मुलांना लिहायला शिकवण्यासाठी - योग्य वेळ, पद्धत ?

Submitted by सावली on 27 June, 2011 - 21:56

मागे मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात
या धाग्यावर मराठी वाचनाचा प्रश्न विचारला होता. आणि त्यावर छान उत्तरेही मिळाली होती. लेक आता थोडफार वाचते आहे. Happy

आता लिहायचे शिकवण्या संबंधी प्रश्न आहे. हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही लिखाणासाठी आहे.
१. लिहायला शिकवायला योग्य वय काय?
२. शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत?
३. लिहायला शिकवायला कशी सुरुवात करावी?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीचा अनुभव नाही. इंग्लिश लेटर्स, नंबर्सकरता साधारण साडेतीन वर्षानंतर सुरुवात होते. त्याआधी मनगटात जोर नसतो. त्यामुळे कितीही मागे लागलात तरी ते पिकप करत नाहीत. त्याकरता त्यांना क्ले द्या, ड्रॉ करायला द्या वगैरे सांगतात.

इंग्रजी लिहिण्याचा प्रश्न शाळेतच सोडवला गेला होता, त्यामुळे विचार नाही केला. म्हणजे घरी स्वत:ला करुन घ्यावं लागलं नाही. मराठी मात्र ५.५ पूर्ण झाल्यावर सुरु केलं होतं, कारण पहिलीपासून शाळेत हिंदी असणार होतं.

२. शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत? >>>
ते प्रत्येक शाळेवर अवलंबुन आहे. बोर्ड कुठलं आहे त्यावर.

हे आमच्या शाळेतलं पहिलीतलं लँग्वेजचं करिक्युलमः

Reading Comprehension
After reading a fiction book...
Retell the story including a clear beginning, middle, and end
Identify the story elements- characters, setting, problem and solution
Make connections- think of how the book reminds you of something in your life or of another book
Compare two characters. They can be from the same book, or from different books. You can even compare a character to yourelf!

As you are reading a nonfiction book....

Write down key words to help you remember the main ideas
See if you can recall information by looking at the key words
Try to write a summary of the book using the key words to help you
Make a list of two new facts you learned

आणि हे मॅथ्सचं:

A first grade student will be able to:
Create number stories, model, represent, and use appropriate strategies to recall addition facts to 10.
Recognize, know values and equivalences, and model combinations of coins that equal given amounts up to $1.00.
Build models, and identify and compare attributes among various shapes.
Measure, estimate, use and compare non-standard/standard units in context.
Represent, analyze, interpret and make predictions based on a set of contrived or student generated data.

हे इथे नको असां वाटत असेल तर सांग. उडवेन.

मंजिरी, सायो धन्यवाद.
साधारण साडेतीन वर्षानंतर सुरुवात >> हो हो आता साडे चार झाली.
पहिलीतलं करिक्युलमः उडवु नकोस. राहु देत.

शाळेवर अवलंबुन >> हम्म Happy
मराठी मात्र ५.५ पूर्ण झाल्यावर सुरु केलं होतं>> कसं केलस ते देशील का प्लिज.

>>मराठी मात्र ५.५ पूर्ण झाल्यावर सुरु केलं होतं>> कसं केलस ते देशील का प्लिज.
त्या मुळाक्षरांच्या बाफ वर आहे तसंच. एकेका दिवशी ३/४ अक्षरं शिकवुन मग त्यापासून शब्द तयार करणे वगैरे.

२. शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत? >>
शाळेवर अवलंबुन आहे असं म्हटलं मी, पण कमीतकमी पहिलीत जाताना ३/४ अक्षरी शब्द, १ ते १०० अंक, आणि छोटी छोटी वाक्य वाचता येणं अपेक्षित असतं. त्या दृष्टीनीच आपल्याकडे केजी मधे तयारी करुन घेतात.

धन्यवाद मंजिरी. आता रोज ३/४ अक्षरे लिहायला शिकवेन.
तीला आता मराठी शब्द थोडे थोडे वाचता येतात. इंग्रजी पण अगदी सोपे शब्द वाचता येतात.
आकडे मात्र १०० पर्यंत नाही येत.

सावली, इन्ग्रजी वाचायला शिकवायचं असेल तर starfall.com वर बघा .अतिशय उत्तम आहे, फ्री आहे.मी मुलीला त्याच्यावरूनच शिकवलं. फक्त त्याच्यामधे जो दिला आहे तसा सिक्वेन्स पाळा.

sneha1 , धन्यवाद वाचायला चालु केले आहे आधीच.
लिहिण्यासाठी कधी/ कसे करायचे त्याबद्दलही माहिती हवी होती.

mulanchya hatache aani botanche snaayu vayachya sahavya varshi vikasit hotat. toparyant likhanacha anawashayk taan mulanna deu naye. tyala drukshraayvya madhyamatun shikvave. mulanna A kasa asato he kalane awashyak asate aani tevdhe purese aahe. pan aaj vayachya adich teen varshapasunch mulanna abhyaasat guntavun tyanche baalpan hiravun ghetale jate. ha shikshanpaddhaticha dosh aahe.

दररोज घडणार्‍या १० गोष्टी कुठल्या, ( नेमक्या वेळी आमचीच स्मरणशक्ती दगा देते , तिथे मुलांना बोलुन काय उपयोग Proud >?)
जसं की ,१) सुर्य दररोज उगवतो ,
२) सुर्य दररोज मावळतो

मी हा धागा टाळत होते, कारण गील्ट. Sad

इथे नर्सरीला वाचायला होते आणि अक्षरे गिरवायला लावायचेच. ज्युनियरकेजी ला लिहायला आहे. Small and Capital दोन्ही. Sad

पहिलीत कदाचित शेक्सपियर असेल अभ्यासक्रमात. विचारायची माझी टाप नाही. Sad

अत्ताचे माहित नाही पण मला आठवतेय त्याप्रमाणे आम्हाला मोठ्या बालवाडीत बाराखडी होती. आणि पहिलीत सोपे सोपे शब्द लिहीता वाचता येत होते. पहिलीच्या मराठीच्या पुस्तकातला पहिला धडा अजुन आठवतोय. Happy
तो धडा होता --
'आई घर बघ. '
एव्हढे एकच वाक्य होते Happy

रैना, तिथे सगळ्याच शाळात असेच आहे तर गिल्ट कशाला.
पण अगदीच वाटत असेल तर तुम्ही एखाद वर्ष स्वताहुनच रिपिट करु शकता का? म्हणजे प्रेशर येणार नाही.

नाही करु शकत रिपिट.
पाल्याला झेपतय तर शाळेच्या नियम क्रमांक अठ्राशेबहात्तरानुसार रिपिट करणे अलाऊड नाही. Angry
नियम क्रमांक एकोणीशेसहासष्टानुसार 'का' हा प्रश्नही अलाऊड नाही. Proud

काय त्रास आहे ना..
आम्ही तर विचार करत होतो की पहिलीत अ‍ॅडमिशन घेऊन कितपत अभ्यास आहे ते बघायचं आणि मग रिपिट करायचं पहिलीतच. चालत नाही म्हणजे वैतागच आहे.

डेलिया, हो आपण लहान होतो तेव्हा बहुतेक वेगळं होत.
श्री तुमचा प्रतिसाद काही कळला नाही मला.
dr.sunil_ahirrao, धन्यवाद. अगदी मान्य. मला तर आनंद होईल सहाव्या वर्षापर्यंत शिकवायचे नसल्यास. पण आपल्या इथे शाळात हे चालणारे नाही.

तिथे सगळ्याच शाळात असेच आहे तर >>>> हे विधान सत्य नाही. सगळ्याच शाळांमध्ये अजिबात नाहीये असं. मी पूर्वीही एका बाफ वर हेच लिहीलं होतं. सरसकट विधाने वाचून लोकांची दिशाभूल होऊ शकते.
माझी स्वतःची मुलगी व इथे बंगळूरात तिच्या वयाच्या इतर शेकडो मुलं-मुली वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत. वय वर्षे ५+ ची माझी मुलगी सध्या फक्त सीनीयर केजी मध्ये शिकत आहे. तिला यावर्षी स्मॉल लेटर्स सुरु होतील. नर्सरी मध्ये फक्त आणि फक्त खेळाव्यतिरीकत काहीच नव्हते. फार तर फार रेघोट्या मारणे, अक्षरांसाठीचे सराव म्हणून उभ्या-आडव्या रेघा वगैरे इतकेच. मागच्या वर्षी ज्यु केजी मध्ये फक्त मोठी अक्षरे तोंडओळख व जमेल तसे लिहीणे. प्रेशर अजिबात नव्हते.
उलट जे शिकवतील ते उदाहरणांनीच असते. आणखी खूप लिहू शकते मी याविषयी, पण तो या बाफचा विषय नव्हे म्हणून गप्प बसते.
कृपया एखाद्या शाळेच्या अनुभवावरुन इथल्या सर्वच शाळांविषयी गैरसमज पसरवू नका. अश्या प्रेशरवाल्या शाळा आहेत याबाबत दुमत नाही पण तसे नसलेल्या शाळा देखील आहेतच व पाल्याला कोठे घालायचे ते आपल्याच हातात असते.

माझ्याकडे ट्युशनला येणारी चारही मुलं केजीचीच आहेत.

कालचा त्याचा होमवर्क..

चित्रे बघून खाली स्पेलिंग लिहा: फॉक्स, गोट, ऑरेंज, नर्स.

वन टू सिक्स्टी (दोन वेळा) आकडे.

Circle the tallest object and tick the shortest object.

Read lesson: This and That.

या दिस आणि दॅटचा मुलाच्या डोक्यातला गोंधळ बघता मला स्वतःलाच कसंतरी वाटतं, चूक त्याची नाही, हे सर्व काही समजून घ्यायची कुवत त्याच्यामधे नाही, असेही नाही. पण पुस्तकातले चित्र बघून जवळचे किंवा लांबचे असे कसे शिकता येइल?

रैना, उप्पर केजीला कर्सिव्ह चालू. मग बाळं स्पेलिंगमधले एक अक्षर स्मॉल दुसरे कॅपिटल तिसरे कर्सिव्ह असे लिहितात, टीचरने चूक असे दिले की त्याना काय चुकलय ते समजतच नाही. कारण, स्पेलिंग तर बरोबर आहे.

मवा मी गैरसमज पसरवण्यासाठी लिहिलेले नाही. मला जी माहिती मिळाली त्यावरुन लिहिले आहे.
जर खरे नसेल तर आनंदच आहे की. खरतर तुम्ही तुमच्या शाळेबद्दल खुप काही लिहा. ते वाचुन फायदाच होईल इतरांना. मलाही आवडेल वाचायला.
<<पाल्याला कोठे घालायचे ते आपल्याच हातात असते.>> आपल्या आजुबाजुला ज्या शाळा आहेत त्यातुनच एक शाळा निवडावी लागते. जर तुमच्या मुलांना मिळाल्या तशा छान शाळा उपलब्ध नसतील तर असेल तो पर्याय निवडावा लागतो.

मवा, सेम माझ्या मुलाच्या शाळेत (नोएडा) पण असाच अभ्यास आहे. त्याला ४+ नर्सरीत घातला होता. कर्सिव्ह १ ली पासुन आहे.
मंदार

हो मंदार, खरंय ते, माझ्या सर्वच मित्र्-मैत्रिणी, भावंडांची मुले अश्याच शाळांमध्ये शिकत आहेत, व मी त्यांना कोणालाही कधीच अभ्यासाचे प्रेशर असल्याचे बोलताना ऐकले नाहीये.
मात्र उलट केसेस पाहील्या आहेत, जिथे पाल्याला काहीच अभ्यास नाही म्हणून पालक कुरकुरत आहेत, ती मानसिकता बदलणे जास्त अवघड आहे.
मी हे इथे लिहीले, जेणेकरुन लोकांना माहीती कळेल की आता बर्‍याच ठीकाणी चित्र बदलले आहे.
सावली, आपल्याच हातात असते म्हणताना माझ्याही मनात ते सर्व विचार आलेच होते. अश्या शाळा आहेत इतकेच. पुढचे आपापल्या परिस्थिती व निर्णयांवर अवलंबून. Happy

मी कदाचित मवासारखा भाग्यशाली आहे शाळेच्या बाबतीत. माझी मुले ज्युनिअर केजीत जातात. नर्सरीमध्ये खेळ, शब्द उच्चारणे आणि अक्षरांसाठीचे सराव म्हणून उभ्या-आडव्या रेघा मारणे एवढेच होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला रेघोट्या मारण्यापेक्षा काहितरी लिहावे म्हणून A4 साईजच्या पेपरवर capital A to Z आणि १ ते १० लिहून घेतले. दोघांनाही इतके आवडले की आज जेवला नाहीत तर अभ्यास करायला मिळणार नाही म्हणून उलट दम द्यायला लागायचा Proud ह्या वर्षी अजून हलक फुलक चालू आहे.

पण सगळ्यानाच घराच्या बाजून अश्या शाळा मिळतील की नाही हेपण तितकेच खरे आहे. तिथे थोडीफार अ‍ॅडजस्टमेंट करावी लागेलच.

तिथे सगळ्याच शाळात असेच आहे तर >>>> हे विधान सत्य नाही. सगळ्याच शाळांमध्ये अजिबात नाहीये असं. मी पूर्वीही एका बाफ वर हेच लिहीलं होतं. सरसकट विधाने वाचून लोकांची दिशाभूल होऊ शकते.>>

मी सगळ्या हा शब्द कुठे वापरला आहे मवा? मी आमच्या मुलीच्या शाळेबाबत लिहीले, आणि दुर्दैवाने ते सत्य आहे.
माझ्या परिसरातील ६ शाळांमध्ये हेच आहे. CBSE & ICSE. Happy
शहर मुंबई.

दिशाभूल कोणाची होऊ शकते? कोणी आपल्या शाळेचे करिक्युलम टाकले म्हणजे इतरांची दिशाभूल कशी काय होणार? Happy

नंदे-
Sad
कालच्या आमच्या वर्कशीटमध्ये एक अफाट प्रकरण होते.
एकीकडे ऋतु आणि दुसरीकडे काही वस्तु. आणि मॅच करायचे.

उदा-
सँटाची टोपी आणि दुसर्‍या बाजूला बर्फ पडताना आणि ख्रिसमसट्री. साडेतिन वर्षाच्या मुलाला दोनतृतियांश भारतीय उपखंडात ख्रिसमसला बर्फ पडत नाही तर मग ते मॅच करायचे हे शिकवणेच मला चुकीचे वाटते. असोच. Happy

रैना, माझ्या मते मवाने सावलीने लिहिले वाक्य त्याबद्दल लिहिले असावे. तु टाकलेला पहिलीचा अभ्यासक्रम असेल तसाच आणि CBSE \ ICSE चे अभ्यासक्रम भारतात कुठेही सारखेच असतात.

रैना, मी कोट केलेले वाक्य सावलीचे होते. तुझ्या अनुभवाविषयी मला काहीच म्हणायचे नाही.
'सगळ्याच शाळांमध्ये असेच असते' या वाक्याने नक्कीच इथे येऊ इच्छिणार्‍या, मुलांना शाळेत घालू इच्छिणार्‍या पालकांची दिशाभूल होऊ शकते. कारण सगळीकडे असेच असते म्हणल्यावर इतर पर्यायांचा विचार केलाच जात नाही. परंतू जर काही शाळांमध्ये असे असते असे म्हणले तर इतर पर्याय आहेत हे कळते व ते आजमावून पाहता येतात.
तुझा अनुभव जितका खरा तितकेच मी, मंदार, चेतन यांचे. आता हे बॅलन्स होऊन वाचक विचार करु शकतील की आपल्याला काय हवे आहे, प्राप्त परीस्थितीत काय करता येईल वगैरे. Happy

चेतन,
मी ज्युनियर केजीचा अभ्यासक्रम लिहीला आहे रे. तो माझ्याच मुलीच्या शाळेत आहे.
CBSE \ ICSE चे अभ्यासक्रम भारतात कुठेही सारखेच असतात>> नसतात बहुतेक. ते शाळेवर अवलंबुन असते म्हणे.

तुझा अनुभव जितका खरा तितकेच मी, मंदार, चेतन यांचे. >> हो. हे पटलं मवा.

रैना Sad
मी सगळ्या हा शब्द कुठे वापरला आहे मवा?>>> मला वाटते, तो प्रतिसाद 'सावली'च्या पोस्टकरता होता. तेव्हा रैना, गैरसमज नसावा. Happy

असो.

मुलांना शक्यतो ४-५ वर्षापासून लिहायला शिकवावे. त्याआधी इतर खेळ, अ‍ॅक्टीव्हिटीज् वापरून त्यांना शारिरीक आणि मानसिक दॄष्ट्या तयार करावे लेखनासाठी.

Pages