय्या इतके कमी प्रतिसाद
अय्या
इतके कमी प्रतिसाद ?
भोंगे लावून रिक्षा फिरल्या नाही कि, बायांचं गटग झालं नाही ? काय कमी पडलं बाई !!
एक आहे, सर्वच प्राणीमात्रात
एक आहे, सर्वच प्राणीमात्रात वाचनाची आवड असलेलं शहर पुणेच असावं ..
पुण्यात फक्त सकाळ वाचतात. हे
पुण्यात फक्त सकाळ वाचतात. हे माकड अमेरीकेतील दिसते (थोडे गोरेहि आहे)
होतकरु, आता कोणीतरी पुणेकर
होतकरु,
आता कोणीतरी पुणेकर म्हणेल.... तुमचं आपलं काहीतरीच हा प्राणी पण "अस्सल पुणेकर" नाही, परप्रांतिय ऊपरा आहे तो
पुण्यात फक्त सकाळ वाचतात. हे
पुण्यात फक्त सकाळ वाचतात. हे माकड अमेरीकेतील दिसते
>>>>>>>>
अमेरिकास्थित पुणेकर असावं..... सुट्टीत पुणं किती बकाल होत चाललय ते बघायला आलय बहुतेक
आवरा! (हे प्रतिसादकांना
आवरा!
(हे प्रतिसादकांना आहे, लेखिकेला नाही.)
आवरूनच आलोय इथं
आवरूनच आलोय इथं
अमेरिकास्थित पुणेकर
अमेरिकास्थित पुणेकर असावं..... सुट्टीत पुणं किती बकाल होत चाललय ते बघायला आलय बहुतेक >>>
किंवा अमेरिका रीटर्न पुणेकर. उद्याच्या सकाळमध्ये पैलतीरमध्ये पुणे कसे बकाल झाले आहे यावर एक (म्हणजे लाखो लेखानंतर अजुन एक) लेख नक्कि येणार.
आवरूनच आलोय इथं >>>>>>>>>
आवरूनच आलोय इथं
>>>>>>>>>
:उसासा मोड ऑन: पूर्वीचे दिवस
:उसासा मोड ऑन:
पूर्वीचे दिवस राहीले नाहीत
:उमो ऑफः
:ज्येष्ठ पुणेकर मोड ऑनः त्या
:ज्येष्ठ पुणेकर मोड ऑनः
त्या ओबामाला म्हणावं कराचीत पण नेव्ही सील्स पाठवून दाऊदला पकडा. आपोआप सगळं सिद्ध होतंय कि नाही बघा.. काय बर्वे ! द्या टाळी
"ज्येपुमो ऑफः
Pages