पुणं तिथं सगळंच उणं!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 08:49

मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात. एकतर पहिल्यांदा मीटरप्रमाणे जायला कोणी तयार नसतं. डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात. मीटरप्रमाणे (अगदी भाडेवाढ गृहीत धरली तरी) ३६ रूपयाच्या वर भाडं होत नाही. मग एखादा मीटरप्रमाणे जायला तयार झालाच तर माझ्या बरोबर अश्वमित्रला (गोर्‍या फॉरीनरला) बघुन आम्ही रीक्षात बसतानाच मीटरचा कान चार-पाच वेळा पिळून मीटर फास्ट करून ठेवतात. मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये. मी तर सरळ एकदा रीक्षावाल्यांना म्हणाले की आहो तुमचा मीटर फास्ट आहे. रीक्षाच्या भाड्यांमध्ये जरी वाध होत असली तरी आमच्या घरापासूनचं स्टेशनचं अंतर गेली अनेक वर्षे बदलेलं नाहीये. त्यामुळे मीटर मध्ये येणारे किलोमीटर रीडींग तर सारखंच असायला हवं. तरी त्या रीक्षावाल्याने मान्य केलं नाही. मग एकदा मी एका रीक्षावाल्याला पोलीस चौकी जवळ आल्यावर म्हंटलं, "चला आपण रीक्षा पोलीस चौकीत नेऊयात. तुमच्या रीक्षाचा मीटर फास्ट आहे." झालं रीक्षावाला एकदम नरमाईत, "कशाला ताई? तुमच्या हिशोबाने किती होतात ते सांगा. मग माझ्या मीटरप्रमाणे कीती होतात ते बघु आणि मग ठरवू किती पैसे घ्यायचे ते." आता इतरांना प्रश्न पडला असेल की जर रीक्षाच्या अशा भानगडी आहेत हे माहीती आहे तर रीक्षाने जायचं कशाला? पण पुण्यात पीएमपीच्या बसेसची सेवा भयंकर या कॅटेगरीत मोडणारी आहे. बस अतिशय जुन्या, अस्वच्छ, प्रवाशांना बसायलाच जेमतेम जागा तर त्यात परगावहून आलेल्या लोकांना सामान ठेवायला स्वतंत्र अशी जागेची सोय नाही, बसची असलेली कमी संख्या, कमी वारंवारीता त्यामुळे प्रत्येक रूटवर प्रचंड गर्दी. यासगळ्यातच लांबचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना कधी एकदा पटकन घरी पोहोचतोय असं होतं म्हणून सद्य स्थितीत बस घेणं शक्यच नाहीये.

पुण्यात एकूणच शासनकर्ते, पीएमपीएम वाले आणि रीक्षावाले यांची इतकी छान भट्टी जमली आहे. शासनाने दर पंधरा दिवसांनी पेट्रोल दरात आडीच ते तीन रूपयांनी वाढ करायची. त्यामुळे सगळेच भाव गगनाला भिडतात. कारण पेट्रोल-डिझेल शिवाय साधा भाजीपाला सुद्धा वाहून आणला जात नाही. मग याच महागाईच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ झाली की पुण्यातील रीक्षावाले बेसीक फेअर वाढवण्याची मागणी करतात. बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो. भाडेवाढ करतानाच इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे पण इलेक्ट्रॉनीक मीटर या लोकांना बसवायचा नसतो. पुणे स्टेशनला एशीयाड बस स्टॅंड्च्या बाहेर प्रीपेड रीक्षाचा एकच काऊंटर आहे आणि बहुतांशवेळा तो बंदच असतो. ९०% रीक्षावाले भाडे दर्शवणारं कार्ड दाखवत नाहीत. मनाला येईल ती रक्कम झालेलं भाडं म्हणून सांगतात. मग आपण कार्ड बघायला मागीतलं की ४-५ रूपयाचा फरक दिसतोच. एकदा तर पुण्यात रीक्षाचं बेसीक भाडं वाढून पुन्हा कमी झालं होतं. तर हे रीक्षावाले स्वत:च्या सोयीप्रमाणे आधीचं भाडेवाढ असलेलं कार्ड दाखवून पैसे घ्यायचे. नेहमी पुण्यात रीक्षाने प्रवास करणार्‍याला हा फरक समजू शकतो पण दर काही महिन्यांनी येणार्‍याला हा फरक समजत नाही. पुण्यातील ९०% रीक्षाचालक प्रचंड उद्धट आहेत. खरंतर रीक्षा चालवण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर आणलीत की कितीही अंतरा पर्यंतचं भाडं असू देत (जवळ किंवा लांब) रीक्षावाल्यांनी प्रवाशाला नाही म्हणायचं नाही असा कायदाच आहे. पुण्यातील रीक्षावाले हमखास हा नियम धाब्यावर बसवतात. संपूर्ण देशात पुण्यातील पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त आहेत.

पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असण्यालागचं कारणही हेच आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे अशांना प्रत्येक ठीकाणी चारचाकी घेऊन जाणं शक्य नसतं. पुण्यातील रस्ते हे पादचार्‍यांना आजीबात अनुकुल नाहीत. पदपथांवर एकतर पथारी पसरून विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं असतं नाहीतर दुचाकीस्वार दुचाकी चालवताना आढळतात. पुण्यात म्हणे दोन वर्षांपूर्वी कुठलेतरी गेम्स झाले त्यावेळी प्रचंड खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. बीआरटी प्रकरण तर औरच आहे. बीआरटी असलेल्या कोणत्याही रस्त्यावर आपण गेलो तर प्रचंड विनोदी चित्र पहायला मिळतं. सायकल ट्रॅक मध्ये चारचाकी गाड्यांनी पार्कींग केलेलं असतं. सायकल्स्वार स्वत:ची सायकल आणि जीव दोन्ही सांभाळत दुचाकी आणि चारचाकी यांच्या ताफ्यातून वाट काढत असतात. दुचाकीस्वार पदपथांवरून दुचाकी चालवत असतात. बीआरटी मार्गावरून केवळ पीएमपी आणि बीआरटीच्याच बस न धावता इतर वाहने सुद्धा धावत असतात. यासगळ्या वाहत्या रस्त्यांवर रस्ता क्रॉसकरणे म्हणजे एक मोठं दिव्यच आहे.

म्हणजे एकूणच पुण्याच्या सर्व पायाभूत सुविधांचा शक्यतेवढा बट्याबोळ करून ठेवून "पुणं तिथं काय उणं" च्या ऐवजी "पुणं तिथं सगळंच उणं" अशी उक्ती प्रचलीत करण्याचा प्रघात चालू झाला आहे.

पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत. अयोग्य याअर्थी की ते पुण्याच्या विकासाचा, पुण्यातील नागरीकांचा विचार करत नाहीत आणि कमकुवत याअर्थी की भ्रष्ट राजकारण्यांना खाली खेचण्याची ताकद अस्लेल्या नेतृत्त्वाचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभाव. पुण्यात कॉंग्रेस सोडलं तर इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वाचा अभाव आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांत तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांत भविष्यवेध आणि नियोजन याचा प्रचंड अभाव आहे. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्‍याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही.

पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक त्यांना मतदान करतील. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चौकट, रिक्षावाल्यांच्या बाबतीत मात्र मी पुणेकर रिक्षावाल्यांच्या बाजूने आहे Happy अख्खा गाव फिरून झाला तरी बिल कमीच येतं..... फार फार आनंद होतो..... नाहीतर इथे मुंबईत गोरेगाव - बांद्रे १८० रुपये घेतात. तिकडे १८० रुपयात माणूस कोथरूड ते हडपसर जातो. (कदाचित कमीच पैसे पडतील अजून.)

अहो बेन्गलोरात देखील अशीच परिस्थिती आहे. पुण्यात निदान आधी तरी ठरवून मागतील आणि तेवढेच घेतील. इकडे उतरताना आधी ठरविलेल्या रकमेपेक्षा जास्त मागतात आणि आक्रमकरित्या भांडतात. तसेच परराज्यातील उतारू असतील तर हिंदी/इंग्रजी येत नाही असे दाखवतात.
हे फक्त रिक्षावाल्यांच्याच बाबत नाही तर पुर्वी जेव्हा टांगे होते तेव्हा देखील हीच परिस्थिती होती.
राम नगरकर यांनी या बद्दलचा किस्सा सांगितला आहे. त्यांना पुणे स्टेशनला उतरून मंगळवार (की रास्ता) पेठेत जायचे होते. रात्रीची वेळ होती. टांगेवाल्याने पार डेक्कन, इ. फिरवून आणून सोडले आणि एक रूपया घेतला.
दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर यांना रेल्वेची शिट्टी ऐकू आली. (स्टेशन पासुन खुप जवळ असल्याने) Happy

दिले समजा रिक्षावाल्याला ४-५ रूपये जास्त तर काय येवढं आकाश कोसळणार आहे?
वैशाली मधल्या खाद्यपदार्थांची किंमत तो मालक दर वर्षी वाढवतो. तरी आपण पुण्यात दुसरीकडे कुठे जेवायलाच मिळत नसल्याप्रमाणे नियमित वैशालीत गर्दी करतो. आणि विनातक्रार बिल भरतो.
मॉलमधे मिळणारे ब्रॅण्डेड कपडे महाग आहेत हे माहिती असूनही आपण लक्ष्मी रोड सोडून मॉलची वाट धरतो.
मग रिक्षावाल्यांनीच असं काय पाप केलयं?

दिले समजा रिक्षावाल्याला ४-५ रूपये जास्त तर काय येवढं आकाश कोसळणार आहे?
वैशाली मधल्या खाद्यपदार्थांची किंमत तो मालक दर वर्षी वाढवतो. तरी आपण पुण्यात दुसरीकडे कुठे जेवायलाच मिळत नसल्याप्रमाणे नियमित वैशालीत गर्दी करतो. आणि विनातक्रार बिल भरतो.
मॉलमधे मिळणारे ब्रॅण्डेड कपडे महाग आहेत हे माहिती असूनही आपण लक्ष्मी रोड सोडून मॉलची वाट धरतो.
मग रिक्षावाल्यांनीच असं काय पाप केलयं?
>>>>>>>>>>>>

हे तर कैच्याकै च......

ब्रँडेड कपडे घेता त्यात कधी तुम्ही छाप्पील किंमतीपेक्षा जास्त पैसे देता का??? की समोरचा माणूस मागतो?? वैशालीवाला काय मेनू कार्डपेक्षा जास्त पैसे घेतो का तुमच्याकडून???

रिक्षावाल्यानेही पैसे घ्यावेत की... पण मग ते रेट कार्ड ठरवताना त्याप्रमाणे रेट छापावे आणि घ्यावे. जिथे ४० रुपये झाले तिथे १०० सांगितल्यावर का आणि कोण निमूटपणे देणार???

अत्यंत चुकीची उदाहरणं दिलीत. Happy

सोहा - वैशाली आणि मॉल ह्या दोन्ही ठिकणी जाण न जाण आपल्या हातात आहे. तिथल्या किंमती जास्त आहेत म्हणून लोक जायचे बंद होतील कधीतरी. पण रिक्षावाले आपल्या अडचणीचा फायदा घेतात म्हणून लेखिकेला त्रास होतोय. बाहेरगावाहून आलेल्या कुठेही जायला लोकांना रिक्षा हे एकच साधन असतं. आणि त्या मजबूरीचा रिक्षावाले पुरेपुर फायदा घेतात.
ह्यावर भुंगाला अनुमोदन.

फारच फालतु लेख आहे. पुण्यातील लोकांवर जरुर टिका करावी पण ज्या गोष्टी या लेखात लिहिल्या आहेत त्यातील बर्याच सर्व शहरांनाही लागु आहे.
उदा.
१. रीक्षावाले
२. बीआरटी आणी वहातुक
हे प्रश्न सर्व शहरात आहेत

शेवटचा परिछेद तर फारच विनोदी आहे.
१. अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी>>> - हे काय फक्त पुण्यात आहेत का ?
२ इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत >>>- शरद पवार, राजा, अशिक चव्हाण, लालु, कनिमोळी आणी बाकि हजारो खासदार, आमदार वगैरे काय पुण्याने निवडुन दिले का ?
३. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे >>> - अहो साहेब हे फक्त पुण्यात नाहि हो.
४. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्‍याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही.>>> -- हे फक्त पुण्यात आहे ? एकावे ते नवीनच साहेब

सर्वात मोठा विनोद -
पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक त्यांना मतदान करतील>>>> पुण्यात कशाला, सर्व देशातच हा प्रश्न आहे,

असो, बाकी तुम्हि मंगळावरुन आलात का ? स्वागत आहे तुमचे.

झक्कींना टांग्याचा काही अनुभव असेल तर वाचायला आवडेल.
दुर्दैवाने नाही. मी पुण्यात आलो तेंव्हा टांग्यात बसायला गेलो नाही. रिक्षातहि नाही, बसमधे तर फारच क्वचित्. लवकरात लवकर सायकल शिकलो, एक आण्याला एक तास या दराने सायकल भाड्याने घेतली की मग हवे तिथे भटकून यायचे.
टांगेवाल्यांबदल पु लंनी लिहीलेलच आहे बहुतेक, आठवत नाही.
टांगे कल्याणला असताना होते. पण क्वचितच बसायची वेळ येई. जाणार कुठे कल्याणमधे? अधून मधून स्तेशनवर जाण्याची चैन करायला टांग्यात बसायचे. घरापासून दोन आण्यात स्टेशन, येताना पायी!

नागपूरला सायकल रिक्षात बसलो होतो बरेचदा, पण तेंव्हा रिक्षाच्या भाड्यापेक्षा इतर अनेSSक विषय विचार करण्याजोग्या होत्या, आय मीन, होते.

पुण्यात पेट्रोल खरंच इतर ठिकाणापेक्षा महाग आहे? नक्की?
बाकी दरवाढ, भिकार राज्यकर्ते यांच्याबद्दल पुण्याला आणि पुणेकरांना वेठीला का बुवा धरलंय?

पुण्यातले रिक्षावाले जगात भिक्कार हे कधीच मान्य केलंय. पण पुणेकरांनी काय केलंय त्यात? अर्ध्याहून अधिक आपापल्या दुचाक्यांवर. गरज पडते कधीतरीच. तेव्हा निमूट जास्तीचे पैसे तरी देतात किंवा वाद घालून योग्य ते पैसे देतात.

बाकी कधी नव्हे ते गणूच्या पोस्टला अनुमोदन द्यायची परिस्थिती आलीये.

जसं मॉलमधे जाताना आपल्याला माहीत असतं की इथे थोडेसे महाग कपडे मिळणार आहेत. आपण मनाची तयारी करून जातो. त्याप्रमाणे रिक्षात बसताना मनाची तयारी करून बसावं की मीटरपेक्षा १०-१२ रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. म्हणजे फारसा मानसिक त्रास होत नाही. आणि रिक्षावाल्यांशी भांडायचे प्रसंगही कमी होतात.
आता मीटरच्या भाड्यापेक्षा दुप्पट पैसे मागायला लागला तर वाद जरूर घालावा. पण इतकी फसवणूक करणारे रिक्षावाले मलातरी क्वचितच भेटले. त्यामूळे मी पुण्यात असताना आरामात रिक्षाप्रवास करायचे.
इथे सतत driving करून मला इतका वैताग येतो की रिक्षासारखी छान सोय दुसरी नाही असंचं मला वाटतं.

असो, बाकी तुम्हि मंगळावरुन आलात का ? स्वागत आहे तुमचे...........

नाही हो मंगळ तरी पुण्यापेक्षा खुप बरा आहे असे ऐकले आहे Happy

दिवे घ्या Happy

रिकामटेकड्या लोकांचा एकमेव छंद... कुठल्याही गोष्टीवरुन पुण्याला नावे ठेवा आणी स्वताचा टी आर पी वाढवा.. असा बाफ सुरु करावा का?? Happy

रिक्षावाले सगळीकडे सारखे असतात.पण ही पुणेकर मन्डळी मात्र अजब आहेत.
काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!>>>अहो जरा डोळे उघडा.
ह्या बाबतीत हे पुणेकर अगदी अमेरिकन आहेत. आम्ही सोडुन बाकी सगळे तुच्छ, हे मात्र ग्रेट. हे लोक तर पुण्याला New York शी सुध्दा compare करतात. दुस-याला बोलु सुध्दा देत नाहीत आणि आपला टेम्भा मिरवतात. भारत ह्यान्ची मक्तेदरी असल्यासारखी विधाने करतात.

अमेरिकेत काय कराल>> Taxi असते की. कधीही जादा charge करत नाहीत. कायद्याचा बडगाच तसा आहे.

कै च्या कै लेख........म्हणजे मुद्दे पटत आहेत असे वाटेपर्यंत conclusion वाचून निराशा झाली लेखात.......
<<डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात.>> तुम्ही देता कशाला.......थोडा वाद घालायची तयारी ठेवा. रिक्षावाल्यांची बेशिस्त वर्तणूक हा पुणेकरांचा ट्रेडमार्क कधी झाला???? उद्या पुण्यात भाजीवाले हुज्जत घातल्याशिवाय भाजी स्वस्त देत नाहीत असे म्हणाल. हे सगळे जागतिक नियम झाले. यात पुण्याला दोष कशाला????
<<मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?>>
लेख "पुणे तिथे #### उणे" असा आहे ना??? मग नरेंद्र मोदी, पंतप्रधान हे मधेच कुठून आले? पुण्यातल्या स्थानिक समस्यांबद्दल बोलताना राष्ट्रीय नेतृत्वाचे विषय कसे आले हे समजले नाही......
"सगळेच उणे" असे म्हणता तेव्हा पुणे फेस्टिवल, सवाई गंधर्व महोत्सव, पुण्याची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती इ. इ. कुठे विसरलात........
अहो, रिक्षात पैशाची बॅग सापडल्यावर परत करणारे रिक्षावालेसुद्धा आहेत पुण्यात........विरळ असतील पण तुमच्या ९० रु. मागणार्‍या रिक्षावल्यांइतकेच विरळ.....
ह. घ्या. हे वे.सां.न.ल
सानी,
आता यात पुण्याबद्दल अभिमान आहे पण इतर कोणत्याही शहराबद्दल तिरस्कार नाही बरं का....... Happy

खुर्ची टाकून ठेवतेय... अजुन राखीव पाहुणे यायचे बाकी आहेत का? Wink

बाकी पुण्याचे रीक्षावाले काय घेवून बसता...हा काय चघळण्यासारखा विषय नाही.

- आजी (पुणेकर) Proud

लोकहो, हा लेख मनाला एवढा का लावुन घेताय? लेखिकाबाईही पुण्याच्याच आहेत असे पहिल्या काही वाक्यावरुन दिसतेय. अहो अमेरिकेत एक कृष्ण्वर्णीय दुसर्‍याला "माय निXX" नावाने संबोधतो तेव्हा त्या दुसर्‍याला काही वाटत नाही. तसेच काहीसे हे नाही का?
मला तरी हा लेख पुण्यावरील प्रेम आणि सद्य परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यापोटी लिहिलेला वाटतो.

बाकी पुण्याचे रीक्षावाले काय घेवून बसता...हा काय चघळण्यासारखा विषय नाही.>> अनुमोदन!

पुण्यात काय गंआविप्र विषयांना धाड भरल्ये का? काय पण चर्चा

आपण फॉर अ चेंज अंबाला वि. अवंतीपूर अशी चर्चा करू Proud

काही झाले हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!>>>

झक्की, वरच वाक्य लिहीताना काही शब्द राहुन गेले का?
ते अस हव होत बहुतेक,

काही झाले तरी स्वत:ला हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी समजणारे असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत!

Happy

काही झाले तरी स्वत:ला हुषार, कर्तुत्ववान, सुसंस्कृत, कलागुणसंपन्न, विनोदी समजणारे असे लोक पुण्यातच जास्त प्रमाणात पहायला मिळतील. तेव्हढे दुसरीकडे नाहीत! >>>> बरे झाले तुम्हाला हे समजले Biggrin

त्रुप्ती अहो दोन दोनदा काय लिहिता ? तुम्हि पुणेकरांना नावे ठेवत आहात मात्र अगदी पुणेकरासारख्या दोन दोन वेळा सांगता आहात.

अमेरिकेत काय कराल>> Taxi असते की. कधीही जादा charge करत नाहीत. कायद्याचा बडगाच तसा आहे. >>>

जादा charge ? अहो पुण्यात १ किमी ला फक्त २५ सेंट घेतात. अमेरीकेत १ किमीला २५ डौलर घेतात. मग कशाला जादा चार्ज करतील

आयला शोधून शोधून दमलो पण त्या गणूची पोष्ट काही सापडली नाही. सावंतबाई राँगनंबर लागला वाटतं तुमचा.

बाकी पुण्याच्या रिक्षावाल्याएवढा भिकार विषय अख्या पृथ्वीतलावर नसेल त्यामुळे माझा पास.......

अहो पुण्यात १ किमी ला फक्त २५ सेंट घेतात. अमेरीकेत १ किमीला २५ डौलर घेतात. मग कशाला जादा चार्ज करतील >>

शिंच्या अरें किती तें फेंकायचें म्हणतो मी, तुझा नाना अमेरिकेत राहतो की काय रें?

गणोबा अहो किती तो विपर्यास? थोडे अदबीने ने फेका, हा बाफ काय डेक्कन किंवा सपेत वर उघडलेला नाही, शिवाय पैके भारतीय मिळतात. (अरे हो चुकलेच पुणे म्हणजे अमेरिकाच जणू नाही का? मग तिथे डॉलर मियाँ असतीलच, रूपयाला कोण विचारणार. Proud

येथील पुणेकरांना उद्योग नाहीत का? आधी पुण्याला शिव्या देऊ नका बाफ पुणेकर काढतो, तिथे खूप टिपी, मग पुढे पुण्याला शिव्या देणारा बाफ खुद्द पुणेकर काढतो, तिथेही पुणे विरूद्ध नॉन पुणे. कमाल आहे!

Pages