मुलांना लिहायला शिकवण्यासाठी - योग्य वेळ, पद्धत ?

Submitted by सावली on 27 June, 2011 - 21:56

मागे मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात
या धाग्यावर मराठी वाचनाचा प्रश्न विचारला होता. आणि त्यावर छान उत्तरेही मिळाली होती. लेक आता थोडफार वाचते आहे. Happy

आता लिहायचे शिकवण्या संबंधी प्रश्न आहे. हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही लिखाणासाठी आहे.
१. लिहायला शिकवायला योग्य वय काय?
२. शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत?
३. लिहायला शिकवायला कशी सुरुवात करावी?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. सध्यातरी (म्हणजे डिसेंबरनंतर) घराजवळच्याच एखाद्या प्लेस्कूलला घालणार आहे. (आधी आईपासून लांब रहायला शिकली तरी बास.) जवळच्या एका मॅडमनी "आठ दिवस येऊदेत तिला.आवडलं तर ठिक नाही तर पुढच्या वर्षी बसव" असं सांगितलय. कंपन्यावाले प्रीस्कूल अर्थातच हा ऑप्शन देणार नाहीत. Proud

रैना, मी वर कुठेतरी हाच मुद्दा मांडला होता. त्यात जर टीचरबाईच अ‍ॅपल म्हणजे सफरचंद असे शिकवताना ऐकले की मग आपोआप कर माझे जुळती. Happy

आधी कोळडोंगरीला होती आता महाकाली केव्ह्ज/ शेर ए पंजाब इत्यादी एरियामधे गेलीये शाळा. पण लांब पडत असेल तर अजिबात नको टाकूस. एवढ्या लहानपणी इतक्या दूरच्या शाळेत कशाला उगाच?

मुलांना पटापट लिहायला लावायला काय बरे करावे? लाच द्यायची ईच्छा नाहीये, अजुन वय ४.३ या वयापासुन लाच म्हणजे? येते सगळे पण पटपट लिहितच नाही. १-२ पाने होम वर्क ला १-१ तास लावतो, मग तो पण कंटाळतो व मी पण. काय करावे? त्याला अजुन आभ्यासाचा सिरियसनेस्स नाही व मला तो द्यायचा पण नाहीये. पण त्याचब्ररोबर नाही केला आभ्यास तरी आई काही म्हणत नाही असा समज होउ नये म्हणुन कमीत कमी होम वर्क तरी रोज केला पाहिजे हा माझा कटाक्ष.
काही / कुठे चुकतेय का मी?

कंपन्यावाले प्रीस्कूल अर्थातच हा ऑप्शन देणार नाहीत...

किड्झी मध्ये मुल नाहिच रमलं तर एक महिन्यानंतर सांगतात थोड्या महिन्यानी आणा Happy

अंधेरी वेस्ट्ला सात बंगला.

Pages