रहस्यमय कथांची पुस्तके

Submitted by माणूस on 6 November, 2008 - 15:22

Johnny Gaddar पाहील्यापासुन चांगली रहस्यमय कथांची पुस्तके शोधत आहे, तुम्हाला माहीत असतील तर ईथे यादी लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Eleventh Commandment, Thou Shalt Not Get Caught. हे पुस्तक कोणी वाचले आहे का? मला कोणीतरी सांगीतले चांगले पुस्तक आहे.

माणसा, वाचू आनंदे मधे टाक हा धागा.

माणसा , मागे मी इथे लिहिले होते, Harlan Coben या लेखकाचे Gone for Good, No second chance.
जबरी वाटली ही दोन्ही मला तरी.

माणसा,
तेवढी टायपिंगची चुक दुरुस्त कर, ते कथांची हवय, चुकुन काथांची झालय.

अरे टण्या Atlas Shrugged ? माणसा डॅन ब्राऊन ची पुस्तके वाच. मजा येईल.

हा Johnny Gaddar कोण आहे? स्वतःला उद्देशून तसे लिहीलेस की पिक्चरच्या नावामूळे. - आता तिथले ऐडीट झाले. Happy

आणि इथे तूला यादीच मिळेल.

Jeffrey Archer ची वाचणार असलास तर Shall we tell the president पण वाच.

अरे वा वा, लगेच बरीच पुस्तके आली, amazon ह्यातली बरीच एक एक सेंट ला मिळतातयत, (टपालाचा खर्च वेगळा) बघतो दोन चार मागवुन.

digital fortress by Dan brown हे बरे आहे एकदा वाचायला

Sidney Sheldon चे "Morning, Noon, And Night", "The Sky is Falling", "Tell me your Dreams" , "If Tommorrow Comes", "The Best Laid Plans" हे सगळेच छान आहेत. "Naked Face" पण छान आहे, पण ते अजुन मी वाचल नाही.

>>"Naked Face" पण छान आहे, पण ते अजुन मी वाचल नाही.
मग तुम्हाला कसं कळलं की ते छान आहे? Light 1

पुस्तकाचे reviews आणि gist वाचुन. ते माझ्या reading list मधे आहे. आणि मला Sidney Sheldon च्या लेखणाची कल्पणा आहे.

Sidney Sheldon ही माला या टोपण नावाने लेखण करायची का Wink

मग ते लेखन अन कल्पना पण बदला ना ?
माणसा ही सगळी पुस्तकं तुला स्थानिक वाचनालयात मिळतील - ऑडिओ फॉर्मट मधे पण मिळतील. उगाच अंमॅझॉन वर पैसे घालवू नकोस.

अरे टण्या Atlas Shrugged ?
>>>
केदार, अरे पुढची स्मायली नाही का पाहिलीस?

जॉन ग्रिशॅमचं 'पार्टनर' माझं आवडतं पुस्तक आहे. रहस्यकथा अशी नाही, पण शेवटचा टर्न जबरी आहे.

हा लेखक संथ लिहितो, कित्येकांना कंटाळा येऊ शकतो (तसं झालं आणि पुस्तक अर्धवट सोडलं, तर त्याबद्दल 'त्या दुसर्‍या' बीबी वर लिहा :)), पण थोडी चिकाटी दाखवली, तर शेवट भारी असतात Happy
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..

हा लेखक संथ लिहितो, >> हा !!! पार्टनर लय फास्ट आहे ग, हल्लीची थेट "त्या" BB वर लिहायच्या लायकीचीच आहेत.

कुणी नोरा रॉबर्ट ची " इन डेथ" सिरिज वाचली आहे का? छान आहे. रोमंटिक सस्पेंस आहे.

मधे मधे इंग्रजी कसं टाकायचं?

Doomsday Conspiracy पण मस्त आहे Happy

मधे मधे इंग्रजी कसं टाकायचं?>>>>>
ctrl+\ ने भाषा बदलता येते Happy

********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

जॉनी गद्दार ज्याला सम्रपित केला आहे त्या जेम्स हॅडलि चेसचे कोणि फॅन नाहित का?
चेस म्हणजे उत्तम टी.पी. इंग्रजितला बाबा कदम म्हणा ना. उत्क्रुष्ट व्यक्तिचित्रण आणि खाण्यापीण्याचि वर्णनं. सर्वात महत्वाचे म्हणजे it is not detective story or 'hudunit' .we know it from the start . आणि शेवटी नेहमी चांगल्याचा वाईटावर विजय. 'ए चेंज ऑफ सीन' आणी 'व्हुडू इन ए पॅक' हे दोन माझ्या मते त्याचे मास्टरपीस आहेत.
चेसच्या जुन्या प्रकाशकाने त्याच्या पुस्तकावर उगीच बायकांचे फोटो टाकुन त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवला. मुळात ही पुस्तकं अगदी शोभणार नाहित इतकी सोज्वळ आहेत.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

thanx rajya. Nora Roberts ची In Death series खरंच छान आहे. पोलिस लेफ्टनंट eve dallas, तिचा नवरा roarke, officer peabody, detective mcnab, captain feeney, अशी टीम प्रतयेक पुस्तकात आहे. मस्त आहेत सगळी पुस्तकं.

जॉन ग्रिशॅमचं 'पार्टनर' माझं आवडतं पुस्तक आहे. >> मस्तच पुस्तक आहे. मलाही आवडलं.

हा लेखक संथ लिहितो, कित्येकांना कंटाळा येऊ शकतो पण थोडी चिकाटी दाखवली, तर शेवट भारी असतात>>

पीएसजी अनुमोदन. तुम्ही लास्ट ज्युरर वाचलय का? ते असच जरा स्लो आहे पण एंड झक्कास. त्यामानाने तेस्तामेंट फास्ट असुनही एंड अपेक्षित असाच आहे.
------

त्याचंच 'द रेनमेकर' आणि 'द क्लायंट' पण सुंदर आहेत....
_______
सपनोंसे भरे नैना... तो नींद है ना चैना !

जर तुम्हाला detective स्टोरिज आवडत असतिल तर,

James Patterson यान्ची Alex Cross ही जवळ्-जवळ १०-१२ पुस्तकान्ची सिरिज आहे... Biggrin
त्यामधे, Along Came A Spider आणि, Jack n Jill पुस्तके भारि आहेत एकदम...!!

Alex Cross character हे नारायण धारप यान्च्या 'काळा पहाड', याच्याशी मिळते-जुळते आहे..
एन्जोय... Wink

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

मायकेल कर्स्टन चे 'डिस्क्लोजर' वाच. खूप छान आहे.
(अर्थात, अक्कीचा 'एतराज' बघितला असेल तर थोडे साम्य जाणवेल.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कितीक हळवे ,कितीक सुंदर,
किती शहाणे, अपुले अंतर.....

नारायण धारप यान्च्या 'काळा पहाड' >>> काळा पहाड हे पात्र धारपांचे आहे?

Alex Cross character हे नारायण धारप यान्च्या 'काळा पहाड', याच्याशी मिळते-जुळते आहे..>>> काळा पहाड नारायण धारपांचं नाहीये. मला वाटतं बाबूराव अर्नाळकरांचं आहे. चू.भू.दे.घे...

बाबूराव अर्नाळकरांचा "झुंजार" ना ?

Pages