मुलांना लिहायला शिकवण्यासाठी - योग्य वेळ, पद्धत ?

Submitted by सावली on 27 June, 2011 - 21:56

मागे मराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात
या धाग्यावर मराठी वाचनाचा प्रश्न विचारला होता. आणि त्यावर छान उत्तरेही मिळाली होती. लेक आता थोडफार वाचते आहे. Happy

आता लिहायचे शिकवण्या संबंधी प्रश्न आहे. हा इंग्रजी आणि मराठी दोन्ही लिखाणासाठी आहे.
१. लिहायला शिकवायला योग्य वय काय?
२. शाळेत पहिलीला लिहिता येणे खरच अपेक्षित असते का? कितपत?
३. लिहायला शिकवायला कशी सुरुवात करावी?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी.. खरे तर play group चा उद्देशच तो आहे. आम्ही तर म्हणतो .. शिशु वर्गात मुले पाठवायची ती शी किंवा शु झाली आहे ते third personला कसे सांगावे याचीच training देण्यासाठी..:)

नंदिनी, हो, नक्की उपयोग होईल तेव्हा नक्की पाठव तिला. त्यांनाही एका वयानंतर बरोबरीच्या मुलांशी खेळण्याची मानसिक गरज असते.

हे कुठे विचारु समजत नाहिये.
लिहायला वाचायला शिकवण्या बद्दल च्या सतिशच्या पोस्ट्स ना अनुमोदन.
माझ्या लेकाला गेली दोन वर्षे असेच फोनिक्स वगैरे शिकवले शाळेत. तो रायन ला आय सी एस ई ला आहे. कर्सिव्ह राईटींग स्मॉल कॅपिटल आणि थ्री लेटर वर्ड्स वगैरे एक्दम छान लिहितो सुंदर अक्षरात कर्सिव्ह.
पण आता पहिलित जाउन गेल्या पंधरा दिवसात खूपच कंटाळलाय. रोज उठून भरपूर राईटींग. Uhoh
एक तर आता सायन्स, कंप्युटर, इंग्लिश आणि ग्रामर आणि काय काय सहा सात विषय.
रोज भारंभार स्पेलिंग्स ३ वेळा लिहायला सांगताहेत. ओरली तो सगळी सांगतो अगदी बरोबर. पण लिहिताना गड्बड होतेय. आणि टिचर बाई अजिबात कंसिडर करत नाहियेत. Angry

Computer, Reflection, information, strawberry, electricity, electronic ह्या प्रकारची मोठ्ठी स्पेलिंग्ज त्याला मी उचाराप्रमाणे कशी लक्षात ठेवायची ते शिकवलेय. छान जमलेही. नविन स्पेलिंग्ज तो स्वतः सांगायचा प्रयत्न चांगला करतोय. पण लिहिताना एखादं अक्षर विसरणं किंवा cursive लिहिताना tion electricity reflection अश्या मोठ्या स्पेलिन्ग्ज मध्ये टी ची आडवी रेघ विसरली तरी डिक्टेशन ला मार्क्स न देणं कितपत योग्य आहे ? मुलांकडून किती अपेक्षा ठेवाव्यात. आणि तिन अक्षरांवरून इतकी मोठी स्पेलिंग्ज् लगेच पहिलिच्या सुरुवातीला ? सगळ्याच शाळांना की आयसीएसईला असं आहे ?

रोज उठून भरपूर राईटींग. >>> electronic ह्या प्रकारची मोठ्ठी स्पेलिंग्ज >>> डॅफो... पहिलीच्या मुलांसाठी हा फारच भयानक प्रकार आहे... भले तो मुलगा ते तन्मयतेने शिकत असेल.

शाळा बदला किंव बाई बदलायची मागणी करा. >>> अनुमोदन.

नंदिनी,
सुनीधी कधी होइल १.५० वर्षाची? मला वाटतं, तु तिला पुढच्या जुन पासुन घालावे. कारण २.५० पुर्ण झाल्याशिवाय नर्सरी मध्ये घेत नाहीत. डिसेंबर पासुन जर ती प्ले-ग्रुप मध्ये गेली तर १:५० वर्ष प्ले-ग्रुप मध्ये जाइल. त्यापेक्शा घरी मस्त मज्जा करु दे. एकदा का शाळा सुरु झाली की आहेच आयुष्यभरा साठी.

डॅफो, अशा वेळेला मुलांचा कंटाळवाणा होम वर्क स्वत: लिहिणे हा एक पर्याय आहे.

कितीही चुकीचा पर्यात वाटत असला तरी अधूनमधून असं केल्याने "आपली आई/बाबा आपला अभ्यास शेअर करतात" हे मुलाना समजतं. "एवढं तरी तू लिहिलंच पाहिजेस" या बाबतीत मात्र ठाम राहायला हवं. त्याचबरोबर कागदावर काय लिहिलय त्यापेक्षा त्याच्या डोक्यात किती शिरलय याला जास्त महत्व देणे अपेक्षित असते, हे समजणारे शिक्षक दुर्मिळ होत चाललेत. वाचन हा प्रकार होमवर्कमधून जवळ जवळ नाहीसा होत चाललाय असा माझा तरी अनुभव.

निकिता, मी तिला साडेतीन वर्षानंतरच नर्सरीमधे घालेन. (जुलैचा जन्म) तरी तवर तिला इतर मुलाबरोबर कम्युनिकेशन जमावे असा माझा उद्देश आहे. शाळा म्हणून नव्हे, तर भरपूर मस्ती करण्यासाठीच तिला प्ले ग्रूपमधे घालायचा विचार आहे. कुणाला झी किड्स, वगैरे प्ले ग्रूप चेनचा अनुभव आहे का?

झी किड्स >> किड्झी का?

तिथे माझी मुलगी जाते. ह्या वर्षापासुन २.२ नंतर. चांगला टाइमपास आहे. खेळण वगैरे. कम्युनिकेशेन इतक्यात कळणार नाही. पण बाकि मजा असते. सॅण्ड गेम, स्प्लॅश गेम वगैरे चालु असते. मध्ये मध्ये अभ्यास वगैरे. सध्यातरी मला बरं वाटतयं. महाग आहे. ३२०००+ वर्षाचे.

मुलांचा कंटाळवाणा होम वर्क स्वत: लिहिणे हा एक पर्याय आहे. >> हे मी सुद्धा केले आहे. प्ले गृप - नर्सरीमध्ये कन्यारत्न लिहायचा कंटाळा करायची आणि तिचा अभ्यास घेण्याची जबाबदारी मॅडमनी माझ्यावर सोपवली होती.. तेव्हा मी सरळ पेन्सिल डाव्या हातात पकडुन तीचा होमवर्क कंप्लिट करायचो. डाव्या हाताने लिहिल्याने अक्षर तिच्या सारखेच यायचे..:)

डाव्या हाताची आयडीया लै भारी. हो डोक्यात जाणे महत्वाचे. पण त्यांनाही थोड्या लिखाणाची सवय हवी ना.
@ नंदिनी, किडझी चांगली आहे. ठाणे शाखेत माझा मुलगा जायचा.
@ निकिता - ३२??? मी २१ भरले होते. अजुन आधी नंबर लावायला हवा होता असे मला तेव्हा वाटले होते. आता वाटते, हरकत नाही. Happy

निकिता - ३२??? मी २१ भरले होते...

हे कधी? गेल्यावर्षी ३० होते बहुतेक? एरिआ प्रमाणे बदलतं का?

म्हणजे दोन वर्षांपुर्वी. बापरे दोन वर्षात १०००० वाढ्ले...देवा..

पोरीच शिक्षण होइपर्यंत तरी नोकरी करावीच लागणार बहुतेक Happy

किडझी, युरो किड्स अश्या चेन्स चा (प्रत्यक्ष अनुभव नसला तरी) त्यांच्या फी मध्ये एरीया/शहर वाईज थोडाफार फरक असतो, फ्रँचाईझी चे लोकेशन, फॅसिलिटीज, एरीया याप्रमाणे, असे मला वाटते.

मवाला अनुमोदन,
कीड्झी युरोकिडस फ्रँचाईझी तत्त्वावर चालतात. कोणीही उठुन जागा घेऊन, त्यांचे नाव विकत घेऊन शाळा चालवू शकते. त्यामुळेच महाग/ पॉश लोकॅलिटींमध्ये त्यांच्या फिया जास्त असतात. Happy
मला मुळातच ज्या शाळा स्वतःला विक्री तत्वावर/ भाडे तत्वावर चालवतात त्यांच्याबद्दल थोडीशी शंका आहे.
तसेच पुढे काय होते या शाळांमधील मुलांचे? पहिलीपासून या शाळांमधील मुले कुठे शिकतात ?

एवढ्या प्रचंड प्रमाणात ट्रीहाऊस, कीडझी, युरोकिडस आणि तत्सम यात पैसा गुंतवते आहे ते का? या मागील अर्थकारण काय याचा विचार व्हायला हवा. Happy

डॅफो पहीलीला लिखाण वाढते पण असे आणि एवढे नाही. माझी पण ICSE लाच आहेत.
ही फारच मोठी स्पेलिंगज आहेत ग. माझ्या मुलांच्या शाळेत अशी ३-३ वेळा पण लिहून घेत नसत.

माझी लेक टिचरला सांगून येईल.. माझा हात दुखताना तू मला अस लिहायला सांगते ना ते राँग आहे.. आता तुला गनेष क्रॉस देणार! Proud

जाजु Lol
आमच्याकडे उलटाच प्रकार आहे. कितीही झोप आली तरी त्याला स्वतःलाच सगळं लिहायचं असतं. Happy
आणि मग लिहिताना प्रत्येकवेळी म्हणत रहतो .. तु टीचर ला नोट लिहुन विचार मला खुप राईटींग का देतात.
मी भेटणार आहेच टिचरला. आणि कदाचित त्यालाही तो पर्यंत सवय होईल. मागच्या वर्षीच्या मुलांची पुस्तके चेक केली. पुसतके आणि विषय बदलले आहेत. मग भेतावेच लागेल शाळेत जाउन.

<<ट्रीहाऊस, कीडझी, युरोकिडस आणि तत्सम यात पैसा गुंतवते आहे >> मला वाटतं त्यांना मार्केटिंग चांगल कळलय. भारताबाहेरचे शिक्षण कसे असते ते आता जे लोक बाहेर जाऊन आले आहेत त्यांना कळतं. मग तसेच काहीतरी भारतातही हवे असते, जे चांगलेच आहे. या ट्रीहाऊस, कीडझी सारख्या कंपन्यांना ( फ्रँचाईझी आहेत म्हणजे कंपन्याच) हि मागणी कळली, त्यातला बिझनेस दिसला. लोक अशा प्रकारच्या शिक्षणासाठी पैसे द्यायला तयार आहेत हे ही त्यांनी बघितले. म्हणुन ते भरपुर पैसे घेऊन अशा शाळा देतात. एका दृष्टीने चांगलेच आहे कारण हळु हळू हे लोण सगळ्याच शाळात पसरु शकते, आणि एकुणच प्रायमरी शिक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. फक्त त्यांच्या भरमसाठ फियांचेही लोण पसरायला नको

डॅफोडिल्स , खरच जाऊन भेट शाळेत.
जाइजुई Lol

मला किड्झी, युरोकिड्स सारख्या चकचकीत प्रिस्कूल्स नाही आवडली.. कारण आव कितीही आणला तरी आयाबाई भारतीयच असते नि टिचरपण.. ह्या शाळांनी टिचिंग चे ६ आठवड्यांचे कोर्स काढलेत.. त्यात शिकलेल्या बायकाच तिथे टिचर असतात बरेचदा.

एकादी चांगलं इन्फ्रा असलेली वसंतविहार, गोकुळधाम सारखी शाळा त्यापेक्षा बरी असते शैक्षणिक दर्जासाठी. पण एक मेन फायदा आहे की ३२००० ही परवडणारे पालक तुमच्याच आर्थिक गटातून असतात.. त्यामुळे साधारण सेम आर्थिक गट, बौद्धिक गट मुलांना मिळण्याच प्रमाण जास्त असते.

जाजुला अनुमोदन.
आणि त्या फार चकचकीत असतात शिवाय करिक्युलम भारतीय करायचे विसरुन जातात. म्हणजे Asparagus ही भाजी भारतात किती टक्के लोकं खातात? तिन वर्षाच्या मुलाला ती शिकवुन काय उपयोग. माझ्या एका मित्राला साऊथ बॉम्बे मधील असल्याच फ्रँचाईझी शाळेने क्लीन बोल्ड केले.
त्यांचे म्हणणे A for Apple वगैरे साध्या गोष्टी तुम्ही घरी करुन घ्या. आम्ही A for Asparagus वगैरे exotic गोष्टी शाळेत करुन घेतो. Proud

माझी मुलगी फक्त प्ले-ग्रुप साठी किड्झी मध्ये जात आहे. माझ्या साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जवळ असण. आणि हि शाळा मला खरच आवडली. १:५० २ वर्षांच्या मुलांना A for apple वगैरे पण फारसं शिकवत नाहीत. इकड तिकड्च्या गोष्टी, भाज्या फळ असं सगळ सांगतात. मुलं शाळेत जाउन मस्त पैकी खेळतात. जे मला फार आवडलं. मुलांच्या कलाने घेतात.

पुढ्च्या वर्षी कुठल्या शाळेत हा गहन प्रश्न आहे माझ्या साठी. अंधेरी पश्चिम साठी कुणाला माहित आहे का?

भवन्स कॉलेजच्या शेजारी मुलींसाठी राज हंस CBSE बोर्डाची शाळा आहे... १८,०००/- वार्षिक फी आणि वेळ ९.४५ ते ३.१० आहे. तिथेच मुलांसाठी हंस राज SSC बोर्डाची शाळा आहे.

मला तरी इतर प्ले स्कुल व किडझी मधे फरक जाणवला. मुल पाळणा घरात जाते व शाळेत जाते यात फरक हवा. हो मी भरपुर आभ्यासासाठी नाही म्हणते. पण ते जे करतात शाळेत ते पाळणाघराहुन निराळे हवे. त्या बाबतीत माझा किडझी चा अनुभव चांगला आहे. तरी माझ्या मुलाबरोबर ज्यांचे दुसरे मुल होते ते म्हणत की त्या वर्षी शाळेने जास्त अ‍ॅक्टीवीटी नाही घेतल्या. (नोट ते वर्ष त्या ब्रँचचे शेवटचे होते.) असे असुन जर मी खुश आहे तर प्रत्यक्षात किती जास्त अ‍ॅक्टीवीटी त्या पालकांच्या १ल्या अप्त्याच्या वेळी असतील माहित नाही.

मला तरी इतर प्ले स्कुल व किडझी मधे फरक जाणवला. >>> मलापण. मला ट्री हाउस फारस आवडलं नाही. खुप गर्दि वाटली तिथे.

निकिता, अंधेरीत इस्टला चालणार असेल तर त्रिधा म्हणून शाळा आहे. ज्यांच्याबद्दल बरंच चांगलं ऐकून आहे. एका मित्राचा मुलगा आणि दुसर्‍या एका मित्राची मुलगी पण त्याच शाळेत जाते. दोघांकडून खूप चांगलं ऐकतेय शाळेबद्दल. अगदी मित्राचा मुलगा नर्सरीला होता तेव्हापासून.

प्ले स्कूलला पाळणाघर हा पर्याय नाहीये.. पण चांगली शाळा आहे.

ठण्याच्या ट्री हाऊसमध्ये माझी पुतणी आणि मैत्रिणीचा मुलगा जात होते. पण बेसिक सू चे स्किलदेखिल त्यांच्या त्यांच्या केद्राने घेतले नव्हते. मूल १५ दिवस येत नसेल तर का आले नाही इ. पण विचारत नव्हते.
२५००० च्या घरात फी होती. प्रवासाची सोय खास नव्हती. युरो स्कूल वसंत विहारचा फीडबॅक पन असाच होता. मुलं टिचरना अ‍ॅटॅच झाली नव्हती. नाश्ता काही केंद्रात होता तर काही केंद्रात मुलांना आणायचा होता.

निमो रेनबो प्रीस्कूलमध्ये जात होती. हे शाळेशी अ‍ॅटॅच आहे. तिथे १६०००/- फी होती. नाश्ता शाळा देते. लेक सू होतेय हे सांगायला शिकली नीट.. तसेच सू बाथरूममध्ये करावी व नंतर फ्लश करावेच हे शिकली. प्रवासासाठी बस होती ज्यात २ ताया आणि १ दादा असत. ह्याचे पैसे वेगळे घेतले होते. ते मुलांना नीट चढवून, उतरून घेत. खूप अ‍ॅक्टिविटीज असायच्या.. तिचे रिझल्ट कार्ड नीट अ‍ॅनालाईझ करून दिले होते. लेकीला अजुनही प्लेगृपच्या टिचरची नावे आठवतात.. त्यांना ती मिस करते. एकंदर अनुभव छान होता.

४ ही मुले त्याच स्किल लेवलवर आहेत म्हणुन माझे असे मत बनलेय.

त्रिधा कुठे आहे. अंधेरी इस्ट खर तर खुप लांब पडेल मला. इतका प्रवास ह्या वयात मुलांनी करु नये. अगदिच आदर्श नाही पण बरी शाळा घराजवळ मिळाली तर बरं.

माझ्या बिल्डिंग मधली काही मुलं सांताक्रुझला पोद्दारला पण जातात. मला नाही जमणार लेकिला इतक्या दुर पाठवायला...

Pages