रहस्यमय कथांची पुस्तके

Submitted by माणूस on 6 November, 2008 - 15:22

Johnny Gaddar पाहील्यापासुन चांगली रहस्यमय कथांची पुस्तके शोधत आहे, तुम्हाला माहीत असतील तर ईथे यादी लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूमाली रहस्य मस्त आहे कादंबरी.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

रोबिनहुड, बरोबर आहे. second lady मधे पुस्तक सम्पले तरि suspense कायम रहतो.

Turke_Minal (link) दिली असती तर बर झाल असत (बहते हूये पानी मे हाथ धो लेता था .. ?)

(कालभैरव, अनंगपाल इ.) (की ते शशिकांत कोनकरांनी लिहिले ? गोंधळ झाला. मला वाटते, शशिकांत कोनकरांनी टारझन लिहिले.) >> कोनकर वाटतेय मला. कोनकरांची ठिकठाक वाटली मला तरी. टारझन ३-४ जणांचे तरी वाचलेय मी. ग. रा कोणितरी होते ज्यांचे १० भाग होते, अर्थात अनुवादित.

अरुण ताम्हणकर (म्हणजे श्री चे संपादक) : त्यांच्या पण कालिकामूर्ती types रहस्य/गूढ कथा आहेत ज्या नक्कीच बाकिच्या अशा गोष्टिंपेक्षा सरस वाटलेल्या मला तरी.

जॉन ग्रिशम चे द क्लायन्ट, द फर्म, रेनमेकर, टाइम टु कील, रनवे ज्युरी चान्गले वाटले
द अपील जरा बोर झाले.
अगाथा ख्रिस्ती चे शॉर्ट स्टोरीज ऑफ मिस मॅर्पल छान आहे, बाकिची कोणी वाचली आहेत का?
सध्या तिचे कार्डस ऑन द टेबल वाचत आहे.

रेनमेकर, लास्ट ज्युरर मस्त आहे. आता चेंबर मिळालय.

स्पॉयलर अ‍ॅलर्टः
********************************************************************************************************************
जॉन ग्रिशम असा काय करतो? बिचार्‍या वकिलांना खुप कष्टात दिवस काढुन केस लढायला देतो. त्यांना मोठ्ठी व्हर्डिक्टस देतो आणि मग पैसे मात्र मिळु देत नाही. (रेनमेकर, अपील)

'सेकंड लेडी'चा मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?
>>
हो...
१० वर्षांपूर्वी वाचला होता...
बाकी डीटेल्स आठवत नाहीत....

द केस बुक ऑफ हर्क्युल पोइरो - अगाथा ख्रिस्ती..
(त्या आधी पॉइरो चे काही एपिसोड ऑनलाईन आहेत ते पहा..आणखी मजा येते वाचताना)

जरुर वाचा,,

स्टीफन किंगने संपादित केलेला 'द मंकी' हा कथासंग्रह वाचला.त्यात आर्थर कॉनन डाईलची हिप्नॉटीझमवर आधारित झकास कथा आहे,त्याच्या शेरलॉक होम्स शैलीपेक्षा वेगळा प्रकार,बाकीच्या कथाही चांगल्या आहेत,विशेषतः किंगची 'द मंकी'.

Irving Wallace चे The Word पण मस्त आहे. Second Lady पाहिलंय लायब्ररीमध्ये. आताचं वाचून संपलं की आणेन.

रत्नाकर मतकरिंच्या गहिरे पाणी वर काही वर्षांपूर्वी एक सिरियल आली होती. मस्तच आहे ते पुस्तक. "ऐक... टोले पड्ताहेत" ह्या कथेच्या एपिसोडमध्ये रोहिणी हट्टंगडी होत्या.

धारपांची पुस्तकं मला झेपली नाहीत म्हणून ती वाचणं बंद केलं Sad

mansmi18, पॉइरोच्या एपिसोडसची लिंक द्याल का प्लीज?

जेम्स हॅडलि चेसची काही चांगली पुस्तकं सांगा ना कोणीतरी. लायब्ररीत आहेत पण लेखकाबद्द्ल काही माहित नसल्याने अजूनपर्यंत वाचली नव्हती.

मला Clive Cussler ची पुस्तकं पण आवडतात. Ancient Mystery ची आवड असलेल्यांनी जरुर वाचा. तसंच Steve Berry ची नॉव्हेल्स पण झकास.

'शालिवाहन शके' नावाची कादंबरी खुप वर्षांपुर्वी वाचली होती. जबरदस्त आहे. लेखक कोणाला माहित आहेत का?

'A simple plan - Scott Smith' पण मस्त आहे.

रहस्यकथा म्हणता येणार नाही, पण जरा वेगळं काहीतरी वाचायचे असेल स्टिफनी मेयरची Twilight सिरीज वाचा.
व्हॅम्पायर आणि एक मुलगी यांची प्रेमकथा आहे. त्यातच वेयरवुल्फ वगैरे प्रकारही आहे.
Twilight, New moon, Eclipse, Breaking Dawn अशी चार वेगवेगळी पुस्तके आहेत या सिरीजमध्ये. आधीची तीन छान आहेत, Breaking Dawn जरा गंडले आहे. एक तर एकाच विषयावरचीच पुस्तके असल्याने जरा तोच तोच पणा आहे आणि Breaking Dawn मध्ये तर तो खूपच जाणवतो.

याच सिरीजमध्ये अजून एक पुस्तक Midnight Sun येणार होते, पण पूर्ण लिहून होण्याआधीच त्याचा काही भाग नेटवर प्रसिद्ध झाल्याने लेखिकेचा लिहिण्याचा मूड गेला म्हणे, त्यामुळे सध्यातरी ते पुस्तक लांबणीवर टाकण्यात आले आहे. Happy

या पुस्तकावर एक चित्रपटही निघाला आहे.

१ जानेवारी - १८ जानेवारी, सुंदरबाई हॉल, मुंबई, आशिष बुक सेंटरचं पुस्तक प्रदर्शन भरलं आहे. मी गेली २-३ वर्ष जातेय. चांगली पुस्तकं चांगल्या किंमतीत मिळतात - अर्थात फक्त इंग्रजी. पुस्तकप्रेमी असाल आणि वेळ असेल तर जाऊन या.

maj sjowall आणि per wahloo ह्या लेखकद्वयीची काही पुस्तके स्विडीश भाषेतून इंग्रजीत अनुवादित केलेली आहेत. ही नावे विचित्र वाटतील पण ह्यांच्या कादंबर्‍या मला तरी खूप आवडल्या. मुख्यतः रहस्यकथाच आहेत. पण तारीखवार काटेकोरपणे दिलेले आहेत. मुख्य घटनेबरोबर (गुन्हा) बाकी पात्रांची पार्श्वभूमी, त्या काळात स्वीडनमधे घडणार्‍या घटना, त्या काळातील लोकांची वृत्ती ह्यांचेही वर्णन आहे. त्यामुळे गोष्ट अगदी टू डायमेन्शनल वाटत नाही.
द लाफिंग पोलिसमन ही एक त्या मालिकेतली एक.
ह्या सगळ्यात मार्टिन बेक हा मुख्य डिटेक्टिव असतो.

जेम्स हॅडली चेसविषयी वर जे म्हटले गेले आहे त्याला अनुमोदन. त्याच्या पुस्तकांना निष्कारण "तसली" कव्हरे घालून ह्या लेखकाला बदनाम केले आहे. कुण्या अक्कलशून्य माणसाला हे करावेसे वाटले त्याला माझ्या वतीने शिव्याशाप! एक चांगला आणि बर्‍यापैकी सोज्वळ रहस्यकथालेखक असून कित्येक वाचक ह्या आवरणामुळे ह्याच्यापासून फटकून राहिले असतील.

बाकी ह्या लेखकाची पुस्तके अमेरिकेत का मिळत नाहीत? कुणाला माहित आहे का?

आपला देसी 'शेरलॉक होम्स' म्हणजे सत्यजित राय यांचा डिटेक्टीव्ह नायक 'फेलुदा'.

मुळ कथा जरी बंगाली असल्या तरी त्यांचे इंग्रजी भाषांतर मध्यंतरी वाचायला मिळाले. जुन्या काळाचा संदर्भ असला तरी पुस्तकं वाचनीय आहेत.
मिळाल्यास नक्की वाचा.

अरे सु. शिरवळकरांचा उल्लेख कसा नाही आला अजुन ? (आला आहे, नंतर वाचला)
त्यांची एक कादंबरी मी पुण्याच्या विश्रामबागवाडा लायब्ररीत बसुन वाचत असताना,
वेळ संपली हे सांगायला त्यांचा माणूस समोर आला आणी मी खुप घाबरलो होतो. Happy
आता नाव आठवत नाहीये, पण उत्खननावर आधारित कादंबरी होती.

हो हो, त्या उत्खनन ग्रूप मधला एक एक जण अचानक कमी होत जातो.
नंतर कळत की ती साईट खरोखर भुताळलेली आणि फारच वाईट आहे.
शेवट नाही आठवत, बहुतेक अगदी मोजके लोक जिवंत सुटत असावेत.

मला आलेली मेल

The Welfare Of Stray Dogs(WSD) has organised The WSD Book Exhibition of donated new and secondhand books from February 25-28, 2010 (Thu-Sun) from 10 am to 7 pm at the garage of Vaswani Mansions, Opposite K C College, Churchgate, Mumbai. A treasure trove of books for book lovers. Come browse around and pick up thousands of books on self- help, best sellers, travel, humor, spirituality, philosophy, Indian and foreign fiction and non-fiction and children's books at throw-away prices. Prices start from Rs 10 only.

Here is a sneak peek of some of the titles and authors of the books that are on display.

P.G. Wodehouse, Aldous Huxley,Robin Cook, Agatha Christie,P D James,John Grisham(hardback editions),Dale Carnegie,Jhumpa Lahiri, Mills and Boon and many many more

Collected Works Of Joseph Conrad ( 22 volumes) with a printed autograph ( Rare books category according to Blackwells) Published: The Gresham Publishing Co. Ltd, London. 1925.
Each volume has a printed autograph that reads "Cordially Yours J. Conrad".

History of French Literature, Pub 1923

The New Standard Encyclopedia and World Atlas

Pears Cyclopedia (1954-55, 1969-79 editions)

Arthur Mee's Golden Years 'Over the Hills and Far Away'

Human Origin by S. Laing Pub 1900.
and thousands more...

All proceeds from the book sale will go towards our sterilization and rabies prevention programme.

महेश, मेघना, त्या शिरवळकरांच्या उत्खननावरच्या पुस्तकाचं नाव सांगा ना प्लीज. काल लायब्ररीमध्ये त्यांची खूप पुस्तकं पाहिली. पण मराठी पुस्तकांवर संक्षेपात कथा लिहिलेली नसते. त्यामुळे ते पुस्तक कुठलं ह्याचा अंदाज आला नाही. Sad

Pages