रहस्यमय कथांची पुस्तके

Submitted by माणूस on 6 November, 2008 - 15:22

Johnny Gaddar पाहील्यापासुन चांगली रहस्यमय कथांची पुस्तके शोधत आहे, तुम्हाला माहीत असतील तर ईथे यादी लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुरुस्ती बद्द्ल धन्यवाद अन्जली२८, काळा पहाड अर्नाळकरांचं आहे,,
आणि झुन्जार सुद्धा त्यान्चेच आहे...

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

केदार, द वुल्फ वाचलं पण त्यातला क्रॉस एवढा जम्या नही.सुरुवात इतकी वेगवाग आणि जबरदस्त होते पण मधेच हिरोच्या मैत्रिणींच्या गोष्टी जास्त फुटेज खातात. शेवट्पण ओकेच.
तुम्ही उल्लेखलेली पुस्तकं मिळतायत का बघायला हवं.

झुंजार, विजया, त्यांच्या नोकराचं आणि मेव्हण्याचं नाव आठवतय का? मला जाम आवडायची सॉरी आवडतात अर्नाळकरांची पुस्तकं.

agatha christie तुमच्या स्थानिक ग्रंथालयात बरीच पुस्तके उपलब्ध असतील. फारच सुंदर.

srk, हिरोच्या मैत्रिणींच्या गोष्टी जास्त फुटेज खातात>>>>
हे मात्र अगदी बरोबर.... ;)...माझ्या मते, या series मधली, पहिली-पहिली, पुस्तके चांगली आहेत, पण नंतर मात्र कंटाळ्वणे होत जाते...Along Came A Spider हे बहुतेक पहिले आहे पुस्तक्..मिळाल्यास जरुर वाचा..

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

Robert Ludlum ची जवळजवळ सगळीच पुस्तकं रहस्यमय असतात. 'The Janson Directive' माझं त्यातल्या त्यात आवडतं जे रॉबर्ट गेल्यानंतर पब्लिश झालं होतं. Bourne Seires चे सिनेमे बघितले नसतील तर पुस्तकं वाचण्यात खूप मजा येईल.
'The Road to Gandolfo' पण त्याचंच होतं त्याने ते दुसर्‍या कुठल्यातरी नावाने लिहिलं होतं बहूतेक.
-----------------------
2b || !(2b)

झुंजारचा मदतनिस बहुदा नेताजी होता.
अर्नाळ्करांनी हजारावर पुस्तके लिहिली आहेत. मी ~२०० वाचली आहेत.
धनंजय - छोटु, भिमसेन ई. इतरही त्यांचे हिरो होते.
बर्यापैकी ढापलेले (उदा. Saint) पण त्याप्रकाराकरता चांगले लेखन.

त्यांनी भाषांतर केलेल्या (म्हणजे जाहीरपणे) अशा फु-मांचु, आणि चार न्यायाधिश या कथामालीका रहस्यमय आणि उत्तम आहेत. थोड्या वेगळ्या प्रकारची पण उत्कृष्ठ मालिका म्हणजे अफ्रिकास्थित कथा (सँडर्स).

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

जॉन ग्रिशमचं 'रन अवे ज्युरी' वाच.. मस्त आहे. रहस्यकथा नाही पण ट्विस्टस मस्त आहेत.
विशेषता: ऑडियो बुक मिळाले तर जरूर बघ.

धारपांचं लेखन भय, उत्कंठावर्धक तसेच भूतकथा या प्रकारात मोडतं. त्यामुळे त्यात रहस्य असणार,हे ओघानेच आलं.
त्यांच्या काही उत्कंठावर्धक भूत तसेच रहस्य कथांची यादि देत आहे.
१. स्वाहा
२. चेटकिण
३. अनोळखी दिशा खंड १,२ आणि ३
४. माटि कहे कुम्हार को
५. सीमेपलीकडून
सर्व पुस्तकं दिलीप प्रकाशन, मुम्बई यांनी प्रकशित केलेली आहेत.

आणि जर आल्फ्रेड हिचकॉक च्या रहस्य कथा वाचायच्या असतिल तर विजय देवधरांची २-३ पुस्तकं मला माहीत आहेत.
१. सापळा
२. बदला
३. आधुनिक युगातला शेरलॉक होम्स
प्रकाशक आठवत नाहिये

रत्नाकर मतकरिंचीही ८-९ गुढ कथांची पुस्तकं उपलब्ध आहेत.
१. खेकडा
२. कबंध
३. रंगांधळा
४. मृत्युंजयी
५. फाशी बखळ
६. निजधाम
७. निर्मनुष्य
८. मध्यरात्रीचे पड्घम
सर्व पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे यांनी प्रकशित केलेली आहेत.

९. ऐक... टोले पड्ताहेत
हे मात्र नवप्रकाशनने प्रकशित केलय.

मीनल, रत्नाकर मतकरिंचे अजून १ - गहिरे पाणी - लय भारी आहे

आज "Have A Change of Scene" आले.

अजुन "Shall We Tell The President?" येईल ह्या आठवड्यात, मग वाचुन झाल्यावर सांगतोच कसे होते ते.

The Top 100 Crime Novels of All Time    · Mystery Novels (From Wikipedia)
The Top 100 Crime Novels of All Time is a list published in book form in 1990 by the British-based Crime Writers' Association. Five years later, the Mystery Writers of America published a similar list entitled The Top 100 Mystery Novels of All Time. Many titles can be found in both Crime Companions.

1. Josephine Tey : The Daughter of Time (1951)
2. Raymond Chandler : The Big Sleep (1939)
3. John le Carré : The Spy Who Came In From the Cold (1963)
4. Dorothy L. Sayers : Gaudy Night (1935)
5. Agatha Christie : The Murder of Roger Ackroyd (1926)
6. Daphne du Maurier : Rebecca (1938)
7. Raymond Chandler : Farewell My Lovely (1940)
8. Wilkie Collins : The Moonstone (1868)
9. Len Deighton : The Ipcress File (1962)
10. Dashiell Hammett : The Maltese Falcon (1930)
11. Josephine Tey : The Franchise Affair (1948)
12. Hillary Waugh : Last Seen Wearing ... (1952)
13. Umberto Eco : The Name of the Rose (1980)
14. Geoffrey Household : Rogue Male (1939)
15. Raymond Chandler : The Long Goodbye (1953)
16. Francis Iles : Malice Aforethought (1931)
17. Frederick Forsyth : The Day of the Jackal (1971)
18. Dorothy L. Sayers : The Nine Tailors (1934)
19. Agatha Christie : And Then There Were None (1939)
20. John Buchan : The Thirty-Nine Steps (1915)
21. Arthur Conan Doyle : The Collected Sherlock Holmes Short Stories (1892-1927)
22. Dorothy L. Sayers : Murder Must Advertise (1933)
23. Edgar Allan Poe : Tales of Mystery and Imagination (1852)
24. Eric Ambler : The Mask of Dimitrios (1939)
25. Edmund Crispin : The Moving Toyshop (1946)
26. Margery Allingham : The Tiger in the Smoke (1952)
27. Peter Lovesey : The False Inspector Dew (1982)
28. Wilkie Collins : The Woman in White (1860)
29. Barbara Vine : A Dark-Adapted Eye (1986)
30. James M. Cain : The Postman Always Rings Twice (1934)
31. Dashiell Hammett : The Glass Key (1931)
32. Arthur Conan Doyle : The Hound of the Baskervilles (1902)
33. John le Carré : Tinker, Tailor, Soldier, Spy (1974)
34. E. C. Bentley : Trent's Last Case (1913)
35. Ian Fleming : From Russia with Love (1957)
36. Ed McBain : Cop Hater (1956)
37. Colin Dexter : The Dead of Jericho (1981)
38. Patricia Highsmith : Strangers on a Train (1950)
39. Ruth Rendell : A Judgement in Stone (1977)
40. John Dickson Carr : The Hollow Man (1935)
41. Anthony Berkeley : The Poisoned Chocolates Case (1929)
42. Ellis Peters : A Morbid Taste for Bones (1977)
43. Ellis Peters : The Leper of St. Giles (1981)
44. Ira Levin : A Kiss Before Dying (1953)
45 Patricia Highsmith : The Talented Mr. Ripley (1955)
46. Graham Greene : Brighton Rock (1938)
47. Raymond Chandler : The Lady in the Lake (1943)
48. Scott Turow : Presumed Innocent (1987)
49. Ruth Rendell : A Demon in My View (1976)
50. John Dickson Carr : The Devil in Velvet (1951)
51. Barbara Vine : A Fatal Inversion (1987)
52. Michael Innes : The Journeying Boy (1949)
53. P.D. James : A Taste for Death (1986)
54. Jack Higgins : The Eagle Has Landed (1975)
55. Mary Stewart : My Brother Michael (1960)
56. Peter Lovesey : Bertie and the Tin Man (1987)
57. Susan Moody : Penny Black (1984)
58. Len Deighton : Game, Set & Match (1984-1986)
59. Dick Francis : The Danger (1983)
60. P.D. James : Devices and Desires (1989)
61. Reginald Hill : Underworld (1988)
62. Mary Stewart : Nine Coaches Waiting (1958)
63. Paula Gosling : A Running Duck (1978)
64. Michael Gilbert : Smallbone Deceased (1950)
65. Lionel Davidson : The Rose of Tibet (1962)
66. P.D. James : Innocent Blood (1980)
67. Dorothy L. Sayers : Strong Poison (1930)
68. Michael Innes : Hamlet, Revenge! (1937)
69. Tony Hillerman : A Thief of Time (1989)
70. Caryl Brahms & S. J. Simon : A Bullet in the Ballet (1937)
71. Reginald Hill : Dead Heads (1983)
72. Graham Greene : The Third Man (1950)
73. Anthony Price : The Labyrinth Makers (1974)
74. Adam Hall : The Quiller Memorandum (1965)
75. Margaret Millar : Beast in View (1955)
76. Sarah Caudwell : The Shortest Way to Hades (1984)
77. Desmond Bagley : Running Blind (1970)
78. Dick Francis : Twice Shy (1981)
79. Richard Condon : The Manchurian Candidate (1959)
80. Caroline Graham : The Killings at Badger's Drift (1987)
81. Nicholas Blake : The Beast Must Die (1938)
82. Martin Cruz Smith : Gorky Park (1981)
83. Agatha Christie : Death Comes as the End (1945)
84. Christianna Brand : Green for Danger (1945)
85. Cyril Hare : Tragedy at Law (1942)
86. John Fowles : The Collector (1963)
87. J. J. Marric : Gideon's Day (1955)
88. Lionel Davidson : The Sun Chemist (1976)
89. Alistair Maclean : The Guns of Navarone (1957)
90. Julian Symons : The Colour of Murder (1957)
91. John Buchan : Greenmantle (1916)
92. Erskine Childers : The Riddle of the Sands (1903)
93. Peter Lovesey : Wobble to Death (1970)
94. Dashiell Hammett : Red Harvest (1929)
95. Ken Follett : The Key to Rebecca (1980)
96. Ed McBain : Sadie When She Died (1972)
97. H. R. F. Keating : The Murder of the Maharajah (1980)
98. Simon Brett : What Bloody Man Is That? (1987)
99. Gavin Lyall : Shooting Script (1966)
100. Edgar Wallace : Four Just Men (1906)

मेल मधून आलेली माहिती.

Irving Wallace चे Second Lady.

अतिशय सुन्दर पुस्तक. शेवटच्या पानाच्या शेवटच्या ओळि पर्यन्त suspense ठेवला आहे.जरुर वाचा.
याच लेखकाचे अजुन एक पुस्तक The Man. मस्त पुस्तक आहे. जरा मधे रेन्गळतं पण otherwise class.

सेकन्ड लेडी तर अफलातूनच आहे . शेवटच्या ओळीपर्‍यन्त सस्पेन्स? पुस्तक सम्पले तरी सस्पेन्स उलगडत नाही.... तो अधान्तरीच आहे. अर्थात हे पुस्तक एवढे जुने झाले आहे की इथल्या सर्वानी वाचले असावे

अर्थात हे पुस्तक एवढे जुने झाले आहे की इथल्या सर्वानी वाचले असावे<<
हो खरंय..
मस्त आहे सेकंड लेडी. सस्पेन्स अजून कायम.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

पुस्तक संपल्यावरही सस्पेन्स कायम रहाते !

सेकंड लेडी खरंच अफलातून आहे...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

रहस्यकथाकार म्हणून आणखी दोन नावे आठवतात मला.
एस एम काशिकर.
माया सामंत
त्यांचा दर्जा यथातथाच असायचा, पण वाचनालयात ते फार फेमस होते.
काशिकर माफक प्रमाणात वेलचियुक्त चहा पण टाकायचे.

काशीकर आणि माया सामन्त एकच. माया सामन्त हा काशीकरांचा 'डु. आय डी' होता

Proud

गुरुनाथ नाईक राहिले. ही मंडळी अर्नाळकर थकल्यावर पुढे आली. मांजर रोड झाले म्हणजे उन्दरांचे फावते तसे.
पण अर्नाळकरांचे 'कॅरक्टरायझेशन' त्याना जमले नाही. बाबुरावांच्या पात्रांच्या इमेजेस डोळ्यासमोर उभ्या रहात. त्यातले गुन्ड (बाबूरावांचा आवडता शब्द 'बदमाष') देखील सभ्य वाटत...
बाबुरावांचे चॅप्टर जिथे सुरू व्हायचे त्याचे टायटल्स मोठी मनोवेधक आणि उत्सुकता वाढविणारी असत....

ह्म्म, म्हणजे मराठी वाड्मयात डु आय्डी ची परंपरा फार जुनी आहे तर !

कुणी मर्मभेद वाचले आहे का? खूप जुने पुस्तक आहे. लेखक काही केल्या आठवत नाही आहे.
पण मला फार आवडले होते. त्या लेखकाची अशीच अजून पुस्तकं होती.

मर्मभेद लिहिणारे शशी भागवत. तुम्ही ते रमल, विश्वंभरशास्त्री वगैरेबद्दलच बोलताय ना ? त्या पुस्तकाला टच्याआलेची प्रस्तावना आहे Happy त्यांनी लिहिलेले दुसरे पुस्तक म्हणजे रत्नप्रतिमा. (कालभैरव, अनंगपाल इ.) (की ते शशिकांत कोनकरांनी लिहिले ? गोंधळ झाला. मला वाटते, शशिकांत कोनकरांनी टारझन लिहिले.) पण ही दोन्ही पुस्तके मस्तच आहेत.
गुरुनाथ नाईक झाले, एक कोणीतरी बांदोडकरसुद्धा होते. पण हे लोक रहस्य कमती आणि थरार (!) जादा असे होते. सुशि तर आहेतच. सुशिंची समांतर चांगली आहे. त्याशिवाय त्यांनी फिरोझ, शकुनी, अमर विश्वास (हे नाव बरोबर आहे ना ?) वगैरे व्यक्तिरेखा निर्माण केल्या.
भारतीय रहस्यकथांमध्ये मला फार आवडणारे म्हणजे भारांचा बिपिन बुकलवार, सत्यजित रे यांचा फेलूदा. बुकलवाराची पुस्तके फारशी नाहीत. फाफेच्या काही कथा चांगल्या रहस्यकथा आहेत. फेलूदा-कथांचे उत्तम इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे. सार्‍या भारतभर या कथा घडतात.

    ***
    I get mail, therefore I am.

    सुशीचा मंदार पटवर्धन राहिलाच की.

    गोनीदांनी 'रुमाली रहस्य' नामक एक मस्त कादंबरी लिहिली होती. पेशवाईत घडणारी रहस्यकथा. इतके दिवस या पुस्तकाची प्रत उपलब्ध नव्हती. डॉ. वीणा देव यांच्याकडील photocopy आणून ती वाचली होती. आता या महिन्यात या कादंबरीची नवीन आवृत्ती निघते आहे.

    हेमंत कर्णिक, शरच्चंद्र वाळिंबे, जयंत रानडे, अनंत सामंत ही नावे आठवूया का?
    मला वाटते, की रह्स्यकथा, साहसकथा, शोधकथा व गूढकथा या सर्वांचा समावेश थ्रिलर (थरारक साहित्य) या एकाच कॅटॅगरीत होतो आणि तसे लेखन करणार्‍यांनी हे बहुतेक फॉर्म हाताळलेले असतात.
    भा. रा. भागवतांचा फा. फे. वाचण्याआधी त्यांच्या भुताळी जहाज, ब्रह्मदेशचा खजिना, तैमूरलंगाचा भाला असल्या रहस्यमय कादंबर्‍यांनी वेडं करून सोडलं होतं
    -योगेश-

    भुताळी जहाज, ब्रह्मदेशचा खजिना, तैमूरलंगाचा भाला >>> अगदी अगदी ! भुताळी जहाजावरचे ते 'उदे उदे ग' वाचताना तेव्हा काटा आला होता. तैमूरलंगाच्या भाल्याचा तो फाळ, त्याची स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी... जबरदस्त होते. खास कुमारवयीन जनतेसाठी मॅजेस्टीकने ४-५ पुस्तकांची मालिकाच काढली होती, त्यात बहुतेक लीलाताईंनीही लिहिले होते आणि बहुतेक मालतीबाईंनीसुद्धा. 'माचव्यातले साहस' त्यापैकी एक होती.
    डीटी नावाच्या एका डिटेक्टिव्ह मराठी पोराची २-३ पुस्तके निघाली होती.

      ***
      I get mail, therefore I am.

      स्लार्टी,
      सुधाकर प्रभूंच्या राजू प्रधान या कॅरॅक्टरवर तर आम्ही लट्टूच होतो. त्यांचं तू वाचलं असशीलच म्हणा.
      आयला! त्या जे. के. रोलिंग बाईने एक हॅरी पॉटर तयार केला तर दुनिया खुळी झाली.
      मराठी ले़खकांनी एवढे माईलस्टोन काम केले, पण आहे का त्यांची कुणाला आठवण?
      योगेश

      येस्स, सिडनी शेल्डन माझा फेव्हरिट आहे. त्याचं 'Tell me your dreams', 'If Tomorrow comes' छानच आहेत. मला त्याचं 'The Naked Face व Bloodline' खूप नाही आवडलं. सध्या त्याचं 'The other side of the midnight' वाचतेय.

      'Morning, Noon and Night' बँकॉक एअरपोर्टवर अर्धवट वाचून झालंय, अजून तसंच राहिलंय.
      मध्ये मायकेल क्रिश्टनची 'The Rising Son व Sphere' ही पण वाचून झाली. चांगली वाटली.

      चेंज म्हणून पॅट्रिशिया कॉर्नवेलचं एक पुस्तक 'Cause of Death' वाचलं, पण छे तिने तर चांगलंच हैराण केलं.

      बरोबर स्लार्टी..... शशी भागवत.
      त्या पुस्तकाला टच्याआलेची प्रस्तावना आहे <<
      हुम्म्म ट्च्याआ पर्यन्त कळले (कदचित) पण "ले" नाही कळले.

      मी पण भा. रा. भागवतांची फॅन. फा.फे माझा हीरो होता. (तेव्हा. सुमित राघवनला-फा.फे म्हणजे फा.फे चा प्रचंड अपमान असे वाटलेले :-))
      शाळेत "वाक्यात प्रयोग करा" च्या प्रत्येक वाक्यात फा.फे असायचा. Happy

      Pages